The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या नाशिकचा मॅग्नेटो डुप्लिकेट असेल पण हा मात्र शंभर टक्के खरा आहे..!

by द पोस्टमन टीम
10 June 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


कोरोनाची लस घेतल्यानंतर चमचे, सुरी इत्यादी गोष्टी एखाद्या चुंबकाला चिकटाव्या तशा नाशिकमधील एका माणसाच्या शरीराला चिकटत असल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होताना दिसत होतं. कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यावर अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सगळीकडे गोंधळ सुरु झाला.

यावेळी असा प्रश्न पुढे येतो की खरंच कोणाच्या शरीरात चुंबकीय शक्ती इतकी जास्तं असू शकते का?

याचं उत्तर मिळवण्यासाठी आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल.

आता जगभरात असे अनेक चित्रविचित्र लोक आढळतातच. त्यांच्या कारनाम्यांनी आपणच हैराण होतो.



पण एक माणूस असाही होता ज्याच्या शरीरात खरंच एवढी जास्तं चुंबकीय शक्ती होती ज्यामुळे कुठलाही धातू त्याच्या पोटाला चिकटून बसायचा. धातूच काय त्यानं तर मोठी बससुद्धा या शक्तीनं ओढून दाखवली आहे.

हा माणूस जो सगळीकडे मॅग्नेट मॅन म्हणून ओळखला जातो त्याचं नाव आहे, “ल्युव थो लीन”. या ल्युव थो लीनचा जन्म मलेशियामध्ये १९३० साली झाला. या रिअल लाईफ मॅगनेटोचं (X-Men वाला) संपूर्ण आयुष्य मलेशियामध्येच गेलं.

आधी एक ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या लीनला वयाच्या साठाव्या वर्षी आपल्याकडे अशी काहीतरी अद्भुत शक्ती असल्याची जाणीव झाली. सुरुवातीला तर लोखंडी रॉड शरीराला चिकटवून विटा उचलून नेण्याऱ्या लीनने थायलंडमधील एका माणसाचा लेख वाचला, ज्याच्या शरीराला पण असेच धातू चिकटत होते. मग त्यानं पण आपल्या शरीराला अजून काही चिकटू शकतं का बघितलं आणि तेव्हा त्याला ही कमाल गोष्टं लक्षात आली.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

छोट्या वस्तूंपासून सुरुवात करून हळूहळू त्यानं मोठ्या वस्तू पोटाला चिकटवून ठेवल्या. आता तो याचे जादूच्या प्रयोगासारखे प्रयोग करू लागला. लोकही ही “जादू” बघायला गर्दी करू लागले.

अक्षरशः दोन किलो वजनाच्या वस्तूपासून ते अगदी ३६ किलोची वस्तूसुद्धा तो सहज स्वतःकडे आकर्षित करू शकत होता.

कुऱ्हाड, हतोडी, मेटलच्या प्लेट्स, या गोष्टी तर सहज त्याच्या पोटाला जाऊन चिकटत असत. एकदा त्यानं मेटल प्लेटच्या सहाय्यानं एक मोठी सुटकेस ओढून घेतली होती. तर एकदा अशीच एका प्रयोगादरम्यान कार ओढून दाखवली होती.

एकदा त्याने एका चॅरिटीसाठी करण्यात आलेल्या प्रयोगात चक्कं एक बस एका चेनच्या सहाय्यानं ओढून दाखवली. तेही अवघ्या काही मिनिटांत! कमाल आहे नं! 

डिस्कव्हरी वाहिनीच्या “वन स्टेप बियॉंड” या कार्यक्रमात देखील लीनचे हे प्रयोग दाखवण्यात आले होते.

सगळ्यांनाच आश्चर्यात टाकणाऱ्या या माणसाबद्दल शास्त्रज्ञ आणि डॉक्टर लोकांना कुतूहल कसे वाटणार नाही? मलेशियातील यूनिवर्सिटी ऑफ़ टेक्नोलॉजीचे शास्त्रज्ञसुद्धा लीनची ही कमाल बघून थक्क झाले होते. त्यांनी डॉक्टरांची मदत घेऊन लीनची हरप्रकारे तपासणी केली. पण त्याच्या शरीरात असा कुठलाच चुंबकीय पदार्थ सापडला नाही, ज्याची लेव्हल सर्वसाधारणपेक्षा जास्त असेल. त्यामुळे शास्त्रज्ञांसाठी तरी तो काही मॅगनेट मॅन वगैरे नाहीये.

जरी त्यांना कुठलाच चुंबकीय पदार्थ सापडला नसला तरीदेखील एक गोष्टं लक्षात आली. ती म्हणजे ल्युवच्या शरीरात घर्षण शक्ती (फ्रीक्शन) इतरांच्या तुलनेत जास्तं आहे ज्यामुळे तो सक्शन पॉवर वाढते. यामुळेच तो या सगळ्या गोष्टी ओढू शकत असावा असा तर्क काढण्यात आला.

तसं बघायला जावं तर ल्युव अगदी एक सामान्य माणूसच आहे पण त्याच्याकडे असणाऱ्या शक्तीने त्याला जगावेगळा बनवला. त्याचं असं म्हणणं होतं की त्याच्या शरीरात अशी काही लहरी निघतात ज्यामुळे तो या गोष्टी स्वतःकडे आकर्षित करू शकायचा.

अर्थात, या सगळ्या मागचं नेमकं कारण काय होतं ते शेवटपर्यंत डॉक्टरांनाही कळलं नाही. पण हा एक जेनेटिक ट्रेट असावा कारण ल्युवच्या नातवंडांतही ही चमत्कारिक शक्ती आढळून आली आहे.

या रिअल लाईफ मॅगनेटोचं ९१व्या वर्षी निधन झालं.

आता आपल्या नाशिकमध्ये सापडलेला मॅगनेटो पण असाच आहे की कोरोनावरील लसीचे काही नवीनच साईड इफेक्ट्स आहेत हे तर आता तपासण्या झाल्यावरच लक्षात येईल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

फिलिपिन्सच्या या शिक्षिकेने २०० जपानी सैनिकांना यमसदनी धाडलं होतं..!

Next Post

जपानच्या भीतीने अमेरिकेने इमर्जन्सी करन्सी सुरु केली होती..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जपानच्या भीतीने अमेरिकेने इमर्जन्सी करन्सी सुरु केली होती..!

पाकिस्तानने फक्त आपल्याच नाही तर जगभरातल्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढवून ठेवलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.