The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगज्जेत्या अलेक्झांडरच्या प्रेयसीने पुरु राजाला राखी बांधून त्याची इज्जत वाचवली होती

by द पोस्टमन टीम
7 February 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतीय इतिहासात जेव्हा सिकंदरचा उल्लेख होतो, त्यावेळी एका नावाची चर्चा हमखास केली जाते, ते नाव आहे राजा पुरु.

राजा पुरु हा अत्यंत पराक्रमी राजा होता. त्याने फक्त सिकंदराच्या घोडदौडीला रोखले नाही तर त्याला पराभूत केले होते. परंतु सिकंदरच्या प्रेयसीच्या हट्टामुळे पुरुने आपला पराभव मान्य केला होता. यानंतर सिकंदर व पुरु यांच्यात मैत्री झाली. पुढे सिकंदर मैत्रीसाठी माघारी परतला होता.

परंतु सिकंदरच्या प्रेयसीशी राजा पुरुशी असं कुठलं नातं होतं ज्यासाठी पोरसने आपला पराभव स्वीकारला होता? चला जाणून घेऊया..

इसवी सन पूर्व ३४० मध्ये भारत अखंड नव्हता, वेगवेगळ्या भूप्रदेशात भारत विभागला गेला होता. त्याकाळी पंजाबपासून झेलम-चिनाब पर्यंत पोरस राजाचे साम्राज्य होते. पुरुचे राज्य छोटे असले तरी त्याचा पराक्रमाची गाथा सर्वदूर पोहचली होती. (इतिहासकरांच्या मते तो एक यदुवंशी राजा होता.)



पुरु अत्यंत कुशलतेने आपल्या राज्याचा कारभार बघत होता. त्याच काळात सिकंदर आपलं जगज्जेता बनण्याच्या स्वप्नाकडे कूच करत होता. एकएक करत त्याने अनेक देशांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. आपले सैन्य घेऊन तो पोरसच्या प्रदेशात येऊन धडकला. त्याने पुरुला त्याला शरण येण्याचे आवाहन करत गुलामगिरीचा स्वीकार करण्यास सांगितले.

परंतु पुरुने सिकंदरच्या या निरोपाला केराची टोपली दाखवत, त्याला यु*द्धभूमीवर लढण्यासाठी आमंत्रित केले. पुरु अत्यंत पराक्रमी आणि स्वाभिमानी होता, प्रसंगी जीव गेला तरी दास्यत्व स्वीकारणारा नव्हता.

अखेरीस पुरु आणि सिकंदर एकमेकांच्या समोर यु*द्धभूमीत उभे ठाकले. इसवी सन पूर्व ३२६ साली हाईड्स्पेश नदीच्या काठावर दोघांमध्ये यु*द्ध झालं. सिकंदराच्या विशाल सैन्यासमोर पुरुचे सैन्य कमी होते. लोकांना वाटायचे की पुरु सहजासहजी चिरडला जाईल आणि सिकंदर विजयी होईल, परंतु झाले भलतेच!

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पुरुच्या सैन्याने सिकंदराच्या सैन्याच्या चिंधड्या उडवल्या. सिकंदर पुरुसमोर हार मानायला तयार नव्हता पण पुरुचे देखील इरादे मजबूत होते, तो देखील प्राण पणाला लावून सिकंदराचा सामना करत होता. पुरुच्या ह*ल्ल्याने सिकंदरच्या सैन्याची बिकट अवस्था झाली. अनेक दिवस हे यु*द्ध सुरू होते, सिकंदराला त्याचा पराभव स्पष्ट दिसत दिसत होता. ज्याप्रकारे पुरु लढा देत होता, त्याच्या मनात भीती निर्माण झाली होती.

सिकंदरच्या सैन्याची दुरावस्था बघून त्याची प्रेमिका दुःखी झाली व तिने पुरुकडे आपल्या प्रियकराचे जीवनदान मागण्याचा निर्णय घेतला, ती पुरुच्या छावणीत गेली त्यावेळी तिने बघितले की पुरुच्या सैनिकांचा हातावर एक विशिष्ट रेशमी धागे गुंडाळले होते, त्याबद्दल विचारणा केल्यावर तिला समजले की ती राखी असून सैनिकांना त्यांच्या बहिणींनी पाठवली आहे.

राखी व रक्षाबंधन सणाचे महत्त्व समजून घेतल्यानंतर सिकंदरचा प्रेयसीने सरळ पुरुचा तंबू गाठला व त्याच्या हाताला राखी बांधून तिने सिकंदरचा प्राणांची भीक मागितली. धर्मप्रेमी असलेल्या पुरुने तिला सिकंदरसमोर पराभव कबूल करेल असं वचन दिलं.

पुरुने आपल्या या बहिणीला दिलेलं वचन पाळण्यासाठी स्वतःचा पराभव स्वीकारला. सुरुवातीला सिकंदराला याचं कुतूहल वाटलं पण नंतर त्याने पुरुला बंदीगृहात ठेवले व मोठ्या उत्साहात त्याने आपला विजय साजरा करायला सुरुवात केली.

त्याने पुरुला गुलाम बनवण्याचा चंग बांधला त्यावेळी त्याच्या प्रेमिकेने त्याला सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून सिकंदर चकित झाला. त्याने तत्काळ सन्मानाने पोरसच्या सुटकेचे आदेश दिले व त्याच्याशी मैत्री केली. इतकेच नाही तर, या यु*द्धानंतर सिकंदर पुन्हा आपल्या मायभूमीकडे परतला, त्याने आपल्या विश्वविजयाच्या मोहिमेला तिलांजली दिली.

परतीच्या वाटेवर बॅबिलोन येथे सिकंदरने आपला देह ठेवला. पुढे पुरुचे काय झाले यावर भाष्य करणारे विशेष पुरावे इतिहासात उपलब्ध नाहीत, पण सिकंदरच्या एका सरदाराने इसवी सन पूर्व ३२२ ते ३१५ काळात पुरुची ह*त्या केल्याचे सांगितले जाते, पण हा ऐकीव इतिहास आहे, याला कुठलाच संदर्भ अजूनतरी देण्यात आलेला नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

केरळच्या या डॉक्टरने आयडिया करून ड्रायव्हिंग कॉस्ट शून्य रुपयांवर आणली आहे

Next Post

केरळच्या जोडप्याने चहा विकून केला जगभर प्रवास!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

केरळच्या जोडप्याने चहा विकून केला जगभर प्रवास!

शरीराच्या आरपार पाहणाऱ्या 'एक्स-रे'चा शोध लावला आणि फिजिक्सचं पहिलं नोबेल मिळालं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.