The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुहम्मद अली बॉक्सिंगमध्ये किंग तर होताच पण त्याला दोन वेळा ग्रॅमी’चं नामांकनही मिळालं होतं

by Heramb
30 September 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एखाद्या माणसाने मनात आणलं तर तो काय काय करू शकतो याची अनेक उदाहरणं आपण दैनंदिन जीवनात आणि इतिहासात बऱ्याचदा पाहतो. काही व्यक्तिमत्वं ही अष्टपैलू असतात. हा बदल त्यांच्यामध्ये एका रात्रीत होत नसतो, त्यामागे कित्येक महिन्यांची तपश्चर्या असते. संपूर्ण जगात, विशेषतः कला आणि क्रीडा क्षेत्रात असे हिरे आपल्याला सापडतात. असाच एक हिरा म्हणजे मोहम्मद अली.

मोहम्मद अलीची क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील कामगिरी प्रसिद्ध आहे. तो एक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता, हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन, मानवतावादी, नागरी हक्क कार्यकर्ता होता. इतकंच नाही तर सन १९६४ आणि १९७६ साली त्याचे नामांकन ग्रॅमी पुरस्कारासाठीही झाले होते. अली तीन वेळा जागतिक हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला बॉक्सर होता. त्याचे मूळ नाव ‘कॅसियस मार्सेलस क्ले ज्युनियर’ होते.

कॅसियस मार्सेलस क्ले ज्युनियर दक्षिण अमेरिकेत मोठा झाला. त्याचे वडील, कॅसियस मार्सेलस क्ले सीनियर यांनी होर्डिंगची कामे करून पत्नी आणि दोन मुलांचे संगोपन केले. त्याची आई, ओडेसा ग्रेडी क्ले गृहिणी होती. जेव्हा क्ले १२ वर्षांचा होता, तेव्हा त्याने जो मार्टिन नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगला सुरुवात केली.

बॉक्सिंगमध्ये एका विशिष्ट श्रेणीत प्रवेश केल्यानंतर त्याने रोममधील ऑलीम्पिक स्पर्धांमध्ये १७५ पौंड विभागात सुवर्णपदक जिंकले आणि लुईसविले स्पॉन्सरिंग ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली आपल्या व्यावसायिक कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत त्याच्या बॉक्सिंगच्या कौशल्यांपेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वासाठी तो प्रसिद्ध झाला.



“फुलपाखरासारखा विहार करणे, मधमाशीसारखा डंक मारणे” अशा काहीशा साहित्याच्या दृष्टीने अपरिपक्व, स्वतःचे वर्णन करणाऱ्या कवितेच्या ओळी त्याने रचल्या आणि त्यांमधून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. २५ फेब्रुवारी १९६४ रोजी क्लेने सोनी लिस्टनला जगातील हेवीवेट चॅम्पियनशिपसाठी आव्हान दिले.

लिस्टनला त्याच्या काळातील सर्वात शक्तिशाली बॉक्सर म्हणून ओळखले जात असे. परंतु क्रीडा इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे लिस्टनने अवघ्या सहा फेऱ्यांनंतर आपला हा नावलौकिक गमावला आणि त्याच्या जागी कॅसियस मार्सेलस क्ले ज्युनियर नवीन चॅम्पियन बनला.

या सामन्यानंतर दोन दिवसांनी क्लेने इस्लामी राष्ट्रीय शिकवण स्वीकारल्याची घोषणा करून बॉक्सिंग जगताला पुन्हा धक्का दिला. ६ मार्च १९६४ रोजी त्याने त्याच्या धार्मिक गुरु एलिजा मुहम्मदने दिलेले, मोहम्मद अली हे नाव घेतले. पुढील तीन वर्षांसाठी, अलीने बॉक्सिंगमध्ये कोणत्याही सर्वोत्तम बॉक्सरसारखेच भव्य वर्चस्व गाजवले. २५ मे १९६५ रोजी त्याचा पुन्हा लिस्टनविरुद्ध सामना झाला. यावेळीही त्याने लिस्टन विरोधात मोठे यश संपादित केले.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

त्यानंतर फ्लोयड पॅटरसन, जॉर्ज चुवालो, हेन्री कूपर, ब्रायन लंडन आणि कार्ल मिल्डनबर्गर अशा दिग्गज बॉक्सर्सवरसुद्धा त्याने विजय मिळवला. १४ नोव्हेंबर १९६६ रोजी अलीने क्लीव्हलँड विल्यम्सशी लढा दिला. तीन फेऱ्यांच्या दरम्यान अलीने १०० हून अधिक ठोके मारले, चार वेळा त्याने प्रतिस्पर्ध्याला नॉकडाउन केले आणि एकूण तीन वेळा प्रतिस्पर्ध्याचा ठोका खाल्ला. या चमत्कारिक विजयानंतर एर्नी टेरेल आणि झोरा फॉली यांच्यावरही त्याने विजय मिळवला.

त्यानंतर, २८ एप्रिल १९६७ रोजी, त्याच्या धार्मिक विश्वासांचा हवाला देत, अलीने व्हिएतनाममधील यु*द्धादरम्यान अमेरिकन सैन्यात भरती होण्यास नकार दिला. या नाकाराच्या १४ महिन्यांपूर्वी त्याने एक स्पष्ट वक्तव्य दिले होते, “माझे व्हिएटकोंगशी कोणतेही भांडण नाही!”. याच वक्तव्याचे त्याने अचूकरीत्या अनुसरण केले.

याविरुद्ध बहुतेक अमेरिकन नागरिकांनी व्हिएतनाम यु*द्धाला पाठिंबा दिल्याने अलीच्या भूमिकेचा तीव्र निषेध झाला. शिवाय, धार्मिक श्रद्धेच्या आधारावर लष्करी सेवेतून त्याने सूट मिळवली असली, तरी तो अशा सुटींसाठी पात्र नव्हता. कारण त्याने इस्लामच्या तथाकथित पवित्र आणि अंतिम यु*द्धात सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली होती.

पण या वादामुळे त्याला आपली चॅम्पियनशिप गमवावी लागली. अमेरिकेतील प्रत्येक राज्यातून त्याला साडेतीन वर्षांसाठी बॉक्सिंगच्या स्पर्धांमधून वगळण्यात आले. याशिवाय, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला. २० जून १९६७ रोजी अमेरिकेच्या सैन्य दलात प्रवेश नाकारल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. चार वर्षांच्या मोठ्या आणि अवघड प्रक्रियेनन्तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आणि त्याला सोडण्यात आले.

अमेरिकेमध्ये १९६० चे दशक अत्यंत गुंतागुंतीचे होते. एकीकडे अमेरिकन समाजावर अलीचा प्रभाव वाढत होता आणि याचवेळी त्याच्यावर सतत सैन्यात भरती व्हायच्या नाकारामुळे आरोप होत होते. कृष्णवर्णीय लोकांच्या अभिमानाचा आणि गौरवर्णीयांच्या वर्चस्वाला कृष्णवर्णीय लोकांच्या प्रतिकाराचा अलीचा संदेश ‘नागरी हक्क चळवळी’ला खतपाणी घालणारा ठरला.

अमेरिकन सैन्यात भरती होण्याच्या नकारानंतर “जोपर्यंत तुमच्याकडे कोणाला संपवण्याचे योग्य कारण नाही तोपर्यंत यु*द्ध चुकीचे आहे.” या भूमिकेवर तो ठाम होता. कृष्णवर्णीय कार्यकर्ते ज्युलियन बॉण्डच्या मते जेव्हा महंमद अलीसारख्या वीर आणि लोकप्रिय व्यक्तीने सैन्यात जाण्यास नकार दिला तेव्हा समाजातील अनेक लोकांनीही याचेच अनुसरण केले.

ऑक्टोबर १९७० मध्ये अलीला बॉक्सिंगमध्ये परतण्याची परवानगी देण्यात आली. पण तोपर्यंत त्याचे कौशल्य जवळ जवळ नष्ट झाले होते. त्याच्या प्रतिक्षेप (रिफ्लेक्सेस) अजूनही उत्कृष्ट असताना, ते पूर्वीइतके जलद नव्हते. अलीने जेरी क्वेरी आणि ऑस्कर बोनावेनाविरुद्ध पहिल्या दोन पुनरागमन लढतींमध्ये विजय मिळवला.

यानंतर त्याने ८ मार्च १९७१ रोजी फ्रेझियरला आव्हान दिले. अलीच्या अनुपस्थितीत तो हेवीवेट चॅम्पियन बनला होता. ही ऐतिहासिक प्रमाणांची स्पर्धा होती. यालाच “शताब्दीची लढाई” असे म्हटले जाते. फ्रेझियरने १५ फेऱ्या एकमताने जिंकल्या.

फ्रेझियरला हरवल्यानंतर अलीने सलग १० लढती जिंकल्या, यापैकी ८ जागतिक दर्जाच्या बॉक्सर्सविरोधात होत्या. यानंतर ३१ मार्च १९७३ रोजी केन नॉर्टन नावाच्या नवख्या आणि अद्याप प्रसिद्धी न मिळालेल्या बॉक्सरने १२ फेऱ्यांच्या अस्वस्थ निर्णयाच्या दुसऱ्या फेरीत अलीचा जबडा तोडला. यानंतर मात्र अलीने नॉर्टनला या सामन्यात पराभूत केले.

नॉर्टनच्या पराभवानंतर अलीने पुन्हा फ्रेझियरला आव्हान दिले आणि १२ फेऱ्या एकमताने त्याने जिंकल्या. बॉक्सिंग मधून बेदखल झाल्यानंतर त्याची ही पहिलीच सर्वोत्तम कामगिरी होती. ३० ऑक्टोबर १९७४ रोजी अलीने जॉर्ज फोरमॅनला आव्हान दिले. जॉर्ज फोरमॅनने १९७३ साली फ्रेझियरला हरवून हेवीवेट चॅम्पियन होण्याचा प्रयत्न केला होता.

हा सामना, (ज्याला अलीने “रंबल इन द जंगल” असे संबोधले आहे) सध्याच्या कांगो रिपब्लिक मधील झैरे येथे झाला. अलीला झैरेच्या लोकांनी विजेता नायक म्हणून स्वीकारले आणि त्याने हेवीवेट शीर्षक पुन्हा मिळवण्यासाठी आठव्या फेरीत फोरमॅनला बाद करून ते शीर्षक मिळवलेही. या लढाईतच अलीने माजी बॉक्सिंग ग्रेट आर्ची मूरने वापरलेली रणनीती वापरली. मूरने युक्तीला “कासव” म्हटले पण अलीने त्याला “रोप-ए-डोप” म्हटले.

अलीने कधीही ग्रॅमी जिंकली नसली तरी त्याचा संगीताचा वारसा कायम आहे. त्याला वैशिष्ट्यपूर्ण आणि यमकांवर आधारित आधुनिक काळातील रॅपस्पर्धांचा (रॅपबॅटल्स) अग्रदूत म्हणून उद्धृत केले गेले आहे आणि हेवीवेट चॅम्पियनला ‘चक डी’सारख्या कलाकारांनी हिप-हॉपचा पायनियर म्हणून श्रेय दिले आहे.

पुढील ३० महिन्यांत, चॅम्पियन म्हणून त्याच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या अलीने नऊ वेळा बॉक्सिंगमध्ये मुकाबला केला. यामुळेच तो एक धाडसी पण हळूहळू आपल्या कौशल्यांच्या बाबतीत कुठेतरी मागे पडणारा बॉक्सर असल्याचे दिसून आले. यापैकी सर्वात लक्षणीय घटना १ ऑक्टोबर १९७५ रोजी घडली.

अली आणि जो फ्रेझियर तिसऱ्यांदा बॉक्सिंग करण्यासाठी फिलिपिन्समध्ये भेटले. काहींच्या मते ही आतापर्यंतची सर्वात मोठी ‘प्राईज-फाईट’ मानली जाते. म्हणजे या प्रकारच्या स्पर्धा नियमांनुसार खेळल्याच जातात असं नाही पण जिंकणाऱ्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवून दिला जातो. या सामन्यात तब्बल १४ फेऱ्यांनंतर अलीला विजेता म्हणून घोषित करण्यात आले.

लिस्टन -टार्टरपेक्षा कठोर स्पर्धकांचा सामना करण्यासाठी तो रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये परतल्यानंतर १९७६ साली अलीसाठी दुसरे ग्रॅमी नामांकन घोषित करण्यात आले. “द ॲडव्हेंचर्स ऑफ अली अँड हिज गँग व्हर्सेस मिस्टर टूथ डेके” मध्ये त्याच्या मौखिक स्वच्छतेसाठी  ओळखल्या जाणाऱ्या बॉक्सरने मुलांसाठी मौखिक स्वच्छतेचा प्रसार केला. फ्रँक सिनात्रा आणि स्पोर्टस्कास्टर हॉवर्ड कोसेल यांचा आवाज असलेल्या अल्बमला सर्वोत्कृष्ट मुलांच्या रेकॉर्डिंगसाठी ग्रॅमी मान्यता मिळाली.

१९७८ मध्ये त्याला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता पण बॉक्सिंगमध्ये नव्या असलेल्या लिओन स्पिंक्सकडून पराभूत व्हावे लागले. आतापर्यंत लिओन स्पिंक्सने केवळ ७ व्यावसायिक लढती दिल्या होत्या. सात महिन्यांनंतर अलीने स्पिंक्सवर १५ फेऱ्यांच्या विजयासह अलीने पुन्हा विजेतेपद मिळवले. मग तो बॉक्सिंगमधून निवृत्त झाला.

पण दोन वर्षांनी कोणाच्यातरी चुकीच्या सल्ल्याने त्याने पुन्हा बॉक्सिंगमध्ये पदार्पण केले. क्रूर ११ फेऱ्यांनंतर थांबलेल्या फाईटमध्ये लॅरी होम्सच्या हातून त्याला भयंकर मारहाण झाली. अलीच्या कारकीर्दीतील अंतिम स्पर्धेत, १९८१ साली तो पराभूत झाला. इतके असूनही बॉक्सिंगच्या इतिहासातील अलीचे सर्वात महान खेळाडू म्हणून स्थान आजही सुरक्षित आहे.

३७ नॉकआऊट्सह ५६ विजय आणि ५ पराभवांचा त्याचा शेवटचा विक्रम इतर बॉक्सर्सनेही केला आहे, परंतु त्याच्या विरोधकांची गुणवत्ता आणि त्याच्या काळात त्याने ज्या पद्धतीने वर्चस्व गाजवले, त्यामुळे त्याचे बॉक्सिंगच्या इतिहासातील स्थान अढळ आहे.

बॉक्सिंग कौशल्यातील अलीचे कौतुकात्मक गुण म्हणजे वेगवान गती, उत्कृष्ट हालचाल करण्याची पद्धत आणि प्रतिस्पर्ध्याने मारलेला पंच सहन करण्याची क्षमता. पण कदाचित त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्याकडे धैर्य आणि सैनिकांसारखेच इतर गुण होते, ज्यामुळे तो एक उत्तम बॉक्सर आणि खेळाडू बानू शकला.

बॉक्सिंगमधून निवृत्ती घेतल्यानंतरची काही वर्षे अलीसाठी शारीरिकदृष्ट्या अत्यंत कष्टदायक होती. डोक्याला मार लागल्याने त्याच्या मेंदूला झालेल्या नुकसानामुळे वाणीवर परिणाम झाला, हालचाल मंदावली आणि पार्किन्सन सिंड्रोमची इतर लक्षणे दिसू लागली. तथापि, त्याची स्थिती क्रॉनिक एन्सेफॅलोपॅथी किंवा डिमेंशिया पुगिलिस्टिक (ज्याला सामान्यतः फायटर्समध्ये “पंच ड्रंक” असे संबोधले जाते) पेक्षा वेगळे होते, कारण त्याला दुखापतीमुळे बौद्धिक क्षमतेच्या कमतरतेचा त्रास झाला नाही.

अलीचे धार्मिक विचार देखील कालांतराने दृढ झाले. १९७० च्या मध्यावर त्याने कुराणाचा गंभीरपणे अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि तो मूलतत्त्ववादी इस्लामकडे वळला. १९८४ साली, अली लुईस फरखानच्या फुटीरतावादी सिद्धांताच्या विरोधात जाहीरपणे बोलला आणि घोषित “तो जे शिकवतो त्यावर आमचा विश्वास नाही. तो अंधारात आमच्या संघर्षाचा काळ आणि आमच्यामध्ये गोंधळाचा काळ आहे, आणि आमचा त्याच्याशी काहीएक संबंध नाही. ”

१९९६ साली जॉर्जिया मधील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पियाडच्या गेम्सच्या सुरुवातीला ऑलिम्पिक ज्योत पेटवण्यासाठी अलीची निवड झाली. त्यानंतर जगातील सर्वात प्रिय खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची स्थिती निश्चित झाली. १९९० मध्ये अली  इंटरनॅशनल बॉक्सिंग हॉल ऑफ फेमच्या उद्घाटन वर्गाचा सदस्य होता आणि २००५ मध्ये त्याला ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ देऊन सन्मानित आले.

२००१ मध्ये त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. १९६४ ते १९७४ या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींवर आधारित हा चित्रपट होता.  यामध्ये विल स्मिथने बॉक्सर म्हणून भूमिका केली होती. आय एम अली (2014) या डॉक्युमेंटरी चित्रपटात त्याच्या जीवनाची कथा सांगितली गेली आहे, ज्यात त्याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंग आणि त्याच्या अंतरंगांच्या मुलाखतींचा समावेश आहे.

अशा या झंझावाती व्यक्तित्वाचा अंत वयाच्या ७४व्या वर्षी २०१६ साली अमेरिकेतील ऍरिझोना येथे झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकन सैन्याची फेव्हरेट असलेली एम-१६ राय*फल एवढी विशेष का आहे..?

Next Post

‘किस ऑफ लाइफ’ या फोटोनं जगभरातील लोकांचा वीज कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

'किस ऑफ लाइफ' या फोटोनं जगभरातील लोकांचा वीज कर्मचाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला

अमेरिकन शेअर बाजारात लिस्ट झालेल्या या भारतीय कंपनीने ५०० कर्मचाऱ्यांना करोडपती बनवलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.