The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या हुकुमशाहच्या कारनाम्यांपुढे हि*टल*रही फिका पडेल

by द पोस्टमन टीम
23 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आधुनिक जगातील सर्वांत क्रू*र शासक म्हणून आपल्याकडे हि*टल*रचे नाव घेतले जाते पण हि*टल*रच्या काही वर्षे अगोदर बेल्जियमचा एक शासक होता, ज्याने क्रू*रतेची परिसीमा गाठली होती. या शासकाचे नाव होते लियोपोल्ड, याने आफ्रिकन देश कॉंगोमध्ये मोठा नरसं*हार केला होता.

दुसऱ्या लियोपोल्डचा जन्म ९ एप्रिल १८३५ रोजी बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे झाला, त्याने सर्वाधिक ४५ वर्ष शासन बेल्जियमवर केले. १७ डिसेंबर १९०९ साली त्याचा लंकन याठिकाणी मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा पुतण्याकडे अल्बर्टकडे राजगादी गेली.

आज बेल्जियममध्ये दुसरा लियोपोल्ड बिल्डर किंग म्हणून ओळखला जातो, त्याने बेल्जियममधील काही प्रसिद्ध वास्तूंची निर्मिती केली, यात काही राजेशाही इमारतींचा समावेश आहे, ज्या आज बेल्जियममधील पर्यटनाच्या महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहेत.

यापैकी ब्रसेल्सची सिनक्वांटेनियर आणि ॲव्हेन्यू लुईस व लंकेनचं रॉयल ग्रीन हाऊस हे राजवाडे जगभरात प्रसिद्ध आहे. पण या मोठमोठ्या राजेशाही इमारतींच्या पाठी लियोपोल्डच्या कॉंगोमधील रक्तरंजित साम्राज्यवादाचा काळा इतिहास दडलेला आहे.

दुसरा लियोपोल्ड हा फारच धूर्त आणि विस्तारवादी शासक होता. इतर युरोपियन देशांप्रमाणे ब्रसेल्सची स्वतःची वसाहत नाही, हे बघून त्याने सुरुवातीला फिलिपाईन्सला स्पेनकडून आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याने व स्पेनची राणी दुसऱ्या इसाबेलाचे सत्तांतर झाल्यामुळे ही योजना बारगळली.



१८७६ साली लियोपोल्डने इंटरनॅशनल आफ्रिकन असोसिएशनची स्थापना केली. या संस्थेचं स्वरूप मानवतावादी व लोककल्याणकारी असलं तरी या संस्थेचा बळावर लियोपोल्डने मध्य आफ्रिकेचा मोठा भाग बळकावला व तिथे बेल्जियमची वसाहत स्थापन केली.

हेन्री मोर्टन स्टॅन्ली या मुसाफिराची मदत घेऊन त्याने आजचा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोचा भाग बळकावला आणि त्याने त्या भागाचे कॉंगो फ्री स्टेट असे नामकरण केले.

१८८४-८५ मध्ये झालेल्या बर्लिन परिषदेत युरोपियन देश व अमेरिकेने लियोपोल्ड कॉंगोमध्ये सेवाकार्य करतोय या खोट्या प्रचारावर विश्वास ठेवत, त्याचे त्या भागातील अस्तित्व मान्य केले. बेल्जियन सरकारने देखील लियोपोल्डच्या धोरणाला पाठबळ देत मोठ्या प्रमाणात निधी देऊ केला, त्या निधीच्या बळावर त्याने तो भाग आपली वैयक्तिक वसाहत म्हणून ताब्यात घेतला. पुढे त्याने जे केले ते युरोपियन देशात निर्माण केलेल्या खोट्या मानवतावादी आवरणाला छेदणारे होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

बेल्जियन सरकारचा पैसा परत करण्यासाठी आणि स्वतःची खाजगी मालमत्ता जमवण्यासाठी कॉंगोमधील लियोपोल्डचे शासन हे तिथल्या स्थानिक लोकांची पिळवणूक करू लागले. तिथल्या नैसर्गिक संसाधनांची लूट करू लागले.

लियोपोल्डने या भागात आपले स्वतःचे खाजगी सैन्य दल तयार केले, ज्याला ‘फोर्स पब्लिके’ असं नाव दिलं. त्याने या सैन्य दलाच्या बळावर कॉंगोमध्ये जबरदस्तीने लोकांना मजुरी करण्यास भाग पाडायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात लियोपोल्डने या भागातील हत्तींची क*त्तल करून हस्तिदंताचा व्यापार केला, पुढे रबराची वाढती मागणी लक्षात घेऊन त्याने रबराच्या झाडाच्या चिकाचे कलेक्शन करायला सुरुवात केली.

नैसर्गिक रबर प्राप्त करण्यासाठी एका ह*त्याराने साल सोलण्यात येते. त्यासाठी झाडाच्या एका विशिष्ट भागावर प्रहार करण्यात येतो. पण जरा ही निशाणा अथवा जागा चुकली तर झाड मृत होते. झाडातून चार तास द्रव्य बाहेर निघत असते, पुढे ते गोठते व ते जमा केले जाते. सकाळी झाडाची साल काढली की दुपारी द्रव्य गोळा होते. ही रबर गोळा करण्याची पारंपरिक पद्धत आहे.

परंतु कॉंगोमध्ये लियाना वनस्पतीची एक जात आढळून येते, ही वनस्पती पण रबराचे द्रव्य उत्सर्जित करते. ही वनस्पती घनदाट अरण्यात आढळून येते.

साधारणपणे या झाडाची साल काढून भांड्यात रबर जमवले जाते. पण कॉंगोमध्ये मात्र भयानक प्रकार असायचा, तिथे वृक्षातून निघणारे द्रव्य हे तिथले मूळनिवासी लोक अंगावर लावून घ्यायचे आणि पुढे ते कठोर झाले की अंगावरून काढले जायचे. हा प्रकार फार अघोरी होता, यामुळे रबराबरोबर कामगारांच्या अंगावरील कातडी सोलली जात होती.

काँगोमधील स्थानिकांना लियोपोल्डने रबर गोळा करण्यासाठी एक विशिष्ट मर्यादा सांगितली होती, जर तितके रबर गोळा केले नाहीतर मोठा दंड तो त्या लोकांना देत होता, यासाठी ते लोक आपल्या लहान लहान मुलांना रबर गोळा करायला घेऊन जात असत.

जर रबर गोळा करू शकले नाहीतर मुलांना सैनिक उचलून घेऊन जात आणि मोठ्यांचे हात छाटून टाकत. जे लोक या कामाला विरोध करत त्यांच्या वस्त्या पेटवून दिल्या जात होत्या. जबरदस्तीने कॉंगोचे बहुसंख्य लोक रबर गोळा करू लागले होते, याचे प्रमाण इतके होते की लोकांनी शेती व्यवसायच बंद केला होता, जर लोक शेती करायला लागले तर सैनिक येऊन लुटमार करत, याचा परिणाम असा झाला की कॉंगोमध्ये एक भीषण दुष्काळ पडला, ज्यात हजारो लाखो लोक भुकेने तडफडून मेले.

लियोपोल्ड ज्या मुलांना दंड म्हणून त्यांच्या पालकांकडून उचलून आणायचा, त्यांना सैनिकी शाळेत घालून प्रशिक्षण द्यायचा, याठिकाणी देखील वेगवेगळ्या आजारांनी हजारोंच्या संख्येने लहान मुलं गतप्राण झाली होती.

ज्यावेळी बेल्जियन सरकारला लियोपोल्डने काँगोमध्ये चालवलेल्या रक्तरंजित व्यवहाराची माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी १९०८ साली लियोपोल्डला त्या भागाला सरकारचा स्वाधीन करण्याची मागणी केली.

लियोपोल्डला यासाठी सरकारने २०० कोटी फ्रॅंक इतकी मोठी किंमत दिली. यापैकी ५० लाख फ्रॅंक तर एकट्या लियोपोल्डच्या खिशात गेले.

यामुळे काँगोतील अमानुष कारभार जरा थांबला तरी अजूनही त्या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाही. तिथे सततचे गृहयु*द्ध सुरू असते. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेने तिथे गेली अनेक वर्षे कारवाया केल्या आहेत, तरी शांतता प्रस्थापीत झालेली नाही.

खरंतर बेल्जियम अथवा लियोपोल्ड हेच काही वसाहतवादी नव्हते, यांच्याप्रमाणे डच, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज ही होते, त्यांनी देखील अत्याचार केले पण बेल्जियमचा कॉंगोमधील लियोपोल्ड पुरस्कृत वसाहतवाद हा वसाहतवादाचा सर्वात अमानुष चेहरा होता. आज जेव्हा बेल्जियमच्या सुंदर वास्तू बघून त्यांच्या निर्मात्याची स्तुती करायला जाल त्यावेळी त्याचा आफ्रिकेतील अमानुष अ*त्याचाराला विसरू नका!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

“उद्योजक होण्यासाठी जिद्द, चिकाटी नव्हे; पॅनकार्ड, शॉपॲक्ट लायसन्स लागतं!” हे सांगणाऱ्या मराठी उद्योजकाचं पुस्तक

Next Post

या व्हिएतनामी कुटुंबाने कोका कोलाची २.५ अब्ज डॉलर्सची ऑफर धुडकावून लावली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या व्हिएतनामी कुटुंबाने कोका कोलाची २.५ अब्ज डॉलर्सची ऑफर धुडकावून लावली होती

आणि इंदिरा गांधींनी अमेरिकी राष्ट्रपतीला जशास तसे उत्तर दिले

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.