The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतातील स्थानिक भाषा संकटात का आहे ?

by द पोस्टमन टीम
11 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


काही वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातील काही स्थानिक ४२ बोलीभाषा नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन पोहचल्या आहेत. या भाषांचा वापर करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी घट आली आहे. फक्त निवडक लोकांना आता या भाषेत संवाद साधता येतो आहे, यामुळे या भाषा नामशेष होणार आहेत. या ४२ भाषांपैकी ११ भाषा अंदमान निकोबार द्वीपावरील आहेत. बाकी इतर भाषा ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आसाम, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, मेघालय आणि पश्चिम बंगालमधील आहेत.

मागील ५० वर्षात भारतातील २० टक्के बोलीभाषा नामशेष झाल्या आहेत. भाषा विलुप्त होण्यात रशिया आणि अमेरिका यांच्यानंतर आपला तिसरा क्रमांक आहे. ५० वर्षांपूर्वी १९६२ साली करण्यात आलेल्या जनगणनेत १६५२ मातृभाषा असल्याचे निष्पन्न झाले होते. ११०० भाषांना मातृभाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला होता. सर्व मानांकांच्या आधारावर आजपर्यंत १९९ भाषा या विलुप्त झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अनेक भाषातज्ज्ञ म्हणतात की गेल्या ५० वर्षांत २५० भाषा नामशेष झाल्या आहेत.

देशात हिंदी भाषेचा वेगाने प्रसार झाला असून हिंदी भाषिकांची संख्या २६ कोटीहुन ४२ कोटी इतकी वाढली आहे. इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ होत असून त्यांची संख्या ३३ कोटीहून ४९ कोटी इतकी वाढली आहे.

भारतात दोन प्रकारच्या भाषा लुप्त झाल्या आहेत. पहिल्या प्रकारात प्रमुख्याने किनारी भागात राहणाऱ्या लोकांच्या बोलीभाषांचा समावेश होतो. या भागातील लोक पारंपरिक शेती व्यवसाय सोडून शहरात जाऊन स्थायिक झाल्याने त्यांचा स्थानिक भाषेचा वापर घटला आणि भाषा हद्दपार झाली. दुसऱ्या प्रकारात भटक्या विमुक्त जातीच्या बोलीभाषांचा समावेश होतो. प्रामुख्याने बंजारा व पारधी समाजातील बोलीभाषा.

बंजारा व पारधी समाजाच्या १९० प्रकारच्या विभिन्न जाती आहेत, या जाती एकेकाळी गुन्हेगार जाती म्हणून ओळखल्या जायच्या त्यामुळे या जातींचे लोक शहरात येऊन स्थायिक झाले. शहरात स्थायिक झाल्यामुळे या लोकांच्या स्थानिक बोलीभाषा विलुप्त झाल्या.



द पीपल लिंगविस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया (पीएलएसआई) ही संस्था भारतात २०१० साली स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून देशात किती बोलीभाषा बोलल्या जातात याचा सर्व्हे करण्यात आला. यात ३५०० व्हॉलेंटियर्स, २००० भाषातज्ज्ञ, सामाजिक इतिहासकार आणि भाषा रिसर्च अँड पब्लिकेशन सेंटरने सहभाग नोंदवला होता. या लोकांनी एकत्रितपणे काम करत भारतात ७८० भाषा असल्याचे शोधून काढले होते. हा सर्व्हे तब्बल तीन वर्ष चालला होता.

भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचित २२ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. यात हिंदी, आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मैतेई (मणिपुरी), मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश होतो. ‘

या भाषांच्या व्यतिरिक्त देशात शंभरपेक्षा जास्त सूचिबद्ध नसलेल्या भाषा आहेत. याशिवाय ३१ अन्य प्रकारच्या भाषा देखील आहेत, ज्यांना विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आधिकारीक भाषेचा दर्जा मिळाला आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

भारतात भाषांना ७० हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. १० हजार वर्षांपूर्वी लोक शेतीकडे वळल्यानंतर अनेक भाषा विलुप्त झाल्या. आधी भाषा फक्त मौखिक स्वरूपात होत्या, कालांतराने ४००० वर्षांपूर्वी भाषेला लिखित स्वरूप मिळाले.

भारतात हिंदी भाषिकांची संख्या ४२ कोटी इतकी आहे. इंग्रजी भाषिकांची संख्या ४९ कोटी इतकी आहे. यानंतर बंगाली भाषिक आहेत, त्यांची संख्या ८ कोटी इतकी आहे. तेलगू भाषिकांची संख्या ७.४ कोटी इतकी आहे. आपली मायबोली मराठी ७.१ कोटी लोकांची बोलीभाषा आहे. तमिळ भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या ६ कोटी इतकी आहे.

एखादी बोलीभाषा संकटात येण्यास तिचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या घटने कारणीभूत असते. काही बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांची संख्याही कमी होत असून ती आता हजार आणि शेकडो लोकांच्या परिघात मर्यादित झाली आहे.

जगभरात ७००० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. मागील १०० वर्षात ५० टक्क्याहून अधिक भाषा विलुप्त झाल्या आहेत. ३५ भाषा अशा आहेत ज्या लवकरच नामशेष होणार आहेत. २११५ पर्यंत आज अस्तित्वात असलेल्या ९० टक्के भाषा हद्दपार होणार आहेत. प्रत्येक १४ दिवसात जगभरात एक भाषा नामशेष होते आहे. १९९ भाषा अशा आहेत ज्या फक्त १० -१५ लोकांना बोलता येतात. १७८ भाषा आशा आहेत ज्या फक्त ५० लोकांना बोलता येतात.

जगभरात लोकांमधील अंतर जसे कमी होते आहे, तसे त्यांच्या भाषा देखील कमी होत चालल्या आहेत. इंग्रजी, मँडरीन इत्यादी भाषांचा व्यवहारातील वापर वाढल्यामुळे त्यांचा प्रसार होत असून इतर अनेक भाषा मात्र नामशेष होण्याच्या टप्प्यावर येऊन पोहचल्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

संशोधकांना एक मिनिट ६० सेकंदांवरून ५९ सेकंदांवर का आणायचा असेल ?

Next Post

बोन्साय : लहान-लहान आकाराची झाडं लावण्याची एक जपानी कला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

बोन्साय : लहान-लहान आकाराची झाडं लावण्याची एक जपानी कला

इजिप्तच्या या राणीच्या प्रेमात रोमन सम्राटाने आपलं साम्राज्य धुळीस मिळवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.