The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेच्या न्यू*क्लिअर टेस्टचं सिक्रेट सर्वात आधी कोडॅकला कळलं होतं..!

by Heramb
3 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


विसाव्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने कळस गाठला होता. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग-धंदे जोमाने सुरु होते, तर सामान्य जनतेलाही या नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल कुतूहल वाटत असे. छायाचित्रीकरणाचं तंत्रज्ञानही नवखं असल्याने अनेक लोकांना त्याबद्दल उत्सुकता होती, यामुळेच कोडॅकसारख्या छायाचित्रीकरणासंबंधित कंपन्या ग्राहकांच्या मनावर राज्य करीत होत्या.

आपल्या ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि अडचण आली तरी त्या अडचणीचं निवारण तात्काळ करता यावं यासाठी ग्राहकांना कंपनीला पत्र पाठवण्याची सोय केली गेली होती. हीच त्याकाळची ‘हेल्पलाईन’!

उद्योग सुरळीत सुरु असताना अचानक ऑगस्ट १९४५ मध्ये ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्या. या तक्रारी प्रामुख्याने फोटोग्राफिक फिल्म्सबद्दल होत्या. या फिल्म्स शेकडो पांढऱ्या रंगाच्या लहान-मोठ्या ठिपक्यांमुळे धूसर झाल्या असल्याच्या या तक्रारी होत्या. सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या कोडॅकच्या फोटोग्राफिक फिल्म्सवर अशा प्रकारचं प्रदूषण अनपेक्षित होतं. प्रथमदर्शनी काही एक्स-रेजमुळे या फिल्म्सवर असा परिणाम झाल्याचं दिसून येत होतं.

पण तक्रारींचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन कोडॅकने त्यांच्या काही सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांपैकी एक ज्युलियन वेबला या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यास सांगितलं. अभ्यासांती ज्युलियन वेब खूप कमी वेळातच निष्कर्षाप्रती पोहोचला. फिल्म्सवर पांढऱ्या रंगाचे ठिपके येण्याचं मुख्य कारण म्हणजे एक्स-रेसारखा कोणताही प्रकाश नसून फिल्म्स रेडियोॲक्टिव पदार्थांमुळे दूषित झाल्याचं समोर आलं. 



कोडॅक उद्योगसमूहासमोर आलेली ही अत्यंत नवखी समस्या होती, १९४० चं दशक हे अणूऊर्जेचं दशक होतं. दुसऱ्या महायु*द्धाच्या या शेवटच्या काळात सगळ्या शक्तिशाली सत्ता अ*णूबॉ*म्बच्या शोधात होत्या. या स्पर्धेत अमेरिका कशी मागे राहणार, पण किरणोत्सर्गापासून आपल्या उत्पादनांचं रक्षण करण्यासाठी कोडॅक उद्योग समूहाने अनेक प्रयत्न केले होते. त्यांनी आपल्या पुरवठा साखळीचं (सप्लाय चेन) नियोजन, किरणोत्सर्गाशी संपर्क होणार नाही अशाच रीतीने केले होते. 

कोडॅकच्या काही व्यवस्थापकांना घडलेल्या प्रकाराला ‘रेडियम’ कारणीभूत असल्याचे वाटले होते. त्यावेळी रेडियम विविध प्रकारच्या घडाळ्यांमध्ये नवा ट्रेंड म्हणून वापरण्यात येत होतं. तसेच कॅन्सरवरील उपचारासह अनेक कारणांसाठी रेडियमचा वापर होत असल्याने आपल्या पुरवठा साखळीत कुठेतरी हे रेडियम आले असल्याचे त्यांना वाटले. रेडियमचा किरणोत्सर्ग पुठ्ठयातून होत असल्याचा त्यांना संशय आला. याच किरणोत्सर्गाचा परिणाम पुढे फिल्म्सवर पांढऱ्या डागांद्वारे समोर आला. या समस्येवरील उपाय म्हणून कोडॅकने कागद आणि कागदाच्या लगद्यापासून पॅकेजिंग करायला सुरुवात केली, आणि या साठी त्यांनी एक स्वतंत्र प्लान्टही उभारला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

तरी गूढ अजूनही उलगडले नव्हते. प्रदूषित झालेल्या फिल्म्सचे पॅकेजेस सदर्न इंडियानामधील व्हिन्सेनास येथील एका कारखान्यातून येत असल्याचं उत्पादनाच्या नोंदी तपासताना ज्युलियन वेबला लक्षात आलं. हा कारखाना प्रामुख्याने एक्स-रेजसाठी आवश्यक स्ट्रॉबोर्डचं उत्पादन करत असे. हे स्ट्रॉबोर्डस् एक्स-रेजचा उपयोग करताना ‘स्निफर्स’ म्हणून वापरले जात होते, यामुळेच ६ ऑगस्टला तयार झालेल्या फिल्म्सवर मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन पांढरे डाग पडले असावेत असा निष्कर्ष काढण्यात आला. पण स्ट्रॉबोर्डस्-वरही अशाच प्रकारचं प्रदूषण दिसून आलं होतं. 

यानंतर झालेल्या अधिक तपासाने मात्र वेगळेच वळण घेतले. मोठ्या प्रमाणात झालेलं हे प्रदूषण आणि नुकसान यामागे फक्त रेडियम नव्हते, कारण रेडियम ‘अल्फा’ प्रकारचा किरणोत्सर्ग करतं, तर बहुतांश फिल्म्सवरील प्रदूषण ‘बीटा’ प्रकारचा किरणोत्सर्ग करत होतं. निसर्गात न सापडणाऱ्या सेरियम-१४१ या आयसोटोपमुळे हा किरणोत्सर्ग होत असल्याचं कालांतराने वेबला लक्षात आलं. निसर्गात न सापडणारा हा सेरियम-१४१ आयसोटोप अणू-खंडनाच्या (न्यूक्लिअर फिशनच्या) प्रक्रियेतून तयार होतो. स्ट्रॉबोर्डस् वापरण्याआधी भरपूर मोठ्या कालावधीसाठी आतमध्ये ठेवले असल्याने आणि सेरियम-१४१चं विघटन झाल्याने स्ट्रॉबोर्डस् वर झालेल्या प्रदुषणाचं कारण लक्षात आलं. 

फिल्म्सवर झालेल्या प्रदूषणाचं कारण शोधण्यासाठी आता एक अंतिम पर्याय होता, तो म्हणजे कोडॅकच्या प्लॅंटजवळील वेबॅश नदीचं पाणी उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी वापरलं जात होतं, आयोवा येथे असलेल्या कोडॅकच्या दुसऱ्या प्लॅंटवरील स्ट्रॉबोर्डस् अशाच प्रकारे प्रदूषित झाल्याने संशय आणखी दृढ झाला. या दोन्ही शाखा एकमेकांपासून ४५० मैलांवर असून दोन्ही शाखांची उत्पादने एकाच वेळी तयार झाली होती आणि दोन्ही शाखेतील प्रदूषित झालेल्या उत्पादनावर एकाच प्रकारचे प्रदूषण होते.

नैऋत्य अमेरिकेत जुलै-मध्यावर कधीतरी घडलेल्या एका घटनेने वातावरणात मोठ्या प्रमाणावर अणू-खंडनाद्वारे निर्माण झालेले किरणोत्सर्गी पदार्थ सोडले होते. हे पदार्थ वातावरणात मिश्रित झाल्याने कालांतराने पावसाबरोबरच ते पुन्हा पृथ्वीवर आले, आणि नद्यांच्या पाण्यात प्रवाही झाले. वेबॅश नदीकाठी वसलेल्या व्हिन्सेनास येथील या कारखान्यातही त्यांचा परिणाम जाणवला. 

वेबचा अंदाज अगदी अचूक ठरला. कुठल्यातरी अज्ञात अणुखंडनाच्या प्रक्रियेतून तयार झालेला सेरियम-१४१ आयसोटोप हा त्या अज्ञात घटनेचाच परिणाम होता. ही घटना दुसरी तिसरी कोणतीही नसून, ट्रिनिटी टेस्ट होती – होय जगातील सर्वप्रथम अणू-चाचणी! या सगळ्याची कल्पना असूनही वेबने तूर्तास कुठेही तोंड उघडलं नाही.

१६ जुलै १९४५ रोजी सकाळी साडेपाच वाजता न्यू मेक्सिको येथील अँलमगोर्डचे आकाश एका वेळी हजार सूर्य आकाशात असल्यासारखे उजळून निघाले. प्रचंड प्रकाश आणि ‘मशरूम क्लाउड’ ही जगातील सर्वप्रथम अणवस्त्राची चाचणी होती, यामध्ये सुमारे २२००० टन टी.एम.टी.चा वापर करून स्फो*ट करण्यात आला होता. याच चाचणीचं सांकेतिक नाव होतं, “ट्रिनिटी टेस्ट”. ट्रिनिटी टेस्ट ही सुमारे १ लाख ३० हजार पेक्षा जास्त लोकांच्या कष्ट आणि अभ्यासाची फलश्रुती होती. यासाठी सरकारकडून सुमारे २३० करोड डॉलर्स खर्च करण्यात आले होते, हाच अमेरिकेचा मॅनहॅटन प्रोजेक्ट होता.

ट्रिनिटी टेस्ट यशस्वी झाल्याचं कोणालाही कळू नये म्हणून सरकार प्रयत्नशील होतं. कारण ट्रिनिटी टेस्ट ही यु*द्धाच्या कालावधीत गुप्त ठेवायची होती. तरी अ*णव*स्त्राचा स्फो*ट झाल्याची घटना सहजासहजी गुप्त ठेवणे जवळ जवळ अशक्यच होते. तरी अमेरिकन अधिकाऱ्यांनी अ*ण्व*स्त्राचा स्फो*ट लपविण्याचा प्रयत्न केलाच. यु*द्धकाळात साहजिकच असलेला पारंपरिक दारूगोळ्याचा कोठाराचा स्फो*ट असल्याचं त्यांनी वर वर सांगितलं. अ*ण्वस्त्र स्फो*टानंतर तयार झालेल्या महाकाय मशरूम क्लाउडला लपवणं मात्र अशक्यच होतं.

पण या अधिकाऱ्यांना  कोडॅक उद्योगसमूह आणि वेब यांच्या अत्यंत उत्कृष्ट गुणवत्ता नियंत्रण विभागाबद्दल (क्वालिटी कंट्रोलबद्दल) काहीच माहिती नव्हती. वेबने मॅनहॅटन प्रोजेक्टवर काही काळासाठी काम केलं असल्याने त्याला या ट्रिनिटी टेस्टबद्दल माहिती होती. पण हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉ*म्ब पडेपर्यंत त्याने आपलं तोंड बंद ठेवलं होतं.

१९४९ साली फिजिकल रिव्यू या जर्नलमध्ये त्याने लेख दिला, या लेखामधून फिल्म्सवर झालेल्या प्रदूषणाचा स्रोतही आपल्याला स्पष्टपणे कळतो.

“बहुधा या किरणोत्सर्गी प्रदूषणाचा स्रोत १६ जुलै १९४५ रोजी न्यू मेक्सिको येथे झालेल्या बॉ*म्ब स्फो*टानंतर हवेद्वारे पसरलेले किरणोत्सर्गी पदार्थ असू शकतात!”

यानंतरही अमेरिकेने जमिनीवरच अनेक अणू-चाचण्या केल्या, या चाचण्यांचे अनेक घातक परिणाम झाले. आयोडीन-१३१ या आयसोटोप मुळे अमेरिकेत थायरॉईडच्या क्षयरोगाचे प्रमाण याच काळात मोठ्या प्रमाणात वाढले, शिवाय अनेक मुलांचा या क्षयरोगामुळे मृत्यू झाला. पण अमेरिकेने अणू चाचण्यांना प्राधान्य देत हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचं सांगितलं.

अखेर १९६३ साली अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी मर्यादित चाचणी बंदीच्या करारावर स्वाक्षरी केली आणि या नंतर भूमिगत अणू चाचण्यांना सुरुवात केली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

उडिसातल्या एका महिलेने चक्क एका सापाशी लग्न केलं होतं..!

Next Post

दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणामुळे ‘ताज महालाचा’ रंग पिवळा पडतोय..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणामुळे 'ताज महालाचा' रंग पिवळा पडतोय..!

या पठ्ठयाने केवळ ४१५ रुपयांमध्ये गुगलचं डोमेन विकत घेतलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.