The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या लोकांमुळे रेल्वेतल्या टॉयलेटमधला मग साखळीने बांधून ठेवलेला असतो

by द पोस्टमन टीम
21 April 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


बरेचदा चोरी करण्यामागे देखील वेगवेगळी कारणं असतात. काही लोक पैशाची निकड असते म्हणून चोरी करतात, काही लोक थ्रिल म्हणून चोरी करतात. काही लोक असे देखील असतात ज्यांना वस्तू चोरी करायची सवय जडलेली असते. काही लोक तर फक्त दुसऱ्याला त्रास देण्याचा उद्देशाने चोरी करतात.

एखाद्या व्यक्तीच्या वस्तूला त्याच्या परवानगीशिवाय आपल्या ताब्यात घेणे आणि ती परत न करणे, ही चोरीची सर्वसाधारण व्याख्या आहे. ‘चोरी’ हा शब्द जेव्हा आपल्या कानांवर पडतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर घरफोडी, बँक लुटणे, पाकिटमार यांचे चित्र उभे राहते. आपला असा सर्वसामान्य ग्रह असतो की चोरी फक्त मोठमोठ्या व महागड्या वस्तूंची करण्यात येते. पण, चोरी अगदी कशाचीही करता येते.

लोक अगदी कसलीही चोरी करू शकतात. मोठमोठ्या घरातील सोने, चांदी, महागडे मोबाईल इत्यादींपासून ते रेल्वेमध्ये मिळणाऱ्या चादर, उशीपर्यंत, इतकेच नाही काही लोक तर रेल्वेच्या संडासमध्ये साखळीने बांधलेल्या मगची देखील चोरी करतात.

आता कुठल्याही उपयोगाचा नसलेल्या मगला चोरून या चोरांना काय मिळते काय माहिती, पण तरीदेखील लोक अशा चोऱ्या करतात.

दारू व सिगारेटप्रमाणे चोरीचा देखील नशा असतो. अनेक लोक फक्त रोमांचकारी अनुभव म्हणून चोरी करतात. चोरी केलेल्या वस्तूंचा काही उपयोग असो अथवा नसो, पण चोरी करून मिळणारे समाधान या लोकांसाठी महत्त्वाचे असते.



चोरी करण्याची नशा असणे हे एक मानसिक आजाराचे लक्षण आहे. क्लिप्टोमेनिया असे या आजाराचे नाव असून अनेक मोठं मोठ्या कुख्यात चोरांना हा आजार होता.

ज्या लोकांना चोरी करण्याच्या वेळी जबरदस्त तणाव व उत्तेजना असते, असे लोक क्लिप्टोमेनियाने बाधित असतात. या लोकांना चोरी करताना एक विलक्षण आनंद आणि मनःशांती प्राप्त होत असते. बऱ्याचदा चोरी केल्यानंतर या चोरांना पश्चाताप देखील होत असतो.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

सरकारी संपत्तीची चोरी करणाऱ्या लोकांना आपल्या या कृतिमुळे राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान होते आहे, याची साधी जाणीव देखील नसते. हे लोक काहीही तोडतात आणि अगदी कशाचीही चोरी करतात. बऱ्याचदा रेल्वेत चोरी करणाऱ्या लोकांना हे माहिती नसते की ते ज्या वस्तूची चोरी करतायत, ती त्यांच्याच पैशातून खरेदी करण्यात आली आहे. ते ज्या तिकिटाचे पैसे भरतायत, त्याच पैशातून त्यांना या सुविधा पूरवल्या जात आहेत. आपल्यामुळे आपलेच नुकसान होते, याची जाणीवही त्यांना नसते.

बरेच लोक तर रेल्वेच्या टॉयलेटमधील मग चोरी करत नाहीत पण फक्त त्यांची वृत्ती अशी असते की ते रेल्वेच्या मालमत्तेची तोडफोड करतात. अनेक लोक आपला राग सार्वजनिक संपत्तीवर काढतात, यामुळे सरकारला, पर्यायाने सामान्य माणसालाच, याचा भुर्दंड बसतो.

बऱ्याचदा काही टोळ्या मुद्दाम रेल्वेमधील सामानाची चोरी करत असतात. हे टोळीवाले या वस्तू चोरी करून भंगारात विकतात आणि त्या माध्यमातून पैसे कमावतात. आजही अशा अनेक टोळ्यांना रेल्वे पोलीस जेरबंद करत असतात.

चोरी करण्याचा हा ‘आजार’ त्या व्यक्तीसाठी आणि त्याच्या आजूबाजूंच्या केवढा भयंकर असेल नाही?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

संतांचे आखाडे काय असतात, त्यांचा उद्देश काय..? जाणून घ्या कुंभमेळ्याबद्दलच्या गोष्टी

Next Post

जग बदलून टाकणारे हे शोध लावून संशोधकांनाच पश्चाताप झाला होता

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

जग बदलून टाकणारे हे शोध लावून संशोधकांनाच पश्चाताप झाला होता

नेहरूंनी तीन मूर्ती भवनाचा बगीचा उखडून तिथे शेती केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.