The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजही नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समनला ‘मांकडिंग’ची भीती वाटत असते..!

by द पोस्टमन टीम
6 May 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये ‘मांकडिंग’ या शब्दानं अनेकदा प्रेक्षकांचं लक्ष खेचून घेतलेलं आहे. यामध्ये बॉलरनं बॉल टाकण्यापूर्वीचं नॉन स्ट्रायकरला रनआऊट केलं जातं. जेव्हा गोलंदाजाला असं वाटतं की, नॉन-स्ट्रायकर क्रीजच्या खूप बाहेर येत आहे, तेव्हा तो नॉन स्ट्रायकर एंडच्या बेल्स उडवून त्याला बाद करू शकतो. गंमत म्हणजे यात बॉलची नोंद होत नाही पण विकेट मात्र, पडते. वर्षानुवर्षे त्याचा वापर आणि खेळाची नैतिकता याबाबत वाद कायम राहिला आहे. ‘मांकडिंग’चा जन्मदाता एक भारतीय क्रिकेटपटू आहे. ‘मांकडिंग’च्या उगमाची गोष्ट आणि त्याचा जन्मदाता दोघेही मनोरंजक आहेत. भारतीय क्रिकेटपटू विनू मांकड यांनी ‘मांकडिंग’चा पहिल्यांदा वापर केला होता.

२०२१ साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अगोदर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) सर्वोत्तम क्रिकेटपटूंची एक स्पेशल एडिशन ‘हॉल ऑफ फेम’ घोषित केली. या दहा दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये दिग्गज भारतीय माजी फिरकीपटू विनू मांकड यांचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोलाचं योगदान दिल्याबद्दल विनू मांकड यांना हा सन्मान मिळाला आहे.

सर लॅरी कॉन्स्टँटाईन (वेस्ट इंडिज), ऑब्रे फॉल्कनर (दक्षिण आफ्रिका), मॉन्टी नोबल (ऑस्ट्रेलिया), स्टॅन मॅकेब (ऑस्ट्रेलिया), टेड डेकस्टर (इंग्लंड), डेसमॉन्ड हेस (वेस्ट इंडिज), बॉब विलिस (इंग्लंड), अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे), कुमार संगकारा(श्रीलंका) या दिग्गज खेळाडूंसह विनू मांकड यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. त्यानिमित्त विनू मांकड आणि मांकडिंगबाबत हा विशेष लेख…

मुलवंतराय हिम्मतलाल मांकड असं खरं नाव असलेल्या विनू यांचा जन्म १२ एप्रिल १९१७ रोजी जामनगर येथे झाला. त्यांनी हायस्कूलमध्ये असल्यापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. याच काळात त्यांनी दिग्गज क्रिकेटपटू अल्बर्ट वेन्सली आणि केएस दुलीपसिंह यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवले. दुलीपसिंह हे महान फलंदाज रणजितसिंह (याच्या नावावरून रणजी ट्रॉफी असं नाव देण्यात आलं आहे) यांचे पुतणे होते. वेन्सली यांनी विनूला गोलंदाजी तर, दुलीपसिंह यांनी फलंदाजीचे धडे दिले होते. विस्डेन मासिकानं क्रिकेटपटूच्या दिलेल्या १९४७ च्या प्रोफाइलनुसार, मांकड यांनी त्यांच्या गोलंदाजीच्या यशाचं श्रेय वेन्सली यांना दिलेलं आहे. वेन्सली यांना भेटण्यापूर्वी विनू यांनी किशोरवयात लेगस्पिन गोलंदाजी केली होती. वेन्सली यांनी विनू मांकड यांना ‘स्लो लेफ्ट आर्म ऑथ्रोडॉक्स’ गोलंदाजी करण्यास भाग पाडलं, असं म्हटलं जातं.



नोव्हेंबर १९३५ मध्ये १८ वर्षीय मांकड यांनी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं. त्यांची सुरुवात काही विशेष नेत्रदीपक नव्हती. पहिल्याच सामन्यात मध्यमगती गोलंदाज रॉन ऑक्सेनहॅमनं त्यांना दोन्ही डावांत ८ आणि ४ धावांवर बाद केलं होतं. गोलंदाजी करण्याची तर संधीही मिळाली नाही. 

त्याचवर्षी डिसेंबरमध्ये पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यांतही त्यांचा तितकासा प्रभाव पडला नाही, कारण त्यांना एकही विकेट मिळाली नव्हती. त्यानंतरच्या रणजी हंगामात मात्र, मांकड यांना सुर गवसला. १९३६-३७ च्या रणजी करंडक स्पर्धेत मांकड यांनी बंगालविरुद्ध १८५ धावा केल्या. लॉर्ड टेनिसनच्या ‘लॉर्ड टेनिसन इलेव्हन’ या प्रसिद्ध क्रिकेट संघाच्या दौऱ्यादरम्यान (१९३७-३८) मांकड यांनी अष्टपैलू कामगिरी करून सर्वांचं लक्ष आपल्याकडं खेचून घेतलं. मांकड यांनी पाच अनऑफिशियल कसोटी सामन्यांमध्ये ६२.६६च्या सरासरीनं फलंदाजी आणि १४.५३च्या सरासरीनं गोलंदाजी केली. २० वर्षीय विनू यांचा खेळ पाहून लॉर्ड टेनिसन इतके प्रभावित झाले की, त्यांनी मांकडकडे जगातील सर्वोत्कृष्ट संघाचा भाग होण्याची क्षमता असल्याचं म्हटलं होतं.

दुसर्‍या महायु*द्धानंतर १९४६ च्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान मांकड यांनी अधिकृतपणे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दोन्ही डावांमध्ये भारतीय संघासाठी त्यांनी सलामीवीराची भूमिका निभावली आणि ४८ षटकांमध्ये एकूण १०७ धावा केल्या याशिवाय दोन बळी देखील घेतले. या सामन्यामुळं पुढे त्यांना संपूर्ण कारकिर्दीत अष्टपैलूची भूमिका पार पाडावी लागली. संघासाठी एक फलंदाज आणि गोलंदाजाचा दुहेरी भार त्यांनी आपल्या खांद्यांवर वाहिला.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

भारतीय व्यवस्थापनानं ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये त्यांना खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं. त्याच सामन्यात विनू मांकड यांनी ४६ षटके गोलंदाजी केली आणि पाच बळी घेतले. सातत्यपूर्ण कामगिरीमुळं त्यांना १९४७चा ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार देण्यात आला.

१९४७-४८मध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. याच दौऱ्यात जागतिक क्रिकेटला ‘मांकडिंग’ हा शब्द मिळाला. विनू मांकड यांनी क्रीजपासून दूर गेलेल्या बिल ब्राऊनला बाद केलं. यामुळं ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये खळबळ उडाली होती. त्यांनी मांकड यांच्या खेळ भावनेवर जोरदार टीका केली होती आणि माध्यमांनीच ‘मांकडिंग’ हा शब्द देखील तयार केला. 

मात्र, ऑस्ट्रेलियन कर्णधार डॉन ब्रॅडमन यांनी मांकडला पाठिंबा दिला होता. आपल्या ‘फेअरवेल टू क्रिकेट’ या आत्मचरित्रात देखील ब्रॅ़डमन यांनी म्हटलं आहे की, ‘विनू मांकड त्यावेळी योग्य होते. रन आऊट करण्यापूर्वी त्यांनी सर्वप्रथम ब्राऊनला इशारा दिला होता.’ अलिकडच्या काळात २०१९ मध्ये असा किस्सा आपल्याला पुन्हा पहायला मिळाला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी -20 सामन्यात नॉन स्ट्रायकर जोस बटलरलाही रविचंद्रन अश्विननं याच पद्धतीनं दूर केलं होतं.

त्यानंतर १९५२ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या लॉर्ड्स कसोटीत त्यांनी हरक्यूलियन टास्क पूर्ण केलं. या कसोटीला ‘मांकड टेस्ट’ असंही म्हटलं जात. लँकशायर लीगमध्ये हॅस्लिंगडेनशी झालेल्या करारामुळे विनू मांकड मूळ भारतीय संघाचा भाग नव्हते. याची भारतीय संघाला मोठी किंमत मोजावी लागली. भारताला चार दिवसातच सात गडी राखून पराभव स्विकारावा लागला. संघाचे व्यवस्थापक पंकज गुप्ता यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मांकडसाठी हॅस्लिंगडेनशी बोलणी करण्यास राजी केलं.

अनेक प्रयत्नांनंतर मांकड यांना लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची परवानगी मिळाली होती. पहिल्या डावात सलामीला येऊन मांकड यांनी अडीच तासात ७२ धावा केल्या. मात्र, सगळा संघ फक्त २३५ धावांवर बाद झाला. अडीच तास फलंदाजी करूनही त्यांनी गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली. ७३ षटके गोलंदाजी करून त्यांनी पाच बळी मिळवले. दुसऱ्या डावात त्यांनी तब्बल १८४ धावा करून दणदणीत सुरुवात करून दिली आणि २४ षटके गोलंदाजी केली. २५ तासांच्या खेळापैकी १७ तास मांकड मैदानावर होते. दुर्दैवानं हा सामना इंग्लंडनं आठ गडी राखून जिंकला. मात्र, मांकड यांच्या कामगिरीमुळं तो सामना त्यांच्या नावानचं ओळखला जातो.

त्यानंतर भारतीय संघातील एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्यांची जागा पक्की झाली होती. पाकिस्तान (१९५४-५५) आणि वेस्ट इंडीज (१९५८-५९) विरुद्ध दोन कसोटी मालिकांमध्ये त्यांना कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. मांकड यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या ४४ कसोटी सामन्यांमध्ये २ हजार १०९ धावा आणि १६२ विकेट्स मिळवल्या.

विनू मांकड हे भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होते. त्याकाळात त्यांनी केलेली कामगिरी भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची होती. विनू मांकड यांची कारकीर्द आजही कित्येक नवीन खेळाडूंना प्रेरणा देण्याचं काम करत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

लॉस एंजेलिसच्या डोंगरावर लावलेल्या HOLLYWOOD नावाच्या छेडखानीचे हे किस्से वाचाच

Next Post

एका श्रीलंकन सैनिकाने राजीव गांधींवर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देतानाच ह*ल्ला केला होता

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

एका श्रीलंकन सैनिकाने राजीव गांधींवर 'गार्ड ऑफ ऑनर' देतानाच ह*ल्ला केला होता

एका पिंजऱ्यात खुर्चीवर बसून एकाचवेळी १३ सिहांना तो आपल्या भोवती खेळवायचा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.