The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका भूकंपाने अवघ्या २३ सेकंदात संपन्न शहराचं मातीच्या ढिगाऱ्यात रूपांतर केलं..!

by Heramb
25 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


नैसर्गिक आपत्ती कधी आणि कशी येऊ शकते याचा परिपूर्ण अंदाज माणूस किंवा कोणतेही यंत्र अचूकपणे लावू शकत नाही. आजतर जागतिक तापमानवाढ आणि बदलत्या हवामानामुळे कधीही पाऊस पडून पूर येऊ शकतो तर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीही साचू शकतं. यामुळे अनेक आयुष्यं उ*द्ध्वस्त  होतात. जपान तर त्सुनामी आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठीच अस्तित्वात आहे की काय असे कित्येकदा वाटते. पण मानवी इतिहासातील सर्वांत भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक म्हणजे १९०८ साली इटलीतील मॅसेलिना येथे आलेला भूकंप!

डिसेंबर १९०८ मध्ये युरोपमधील सिसिलीचे दुसरे सर्वांत मोठे शहर मेसिनावर मोठी नैसर्गिक आपत्ती आली. याची सुरुवात भूकंपापासून झाली पण हे सगळं प्रकरण तिथेच थांबलं नाही. २८ डिसेंबरच्या पहाटे, मेसिना शहरात सुमारे ७.५ रिश्टर स्केलचा भूकंप आला. या भूकंपाचे धक्के तब्बल २३ मिनिटे बसत होते. जमीन स्थिरावेपर्यंत, शहरातील सुमारे ९१ टक्के इमारती, दगडी घरे, वसाहती, वाडे जमीनदोस्त झाले होते. 

मेसिना सामुद्रधुनी हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रेजिओ-डी-कॅलब्रिया आणि मेसिना, या मेसिना सामुद्रधुनीवरील एकमेकांकडे तोंड करून वसलेल्या दोन्ही शहरांनी त्यादिवशी प्रचंड विनाश अनुभवला. या दोन मुख्य शहरांबरोबरच आजूबाजूची इतर लहान शहरे आणि गावांनासुद्धा या भूकंपाचा फटका बसला. मेसिना शहर कायमचेच बदलले गेले. प्रमुख ऐतिहासिक आणि राजकीय इमारती कोसळल्या. नॉर्मन कॅथेड्रल आणि रेल्वे स्टेशनसुद्धा कोसळले. इतकेच काय तर किनारपट्टीची रचना देखील बदलली गेली. किनारपट्टीचे मोठे भाग पाण्याखाली कैक फूट बुडाले.



जमिनीच्या प्रचंड भयानक थरथरण्याने शहरातील गॅसच्या टाकीचा स्फो*ट झाला. अनेक शॉर्ट सर्किट्सच्या घटना घडल्या. त्या शॉर्ट सर्किट्समुळे लागलेली आग शहरात सगळीकडे पसरत गेली. आगीच्या या घटनांमध्ये भाजून आणि धुरामुळे अनेक जणांचे जीव गेले. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे मेसिना आणि रेजिओ डी कॅलाब्रियाच्या किनारपट्टीवरून पाणी अचानक वाढू लागले आणि भूकंपाच्या सुमारे १० मिनिटांनंतर १७ मीटर उंच त्सुनामी रेजिओ डी कॅलब्रियाच्या किनाऱ्यावर धडकली आणि संपूर्ण शहरच उ*द्ध्वस्त झाले. तसेच त्सुनामीची ही लाट मेसिनाच्या किनारपट्टीलासुद्धा धडकली आणि जहाजे तसेच उरल्या-सुरल्या इमारती उ*द्ध्वस्त झाल्या.

२७ डिसेंबरच्या संध्याकाळी, ज्युसेप्पे व्हर्डीचा “आयडा” व्हिटोरिओ इमानुएल २ थिएटरमध्ये सादर केला जात होता. यामुळे शहराबाहेरील असंख्य पाहुणेसुद्धा शहरात राहत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून २० मिनिटांनी भूकंप झाला, तेव्हा मेसिनाची १ लाख ६० हजार इतकी अधिकृत लोकसंख्या अक्षरशः बुडाली. भूकंपाच्या वेळी बहुतेक लोक साखरझोपेत होते. संपूर्ण गोंधळात आणि अंधारात कोणाला प्रतिक्रिया देण्याची संधीच मिळाली नाही. बहुतेक लोक प्रचंड मलब्याखाली दबले गेले आणि काही मिनिटांत कैक लोक मारले गेले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

इमारती कोसळत होत्या, शहरात सर्वत्र आगी लागल्या होत्या. हॉटेल ट्रिनाक्रियासुद्धा कोसळले, यामध्ये टेनोर अँजेलो गाम्बा (ज्यांनी आधीच्या संध्याकाळी “आयडा”  सादर केले होते) आणि त्यांचे दोन मुलगे मृत्युमुखी पडले. सोप्रानो (शास्त्रीय गायन करणारी स्त्री) पाओला कोरलेक मात्र भूकंपाच्या संकटातून वाचली. भूकंप झाला तेव्हा ती जागी होती आणि तिने तिच्या खोलीच्या खिडकीतून उडी मारली. तिचे दोन्ही हात मोडले, पण जीवावरचं हातांवर निभावलं..

पीडितांमध्ये इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. पोलीस प्रमुख, तसेच जवळजवळ संपूर्ण पोलीस दल, मेसिनाचे अटॉर्नी जनरल, अमेरिकन कॉन्सुल आणि त्यांची पत्नी, फ्रेंच कॉन्सुल आणि त्यांची मुले, माजी अमेरिकन व्हाईस -कॉन्सुल आणि त्याचे कुटुंब, तसेच अनेक इटालियन साहित्यिक आणि खानदानी लोकांची या भूकंपात जीवित हानी झाली.

सुरुवातीच्या धक्क्याने सर्वाधिक जीव घेतले, परंतु आगीच्या घटना आणि भूकंपाच्या आफ्टरशॉक्समुळे मृतांची संख्या वाढतच गेली. कोसळलेल्या इमारतींमधून पळून जाण्यात यशस्वी झालेल्या बऱ्याच लोकांनी कोसळणारा मलबा आणि दगडांच्या भीतीने किनाऱ्याकडे धाव घेतली. पण लगेचच आलेल्या त्सुनामीमध्ये ते वाहून गेले. तुरुंगाची इमारतही भूकंपातून वाचली नाही. कैद्यांनी घरे आणि मृतदेहांची लू*ट सुरु केली. 

दळणवळण सेवा पूर्णपणे कोलमडल्यामुळे, उर्वरित जगाला २ डिसेंबरपर्यंत मेसिनापर्यंत पोहचण्यास आणि आवश्यक मदत पाठवण्यास वेळ लागला. यावेळी, लुटमार आणखी वाढली होती कारण कैद्यांना जवळच्या गावांतील काही गावगुंड सामील झाले होते. अखेरीस, इटलीने भूकंपग्रस्त भागात मार्शल लॉ घोषित केल्यानंतर सैन्याने ही लूटमार काहीच दिवसात थांबवली.

मदतकार्य एका आठवड्यापेक्षा अधिक काळ चालले, आपत्तीनंतर काही दिवसांनी मलब्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले. पण मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ७५ ते ८२ हजाराच्या दरम्यान पोहोचली. मेसिनाची आर्धी लोकसंख्याच या संकटांच्या मालिकेत वाहून गेली.

या भयानक घटनांनंतर मेसिनामधून मोठ्या प्रमाणात निर्वसन झाले आणि शहरात फक्त १९ हजार लोक राहू लागल्याने एकेकाळी बहरलेलं शहर ओसाड बनून गेलं. वाचलेल्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा कमी लोक शहरात राहत होते. तर मेसिनाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त दहा टक्के लोकांनी या शहरात पुन्हा वास्तव्य करायचं ठरवलं. बहुतेक वाचलेले लोक, त्यांचे नातेवाईक आणि घरे गमावून, सिसिली आणि इटलीमधील जवळच्या शहरांमध्ये गेले. काहींनी अमेरिकेत स्थलांतर केले.

मेसिनाला “स्मृतीहीन शहर” असेही म्हटले जाते. १९०८ साली मित्र-राष्ट्रांनी केलेल्या हवाई ह*ल्ल्यांमध्ये पुन्हा ऐतिहासिक इमारती नष्ट झाल्या. पण १९१० साली स्थलांतरितांचा ओघ आणि परतलेल्या मूळ रहिवाशांसह या शहराचा पुनर्जन्मच झाला. आज, युरोपमधील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती सहन केल्यानंतर एका शतकात, मेसिनाची लोकसंख्या २ लाख ३० हजारांपेक्षा वाढली आहे आणि सिसिलीच्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक जीवनात या शहराचे महत्वाचे स्थान आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

डॅनियल क्रेगला रॉयल नेव्हीमध्ये रियल लाईफ ००७ जेम्स बॉण्डचा किताब बहाल केलाय

Next Post

…जेव्हा धनदांडग्यांनी एकत्र येऊन सरकारच उलथवून टाकण्याचा कट रचला होता..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

...जेव्हा धनदांडग्यांनी एकत्र येऊन सरकारच उलथवून टाकण्याचा कट रचला होता..!

एअर लाईन्सची जाहिरात म्हणून विमानात गाईचं दूध काढण्याचा स्टंट केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.