The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मॅरेथॉनची सुरुवात होण्यामागे हा इतिहास आहे

by द पोस्टमन टीम
10 December 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


फक्त वजन कमी करण्यासाठी म्हणून अनेक जण सकाळी उठून धावायला जातात. धावण्यामुळे वजन कमी होतेच पण, शरीराला चपळाई आणि मजबुती देखील येते. पण, फक्त वजन कमी करण्यासाठी धावणे आणि धावण्याची आवड किंवा पॅशन असते म्हणून धावणे यात जमीन-आस्मानचा फरक असतो. मॅराथॉनसारख्या लांब पल्ल्याच्या स्पर्धेत तेच यशस्वी होतात ज्यांना धावण्याची आवड असते, धावणे ही त्यांची पॅशन असते.

जागतिक पातळीवर सन्माननीय समजल्या जाणाऱ्या ऑलम्पिक खेळातही मॅराथॉन या क्रीडा प्रकाराचा समावेश केला जातो. यामधे स्पर्धकाला जवळपास ४० किमीचे अंतर पार करावे लागते. ऑलिम्पिकमधे खेळल्या जाणाऱ्या या खेळाचा जन्म ग्रीकमधेच झाला. या खेळाला ऑलम्पिकपेक्षाही जुना आणि मोठा इतिहास आहे.

हा खेळ कसा सुरु झाला? पहिला मॅराथॉन रनर कोण होता, इथपासून ते मॅराथॉन ही ४० किमीका असते? जाणून घेऊया या लेखातून.

जुन्या काळात ग्रीकमधे ज्या ऑलम्पिक स्पर्धा भरवल्या जात त्यामध्ये मॅराथॉनचा समावेश नव्हता. इसपू ४९० मधे पर्शियन सैन्य अथेन्सवर हल्ला करण्याचा इराद्याने मॅराथॉनमध्ये दाखल होण्यास सज्ज झाले होते. ही बातमी अथेन्सला पोचवण्यासाठी ग्रीक सैन्यातील फेडीपाइड्स मॅराथॉनपासून स्पार्टापर्यंत धावत आला होता.



२६० किमीचे हे अंतर त्याने दोन दिवसांत पूर्ण केले होते. या युद्धात ग्रीक सैन्याला विजय मिळाला होता पर्शियन सैन्याला या युद्धात पराभव स्वीकारावा लागला. विजयाची ही बातमी देण्यासाठी दोन दिवस न थांबता पळालेला तो सैनिक स्पार्टामधे पोहोचला तेव्हा त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली होती.

त्याचा श्वास जोरजोरात चालू होता, घसा कोरडा पडला होता. तरीही त्याने कशीबशी आपल्या विजयाची बातमी दिली आणि ही बातमी देताच तो खाली कोसळला आणि मरण पावला. सलग दोन दिवस अंगावर चिलखत, हातात तलवार, पायात जड पादत्राणे अशा सगळ्या साहित्यानिशी पाळलेला त्या सैनिकाचा मृत्यू होणे साहजिकच होते. पण, त्याने केलेली कामगिरी असामान्य होती.

हा फेडीपाइड्सच होता ग्रीकमधील पहिला मॅराथॉन रनर. फेडीपाइड्सचे स्मरण आणि त्याला अभिवादन देण्यासाठीच पुढे जाऊन ऑलिम्पिकमधेही या खेळाचा समावेश करण्यात आला. याची सुरुवातच मॅराथॉनपासून झाली होती म्हणून या खेळाला मॅराथॉन असे नाव पडले.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

पूर्वीच्या ऑलिम्पिक खेळात धावणे हा एक प्रमुख प्रकार होता. मात्र सुरुवातीला लांब पल्ल्याच्या शर्यती घेतल्या जात नसत. सुरुवातीच्या १३ ऑलिम्पीयाडमध्ये धावण्याच्या शर्यती या कमी अंतराच्या असत. सुरुवातीचा हा ट्रॅक सरळ रेषेत होता आणि या शर्यतीचे अंदाजे अंतर होते १९२ मैल.

हळूहळू ऑलिम्पिकमधील या शर्यतींचे अंतरात आणखी आणखी भर पडत गेली. डायऑलास शर्यतीत स्टेडियमच्या दुप्पट अंतरावर पाळायचे होते. तर डॉलीचोस ही लांब पल्ल्याची शर्यत होती ज्यात २० किंवा २४ मैल अंतराचा समावेश होता. आजवर ऑलिम्पिकच्या इतिहासात होऊन गेलेला सर्वोत्कृष्ट धावपट्टू म्हणजे लिओनिडास ऑफ ऱ्होड्स. याने चार ऑलिम्पिकमधे सलग तिन्ही प्रकारच्या शर्यतीत भाग घेऊन तिन्ही शर्यतीत विजय मिळवला होता. विशेष बाब म्हणजे या तिन्ही प्रकारच्या स्पर्धा एकाच दिवशी होत असत.

इसपू १६४ ते इसपू १५२ दरम्यान झालेल्या चार ऑलम्पिकमधे त्याने सलग यश मिळवले होते. एकाच दिवसात सलग तीन स्पर्धा जिंकण्यासाठी किती शारीरिक मजबुती आणि क्षमता कमावली असेल याची कल्पनाच केलेली बरी. पुढील चारही ऑलम्पिकमधे त्याने या कामगिरीत सातत्य ठेवले होते. सलग चार ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने ही असामान्य कामगिरी करून दाखवली होती. त्याच्या देशवासीयांच्या नजरेत तर तो हिरो ठरला होता. लोक अक्षरश: त्याची पूजा करत असत.

१८९६ साली आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होईपर्यंत मॅराथॉन हा प्रकार आजच्या रुपात विकसित झाला नव्हता. पहिल्या ऑलिम्पिकमधे मॅराथॉनचे अंतर हे ४० किमी म्हणजे अंदाजे २५ मैल होते.

मॅराथॉन ते अथेन्स दरम्यानचे अंतर २५ मैल आहे म्हणून मॅराथॉनचे अंतरही २५ मैलच ठेवण्यात आले. १९०८ साली लंडन येथे भरलेल्या ऑलिम्पिकमधे पहिल्यांदाच मॅराथॉनचे अंतर वाढवून ते २६ मैल करण्यात आले.

पूर्वी ऑलिम्पिकमधे महिलांना स्थान नव्हते, पण त्यावेळी ऑलिम्पिकदरम्यान त्या त्यांचा स्वतंत्र उत्सव साजरा करत. याला हेरैया म्हटले जात असे. हेरैया म्हणजे हेरा देवतेच्या आदराप्रीत्यर्थ भारावलेला उत्सव. हा उत्सवही चार वर्षातून एकदाच साजरा केला जात असे आणि या उत्सवात फक्त धावण्याचाच खेळ प्रकार घेतला जात असे. धावण्याची ही स्पर्धा तीन वेगवेगळ्या वयोगटात विभागली होती. या स्पर्धेत जिंकणाऱ्या मुलीला हेरा देवतेला बळी दिलेल्या प्राण्याचे मांसाचा काही वाटा बक्षीस म्हणून मिळत असे. ऑलिम्पिक विजेत्यांना त्यांचा पुतळा बनवून घेण्याची परवानगी असे, तसेच या विजेत्या मुली देखील आपली प्रतिमा बनवून ती हेरा देवतेच्या मंदिरात तिच्या मूर्तीशेजारी ठेऊ शकत होत्या.

स्पार्टातील मुलीही या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलांप्रमाणेच शारीरिक कसरत करत असत. स्पार्टामधे अशी समजूत होती की, एक धष्टपुष्ट आईच धष्टपुष्ट मुलाला जन्म देऊ शकते. मुलगा जर जन्मत:च धष्टपुष्ट असेल तर तो पुढे जाऊन एक धाडसी सैनिक बनू शकतो. म्हणून तिथे मुलींकडूनही खडतर पद्धतीने शारिरीक मेहनत करून घेतली जात असे.

१९८४ पासून ऑलिम्पिकमधे महिला स्पर्धकही भाग घेऊ लागल्या. अमेरिकेच्या जॉन बेनॉइट हिने ऑलिम्पिक रनरचे पहिले सुवर्णपदक जिंकले होते.

आज फक्त ऑलिम्पिकच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी मॅराथॉन स्पर्धा भरवल्या जातात. जगभरातील अनेक लोक हौसेने या स्पर्धांमधे भाग घेतात. लांब पल्ल्याच्या या शर्यतीत नुसते पळणे हेच एकमेव उद्दिष्ट असते. कुणाला मागे टाकायचे म्हणून किंवा कुणाला गाठायचे म्हणून नाही तर कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर पार करण्यासाठी खेळाडू या स्पर्धेत उतरतात.

विविध विषयांवर जागृती घडवून आणण्यासाठीही आज मॅराथॉन स्पर्धा भरवली जाते. स्पर्धेदरम्यान थोड्या थोड्या अंतरावर स्पर्धकांसाठी खाण्या-पिण्याचीही व्यवस्था केलेली असते.

पूर्वी खेळातही करिअर होऊ शकते ही कल्पना कोणत्याही पालकांना अजिबात रुचत नसे. आज मात्र पालक स्वतः मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. पी. टी. उषा, हिमा दास अशा अनेक अथलेट्सनी मुलींसमोरही एक चांगले उदाहरण आणि आदर्श निर्माण केला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

श्रीलंकेच्या वर्ल्डकप विनिंग टीमचा हिस्सा असलेला सुरज सध्या ऑस्ट्रेलियात बस चालवतोय

Next Post

ही आहे जगातील सगळ्यात महागड्या चहांची यादी, यातला तुम्ही कुठला प्यायला आहे का..?

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

ही आहे जगातील सगळ्यात महागड्या चहांची यादी, यातला तुम्ही कुठला प्यायला आहे का..?

कर्णन आवडलाय? मग साऊथ इंडियन चित्रपटांची ही यादी खास तुमच्यासाठी..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.