The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या महायु*द्धात हा कार्यकर्ता चक्क धनुष्यबाण घेऊन लढला होता

by द पोस्टमन टीम
7 December 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


दुसऱ्या महायु*ध्दाची पार्श्वभूमी. जर्मन वेहरमॅक्ट आणि अ‍ॅ*डॉल्फ हिट*लर*च्या पॅन्झर कॉर्प्सने फ्रान्स आणि बेल्जियममधून ब्रिटीश सैन्य उ*द्ध्वस्त केले होते. इतिहासातील सर्वात मोठे नौदल ज्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले अशा डन्कर्क नावाच्या फ्रेंच बंदरात हि*टल*रने आपल्या सैन्यास ब्रिटिश सैन्यावर ह*ल्ला करण्यापासून दोनदा थांबवले. इतिहासकार असा अंदाज वर्तवतात की हि*टल*रने मे १९४० मध्ये आपल्या सैन्याला तीन दिवस थांबवण्याचा निर्णय म्हणजे ब्रिटनचे नवे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना “एक संधी” देण्यासाठी होता.

हि*टल*र आणि चर्चिल रणांगणावर वेगवेगळे डावपेच आखून पुढाकार घेण्याच्या मार्गावर असताना, आणखी एक “चर्चिल” त्याच्या इतर जगातील डावपेचांबद्दल, धूर्त नेतृत्व आणि शत्रूला गोंधळात टाकणारी योजना बनवत होता. हा चर्चिल त्याच्या सोबत्यांना प्रेरणा देण्याची रहस्यमय क्षमता स्वत:बरोबर घेऊन लढत होता.

२७ मे, १९४० रोजी लेफ्टनंट कर्नल ‘जॉन मालकम थॉर्प फ्लेमिंग चर्चिल’ टॉवरच्या पायथ्याशी उभा राहिला आणि गस्त घालत असलेले जर्मन सैन्य फ्रेंच गाव असलेल्या ‘ला’इपिनेटच्या’ आसपासच्या टेकडीजवळ निरीक्षण केले.

दृष्टीक्षेपात आलेल्या पहिल्या जर्मन सैनिकावर ३० यार्ड अंतरावरुन ह*ल्ला केला गेला. सैनिकाला झालेली जखम बंदुकीच्या गोळ्यांपासून नव्हती तर धनुष्यामधून सट्कन आलेल्या बाणातून होती. मॅन्चेस्टर रेजिमेंटच्या दोन सैनिकांबरोबरच, चर्चिलने आपली क्लेमोअर पध्दतीची मध्ययुगीन तलवार स्वच्छ केली आणि उर्वरित जर्मन गस्त बाहेर काढण्यासाठी काय करता येईल याचा विचार करण्याचा आदेश आपल्या सोबत्यांना दिला. इथूनच हातात धनुष्यबाणांनी सज्ज असलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्याच्या वेगवेगळ्या कथांचा जन्म झाला आणि दुसर्‍या महायु*द्धात त्याला “मॅड जॅक” आणि “फायटिंग जॅक” अशी नावे मिळाली.

पण “मॅड जॅक” चर्चिल नेमका कोण होता आणि आधुनिक यु*द्धात मध्ययुगीन शस्त्रे नेण्यामागे नेमकी कोणती प्रेरणा होती?



चर्चिलचा जन्म ब्रिटीश-नियंत्रित हाँगकाँगमध्ये झाला होता आणि इंग्लंडमधील ॲंग्लो-स्कॉटिश पालकांमध्ये तो व त्याच्याबरोबर दोन भाऊ – थॉमस आणि रॉबर्ट यांच्यासह तो राहत असे (त्याच्या दोन्ही भावांनीही पुढे जाऊन दुसऱ्या महायु*ध्दात मोठे पराक्रम केले आहेतच.) इंग्लंडमधील सँडहर्स्ट येथील ‘आयल ऑफ मॅन’ आणि ‘रॉयल मिलिटरी कॉलेज’वरील ‘किंग विल्यम्स कॉलेज’ या खासगी संस्थेत त्याने शिक्षण घेतले. इथेच त्याच्यात इतिहासाची आणि काव्याची आवड निर्माण झाली.

१९२६ साली त्याला मँचेस्टर रेजिमेंटच्या दुसर्‍या बटालियनमधे नियुक्त करण्यात आले आणि पुढील प्रशिक्षण घेण्यासाठी तो बर्माच्या रंगून येथे दाखल झाला. त्याने पुण्यात त्याच्या सिग्नल कोर्सपासून १,५०० मैलांवर झेनिथ मोटरसायकल चालविली. मोटरसायकल चालवताना त्याने वाटेने चुकून पाण्यातल्या म्हशीला धडकवली असे सांगतात. सेवेत असताना त्यांनी संशयित डाकुंची गुप्त माहिती गोळा करण्याच्या दृष्टीने खेड्यांना भेट देण्यासाठी बर्माचा सर्वांत मोठा आणि व्यावसायिक महामार्ग असलेल्या इरावाडी नदीच्या खाली जाणाऱ्या ध्वज मोर्चात बरेचदा भाग घेतला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१९३६ साली त्याने दहा वर्ष सेवा करुन बर्मा आणि नंतर सैन्य सोडण्यापूर्वी, तो मायमायो इथे बॅगपाइप्स नावाचे वाद्य वाजवण्यास शिकला. मायमायोला आता ‘पायन ओओ ल्विन'(म्यानमार) म्हणून ओळखले जाते.

त्याने केनियामधील नैरोबी येथे वृत्तपत्र संपादक म्हणून काम केले आणि आपल्या सुंदर शरीरयष्टी तसेच आकर्षक चेहऱ्याच्या बळावर पुरुष मॉडेल म्हणूनही काम केले. मनोरंजक म्हणून इंग्लंडमध्ये त्याने सगळ्यांचे लक्ष वेधले, तिरंदाजीच्या तंत्राविषयी सल्ला देण्यासाठी १९२४ साली ‘द थीफ ऑफ बगदाद’ या चित्रपटात त्याने छोटी भूमिका साकारली आणि १९३२ साली नॉर्वेच्या ओस्लो येथे झालेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत २०० यार्ड धनुर्विद्येत आपल्या कौशल्याची चुणूक देखील दाखविली.

लढाईत धनुर्विद्या स्पर्धेत मिळवलेल्या यशानंतर चर्चिलने क्रमांक २ च्या कमांडो या विशेष ऑपरेशन युनिटसाठी स्वेच्छेने काम केले. या युनिटला पुढे जाऊन त्यांच्या सागरी किनाऱ्यावरील ह*ल्ल्यांच्या धाडसासाठी मोठी प्रसिध्दी प्राप्त झाली. वागसॉय या नॉर्वेतील बेटावर जर्मन सैन्याच्या विरोधात, ऑपरेशन आर्चरी (कधीकधी मलॉय रेड असेही म्हटले जाते) या योजनेत भाग घेतला. इथे त्याने हातात बॅगपाइप्सचे वाद्य घेऊन ‘मार्च ऑफ द कॅमेरून मॅन’ या गाण्याची एक मस्त अशी धुनही वाजवली होती.

सिसिली आणि सालेर्नो येथे इटालियन सैन्य उतरले त्यावेळी त्याने ४२ जर्मन सैनिक आणि ८१ मि.मी. मोर्टार पथकास फक्त त्याच्या तलवारीच्या जोरावर एकट्याने पकडले. “माझ्या मते तलवार न घेता कारवाई करण्यास जाणारा कोणताही अधिकारी अयोग्य कपड्यानिशी लढाईला जातो” असे चर्चिल नेहमी म्हणायचा. ब्रॅक बेटावरील युगोस्लाव्हियात रात्रीच्या वेळी कमांडोच्या ह*ल्ल्यादरम्यान चर्चिल जखमी झाला, पकडला गेला आणि बर्लिनजवळील ‘साचसेनहॉसेन’ कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये त्याला कैद केले गेले.

त्याने रॉयल एअर फोर्सच्या दुसऱ्या कैद्याबरोबर तुरूंग छावणीच्या बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला पकडले गेले आणि ऑस्ट्रियाच्या अधिक सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. इथून पळून जाण्यात शेवटी त्याला यश आलेच.

आठ दिवस स्विस आल्प्सच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनद्वारे १५० मैलांचा प्रवास त्याने केला. ब्रेनर पास याठिकाणी तो एका अमेरिकन टोळीस सापडला. यु*द्धानंतर, ४०च्या दशकात त्याने १९४८ साली ‘हदासा’ येथील ह*त्याकांडानंतर जेरूसलेममधील रुग्णालयात ओलिस ठेवलेल्या अंदाजे ५०० ज्यू डॉक्टर आणि रूग्णांची सुटका केली.

“जेव्हा आपण त्यांच्याकडे बघून हसत असू तर लोक तुमच्यावर गोळीबार करण्याची शक्यता कमी असते.” असे चर्चिल सांगत असे. ५० च्या दशकात, “मॅड जॅक” दोन विशिष्ट सेवास्तरावरील पुरस्कारांसह सैन्य सेवेतून निवृत्त झाला.

पुढे थेम्स नदीच्या बाजूने नूतनीकरण केलेल्या वाफेच्या नावेंची आवड त्याच्यात निर्माण झाली. त्याने मोटरसायकल स्पीड ट्रायल्समध्येही कित्येकदा भाग घेतला.

चर्चिलचा मुलगा माल्कम सांगतो “त्यांनी कधीही या गोष्टींबद्दल अजिबात बढाई मारली नाही, परंतु कोणी विचारले तर त्या कोणालाही सांगायला त्यांना आनंद होत असे, विशेषत: संध्याकाळी दोन दारुचे पेग जास्त चढल्यावर.” इतिहासाच्या पलीकडे आपलं अस्तित्व असलेला चर्चिल एक नम्र यो*द्धा होता. वयाच्या ८९ व्या वर्षी १९९६ साली त्याचे निधन झाले.

काही माणसांची कर्तुत्व घडवण्याची पध्दत ही जगावेगळी असते पण, म्हणूनच ती माणसं चुकीची ठरत नाहीत. मार्ग वेगळा असला तरीही आपल्या ध्येयानिशी आणि कार्यानिशी प्रेम असेल तर काहीही साध्य करता येइल याचं चर्चिल एक ऐतिहासिक उदाहरण आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

तमन्नाची हॉटस्टारवर रिलीज झालेली ‘नोव्हेंबर स्टोरी’ वेबसिरीज कशी आहे..?

Next Post

‘तूतनखामेन’च्या शापित थडग्याचा शोध घेणाऱ्या सर्वांचाच रहस्यमय मृत्यू झाला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

'तूतनखामेन'च्या शापित थडग्याचा शोध घेणाऱ्या सर्वांचाच रहस्यमय मृत्यू झाला होता

हेन्री फोर्डने 'लवासा'पेक्षा भारी सिटी उभारली होती जी लवासापेक्षा जास्त फ्लॉप गेली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.