The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा युट्युबर सात मिनिटांसाठी सगळ्यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता

by द पोस्टमन टीम
18 February 2022
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


अब्जाधीश होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अब्जाधीश झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्व सुविधांसह मिळणारं विलासी जीवन जगण्याचा मोह कुणाला नाही होणार? मात्र, अब्जाधीश होण्याचा मार्ग नक्कीच सोपा नसतो. त्यासाठी काही लोकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ खर्ची घालावा लागतो. जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा विचार केल्यास जेफ बेझोस, एलॉन मस्क, बिल गेट्स यासारख्या दिग्गज उद्योजकांचा त्यामध्ये समावेश होतो. या लोकांनी यशाचं शिखर गाठण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेलं आहे. त्यानंतर त्यांना श्रीमंती अनुभवण्यास मिळत आहे.

सध्या टेस्लाचे भागीदार आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. मात्र, युकेतील एका युट्युबरनं मस्कला मागे टाकल्याचा दावा केला आहे.

ब्रिटनमधील मॅक्स फॉश या युट्यूबरनं एका व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, तो अवघ्या सात मिनिटांसाठी जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनला आहे. 

मॅक्स फॉशनं आपल्या चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, त्यानं एकट्यानं 500 अब्ज पौंडची कंपनी उघडली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्या संपत्तीपेक्षा ही संपत्ती दुप्पट आहे. मस्कला मागे टाकल्याचा दावा करणारा हा मॅक्स फॉश आहे तरी कोण? आणि त्याच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा….

मॅक्सिमिलियन आर्थर फॉश एक ब्रिटिश युट्युबर आणि रेडिओ प्रेझेंटर आहे. पूर्वी त्याला ‘स्ट्रीटस्मार्ट’ या नावानं ओळखलं जाई. त्याचं चॅनल मूळतः एका वेब सिरीजसाठी समर्पित होते ज्यामध्ये त्यानं विद्यापीठातील विद्यार्थी आणि पादचाऱ्यांची मुलाखत घेतली होती. परंतु, आता तो इतर सिरीज आणि कन्टेंटकडं वळल्यानं त्याचं री-ब्रँडिंग झालं आहे. त्यानं २०१७मधील शरद ऋतूपासून अपलोडिंग सुरू केली होती.



रेडिओ टायनेसाइड सोबत केलेल्या कामासाठी त्याला २०१७चा नॅशनल हॉस्पिटल रेडिओ अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट न्यूकमर’ हा अवॉर्ड मिळाला होता. लंडन आंतरराष्ट्रीय सुरक्षा प्रदर्शनात प्रवेश करणं, कारच्या वरील भागात सीव्ही छापणं आणि नंतर ती बीबीसीच्या मुख्यालयाबाहेर पार्क करणं, लंडनच्या महापौरपदासाठी उमेदवार म्हणून उभं राहणं यासारखे स्टंट त्यानं केलेले आहेत. त्याच्या या स्टंटची विनोदी माहिती त्याच्या चॅनेलवरील कंन्टेंटमध्ये दिसते.

मे २०२० मध्ये तो ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजनवर दिसला होता. तिथे त्यानं एका महिलेला शोधण्यासाठी आवाहन केलं होतं. यावर्षी जानेवारी महिन्यात त्यानं एक स्टंट आयोजित केला होता. ज्यामध्ये त्यानं युट्युब व्हिडिओचा भाग म्हणून एंजेल ऑफ द नॉर्थवर विनोद सादर केले होते. अशा या अतरंगी मॅक्स फॉशनं एलॉन मस्कला मागे टाकल्याचा दावा केला आहे.

मॅक्स फॉशनं नुकताच एक व्हिडिओ आपल्या युट्युब चॅनेलवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यानं दाखवलं आहे की, त्यानं ‘अनलिमिटेड मनी लिमिटेड’ नावाची कंपनी कशी सुरू केली. मॅक्सनं आपल्या कंपनीची ‘मॅकरोनी नूडल्स बनवणारी कंपनी’ अशी नोंदणी केली आहे. त्यानं आपल्या या कंपनीचं 10 अब्ज शेअर्सदेखील इश्यू केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानं आपल्या प्रत्येक शेअरची किंमत 50 पौंड इतकी निश्चित केली होती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आपल्या कंपनीच्या शेअर्सची विक्री कशी करायची हे मॅक्ससमोर मोठं आव्हान होते. त्यासाठी मॅक्स स्वतः बाहेर पडला आणि रस्त्याच्या कडेला टेबल-खुर्ची लावून आपल्या कंपनीचे शेअर्स लोकांना विकण्याचा प्रयत्न करू लागला. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर एका महिलेने मॅक्सच्या अनलिमिटेड मनी लिमिटेड नावाच्या कंपनीचे शेअर्स विकत घेण्याचं मान्य केलं.

त्यानंतर मॅक्सनं त्याच्या कंपनीची खरी किंमत जाणून घेण्यासाठी शेअर्सची कागदपत्रं आणि इतर आवश्यक कागदपत्र अथॉरिटीकडे पाठवले. त्यानंतर सुमारे दोन आठवड्यांत मॅक्सला अथॉरिटीकडून एक पत्र मिळालं. ज्यामध्ये कंपनीचे मूल्य 500 अब्ज पौंड असल्याचं सांगण्यात आलं. हा आकडा एलॉन मस्कच्या एकूण संपत्तीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. याचाच अर्थ तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता. 

मात्र, त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण, मॅक्सकडं त्याचे 500 अब्ज पौंड सिद्ध करण्यासाठी कोणताही रेव्हेन्यू किंवा प्रॉडक्ट सपोर्ट नव्हता, म्हणून त्याला त्याची कंपनी त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात आले. असं करण्यात अयशस्वी झाल्यास त्याच्यावर फ्रॉडचा गुन्हा दाखल झाला असता. पत्र मिळताच मॅक्सनं आपल्या कंपनीतील एकमेव गुंतवणूकदार महिलेशी बोलून कंपनी बंद केली. असं करण्यासाठी त्यांना फक्त सात मिनिटे लागली. मॅक्स फॉशचा हा व्हिडिओ आतापर्यंत ७ लाख १९ हजार ८५० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवत व्हायरल झाला आहे.

सध्या एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी ॲमेझॉनचे मालक जेफ बेझोझला मागे टाकत मस्कनं हे स्थान मिळवलं होतं. एलॉन मस्क टेस्ला या इलेक्ट्रिक कंपनीमध्ये भागीदार आहे तर स्पेस एक्स या रॉकेटनिर्मिती कंपनीचा मालक आहे. २०१८मध्ये मस्क टेस्लाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाला होता.

यावर्षाच्या सुरुवातीला देखील मस्कची कंपनी जबरदस्त नफा घेऊन आली आहे. नवीन वर्षात शेअर बाजाराच्या पहिल्या दिवशी मस्कच्या उत्पन्नात ३२.६ अब्ज डॉलरची (सुमारे २.४२ लाख कोटी रुपये) वाढ नोंदवली होती. सोबतचं त्यांनं ३०० अब्ज डॉलर्सचा (सुमारे २२.३५ लाख कोटी रुपये) टप्पा पार केला होता. मस्ककडं आता इजिप्त, पोर्तुगाल, झेक रिपब्लिक, ग्रीस, कतार आणि फिनलंड सारख्या देशांच्या वार्षिक जीडीपीपेक्षाही जास्त संपत्ती आहे. एकूणचं जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी मस्कनं आपल्या आयुष्यातील मोठा कालावधी खर्च केला आहे. अशा मस्कला मॅक्स फॉशनं मागे टाकल्याचा दावा केला होता. मात्र, त्याचा हा दावा अवघ्या काही मिनिटातच फोल ठरला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

Explainer: समान नागरी कायदा म्हणजे काय? देशात समान नागरी कायद्याची गरज आहे का?

Next Post

भारताला सध्या भेडसावणारी एक महत्वाची समस्या म्हणजे ब्रेन ड्रेन..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

भारताला सध्या भेडसावणारी एक महत्वाची समस्या म्हणजे ब्रेन ड्रेन..!

फ्रेनॉलॉजी - कवटीचा आकार आणि मानवाचा स्वभाव यांचा संबंध दाखवणारे स्युडो सायन्स

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.