The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पराक्रमी सम्राट ललितादित्य होता म्हणून मुघल काश्मीरपासून ३०० वर्षे लांब राहिले..!

by द पोस्टमन टीम
3 January 2026
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतात असे अनेक महान राजे होऊन गेले ज्यांनी मध्य आशियातील अनेक देश आणि अगदी चीनमधील प्रदेशसुद्धा जिंकले. पण आपल्या देशातील इतिहासकारांनी आपल्याला पराभवाचा इतिहासच शिकवला. आता अशा चुका सुधारण्याची वेळ आली आहे. आज आम्ही तुम्हाला काश्मीरच्या शूर राजा ललितादित्यची कहाणी सांगणार आहोत. त्यांच्या भीतीने ३०० वर्षे मुस्लिम आ*क्रमकांना काश्मीरच्या भूमीवर पाऊल ठेवण्याची हिंमत झाली नाही.

आठव्या शतकात काश्मीरमध्ये सम्राट ललितादित्य मुक्तपिड नावाचा एक महान आणि शूरवीर राजा होऊन गेला. सम्राट ललितादित्याचं राज्य तिबेटपासून द्वारकेपर्यंत, उडीसाच्या समुद्रकिनाऱ्यापासून ते दक्षिण महासागरापर्यंत, पूर्वेत बंगालपासून ते पश्चिमेत विदिशापर्यंत आणि मध्य आशिया पर्यंत पसरलेलं होत. सम्राट ललितादित्याने आजच्या चीनमधील पिकिंगपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता. परंतु भारतीय इतिहासात या साम्राटाचे वर्णन कुठेही पाहायला मिळत नाही.

परकीय इतिहासकारांनी सूर्यवंशी सम्राट ललितादित्य मुक्तपीड यांना “काश्मीरचा सिकंदर” म्हटले आहे. काश्मीरी यो*द्धे परकीय आक्र*मकांसमोर आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांसमोर कधीही झुकले नाहीत. महाभारत यु*द्धातही काश्मीरचा उल्लेख आढळतो. काश्मीरचा ज्ञात इतिहास राजतरंगिणी या संस्कृत महाकाव्यात उपलब्ध आहे. राजतरंगिणीचा एक श्लोक आहे.

विजीयते पुण्यबलैर्बर्यत्तु न शस्त्रिणम । परलोकात ततो भीतिर्यस्मिन् निवसतां परम्।।
या श्लोकाचा अर्थ असा की, ते (काश्मीर)  शस्त्राने नाही तर केवळ सद्गुणांनी जिंकता येईल. तेथील रहिवाशांना केवळ परलोकाची भीती आहे, शस्त्रधारी लोकांची नाही.

राजतरंगिणी ग्रंथानुसार ललितादित्याने अर्धा भारत आणि मध्य आशियापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता. सम्राट ललितादित्य कार्कोटक वंशाचा सर्वात बलशाली हिंदू शासक होता. सम्राट ललितादित्यने काश्मीरमध्ये परिहासपूर नावाची नगरी वसवली होती. आपल्या मजबूत मनगटाच्या बळावर ललितादित्यने तिबेटी, कुंभोजी आणि तुर्की सत्ताधाऱ्यांना आसमान दाखवले होते.



ज्ञान, कला आणि गुणवत्तेची कदर असलेला सम्राट:

आठव्या शतकात भारतात अनेक सत्ता अस्तित्वात होत्या. त्यापैकीच एक महासत्ता होती कनोज. कनोजचा सम्राट यशोबर्मन हा देखील शूर राजा होता. परंतु सम्राट ललितादित्याने कनोज सम्राट यशोबर्मनला यु*द्धात पराभूत केले आणि संपूर्ण भारतावर आपला प्रभाव पाडला. यशोबर्मनचा पाडाव केल्यानंतर त्याच्या दरबारातील कलाकार, कवी आणि चतुर मंडळींना बोलावून ललितादित्यने आपल्या काश्मीरच्या दरबारात स्थान दिले.

आठव्या शतकाच्या सुरुवातीला भारतावर मीर कासीमने आक्रमणाला सुरुवात केली परंतु मेवाड शासक बाप्पा रावल यांनी त्याची ही आक्र*मणे मोडून काढली. असाच काही पावित्रा ललितादित्यने देखील घेतला होता. अरब राज्यकर्ते काबुलमार्गे उत्तर-पूर्वेत घुसण्याच्या मार्गावर होते. सिंधच्या मार्गाने मुस्लिम शासक देखील भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

काबुल आणि कंधारचे शासक अरब आक्र*मकांशी लढत असताना ललितादित्यने आपली फौज तयार करून तुर्कीवर चाल केली. ललितादित्याच्या मार्गदर्शनाखालील फौजांनी अनेक मध्य आशियायी शहरांवर आपली सत्ता स्थापित केली. ललितादित्यच्या काश्मीरवर सर्वाधिक चार वेळा आक्र*मण मोईनने केले. चार वेळा यु*द्ध झाले आणि चारही यु*द्धांत सम्राट ललितादित्याने मोईनचा पराभव केला. चौथ्या युद्धात मोईनचा मृत्यू झाला. चौथ्या लढाईनंतर जेव्हा मोईनचा पराभव करून ललितादित्य येत होते तेव्हा तुर्कीवासीयांनी माना झुकवून त्यांचे स्वागत केले होते.

सूर्यवंशी सम्राट ललितादित्य यांनी अनेक प्रसिद्ध मंदिरे बांधली होती. यामध्ये दक्षिण काश्मीरमधील अनंतनागचे सूर्यदेवतेला समर्पित मार्तंड मंदिर प्रसिद्ध आहे. ललितादित्य यांनी अनेक बौद्ध विहारांची देखील स्थापना केली. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील खेराबल गावात मार्तंड सूर्य मंदिराचे अवशेष आजही आहेत. ललितादित्याने अनेक गावे, शहरे आणि नगरेही वसवली होती. यामध्ये सुरेशपूर, दारजितपूर, फलपुरा, पर्णोतसर्ग, ललितपुरा, हुश्कापुरा यांचा समावेश होतो.

इराणी लेखक अलबरुणी सम्राट ललितादित्य मुक्तपिड यांना ‘मुथाई’ या नावाने संबोधित करतात. अलबरुणीनुसार काश्मीरचा राजा मुथाईने मोईनला हरवलं आणि याचीच आठवण म्हणून काश्मिरी लोक चैत्र महिन्याच्या दुसऱ्या दिवशी उत्सव साजरा करतात. या व्यतिरिक्त इतर अरबी लेखकांनी देखील ललितादित्याला महान राजा म्हणून संबोधले आहे.

सम्राट ललितादित्यची ख्याती चीनपर्यंत पोहोचली होती. चीनच्या टंग राजवंशाचा उल्लेख करणारे पुस्तक “Xing Tang Shu” मध्ये ललितादित्यच वर्णन आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या मोहिमेसाठी चीनकडे सैन्याची मागणी केली होती.

ललितादित्याचे विजय अभियान काही केल्या थांबण्याचं नाव घेत नव्हतं. एकही यु*द्ध पराभूत न होता ललितादित्य जगभर प्रसिध्द होत चालला होता. असे मानले जाते की, अशाच एका अभियानात ललितादित्याचा मृत्यू झाला होता. काही लोक म्हणतात, अफगाणिस्तानमध्ये एका मोहिमेवर असताना हिमस्खलनाखाली दबला गेल्याने ललितादित्याचा मृत्यू झाला.

तर काही लोक म्हणतात, अफगाणिस्तान मध्ये त्यांच्या सैन्याचा पाठलाग होत असताना संपूर्ण सैन्य मुघलांच्या हाती लागू नये म्हणून त्यांनी आत्मसमर्पण केले. अशा शूर, पराक्रमी आणि मुत्सद्दी राजाचा इतिहास डाव्या भारतीय इतिहासकारांनी जाणून बुजून लपवला. असे अजून किती पराक्रमी योद्धे व राजे असतील ज्यांचा इतिहास वर आलाच नाही याचा आपण विचार करायला हवा. पण सूर्यासमोर असे ढग आल्याने सूर्याचे तेज संपून जात नाही, ढग मात्र येतात आणि जातात!!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर चिनी ड्रॅगनची वक्रदृष्टी आता भूतानवर पडली आहे

Next Post

वातावरण बदलाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांनी गुडघाभर पाण्यात उभं राहून भाषण दिलंय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

वातावरण बदलाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांनी गुडघाभर पाण्यात उभं राहून भाषण दिलंय

इराणमध्ये नदीच्या पुनरुज्जीवनासाठी हजारो लोक रस्त्यावर आलेत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.