The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या घरचा बल्ब वर्षभर टिकत नाही पण हा बल्ब शंभर वर्षे सलग चालू आहे

by द पोस्टमन टीम
4 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एखाद्या बल्बचं आयुष्य असून असून असं किती असणार? दोन महिने, सहा महिने फार फार तर वर्ष-दीड वर्ष. मात्र गिनिज बुकमध्ये नोंद झालेला सेंटेनियल लाईट शंभर वर्षाहून जास्त काळ सलगपणे प्रकाश देत आहे.

जगातला दीर्घायुषी असा बल्ब १९०१ पासून प्रकाश देत आहे. हा बल्ब ४५५० ईस्ट ॲव्हेन्यू लिवरमोर कॅलिफ़ोर्नियात असून लिवरमोर प्लिसटन फ़ायर डिपार्टमेंटकडून याची देखभाल केली जाते. याच्या दीर्घायुष्यामुळे याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ़ द वर्ल्ड रेकॉर्डस’नेही घेतली आहे.

सेंटेनियल लाईट मुळात ३० वॅटचा बल्ब होता मात्र आता तो मंद झालेला असून ४ वॅट इतका प्रकाश देत आहे. या लाईटचा शोध आणि निर्मिती फ़्रांन्सचा इंजिनिअर ॲडॉल्फ़ शॅलेटनं केलेली आहे. या बल्बचं तांत्रिक पेटंट ॲडॉल्फ़कडेच आहे.

या बल्बची निर्मिती ९० च्या दशकाच्या शेवटी शेल्बी कंपनीनं केलेली आहे.

हा बल्ब काही काळासाठी बंदही झालेला आहे पण त्याचं कारण मानवनिर्मित होतं. १९०३ साली बल्ब न्यू स्टेशन १ मध्ये हलविण्यात आला होता. त्यानंतर १९३७ साली ज्या फ़ायर हाऊसमध्ये हा बल्ब आहे, त्याच्या नूतनीकरणाचं काम चालू असण्याच्या दरम्यान तो एक आठवड्यासाठी बंद ठेवण्यात आला होता. १९७६ साली एखाद्या व्हीआयपी व्यक्तीप्रमाणे कडक सुरक्षेत त्याला कॅप्टन किर्बे यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा पथकानं एस्कॉर्ट करत, सध्या तो ज्या जागी आहे त्या फ़ायर स्टेशन ६ मध्ये आणण्यात आलं, तेव्हाही २२ मिनिटं हा बल्ब बंद होता.



यानंतर २०१३ मध्ये UPS मधे बिघाड झाल्यानं ९-१२ तासासाठी बल्ब शांत झाला होता. तेव्हा लोक जरा नाराजच झाले होते. हा बल्ब फ़्यूज झाल्याची अनेकांना खात्री पटली होती. मात्र तारेत झालेला बिघाड लक्षात आल्यानंतर तार बदलण्यात आली त्यानंतर पुन्हा नव्यासारखा ६० वॅटचा प्रकाश त्यानं काही तास दिला.

मग मात्र तो पुन्हा मंदावला आणि ४ वॅटचा प्रकाश देऊ लागला. हे असं का घडलं असावं? हे अद्यापही रहस्यच आहे. सेंटेनियम लाईटचा अभ्यासक्रमातही समावेश करण्यात आलेला आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

थॉमस एडिसननं १८८१ साली निर्मिती केलेला पहिला विजेवरचा बल्ब १५०० तास चालला होता.

त्यानंतर बल्ब निर्मिती करणार्‍या कंपन्या मोठ्या अभिमानानं जाहिरातीत उल्लेख करत असत की त्यांचा बल्ब किमान २५०० तास तरी चालेल. मात्र बल्ब निर्मिती करणार्‍या कंपन्यांना वाटू लागलं की जर दीर्घकाळ बल्ब टिकले तर लोकांना बल्ब बदलावेच लागणार नाहीत आणि यामुळे व्यवसाय धोक्यात येईल. यामुळे १९२४ साली अमेरिका आणि युरोपमधील मुख्य बल्ब निर्मिता कंपन्यांनी गुप्तपणे एक बैठक घेतली आणि यात बल्बचं आयुष्य कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी एक कार्टेल बनवून बल्बचं आयुर्मान १००० तासाचं केलं.

१९४० पर्यंत बल्बचं सर्वसाधारण आयुष्य १००० तासांचंच बनलं. मात्र अखेरीस ही कार्टलची गोष्ट उजेडात आली आणि १९५३ साली जनरल इलेक्ट्रिक आणि अन्य उद्योगसमूहांनी अशा प्रकारे बल्बचं आयुष्य नियंत्रणात ठेवण्याला विरोध दर्शविला.

सेंटेनियल बल्ब मात्र या सगळ्यापासून अलिप्त रहात आजही आपला प्रकाश देतो आहे. २००१ मधे या बल्बचा शंभरावा वाढदिवस मोठ्या जोशात साजरा केला गेला. यानिमित्त एक जंगी पार्टीही यानिमित्त देण्यात आली होती.

लोक आजही हा बल्ब बघण्यासाठी भेट देत असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ही आहे हॉलिवूडमध्ये हवा करणाऱ्या भारतीयांची यादी

Next Post

क्रिकेटर व्हायचं स्वप्न बघितलेला पोरगा जगातला सर्वोत्तम धावपटू बनला होता

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

क्रिकेटर व्हायचं स्वप्न बघितलेला पोरगा जगातला सर्वोत्तम धावपटू बनला होता

अमेरिकेत लोक आपल्या पोरांना पोस्टाने मामाच्या गावाला पाठवायचे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.