The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आफ्रिकेतील या छोट्याश्या तळ्याने एकाच रात्रीत तब्बल दोन हजार लोकांचा जीव घेतला होता

by नंदकुमार कारभारी
20 August 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


लेक न्योस डिजॅस्टर (Lake Nyos Disaster)
दिनांक : २१ ऑगस्ट १९८६
ठिकाण : लेक न्योस तळ्याच्या आजूबाजूचा परिसर, वायव्य कमेरून, आफ्रिका.
घटनेची व्याप्ती : लेक न्योसच्या २५ किमी परिघातला परिसर.
बळी : 1746 लोकं + 3500 गुरढोरं

ही घटना न्योस तळ्याच्या परिसरात राहणाऱ्या बहुतेक लोकांची अखेरची रात्र ठरली. एका अदृश्य शक्तीने त्यांना गुदमरुन मारून टाकलं. दुसऱ्या दिवशीचं चित्र भयावह होतं. तळ्याच्या आजूबाजूच्या चार गावांमध्ये लोकांचे व पशूंचे मृतदेह घरात, बाहेर, रस्त्यावर आणि रानात विखुरलेले होते. प्रेतांच्या त्वचेचा रंग बदलला होता, त्यांच्या अंगावर चट्टे, जखमा होते. बचावलेल्या लोकांचे जबाब रहस्यात अजून भर टाकत होते.

एका पिडीत व्यक्तीने नोंदवलेला जबाब असा होता :

“मला श्वास घेता येत नव्हता. मला कशाचीच शुद्ध राहिली नव्हती. तोंड उघडता येत नव्हतं. कशाचातरी उग्र वास हवेमध्ये पसरला होता. माझी मुलगी बेडवर झोपलेल्या अवस्थेत विचित्र आवाजात घोरत होती.मी तिच्या बेडपर्यंत जायचा प्रयत्न केला पण माझी शुद्ध हरपली, मी कोसळलो.”

“सकाळी ९ वाजता जाग आली. माझ्या हातावर चट्टे व जखमा होत्या, त्या कशा झाल्या वा कोणी केल्या मला माहीत नाही. मला बोलायचं होत पण तोंडावाटे हवा बाहेरच येत नव्हती. मी माझ्या मुलीच्या बिछान्याजवळ तिला उठवण्यासाठी पोहोचलो पण तिचा मृत्यू झाला होता. घराबाहेर पडून कशीबशी मोटारसायकल सुरू केली पूर्ण गावात माणूस तर सोडा पशु आणि पक्षांचंही चिन्ह दिसत नव्हतं.”


The Lake Nyos Disaster
BBC World Service

या घटनेनं प्रशासन, संशोधक आणि अभ्यासक यांना बुचकळ्यात टाकलं. मृत्यू पावलेल्या लोकांच्या रक्तात Co2 (कार्बन डायॉक्साईडच) प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षाही जास्त होतं. गावातल्या हवेतही Co2 चं लक्षणीय प्रमाण होतं. हवेत सडलेल्या अंडी व बंदुकीच्या दारूसारखा वास पसरला होता. कसून चौकशी केल्यावर काही पुरावे हाती लागले. घटनेच्या रात्री काही लोकांनी तळ्यावर मोठा ढग बघितल्याचं सांगितलं आणि मग सगळ्यांची नजर तळ्याकडे वळाली.

लेक न्योस तसं दिसायला वरवर अगदी सगळ्या तळ्यांसारखं सामान्य तळं. पण त्याच्या बाबतीत सामान्य असं काही नव्हतं. घटनेच्या दुसऱ्या दिवशी तळ्याचं निळशार पाणी लाल रंगाचं झालं होतं आणि तळ्याच्या आजूबाजूच्या लोकांवरच मरण ओढवलं होतं त्यामुळे संशय आणखी बळावला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

तो भागही तसा ज्वालामुखीय गतीविधींसाठी ओळखला जात होताच. त्या तळ्याखालील जमिनीच्या भेगांमधून ज्वालामुखीय वायू हळूहळू तळ्यात मिसळत होते ही प्रक्रिया अतिशय कमी वेगानं जरी होत असली तरी वर्षानुवर्षे अविरत चालू होती.

तज्ज्ञांनी तळ्याच्या पाण्याचे नमुने घेतले आणि मग एकेका गोष्टीचा उलगडा होत गेला. पाण्यात Co2 चं प्रमाण चक्रावून टाकणार होतं.

झालं असं होतं की, तळ्याच्या पाण्याच्या खालच्या थरात Co2 चं प्रमाण वाढत गेलं होतं. ते एक स्थिर तळं होतं म्हणजे पाण्याची हालचाल एकदम नाही म्हणावं अशीच होती आणि त्यामुळे खाली पाण्यात विरघळून गेलेला Co2 कधी तळ्याच्या पृष्ठभागावर येऊ शकला नाही. वरच्या पाण्याच्या दाबामुळे आणि कमी तापमानामुळे कार्बन डायॉक्साईड त्याच्या क्षमतेपेक्षाही जास्त प्रमाणात विरघळत राहिला.

आणि दुर्घटनेच्या दिवशी अज्ञात कारणामुळे अंदाजे 1,00,000 – 3,00,000 टन Co2 लहरीय स्फोटाद्वारे (Lumnic Eruption) तळ्यातुन बाहेर पडला. वायूच्या प्रमाणावरून आपण अंदाज लावू शकतो की एवढा वायू जमा होण्यासाठी कित्येक वर्ष लागली असतील. पृष्ठभागावरुन बाहेर पडलेल्या त्या Co2 च्या ढगाचा वेग जवळपास ताशी 100 किमी एवढा असावा. Co2 च्या गुणधर्मानुसार हा वायू जड असतो आणि त्यामुळे तो वायू आकाशात वर न जाता वातावरणाच्या खालच्या थरात म्हणजेच जमिनीजवळच राहिला आणि पसरला.

सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जी शीतपेये पितो त्यामध्ये कार्बन डायऑक्सइड उच्च दाबाद्वारे मिसळला जातो आणि आपण जेव्हा तो दाब काढतो म्हणजेच बाटलीच झाकण काढतो तेव्हा शितपेयामध्ये Co2 चे बुडबुडे तयार होतात व ते पृष्ठभागावर येऊ लागतात अगदी तसंच.

पण तळ्यातुन वायू बाहेर येण्याची साखळी प्रक्रिया का आणि कशी सुरू झाली हे प्रश्न अनुत्तरित आहेत किंबहुना त्याबद्दल एकमत नाही असं म्हटलं तर बरं होईल.

हा वायू बाहेर पडताना तळ्याच्या तळभागातील लोहखनिज युक्त पाणीही वर आले आणि नंतर हवेच्या संपर्कात येऊन त्याचे ऑक्सिडीकरण होऊन तळ्याच्या पाण्याला लाल रंग आला.

Co2 बरोबरच इतरही गंधक (सल्फर) आणि हायड्रोजन मिश्रित वायूही बाहेर पडले आणि त्यांचा उग्र वास हवेत पसरला. मृत शरीरावर पडलेले चट्टे हे वायुतील HCL (ऍसिड) वाफेमुळे झाल्याचं निष्पन्न झालं.

अशा या विरळातील विरळ घटनेने हजारोंचा जीव घेतला आणि नैसर्गिक आपत्तीचा एक अनपेक्षित चेहरा मानवाच्या समोर आणला.

त्या तळ्यावर आजही संशोधन चालू आहे आणि अशी दुर्भाग्यपूर्ण घटना पुन्हा उद्भवू नये यासाठी उपाय आणि प्रयत्न चालू आहेत.

त्या भागात अशाच प्रकारच्या दुसऱ्या तळ्याचा शोध संशोधकांनी घेतला आहे जे लेक न्योस पेक्षा २००० पटीने मोठं आहे आणि खोलही. अभ्यासकांच्या मते या तळ्यातही अशाच परिस्थिती आहेत आणि भविष्यात इथेही अशाच प्रकारची त्रासदी होऊ शकते. अशी नैसर्गिक आपत्ती भविष्यात कोणावर ओढवू नये हीच अपेक्षा आणि प्रार्थना.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Lake Nyos Disaster
ShareTweet
Previous Post

लोथल – भारताचा ५००० वर्षांचा सांस्कृतिक वारसा एकाच ठिकाणी उलगडून दाखवणारं प्राचीन गाव

Next Post

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बॉलीवूडने आजवर इतिहासाची बरीच वाट लावलेली आहे

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बॉलीवूडने आजवर इतिहासाची बरीच वाट लावलेली आहे

साबू दस्तगीर - 'हॉलीवूड वाॅक ऑफ फेम'मध्ये नाव कोरणारा एलिफंट बॉय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.