The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेपाळ-भारत सीमेवर सैन्य तैनात करणाऱ्या नेपाळची सैन्यशक्ती किती आहे..?

by द पोस्टमन टीम
13 April 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


नेपाळी सेना सध्या चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे लिपुलेख सैन्यसीमेवर वाद झाल्यानंतर त्यांनी आपली सेना तिथे तैनात करण्याचा घेतलेला निर्णय. नेपाळी सेनेची ताकद आणि क्षमता याबद्दल आज आपण जाणुन घेणार आहोत. इतिहासात प्रथमच नेपाळी सेना लिपुलेखवर आपला सैनिकी तळ बनवून सैन्य तैनात करणार आहे. संख्येच्या तुलनेत नेपाळी सेना भारतीय सेनेपेक्षा खुप कमी असली तरी दक्षिण आशियामधील सगळ्यात जुन्या सेनेपैकी एक म्हणुन ही सेना ओळखली जाते. याच सेनेला गोर्खाली सेना म्हणुनही ओळखले जाते.

सगळ्यात आधी गोर्खाली सेना म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या सेनेचे नाव पुढे द रॉयल नेपाळी आर्मी करण्यात आले. पुन्हा २४० वर्ष चाललेल्या राजेशाहीनंतर तिला परत नवीन नाव मिळाले. २८ मे, २००८ ला तिला नेपाळी आर्मी म्हणजेच नेपाळी सेना असे आत्ताचे नाव देण्यात आले. नेपाळी सेनेने अनेक लढाया केल्या आहेत.

याआधी ही सेना चीन आणि इंग्रजांशी सुध्दा लढली आहे. तसेच इंग्रजांच्या बाजुने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातही सेना लढली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बाजुने ही सेना सोमालिया, सिएरा लीओन, इथियोपिया आणि सुडानच्या अंतर्गत युध्दात लढली आहे.

नेपाळी सेनेचे मुख्यालय भद्रकाली काठमांडू इथे आहे. जनरल पूर्ण चंद्र थापा या सेनेचे प्रमुख आहेत. आपल्या शौर्याचे अनेक दाखले नेपाळी सेनेने आजपर्यंत दिलेले आहेत. त्यांच्या या शौर्यामुळेच इंग्रजांनी त्यांना आपल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सेनेत भरती करण्यास सुरुवात केलेली. भारतात अजुनही एक गोरखा तुकडी आहे जी इंग्रजांच्या काळात स्थापन केली गेली होती.



सन २००४ मध्ये नेपाळने आपल्या सेनेवर ९९.२ दशलक्ष डॉलर खर्च केले होते, जो त्यांच्या स्थूल प्रादेशिक उत्पन्नाच्या १.५ टक्के होता. त्यानंतर मात्र सेनेवर होणारा खर्च वाढत गेला. ‘ट्रेड इकॉनॉमिक्स’ संकेतस्थळाच्या अहवालानुसार २०१७ मध्ये ४०५ दशलक्ष डॉलर खर्च केला गेला, जो २०१८ मध्ये ३९७ डॉलर होता.

नेपाळी सेनेत जवळजवळ १ लाख युध्दसैनिक आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये ‘हिमालय टाइम्स’ च्या बातमीनुसार नेपाळची सैन्यक्षमता ९६००० आहे. तर काठमांडूच्या एल वृत्तपत्रानुसार ही संख्या ९२००० आहे. जगभरातील विविध सेनेची आकडेवारी जाहीर करणाऱ्या  ‘ग्लोबल फायरपावर’ या संकेतस्थळावर हीच संख्या ९५००० आहे. याच संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार नेपाळकडे  ‘फायटर प्लेन’ नाही. वायुसेनेकडे १३ हेलिकॉप्टर आणि तीन मालवाहू विमाने आहेत. नेपाळी सेनेकडे रणगाडा सुध्दा नाही. ८४ तोफा आहेत. नेपाळकडे स्वत:ची नौसेना नाही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

नेपाळी सेनेचा सर्वोच्च अधिकारी देशाचा राष्ट्रपती असतो. २००६ पर्यंत नेपाळचा राजा या सगळ्या सेनाविभागांचा प्रमुख असे.

नेपाळमध्ये एक राष्ट्रीय सुरक्षा समिती आहे जी या सगळ्या कामकाजावर नियंत्रण ठेवते. ७ सदस्यीय असलेल्या या समितीमध्ये पंतप्रधान, संरक्षण मंत्री, सेनाध्यक्ष, विदेश मंत्री, वित्तमंत्री, गृहमंत्री आणि मुख्य सचिव असतात. नेपाळी सेनेचे ८ विभाग आहेत. नेपाळी सेनेचे ७ विभाग नेपाळच्या ७ राज्यात असुन १ विभाग काठमांडूमध्ये स्थित आहे. याचबरोबर नेपाळी सेनेच्या ७ तुकड्या आहेत. ज्या खालीलप्रमाणे:

  • आर्मी एविएशन डायरेक्टरेट
  • स्पेशल फोर्सेस ब्रिगेड
  • वीवीआई सिक्योरिटी
  • आर्टीलरी ब्रिगेड
  • सिग्नल ब्रिगेड
  • इंजीनियर्स ब्रिगेड
  • एयर डिफेण्स ब्रिगेड
  • वुमन पार्टीसीपेशन इन नेपाळ आर्मी.

बाकी देशांच्या सेनेसारखंच नेपाळी सेनेचे मुख्य काम आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण, नेपाळच्या स्वंतत्रतेचे रक्षण हे आहे. तसेच नेपाळी सरकारच्या अंतर्गत संरक्षणाची जबाबदारीसुध्दा सेनेकडे आहे. संयुक्त राष्ट्राच्या विविध शांती प्रस्थापित करण्यासाठीच्या मोहिमेत या सेनेने भाग घेतलेला आहे.

१९७४ मध्ये तिबेटजवळ असणाऱ्या नेपाळी जमीनवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चीनच्या पीपल्स लिबरेशन सेनेच्या विरोधात नेपाळी सेनेने युध्द केले. त्यावेळी नेपाळने आपली बरीचशी सेना पाठवली होती. नंतर त्यांचा चीन बरोबर करार झाला आणि युध्द संपले.

नेपाळला येणाऱ्या हत्यारांचा पुरवठा मुख्यतः अमेरिकेतून होतो. नेपाळी सेनेला प्रशिक्षण देण्यासाठीही अमेरिकन प्रशिक्षक असतात. चीनबरोबरच्या युध्दात अमेरिकेने नेपाळला मदत करण्याचे वचन दिले आहे. परंतु हेच वचन भारताशी युध्द झाल्यास निष्प्रभ ठरेल. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा मुख्य सहकारी आहे. त्याचबरोबर भारतसुध्दा नेपाळी सेनेला हत्यारे, काडतुसे आणि विविध उपकरणे पाठवतो. जर्मनी, बेल्जियम, साउथ कोरिया आणि इस्त्राईलमधूनसुध्दा हत्यारांचा पुरावा केला जातो.

एकूणच काय तर नेपाळी सैन्याची एकंदर स्थिती पाहता त्यांचा भारताविरुध्द निभाव लागू शकत नाही. आज चीन नेपाळच्या आडून भारतावर कुरघोडी करू पाहत आहे. त्याचा नेपाळला सर्वच बाजूंनी घाटा आहे. 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आदिवासींना अ*त्याचारांची जाणीव करून देऊन इंग्रजांविरोधात एल्गार करणारे भगवान बिरसा

Next Post

जाणून घ्या भारत-चीन सीमावाद काय आहे.

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जाणून घ्या भारत-चीन सीमावाद काय आहे.

वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठीचा आराखडा आपल्याकडे १२ वर्षांपूर्वीच बनला होता, पण...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.