The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाढती लोकप्रियता पाहता काश्मिरी विलो बॅट्स लवकरच इंग्लिश बॅट्सना मागे टाकतील असं दिसतंय

by द पोस्टमन टीम
28 January 2026
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


नैसर्गिक सौंदर्य आणि नयनरम्य ठिकाणं यामुळं जगभरातील पर्यटकांसाठी जम्मू-काश्मीर हे एक आवडतं ठिकाण बनलं आहे. केवळ निसर्गसौंदर्यच नाही, तर याठिकाणी तयार होणाऱ्या आणि केवळ काश्मीरमध्येच मिळणाऱ्या कित्येक गोष्टीदेखील जगभरात प्रसिद्ध आहेत. काश्मिरात मिळणाऱ्या पश्मिना शाली, गालिचे, केशर, चांदीची भांडी, कागदी शोभेच्या वस्तू, काश्मिरी सफरचंद अशा बऱ्याच गोष्टींसाठी जम्मू-काश्मीर प्रसिद्ध आहे. या सगळ्या सोबतच काश्मीरमध्ये तयार होणारी आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे, ती म्हणजे क्रिकेटची बॅट!

काश्मीरमधील विशेष अशा विलो बॅट्सना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख प्राप्त झाली आहे. टी 20 मेन्स क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत ओमान देशाच्या दोन खेळाडूंनी इतरांप्रमाणे इंग्लिश विलो बॅट्सचा वापर न करता, काश्मीर विलो बॅट्सचा वापर केला. यानंतर या बॅट्स आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या. यामुळं, आता या बॅट्सची मागणी कित्येक पटींनी वाढली आहे.

भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे लहान मुलांना खेळण्यासाठी प्लास्टिकचे बॅट-बॉल हे हमखास दिले जातात. त्यानंतर थोडं मोठं झाल्यावर आपण लाकडी बॅटनं क्रिकेट खेळू लागतो. रस्त्यावर मिळणाऱ्या बॅट या अगदी 100 रुपयांनाही मिळतात. या बॅट खरंतर कोणत्याही लाकडापासून तयार करण्यात आलेल्या असतात. मात्र, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या ‘प्रोफेशनल’ खेळाडूंच्या बॅट्स या विशिष्ट प्रकारच्या लाकडापासूनच तयार केलेल्या असतात. हे विशिष्ट लाकूड म्हणजे, विलो!

काश्मीरमध्ये १९४७ पासून काश्मीर विलो लाकडापासून बॅट तयार करण्यात येत आहेत. मात्र, या बॅट्स राज्य पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्येच वापरल्या जात. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी केवळ इंग्लिश विलो बॅट्सचा वापर करण्यात येतो. इतर कोणत्याही बॅटच्या वापरासाठी आयसीसीची परवानगी आवश्यक असते. जी आतापर्यंत काश्मीर विलो बॅट्सना मिळालीच नव्हती.

काश्मीरमधील युवा उद्योजक फौजुल कबीर यानं तब्बल दीड वर्षं मेहनत करून, आणि आयसीसीच्या मागे लागून अखेर, काश्मीर विलो बॅट्स देखील इंग्लिश विलो बॅट्सप्रमाणेच दर्जेदार असल्याचं आयसीसीला पटवून दिलं. त्यामुळं काश्मीरच्या विलो बॅट्सना तब्बल ७५ वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आणि परवानगी मिळाली. फौजुलच्या या कामगिरीमुळं काश्मीर खोऱ्यातील तब्बल ५६ हजारांहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.



विलोची झाडं ही भारतात केवळ काश्मीरमध्ये दिसून येतात. भारताबाहेर पाकव्याप्त काश्मीर, आशियाचा काही भाग, युरोप, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागात ही झाडं आढळतात. बॅट बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ इंग्लिश विलो झाडांचा वापर करण्यात येतो. अगदी आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील काही बॅट बनवणारे कारखानेही इंग्लंडमधून विलो लाकडाची आयात करतात.

काश्मीरी विलो आणि इंग्लिश विलोमध्ये काही ठळक फरक आहेत. काश्मीरी विलोच्या तुलनेत इंग्लिश विलोमध्ये जास्त ग्रेन्स असतात, जे ठळकपणे दिसून येतात. शिवाय, इंग्लिश विलोचा रंग काश्मिरी विलोच्या तुलनेत थोडा फिकट असतो. इंग्लिश विलो हा काश्मीरच्या तुलनेत हलका असतो. अशा काही फरकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ इंग्लिश विलो बॅट्सचा वापर केला जातो. मात्र, काश्मीरमधील उद्योजक फौजुल याने काश्मीर विलोचा वापर करून इंग्लिश विलोच्या तोडीस तोड बॅट तयार करून दाखवली आहे. यासोबतच अन्य काही नियमांची पूर्तता केल्यामुळेच आयसीसीने त्यांच्या ‘जीआर8’ या कारखान्यात तयार झालेल्या बॅट्सना आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वापरण्याची परवानगी दिली.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

ओमानच्या नसीम खुशी आणि बिलाल खान या खेळाडूंनंतर पाकिस्तान, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, स्कॉटलंड आणि अगदी ऑस्ट्रेलियाच्याही काही खेळाडूंनी काश्मीर विलोच्या जीआर 8 बॅट्सची मागणी केली आहे. आयसीसीने अद्याप या एकाच कंपनीला परवानगी दिली असली, तरी याचा फायदा काश्मीरमधील सर्वच बॅट उत्पादकांना होणार आहे.

भारत सरकारने काश्मीरच्या बॅट इंडस्ट्रीला जीआय मानांकन दिले आहे. यामुळे काश्मीरमध्ये तयार होणाऱ्या सर्वच विलो बॅट्सची क्वालिटी नियंत्रित राहणार आहे. विश्वचषकातील या बॅटच्या वापरानंतर काश्मीरमधील बॅट निर्मिती उद्योगाला नवसंजीवनी मिळाली आहे.

पूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे ४०० बॅट उत्पादक कारखाने आहेत. यापैकी बरेचसे अनंतनाग जिल्ह्याच्या बिजबेहरा, संगम, हरमुलाह भागात आहेत. काश्मीर विलो बॅट्सचा उद्योग किती मोठा आहे हे अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल तर लक्षात घ्या; पूर्ण भारतात दर वर्षी सुमारे 30 लाख बॅट काश्मीरमधून देशभरात पाठवल्या जातात. आतापर्यंत देशाबाहेर या बॅट्स पाठवले जाण्याचे प्रमाण अगदी कमी होते. मात्र आता दर वर्षी सुमारे १० लाख काश्मीर विलो बॅट्स हे बाहेरच्या देशांमध्ये पाठवल्या जाण्याची शक्यता येथील बॅट उत्पादक व्यक्त करत आहेत.

काश्मीर विलो बॅट्सना आता आयसीसीने हिरवा कंदिल दिल्यामुळं, आणि टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याचे प्रदर्शन सर्वांनी पाहिल्यामुळे, क्रिकेट खेळणाऱ्या सुमारे १२ देशांमधून काश्मीर विलो बॅट्सना मागणी होत आहे. काश्मीरमधील क्रिकेट उद्योगाची वार्षिक उलाढाल ही सुमारे १०० कोटी रुपये असते. आता परदेशातून वाढलेल्या मागणीमुळे, हीच उलाढाल २०० कोटींवर जाण्याची शक्यता उत्पादक व्यक्त करत आहेत.

सध्या परिस्थिती अशी आहे, की जेवढे उत्पादन होत नाही त्याच्या कितीतरी पट अधिक मागणी वाढली आहे. याला प्राईज फॅक्टरही मोठे कारण आहे. एक उत्तम दर्जाच्या इंग्लिश विलो बॅटची किंमत ही सुमारे एक लाख रुपयांपासून सुरू होते. तर जवळपास त्याच तोडीच्या काश्मीर विलो बॅटची किंमत ही दहा हजार रुपयांपासूनच सुरू होते. म्हणजेच, कमी किंमतीत तेवढ्याच क्वालिटीचे प्रॉडक्ट लोकांना मिळत आहे.

ओमान सारख्या छोट्या देशाने या बॅट्स वापरल्यानंतर जर काश्मीरच्या बॅट्सना एवढी प्रसिद्धी मिळाली असेल, तर विचार करा विराट कोहली, शिखर धवन, के एल राहुल या भारताच्या मुख्य खेळाडूंनी काश्मीरच्या बॅट्स वापरल्यानंतर त्यांची मागणी किती वाढेल! यासाठीच आता काश्मीरमधील कित्येक बॅट उत्पादक भारतीय क्रिकेट टीमच्या या खेळाडूंना काश्मीर विलो बॅट वापरण्याची विनंती करण्याच्या विचारात आहेत. सध्या आपला देश सर्वच बाबतीत आत्मनिर्भर होत असताना, क्रिकेट जगतही यात मागे नाही, हेच यातून दिसून येतंय!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

शत्रूला धडकी भरवणाऱ्या भारतीय बनावटीच्या ब्रह्मोसची आता निर्यात होणार आहे

Next Post

Explainer – दोन्ही मुस्लिम राष्ट्रे असूनही सौदी अरेबिया आणि इराणमध्ये एवढं वैर का आहे..?

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

Explainer - दोन्ही मुस्लिम राष्ट्रे असूनही सौदी अरेबिया आणि इराणमध्ये एवढं वैर का आहे..?

या प्राण्याची प्रजाती पृथ्वीवरून दोनवेळा नामशेष झाली आहे...!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.