The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘Keep calm..’चे पोस्टर्स मुळात एक सरकारी जाहिरात होती..!

by द पोस्टमन टीम
29 June 2021
in मनोरंजन
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हा लेख वाचणाऱ्या जवळपास प्रत्येकानेच “Keep Calm And Carry On” हे पोस्टर कुठेतरी पाहिलंच असेल. अगदी कॉफी मग, टी-शर्टपासून ते समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातलेल्या या पोस्टरमागची कथा जाणून घ्यायला आपल्याला दुसऱ्या महायुद्धापर्यंत मागे जावं लागेल!

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ज्यांना आज आपण “मोटिव्हेशनल पोस्टर्स” म्हणू अशी पोस्टर्स अक्षरशः लाखांच्या संख्येत ब्रिटनच्या शासकीय माहिती खात्याकडून पत्रके छापली जात. जेणेकरून युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना मानसिक आधार मिळेल.

ब्रिटनच्या वेशीवर ‘हिटलर’ नावाचं वादळ धडकण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १९३९ मधेच ब्रिटनच्या शासकीय माहिती खात्याने तीन पत्रके काढली होती. त्यातील एक पत्रक म्हणजेच हे “keep calm” पत्रक!

अतिशय आकर्षक मांडणी असणाऱ्या या पत्रकांवर शिरोभागी सहाव्या जॉर्जचा राजमुकुट चित्रित केला होता आणि ऐतिहासिक अशी तीन घोषवाक्ये प्रत्येकी एका पत्रकावर छापलेली होती. एका पत्रकावर लिहिलं होतं, “YOUR COURAGE, YOUR CHEERFULNESS, YOUR RESOLUTION WILL BRING US VICTORY.” तर दुसऱ्या पत्रकावर लिहिलं होतं, “FREEDOM IS IN PERIL, DEFEND IT WITH All YOUR MIGHT.”

आणि तिसऱ्या पत्रकावर आपल्या सगळ्यांचं लाडकं वाक्य लिहिलं होतं, “Keep Calm and Carry On!”

वास्तवात ब्रिटनच्या वर्तमानावर आणि भविष्यावर एकामागून एक तोफगोळे आदळत असताना आणि डोळ्यासमोर भयंकर विध्वंस सुरु असताना ही पत्रकं असा काय चमत्कार करणार होती? असा युक्तिवाद मांडणारा देखील एक गट होताच. पण अशा बिकट परिस्थितीत नागरिक खचून जाऊ नयेत म्हणून त्यावेळी चर्चिल यांनी जनतेला सावरण्यासाठी केलेला उपाय होता असं म्हणतात. कारण जर सामान्य नागरिक मटकन खालीच बसला तर आधीच डबघाईला आलेले उद्योगधंदे बंद पडले असते आणि अर्थव्यवस्था पूर्ववत करणे कर्मकठीण होऊन बसले असते.

ब्रिटनच्या माहिती मंत्रालयाने त्यावेळी ‘keep calm and carry on’ या पत्रकाच्या जवळपास अडीच दशलक्ष प्रति छापल्या होत्या आणि अतिशय बिकट परिस्थिती ओढवल्यास लोकांचे मनोबल वाढवण्यासाठी ती पत्रके वापरण्याचे ठरले होते.

पण गंमत म्हणजे इतर दोन पत्रके प्रसिद्ध करण्यात आली आणि एवढ्या मोठ्या संख्येत छापलेले हे पत्रक कधीही प्रसिद्ध केले गेले नाही. एवढेच नव्हे तर त्याची १९४० सालात विल्हेवाट देखील लावण्यात आली. त्यानंतर तेवढे शतकभर तरी ‘keep calm and carry on’ हे शब्द कुणाच्याही दृष्टीस किंवा कानांवर पडले नाही.

आता जरा गोष्ट फास्ट फॉरवर्ड करूयात,

स्टुअर्ट मॅनले नावाचा एक इसम त्याची पत्नी मेरीसोबत बार्टर बुक्स नावाचे एक पुस्तकांचं दुकान चालवायचा. सन २००० मध्ये एका लिलावातविकत घेतलेल्या पुस्तकांना आवरताना, ते महायुद्धाच्या काळातलं एक वर्जिनल “keep calm and carry on”वालं पत्रक त्याच्या हाती लागलं. त्या दोघांनी पण हे पोस्टर मस्तपैकी फ्रेम करून दुकानात कॅशकाउंटरजवळ टांगलं. 

येणाऱ्याजाणाऱ्यांना हे पत्रक खूपच आवडू लागलं. हळूहळू या पत्रकाची प्रसिद्धी वाढत गेली. ते बघून या जोडगोळीने लगेच ओरिजिनलसारखे अजून पत्रकं छापून ते विकायला सुरुवात केली. हळूहळू बऱ्याच कंपन्यांनी ओरिजिनलमधलं फक्त keep calm वापरून वेगवेगळ्या उत्पादनांवर वगैरे टॅगलाईन म्हणून वापरायला सुरुवात केली.

आज टीशर्ट, मग, डब्बे तुम्ही म्हणाल त्या प्रत्येक वस्तूवर keep calm छापलेलं दिसेल. अक्षरशः कशाचाही पुढ्यात keep calm लावलेलं दिसेल. मध्यंतरी वेड्यासारखं keep calm हे वाक्य जगभरात पसरलं होतं. महायुद्धाच्या वेळी ज्या कुण्या अधिकाऱ्याच्या डोक्यातून हे वाक्य निघालं असेल त्याला त्यावेळी कल्पनाही नसेल की त्याचं एक वाक्य लोकांना एवढं वेड लावेल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.


ShareTweet
Previous Post

इलेक्ट्रिक कारची फॅशन शंभर वर्षे अगोदर एकदा येऊन गेलीये

Next Post

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या नेतृत्वात ‘सौदी’ नव्या जगाची नीतिमूल्ये आत्मसात करतोय

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या नेतृत्वात 'सौदी' नव्या जगाची नीतिमूल्ये आत्मसात करतोय

या डेड सेलिब्रिटीजची अजूनही चालू असलेली कमाई ऐकून कोणाचेही डोळे पांढरे होतील

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.