The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाचा IQ न्यूटनपेक्षा जास्त आहे, पण अचिव्हमेंट्स त्याच्या निम्म्याही नाही

by द पोस्टमन टीम
2 August 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


आपल्या देशात विज्ञानशाखेत फिजिक्स (भौतिकशास्त्र), केमेस्ट्री (रसायनशास्त्र) आणि बायोलॉजी (जीवशास्त्र) हे तीन मुख्य विषय असतात व यांच्या जोडीला गणितही असतचं. मी जेव्हा कला शाखेमध्ये शिकत होते तेव्हा मी अनेकदा विज्ञान शाखेची मुलं न्यूटनच्या नावानं खडे फोडताना ऐकलं आहे. कारण न्यूटनला आधुनिक फिजिक्सचं जनक समजलं जातं. फिजिक्स हा विषय तुलनेनं कठिण म्हणण्यापेक्षा किचकट आहे. ज्या मुलांचा आयक्यु (IQ) चांगला आहे, अशा मुलांना हा विषय सोपा जातो.

सर आयझॅक न्यूटननं फिजिक्समध्ये बरंच संशोधन करून ठेवलेलं आहे. न्यूटनला सर्वात मोठा गणितज्ज्ञ, सर्वात मोठा शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अनेक वैज्ञानिक संकल्पनांचा उद्गाता, खगोलशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ता समजलं जातं. त्याच्या महत्त्वाच्या शोधांमध्ये कॅल्क्युलस, परावर्तित दुर्बिणी, किनेमॅटिक्स, गतीचा नियम, गुरुत्वाकर्षण, ऑप्टिक्सचा समावेश होता. त्याच्या योगदानामुळे सर्व विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्र समृद्ध झालेलं आहे. अशा या असामान्य व्यक्तीचा IQ १९३ इतका होता. सामान्य व्यक्तीच्या बुद्धिमत्तेपेक्षा हा आकडा कितीतरी जास्त होता.

मात्र, न्यूटनपेक्षाही जास्त आयक्यू असणारा एक व्यक्ती सध्या अस्तित्त्वात आहे! किम युंग याँग, असं या व्यक्तीचं नाव आहे. न्यूटनपेक्षाही जास्त आयक्यू असणारी ही व्यक्ती आहे तरी कोण आणि सध्या ती काय करते हे जाणून घेण्यास नक्कीच तुम्ही उत्सुक असाल ना?

किम युंग-याँगचा जन्म ८ मार्च १९६२ रोजी दक्षिण कोरियातील सेऊल या शहरात झाला. त्याचे वडील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते आणि आई वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक होती. अतिशय प्रतिभावंत पालकांच्या पोटी जन्मलेला किम देखील असामान्य बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आला होता.



साधारण लहान मुलं वयाच्या एका वर्षानंतर बोलण्यास सुरुवात करतात. मात्र, किम याला अपवाद होता. तो सहा महिन्यांचा असतानाचा बोलू लागला होता. तो एक वर्षांचा होऊपर्यंत त्यानं हजारो कॅरेक्टर असलेली कोरियन आणि चीनी वर्णमाला अवगत केल्या होत्या. यासोबतचं त्याला सहाव्या शतकातील अनेक चिनी कविता देखील पाठ झाल्या होत्या.

तीन वर्षांच्या वयात, तो कॅल्क्युलसची अवघड अवघड गणितंही सोडवू शकत होता. आश्चर्याची गोष्टं म्हणजे तोपर्यंत इंग्रजी व जर्मन भाषेत त्याचं निबंधांचं एक पुस्तक देखील प्रकाशित झालं होतं. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत किमला कोरियन, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि जपानी भाषा बोलता येत होत्या. 

लुक मॅगझिनमध्ये त्याच्याबद्दल एक लेख प्रकाशित झाला होता. त्याच वर्षी त्यानं लॉस एंजेलिसच्या ग्राँट हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. किम यांनी हानयांग विद्यापीठात भौतिकशास्त्र वर्गाचं ऑडिटही केलं होतं, असं सांगितलं जातं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

काही वर्षापूर्वी आपल्याकडे कौटिल्य नावाच्या लहान मुलाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. टेलिव्हिजन चॅनल्सवर त्याच्या अनेक मुलाखती आणि कार्यक्रम दाखवण्यात आले. त्याची बुद्धिमत्ता त्याच्या वयाच्या तुलनेत अफाट होती. किमला देखील अशीच प्रसिद्धी मिळाली होती. वयाच्या पाचव्या वर्षी जपानमधील फुजी टेलिव्हिजनवर झळकला होता. त्या कार्यक्रमात त्यानं अनेक कठीण समीकरणं सोडवून प्रेक्षकांना अचंबित केलं होतं.

किमबाबत एक लोकप्रिय अफवा आहे. असं म्हटलं जातं की, जेव्हा तो आठ वर्षांचा होता तेव्हा तो कोलोरॅडो विद्यापीठात अणुभौतिकशास्त्राचा (न्युक्लिअर फिजिक्स) अभ्यास करण्यासाठी गेला होता आणि त्यानं पीएचडी मिळवली होती.

महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेच्या फिटनेस टेस्टवेळी मीडियानं त्याला वैतागून सोडलं होतं. तेव्हा त्याच्या वडिलांनी पत्रकारांसमोर खुलासा केला की, किम आतापर्यंत फक्त एकदाच देशाबाहेर गेला आहे. तेदेखील फुजी टीव्ही शोच्या शूटिंगसाठी. पीएच.डी आणि कोलोरॅडो विद्यापीठातील पदवीबाबतची माहिती अफवा आहेत. किमच्या वडिलांच्या मते, या सर्व अफवा ‘पत्रकारांचा मूर्खपणा’ होता. मात्र, त्याच्या आईच्या काही विधानांनी त्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. किमच्या आईच्या सांगण्यानुसार, तो कोलोराडो विद्यापीठातील वर्गांचे ऑडिट करण्यासाठी काही काळ विद्यापीठात गेला होता. मात्र, तो त्वरित परत आला होता. त्यानंतर त्याच्या महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेपर्यंत त्याला घरीच(होमस्कूल) शिक्षण दिलं गेलं.

किमची बुद्धिमत्ता पाहून त्याला नासानं निमंत्रण दिलं होतं. नासासाठी त्यानं दहा वर्षे काम केले. 

२०१० मध्ये, किमने नासातील त्याच्या कामाविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “त्यावेळी, मी माझं आयुष्य अगदी एखाद्या यंत्राप्रमाणं घालवत होतो. मी उठायचो, दररोज दिलेली समीकरण सोडवायचो, जेवण आणि झोप या गोष्टींशिवाय मी काहीही करत नव्हतो. तिथे मी एकदम एकटा होतो मला कुणी मित्र देखील नव्हते.” 

दक्षिण कोरियाला परतल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किमला औपचारिकपणे शालेय शिक्षण पूर्ण करणं आवश्यक होतं. त्यानं केवळ दोन वर्षांत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. नंतर त्यानं चुंगबुक राष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे त्यानं स्थापत्य अभियांत्रिकीचं (सिव्हिल इंजिनिअररिंग) शिक्षण घेतलं आणि पीएच.डी. पूर्ण केली. २००७ पर्यंत, त्यानं चुंगबुक राष्ट्रीय विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून काम केलं. १४ मार्च २०१४ रोजी तो शिन्हान विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आणि नॉर्थ क्योंग-जी संशोधन केंद्राचा उपाध्यक्ष झाला.

किमचा आयक्यू २१० इतका होता आणि न्यूटनचा १९३. म्हणजेचं न्यूटनपेक्षा किमची बुद्धिमत्ता जास्त होती. मात्र, न्यूटनच्या तुलनेत किम यांनी काहीही साध्य केलं नाही. 

न्यूटननं फिजिक्समध्ये असामान्य कामगिरी करून दाखवली होती. किमनं तसं काहीही केलं नाही, त्यामुळं जगभरातील अनेक तज्ञांनी किमच्या हुशारीवर टीका केली आहे. २०१० मध्ये, किमनं या टीकेला उत्तर दिलं होतं, ‘काहींना वाटतं की, उच्च बुद्ध्यांक असलेले लोक सर्वशक्तिमान असतात. मात्र, ते खरं नाही. माझाच विचार केला तर, माझ्याकडं संगीत आणि क्रीडा क्षेत्राबाबत काहीही ज्ञान नाही. किंबहुना मला त्यात रूची देखील नाही. याचा अर्थ असा होता नाही की, माझी बुद्धीमत्ता कमी आहे. समाजाने कोणालाही एकतर्फी मानकांमध्ये तोलू नये. प्रत्येकाची शिकण्याची पातळी, प्रतिभा आणि स्वप्नं वेगवेगळी असतात आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.’

किमच्या म्हणण्याचा विचार केला तर, त्यात नक्कीच तथ्य आढळतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि तिच्या आवडीच्या गोष्टी देखील वेगळ्या असतात. त्यामुळं एकमेकांच्या बौद्धिक क्षमतेचा देखील आदर झाला पाहिजे, हे नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांनी भगवतगीतेची शपथ घेऊन पदभार स्वीकारला होता

Next Post

सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे फायदे वाचा आणि ही सवय आजच लावून घ्या

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

सकाळी उपाशी पोटी पाणी पिण्याचे फायदे वाचा आणि ही सवय आजच लावून घ्या

हा विजयस्तंभ शेकडो वर्षांच्या पावसाने गंजला नाही की नादीरशहाच्या तोफांनी भंगला नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.