The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या वकिलाने गेली ४० वर्षे सगळे खटले संस्कृतमधूनच लढवले आहेत

by द पोस्टमन टीम
24 May 2025
in विश्लेषण, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


“अंग्रेज चले गये पर अंग्रेजी छोड गये” हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. सत्य परिस्थितीही तशीच आहे. जरी भारतात मोठ्या प्रमाणावर हिंदी बोलली जात असली तरीही आज भारतात बहुतांश भागात इंग्रजीचं चलन अधिक प्रमाणात आहे.

कामाच्या ठिकाणी तर हमखास इंग्रजीचाच वापर होतो. अगदी एखाद्याची विचारपूस करण्यापासून तर एखाद्या मोठ्या कराराच्या कागदपत्रापर्यंत, सगळीकडे इंग्रजीचाच वापर होतो.

भारताची न्यायव्यवस्थाही या इंग्रजीच्या जाळ्यातून सुटली नाही. जवळपास सगळे वकील त्यांचं काम इंग्रजीतूनच करतात, काही थोडकेच आहेत जे हिंदीतून लिखापढी करतात. आता जिथे हिंदीचीच ही व्यथा आहे तिथे देववाणी संस्कृतबद्दल काय बोलणार!

आता तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण एक असा अतरंगी वकील आहे जो ना इंग्रजीचा वापर करतो ना हिंदीचा.



वाराणसीमधला हा वकिल गेल्या जवळपास ४० वर्षांपासून कोर्टातलं सगळं कामकाज संस्कृतमधूनच करतो आहे.

त्यांनी आपले आजपर्यंतचे सगळे खटले संस्कृतमधूनच लढले आहेत. त्यासाठी लागणारे सगळे कागदपत्र, शपथपत्र, वकीलपत्र, इत्यादी ते संस्कृतमधूनच जमा करत.

त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट श्यामजी उपाध्याय. 

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

श्यामजी मूळ मिर्झापुर या गावचे आहेत. त्यांचे वडील संगठा प्रसाद उपाध्याय संस्कृत पंडित होते. संस्कृतचं शिक्षण त्यांना आपल्या घरातून, वडिलांकडूनच मिळालं. गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयातून बौध्द दर्शन या विषयात आचार्य ही पदवी प्राप्त केली. आपले गुरु प्रा. जगन्नाथ उपाध्याय यांच्या इच्छेचा मान ठेवत त्यांनी वर्षभर कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केलं.

त्यानंतर त्यांनी हरिशचंद्र महाविद्यालयातून विधीची पदवी प्राप्त करून वकिली करायला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी सगळे खटले संस्कृतमधूनच लढले आहेत.

श्यामजींना संस्कृतवरील त्यांच्या प्रेमाबद्दल विचारणा केली असता ते सांगतात की, “एकदा ते वडिलांसोबत गावातून चालले होते. तेव्हा त्यांच्या वडिलांना काही लोक भेटले आणि स्वाभाविकपणे सगळे भोजपुरीत गप्पा मारायला लागले. तेव्हा त्यांचे वडील सहज बोलून गेले की आपण सगळे जर का असं संस्कृतमध्ये बोललो तर किती छान झालं असतं ना?!”

ही गोष्ट दहा वर्षांच्या श्यामजींच्या डोक्यात बसली आणि त्यानंतर त्यांनी संस्कृतमध्येच बोलायचं असं मनाशी पक्कं केलं.

एकदा बनारसच्या एका व्यक्तीवर ४० खासदारांची खोटी सही करण्याचा आरोप होता. त्या केसमध्ये जिल्हा न्यायाधीशांनी यांना संस्कृतमध्ये याचिका दाखल करून त्याचं हिंदी भाषांतर करायला सांगितलं. उपाध्याय सांगतात की, ही केस ते दिल्लीतील पटियाला कोर्टात लढायला पण तयार होते.

संस्कृतमध्येच सगळी उलटतपासणी व्हावी याचा त्यांनी कायमच प्रयत्न केला आहे.

ते फक्त स्वतः संस्कृतमध्ये बोलतात असं नाही तर ते देववाणीला पुढे नेण्याचंही काम करतात. यासाठी दरवर्षी ४ सप्टेंबरला संस्कृत दिवस आयोजित करतात. या कार्यक्रमात जिल्ह्यातील ५० वकिलांचा सत्कार देखील केला जातो.

श्यामजी उपाध्याय यांना भारत सरकारने संस्कृत मित्र या पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

जेव्हा ते कोर्टात उलटतपासणी करतात, तेव्हा त्यांच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं प्रतिपक्षाला देता येत नाही. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी संस्कृत भाषेच्या विकासासाठी खर्ची केलं आहे. जिथे लोक आपल्याला किती इंग्रजीचं ज्ञान आहे हे दाखवत असतात आणि इंग्रजी बोलता येणं हेच बुद्धिमत्तेचं प्रमाण आहे असं मानतात तिथे श्यामजींसारख्या आयुष्य संस्कृतसाठी वाहणाऱ्या माणसाचं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा पठ्ठ्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन्ही अ*णुबॉ*म्ब ह*ल्ल्यातून वाचलाय

Next Post

शिंग असलेल्या टकल्या शैतानाने हा टीव्ही घराघरात पोहोचवला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

शिंग असलेल्या टकल्या शैतानाने हा टीव्ही घराघरात पोहोचवला

सरकारी कंपन्यांच्या अपयशाचं इंडियन एअरलाईन्स हे उत्तम उदाहरण आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.