The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तिला ‘फाशीची शिक्षा’ भोगून झाल्यानंतर, उर्वरित आयुष्य जगण्याची परवानगी देण्यात आली होती

by Heramb
4 October 2024
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


युरोपातील, विशेषतः इंग्लंडमधील ‘पॉश’ जीवनमान सर्वांच्याच आवडीचे आहे. एडिनबर्गचा ग्रासमार्केट जिल्हा नाईट लाईफमुळे पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे. ग्रासमार्केट एडिनबर्ग किल्ल्याजवळ आहे आणि एक ऐतिहासिक स्थळसुद्धा आहे. याठिकाणी कोबेलस्टोन दगडांनी तयार केलेल्या रस्त्यांची आणि जुन्या पब्सची काहीच कमतरता नाही.

याठिकाणी एक ऐतिहासिक फाशीची जागा देखील जतन केली गेली आहे. ही जागा सार्वजनिक पद्धतीने फाशीची  शिक्षा देण्यासाठी वापरली   जात असे. ही हँगिंग साइट आजच्या कथेसाठी महत्त्वपूर्ण असून हे ठिकाण मॅगी डिक्सन नावाच्या महिलेमुळे प्रसिद्ध आहे.

मार्गेरेट ‘मॅगी’ डिक्सनचा जन्म मसलबर्ग येथे १७०२ साली झाला आणि तिचे लग्न एका नाविकशी झाले होते. न्यू कॅसलमध्ये स्वतःसाठी काम शोधत असलेल्या तिच्या पतीने अचानक मॅगीचा त्याग केला. त्याने तिला सोडले नव्हते पण फक्त काही काळासाठी तो निघून गेला होता असा काहींचा अंदाज आहे. पण हे निश्चित नाही. तिचा नवरा गेल्यानंतर, मॅगी केल्सोला गेली आणि एका हॉटेलमध्ये काम मिळाले. ती त्या हॉटेलमध्येच राहत होती.

आपली नोकरी आणि प्रतिष्ठा आपण गमावू अशी भीती मॅगीला वाटत होती आणि म्हणूनच तिला ते बाळ नको होते. मुलाचा जन्म अकाली आणि खराब तब्येतीत झाला होता, असेही म्हटले जाते. मॅगीला हा जन्म आणि गर्भधारणा गुप्त ठेवायची असल्याने ती जवळच्या तलावाकडे गेली. कोणालातरी हे मूल सापडेल आणि ते जिवंत राहील या आशेने तिने मुलाला तलावाजवळ सोडले. पण तिच्या दुर्दैवाने, अनेक दिवसांनंतर एक मृत अर्भक त्याठिकाणी सापडले.

तिच्या शेजाऱ्यांना तिच्या गरोदरपणाची खात्री असल्याने, स्थानिक पोलिसांनी मॅगीला अटक केली. तिला गर्भधारणा लपवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि तिच्यावर एडिनबर्ग येथे चाचणी घेण्यात आली. अखेर मुलाच्या मृत्यूसाठी तिला आरोपी ठरवले गेले. मुलाच्या मृत्यूला मॅगी थेट जबाबदार आहे असा निष्कर्ष लोकांनी काढला. पण याची पर्वा न करता, मॅगी ती निर्दोष असल्याचा दावा करीत होती. पण, ती दोषी आढळल्याने तिला सार्वजनिक फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सार्वजनिक फाशीची अंमलबजावणी सप्टेंबर १७२४ मध्ये एडिनबर्गच्या ग्रासमार्केट जिल्ह्यात झाली.



ज्या वेळी मॅगीला फाशी द्यायची होती, त्या वेळी फाशी देण्याची लाँग ड्रॉप पद्धत सुरू झाली नव्हती. लोकांना सामान्यत: शॉर्ट ड्रॉप पद्धतीचा वापर करून फाशी देण्यात येत होती, यामुळे मान मोडून आणि तात्काळ फाशी देण्याऐवजी व्यक्तीचा गुदमरून मरण्यावर अधिक भर दिला जात होता.

मॅगीला फाशी दिल्यानंतर तिची हालचाल थांबेपर्यंत वाट पाहिली गेली. त्यानंतर त्यांनी तिला फाशीवरून उतरवून शवपेटीत ठेवले गेले. मॅगीचे शरीर दफन करण्यासाठी तयार होते. स्मशानात जाताना, पॉलबेरर्सनी एका पबमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने एक पॉलबेरर धूम्रपान करण्यासाठी बाहेर गेला.

त्याने शवपेटी हलवताना पाहिले आणि आतून येणाऱ्या किंकाळ्या ऐकल्या. घाबरलेल्या त्या पॉलबेररने आपल्या सहकाऱ्यांना घडलेली घटना सांगण्यासाठी पबमध्ये धाव घेतली. ते सर्व धावत बाहेर आले आणि शवपेटीची तपासणी केल्यावर त्यांना मॅगी जिवंत असल्याचे आढळले.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

या घटनेने परिसरातील सर्वांना स्तब्ध केले. हा एक चमत्कार आहे आणि देवाकडून मॅगीला जगू देण्याचे चिन्ह आहे असा काही लोकांनी दावा केला. म्हणूनच, मॅगी डिक्सनला तिची ‘फाशीची शिक्षा’ भोगून झाल्यानंतर, कायद्याच्या कोणत्याही अडचणीशिवाय आपले उर्वरित आयुष्य जगण्याची परवानगी देण्यात आली.

मॅगी पुन्हा आपल्या पतीकडे गेली आणि त्यांनी पुन्हा लग्न केले. फाशी झाल्यानंतर तिने संपूर्ण देशभरात एक ‘लिजेंडरी’ दर्जा मिळवला आणि ‘हाफ हँगिट मॅगी’ नावाने प्रसिद्ध झाली. ‘द मॅगी डिक्सन पब’च्या उद्घाटनाने ग्रासमार्केटमध्ये तिचे आयुष्य कायमचे अमर झाले आहे. आज, हाफ हँगिट मॅगीची कथा एक सांस्कृतिक वारसा बनली आहे. एडिनबर्गातील ग्रासमार्केटला भेट देताना ही गोष्ट नक्की लक्षात असावी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फोन केल्यावर किंवा उचलल्यावर आपण ‘हॅलो’च का म्हणतो?

Next Post

विश्वास बसणार नाही, पण हे अदृश्य शिल्प एका माणसाने १८ हजार डॉलर्सला खरेदी केलंय

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

विश्वास बसणार नाही, पण हे अदृश्य शिल्प एका माणसाने १८ हजार डॉलर्सला खरेदी केलंय

न्यूझीलँड तर सगळ्यांना माहिती आहे, पण ओल्ड झीलँड कुठे आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.