The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हे आहेत आजवर न सापडलेले खजिने, ज्यांच्या शोधात लोक आजही आपलं आयुष्य पणाला लावतात

by Heramb
29 January 2026
in इतिहास
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


खजिना आणि गुप्तधन म्हटलं की माणसाची संशोधन वृत्ती आपोआप जागृत होते. विनाकष्ट एकाच वेळी भरपूर धन मिळवायला सगळेच उत्सुक असतात. त्यामुळे लपवलेल्या खजिन्यांच्या अनेक कथा आपण ऐकतो आणि मंत्रमुग्ध होऊन जातो. ॲझटेक्सच्या प्रचंड खजिन्याची कथा आपण पहिली. पण ॲझटेकशिवाय जगात आणखी ५ ठिकाणी अशा गुप्त खजिन्याचा उल्लेख आहे. त्याच ५ गोष्टींचा आपण या लेखात आढावा घेणार आहोत.

१. अर्क ऑफ कॉवेनंट: द हॉली चेस्ट:

‘अर्क ऑफ कॉवेनंट’ हे इस्रायली लोकांचे धार्मिक स्थळ आहेच पण याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. त्यात शुद्ध सोन्याने मढवलेली लाकडी ‘चेस्ट’ होती. यालाच मर्सी सीट म्हणतात. दहा आज्ञांच्या दोन दगडी पाट्या असलेल्या निर्गम पुस्तकात ‘अर्क ऑफ कॉवेनंट’चे वर्णन केले गेले आहे. हिब्रू बायबलनुसार, मोसेसकडे ‘अर्क ऑफ कॉवेनंट’ होते. हे अर्क ऑफ कॉवेनंट ईश्वराने स्वतः डिझाईन केले आहे. वाळवंटात असताना सुमारे ४० वर्षे इस्रायली लोकांनी हा ‘अर्क ऑफ कॉवेनंट’ जपला. शेवटी, त्यांनी ते जेरुसलेममधील राजा शलमोनच्या मंदिरात ठेवले.

पण इ.स.पूर्व ६०७ साली बॅबिलोनी लोकांनी जेरुसलेमला वेढा घातला आणि दहा लाखांहून अधिक लोकांची क*त्तल केली. यातून वाचलेले लोक हद्दपार झाले. ते जेव्हा परत आले तेव्हा, ‘अर्क ऑफ कॉवेनंट’ आणि  इतर मौल्यवान खजिना शत्रूंनी लुटला होता. ‘हॉली चेस्ट’ बॅबिलोनियन आक्र*मणकर्त्यांनी नष्ट केली होती किंवा त्यांचे आक्र*मण येण्यापूर्वी ते कुठेतरी लपवले होते हे निश्चित नाही. आजपर्यंत, जगभरातील खजिन्यांचा शोध घेणारे आणि पुरातत्वशास्त्रज्ञ ‘अर्क ऑफ कॉवेनंट’ शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु अद्याप त्यांना यश आले नाही.

२. ब्लॅकबेअर्डचा छुपा खजिना

यालाच एडवर्ड टीचलाच ब्लॅकबेअर्ड म्हणूनही ओळखले जाते. तो इतिहासातील प्रसिद्ध पायरेट्सपैकी एक आहे. त्याने  अठराव्या शतकाच्या सुरुवातीस, स्पॅनिश वारसाहक्काच्या यु*द्धादरम्यान खाजगी ब्रिटिश अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर, त्याने आपल्या साहसी आणि कुख्यात पायरसी कारकीर्दीला सुरुवात केली.

१७१६ ते १७१८ दरम्यान ब्लॅकबर्डने त्याच्या ४० बंदुकीच्या फ्लॅगशिपच्या मदतीने वेस्ट इंडीज आणि उत्तर अमेरिकेच्या अटलांटिक किनार्‍यादरम्यान प्रवास केला. त्याच्या या फ्लॅगशीपचे नाव होते क्वीन ऍनीज रिव्हेंज. दक्षिण अमेरिका आणि मेक्सिकोतून स्पेनच्या दिशेने जाणाऱ्या ज्या जहाजांमध्ये सोने, चांदी आणि इतर खजिना भरलेला असत, त्यावर ते ह*ल्ला करायचे.



१७१८ च्या उत्तरार्धात लेफ्टनंट ‘रॉबर्ट मेनार्ड’च्या नेतृत्वाखालील ब्रिटीश नौदलाने दीर्घ लढाईनंतर ब्लॅकबर्डला कैद करण्यात यश मिळविले. मेनार्डने ब्लॅकबर्डचा प्रचंड छळ केला, त्याचे डोके कापले आणि जहाजाच्या अर्कवर लटकवले.

त्याच्या मृत्यूपूर्वी, ब्लॅकबर्ड मेनार्डला एक खजिना लपविल्याचे म्हणाला होता, परंतु त्याने खजिन्याचे अचूक स्थान सांगितले नाही. कदाचित तो फक्त जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होता. जगभरातील खजिना शोधकर्ते केमन आयलंड्स आणि व्हर्जिनियाच्या चेसापीक खाडीच्या किनारी भागात त्या छुप्या खजिन्याचा अजूनही शोध घेत आहेत.

३. लिमाचा खजिना

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस, ‘जोसे डी सॅन मार्टिन’च्या सर्व सैन्याने लिमा, पेरूच्या दिशेने कूच केले. जवळजवळ तीन शतकांपूर्वी स्पॅनिश अधिकाऱ्यांनी जमवलेली संपत्ती मिळवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता. त्यांनी ब्रिटीश नौदलाचा कॅप्टन विल्यम थॉम्पसनवर विश्वास ठेवला आणि त्याच्या ‘मेरी डियर’ या जहाजावर खजिना लपवून ठेवला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

लिमा जोपर्यंत पूर्णतः सुरक्षित होत नाही तोवर त्याने समुद्रातच फिरत राहावे असे त्याला सांगण्यात आले. पण, थॉम्पसनच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याने आपल्या ताफ्यासह स्पॅनिश व्हाईसरॉयच्या रक्षकांना ठार मारले आणि खजिना घेऊन निघून गेला.

त्याच्या दुर्दैवाने थोम्पसन फार दूर जाऊ शकला नाही.  एका स्पॅनिश जहाजाने मेरी डियरचा पाठलाग केला आणि त्यावर ह*ल्ला केला. कॅप्टन थॉम्पसन आणि त्याचा पहिला जोडीदार वगळता संपूर्ण क्रूला फाशी देण्यात आली. थॉम्पनचा जीव वाचला कारण त्याने खजिना कुठे लपवला होता ते उघड करण्याचे त्याने वचन दिले होते. थॉम्पसन आणि त्याचा पहिला जोडीदार कोठडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि ते पुन्हा कधीही दिसले नाहीत.

आजपर्यंत, ३०० हून अधिक मोहिमांनी लिमाचा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते सर्व अयशस्वी ठरल्या. खजिन्यात रत्नांनी झाकलेली मेरीची २०० दशलक्ष डॉलर्स किमतीची सोनेरी प्रतिमा देखील आहे.

४. कर्नल सिंगलटन मॉस्बीचा खजिना:

कर्नल जॉन सिंगलटन मॉस्बी, हा एक कॉन्फेडरेट रेंजर होता. कर्नल जॉन त्याच्या गनिमी आक्रमणकर्त्यांच्या गटासह १८६३ सालच्या मार्चच्या सुरुवातीला फेअरफॅक्स कोर्टहाऊसमध्ये ४० पेक्षा जास्त केंद्रीय सैन्यासह समोरासमोर आला. त्याने एकही गोळी न चालवता त्यांना सहज पराभूत केले. मॉस्बी आणि त्याचे सैन्य जनरल एडविन स्टॉफ्टनच्या निवासस्थानी गेले. त्यांनी जवळजवळ अर्धा दशलक्ष डॉलर्स किमतीचे सोने, चांदी, मेणबत्त्या आणि काही फॅमिली हेरिटेज असलेल्या सामानाने भरलेली बॅग घेतली.

मॉस्बीने आपल्या माणसांना सांगितले की लढाई झाल्यास, त्यांनी चिन्हांकित केलेल्या दोन पाइनच्या झाडांमध्ये त्यांनी घेतलेला सर्व खजिना पुरून टाकावा. त्याच्या माणसांनी युनियनच्या सैनिकांना कात्रजचा घाट दाखवला आणि कॉन्फेडरेटच्या मागे परतले. पण, जेव्हा मॉस्बीने आपल्या माणसांना खजिना परत मिळविण्यासाठी पाठवले तेव्हा त्यांना अटक करून ठार मारण्यात आले.

असे म्हटले जाते की मॉस्बी कधीही संपत्ती मिळविण्यासाठी परत आला नाही आणि इतर कोणालाही त्याने त्या खजिन्याचे अचूक स्थान सांगितले नाही. म्हणून, आजपर्यंत, व्हर्जिनियाच्या फेअरफॅक्स काउंटीच्या जंगलात खजिना कुठेतरी पुरला आहे.

५. प्रचंड प्रमाणात ना*झींनी लुटलेले सोने

दुसऱ्या महायु*द्धाच्या शेवटच्या दिवसांमध्ये ना*झी राजवट पराभवाच्या उंबरठ्यावर होती. आपला पराभव होतोय असं दिसल्यानंतर त्यांनी संग्रहालये आणि गरीब ज्यू कुटुंबांमधून चोरलेला सर्व मौल्यवान खजिना लपविण्यास सुरुवात केली. पोलंडच्या भागात भूमिगत बोगद्यांच्या जाळ्यातून एक ना*झी ट्रेन ३०० टनांपेक्षा जास्त सोने आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन जात असल्याच्या अफवा होत्या.

ऑस्ट्रियातील घनदाट अल्पाइन जंगलात असलेल्या लेक टॉपलिट्झमध्ये ना*झी अधिकाऱ्यांनी अब्जावधी डॉलर्स किमतीचे रीश बँकचे सोने बुडवले अशाही वदंता आहेत. हे सोने अद्याप कोणालाही सापडलेले नाही. १९५९ साली काही डायव्हर्सनी तलावातून लाखो डॉलर्सच्या बनावट चलनांचे कंटेनर काढले. चालनफुगवट्याद्वारे शत्रूंची अर्थव्यवस्था उ*द्ध्वस्त करण्याच्या ना*झींच्या योजनेचा ‘बनावट चलन’ हा भाग होता.

प्रचंड थंड असलेल्या आणि शरीर गोठवणाऱ्या या तलावात लपलेला खजिना शोधताना आतापर्यंत किमान सात जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इस्लाम, ज्यू आणि ख्रिश्चन धर्मात असलेल्या समानता थक्क करणाऱ्या आहेत..!

Next Post

फाशीच्या शिक्षेवर असलेले सहा कैदी ‘मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन’मधून पळाले होते..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

फाशीच्या शिक्षेवर असलेले सहा कैदी 'मॅक्झिमम सिक्युरिटी प्रिझन'मधून पळाले होते..!

एकाच वेळी दोन्ही बाजूंना खेळवणारा हा सर्वात चलाख गुप्तहेर होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.