The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काश्मीरच्या मीरपूरमध्ये पाकिस्तानने ३५ हजार हिंदू आणि शिखांची निर्दयपणे क*त्तल केली होती

by द पोस्टमन टीम
25 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


१९४७ हे आपल्या देशाच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचं वर्ष समजलं जातं. अनेक भारतीयांच्या बलिदानानंतर आणि प्रदीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर भारतानं स्वातंत्र्याची पहाट पाहिली होती. मात्र, याचं वर्षी काही अप्रिय घटना देखील घडल्या होत्या. भारत आणि पाकिस्तान विभाजन अशाच काही घटनांपैकी एक असल्याचं सर्वांना माहिती आहे.

याशिवाय याच वर्षी भारतीय इतिहासातील सर्वात भयंकर ह*त्याकांड देखील झालं होतं! हे तेच वर्ष आहे जेव्हा जम्मू-काश्मीरच्या मीरपूरमध्ये सुमारे ३५ हजार हिंदू आणि शीख निर्वासितांची निर्दयपणे क*त्तल करण्यात आली होती. महिलांवर अ*त्याचार करण्यात आले. २५ नोव्हेंबर रोजी घडलेली ही घटना पहिलं काश्मीर यु*द्ध समजलं जातं. भारताच्या नंदनवनात ७५ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं ते आपण जाणून घेऊया…

१९४७ मध्ये, भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनाच्या वेळी पाकिस्तानातील हजारो हिंदू पंजाबमधून मिरपूरला आणि मिरपूरमधील मुस्लिम पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. मिरपूर हे महाराजा हरी सिंग यांच्या काश्मीर राज्याचा भाग होते. २६ ऑक्टोबर १९४७ रोजी जम्मू आणि काश्मीर स्वतंत्र भारतात विलीन झालं. ‘इन्स्ट्रुमेंट ऑफ अक्सेशन’नुसार महाराजा हरी सिंग यांच्या अधिपत्याखालील संपूर्ण काश्मीर हे भारताचा अविभाज्य भाग आहे. पण या ‘इन्स्ट्रुमेंट ऑफ अक्सेशन’वर सह्या झाल्यानंतर आपल्या भविष्यात काय लिहून ठेवलेलं आहे याची खोऱ्यात राहणाऱ्या मुस्लिम, हिंदू आणि शीखांना कल्पनाही नव्हती.

जम्मू -काश्मीरला भारताशी जोडण्याच्या निर्णयाचं मीरपूरमधील नागरिकांनी स्वागत केलं. आपण भारताचा अविभाज्य भाग झाल्याचा आनंद त्यांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला. महत्त्वाच्या धोरणात्मक कारणांसाठी जम्मू -काश्मीर संस्थानाचा काही भाग पाकिस्तानात जाणं आवश्यक असल्याचा निर्णय ब्रिटिश गव्हर्नरनं घेतला होता. मात्र, पाकिस्तानला हा निर्णय मान्य नव्हता. त्यांना संपूर्ण जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानात पाहिजे होता.



पाकिस्तानी नेतृत्वाने वझिरीस्तान येथील भटक्या टोळ्यांना एकत्र करून जम्मू-काश्मीरवर आक्र*मण करण्याची योजना आखली होती. याच भटक्या टोळ्यांच्या आक्र*मणाला त्यांनी ‘ऑपरेशन गुलमर्ग’ असं नाव दिलं होतं. (याची रणनीती आखण्यात ब्रिटिश राज्यकर्त्यांचा देखील हात असल्याचं मत अनेक अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे) शत्रूनं २३ नोव्हेंबर १९४७ रोजी मिरपूरच्या मुख्य पूर्व दरवाजावरून मोठा ह*ल्ला केला.

मीरपूरमधील युवकांच्या पथकांनी हातात हात घालून पाकिस्तानी आक्र*मणाविरोधात लढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संरक्षण चौक्यांवर राज्य सुरक्षा दलाच्या सैनिकांना कित्येक दिवस साथ दिली मात्र, स्थानिक लोकांचा पूर्ण पाठिंबा, शस्त्रांची कमी आणि पाकिस्तानी टोळ्यांच्या वाढत्या संख्येमुळं त्यांना यश आलं नाही.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

दुर्दैवानं राज्य सुरक्षा दलांकडे असलेलं एकमेव वायरलेस उपकरण देखील तुटलं. त्यामुळं त्यांना मदत मागण्यासाठी संपर्क देखील करता आला नाही. २४ तारखेला शत्रू टोळ्यांनी पुन्हा केलेल्या मजबूत ह*ल्ल्यात राज्य सुरक्षादलाची दैना झाली. त्यांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

मीरपूरच्या रहिवाशांनी पाकिस्तानी आक्र*मकांना शहरात प्रवेश करू न देण्याचा निश्चय केला होता. म्हणूनच आक्र*मणकर्त्यांशी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. २५ नोव्हेंबरचा दिवस मिरपूरमधील जनतेसाठी वाईट स्वप्नासारखा उजाडला. पाकिस्तानी टोळ्यांनी मिरपूर शहरात प्रवेश केला. त्यांनी शहरातील अनेक भागांत आग लावली, त्यामुळे संपूर्ण शहरात अराजकता आणि गोंधळ उडाला.

मोठ्या प्रमाणावर दं*गली देखील उसळल्या. सकाळपासून दुपारपर्यंत मृत्यूचं तांडव सुरू होतं. दिवस मावळेपर्यंत पाकिस्तानी टोळ्यांनी मानवी इतिहासातील अत्यंत क्रू*र ह*त्याकांडांपैकी एक ह*त्याकांड घडवून आणलं होतं. दिवसभरात त्यांनी तब्बल १८ हजार लोकांची क*त्तल केली. याशिवाय ५ हजार जणांचं अपहरण देखील केलं. शहरातील बहुतेक स्त्रिया किंवा मुलांनी आपला जीव वाचवण्यासाठी अलिबेग गुरुद्वारा साहिबकडं धाव घेतली होती. मात्र, त्यांना देखील रस्त्यात अडवून कैद केलं गेलं.

काही महिलांचं अपहरण करून त्यांच्यावर अ*त्याचार करण्यात आले. तर काही महिलांनी अ*त्याचार टाळण्यासाठी आणि पाक टोळ्यांच्या हातात पडण्यापूर्वी विष प्राशन करून सामूहिक आत्मह*त्या केली. विष न मिळालेल्या काही महिला आणि मुलींचा तर स्वत:च्या पतीनं व वडिलांनी तलवारीनं बळी घेतला, इतकी भयावह परिस्थिती त्याठिकाणी निर्माण झाली होती. काही पुरुषांनीही आत्मह*त्या केल्या होत्या.

त्यावेळचा अंगावर शहारे आणणारा एक प्रसंग सांगितला जातो. मीरपूरच्या उत्तर बाजूला गुरुद्वारा दमदमा साहिब आणि सनातन धर्माचं मंदिर होतं. तिथे एक मोठा तलाव आणि एक खोल विहीर होती. त्या तलावाच्या जवळ आर्य समाजाच्या शाळकरी मुलींचं वसतिगृह होतं. त्यावेळी त्याठिकाणी सुमारे १०० मुली होत्या. जेव्हा पाकिस्तानी सैन्यान मीरपूरमध्ये धुमाकूळ घातला तेव्हा वसतीगृहाच्या महिला अधिक्षकानं स्वत: मुलींना विहीर उड्या मारण्यास सांगितलं.

मात्र, त्यापूर्वी तिनं मुलींला सांगितलेली एक गोष्ट कुणाच्याही अंगावर शहारे आणते. अधिक्षक मुलींना म्हणाली होती, विहिरीत उड्या मारताना देवाला प्रार्थना करा की, पुढच्या जन्मात मुलगी म्हणून जीवन देऊ नको! मुलींसोबत या अधिक्षकानं देखील जीव दिला. ज्या विहिरीत त्यांनी आपले जीव दिले ती इतकी खोल आहे की, त्यातील पाणीसुद्धा लवकर दिसत नाही. २५ नोव्हेंबरच्या त्या भयानक दिवशी पाकिस्तानी टोळ्यांनी ५ हजार पेक्षा जास्त महिला आणि मुलींचे हाल केले.

काहींना पाकिस्तानात नेण्यात आलं व नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अरब देशांमध्ये विकण्यात आलं. मीरपूरमधील केवळ दोन हजार लोक पायी चालत जेंजरला पोहचू शकले. भारतीय सैन्यानं त्यांना जम्मू निर्वासित छावणीत नेलं. हे मृत्यू तांडव संपेपर्यंत मीरपूरमधील ३५ हजार लोकांचा जीव गेला होता.

मार्च १९४८ मध्ये, आयसीआरसी, रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीनं अलिबेगमधून वाचलेल्या १ हजार ६०० नागरिकांची सुटका केली. त्यांना जम्मू आणि भारताच्या इतर भागात पुनर्वसित करण्यात आलं. १९५१ पर्यंत पाकव्याप्त काश्मीरमध्ये समाविष्ट असलेल्या भागात फक्त ७९० मुस्लिम राहिले. पूर्वी याच ठिकाणी हजारो मुस्लिम राहत होते. मुझफ्फराबाद आणि मीरपूर येथील हिंदू आणि शिखांचे बचाव करणारे काही मुस्लिम कुटुंबं देखील जम्मू -काश्मीरमध्ये त्यांच्या पूर्वजांच्या भूमीवर विस्थापित झाले.

या भयंकर घटनेपूर्वी मीरपूर जिल्ह्यात साधारण ७५ हजार हिंदू आणि शीख होते. पश्चिम पंजाबातील आणि झेलममधील निर्वासितांनी मीरपूर शहरात आश्रय घेतलेला होता. मात्र, पाकिस्तानी आ*क्रमणानंतर मीरपूर विधवा झालेल्या स्त्रीच्या चेहऱ्याप्रमाणं उदास आणि भकास दिसू लागलं होतं. पाकव्याप्त काश्मीरचा तत्कालीन अध्यक्ष सरदार मुहम्मद इब्राहिम खान याने ह*ल्ल्यानंतर मीरपूरला भेट दिली.

तेथील परिस्थिती पाहून तो देखील नि:शब्द झाला होता. सध्या मीरपूर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. मात्र, जून्या मीरपूरचं याठिकाणी नामोनिशाण देखील नाही. झेलम नदीवर मंगला धरण बांधून पाकिस्ताननं जुनं मीरपूर बुडवून टाकलं आहे. येथील बहुतेक रहिवासी आता लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत.

या ठिकाणची सांस्कृतिक आभा संपूर्णतः  नष्ट झालेली आहे. भारत सरकार आणि जागतिक संघटना आता काश्मीरबद्दल जागृती दाखवू लागल्या आहेत, तेव्हा जुन्या नेत्यांच्या नेतृत्वाच्या अभावामुळे गमावलेलं काश्मीर पुन्हा भारताला मिळेल या आशा जागृत झाल्या आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जॉन हावर्डच्या पुतळ्याच्या डाव्या पायावर बोट घासून आशिर्वाद घेतल्यानं ‘गुडलक’ मिळतं

Next Post

कम्प्युटरमधल्या एररला ‘बग’ म्हणतात त्यामागे हा किस्सा आहे..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

कम्प्युटरमधल्या एररला 'बग' म्हणतात त्यामागे हा किस्सा आहे..!

...म्हणून दुसऱ्या महायु*द्धात फ्रांसने स्वतःचीच जहाजं समुद्रात बुडवून टाकली..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.