The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१८व्या शतकातच टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून एका गुन्हेगाराला अटक केली होती

by द पोस्टमन टीम
22 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आपण सध्या ‘इंटरकनेक्टेड’ जगात राहतो. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळं जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहत असलेला आपला एखादा मित्र काय करतो हे सहज मोबाईलच्या स्क्रीनवर पाहता येतं. इतर खंडातील लोकांशी आपण तासन् तास गप्पा मारू शकतो. कुठलीही कागदपत्रे क्षणात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचवली जाऊ शकतात. हे सर्व करताना नकळत आपण आपल्या प्रत्येक कृतीचे पुरावे (डिजीटल फूटप्रिंट) मागे सोडत असतो. त्यामुळं जर एखाद्या व्यक्तीनं कितीही हुशारीनं एखादा गुन्हा केला तरी त्याला पकडणं आता शक्य आहे.

पण, पोलिसांनी ही किमया १८व्या शतकातच करून दाखवली होती. त्यांनी टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या बळावर जॉन टावेल या आरोपीला अटक केली होती. अशा प्रकारे अटक होणारा तो पहिलाच आरोपी आहे. 

जॉन टावेलनं काय गुन्हा केला होता आणि तो पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला, यामागचा किस्सा मोठा रंजक आहे.

लंडनमध्ये जन्मलेला जॉन एका सुखवस्तू व्यक्तीच्या घरी हिशोबनीस म्हणून काम करत होता. त्याच घरात काम करणाऱ्या मेरी नावाच्या मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते आणि त्यांच्या संबंधातूनच ती गर्भवती राहिली. ही गोष्ट त्यांच्या मालकाला समजल्यानंतर त्याने दोघांनाही कामावरून काढून टाकले. त्यानंतर जॉननं मेरीसोबत लग्न केलं. पुढे त्यांना दोन मुले झाली. पैसे मिळवण्यासाठी त्यानं बनावट नोटा बँकांमध्ये पसरवण्यास सुरुवात केली. याच फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षा म्हणून १८१४मध्ये त्याला ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आलं होतं. पण, १८१९मध्येच त्याची सुटका झाली.

त्यानंतर जॉननं सिडनीमध्येच केमिस्टचा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायाच्या बळावर अल्पावधीतच तो अतिशय श्रीमंत माणूस झाला. व्यवसाय स्थिर झाल्यानंतर १८२३मध्ये त्याने पत्नी मेरी आणि दोन्ही मुलांना सिडनीला बोलवून घेतलं. १८२५ मध्ये जॉन एका नामांकित शाळेचा गव्हर्नर बनला. ‘बँक ऑफ न्यू साउथ वेल्स’मध्ये देखील तो भागीदार बनला. मात्र, वर्षभरातच त्याने आपला व्यवसाय थांबवण्याचा निर्णय घेतला. औषधांची दुकानं विकण्यासाठी त्याने जाहिराती दिल्या मात्र, कुणीही खरेदीदार मिळाला नाही. १८२९ पर्यंत त्याला दुकानांसाठी गिऱ्हाईक मिळालं नाही. शेवटी कंटाळून त्यानं एका एजंटवर सर्व जबाबदारी सोपवली आणि तो इंग्लंडला परतला.



जॉन इंग्लडला परत गेला त्याचवेळी त्याचा जुना मित्र जोसेफ हंटन बनावट नोटांच्या प्रकरणात तुरुंगात गेला. परिणामी मीडियानं जोसेफ सोबत जॉन टावेलचंही नाव जोडून बातम्या छापण्यास सुरुवात केली. या प्रकाराला कंटाळून जॉनला परत ऑस्ट्रेलियाला जावं लागलं.

ऑस्ट्रेलियाला परत आल्यानंतर त्यानं विक्रीला काढलेली दुकानं पुन्हा सुरू केली आणि आपला मोठा मुलगा जॉन ज्युनिअरला डॉक्टर केलं. 

एकंदरीत जॉन व त्याच्या कुटुंबाचं ऑस्ट्रेलियामध्ये व्यवस्थित सुरू होतं. मात्र, अचानक त्याच्या दोन्ही मुलांचे पाठोपाठ मृत्यू झाले. या धक्क्यामुळं जॉनची पत्नी मेरीनं अंथरूण धरलं. त्यामुळं जॉन आणि मेरी पुन्हा इंग्लंडला आपल्या नातेवाईकांच्या जवळ परतले. साऊथवार्कमध्ये टावेल दांम्पत्यानं घर खरेदी केले. मेरीची काळजी घेण्यासाठी जॉननं सारा नावाची एक केअरटेकर कामावर ठेवली आणि इथूनचं जॉनच्या आयुष्यात वादळ आलं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

सारा किशोरवयीन असल्यापासून विविध ठिकाणी केअरटेकरचं काम करत होती. विशेषत: ती क्वॅकर्सच्या (प्रोटेस्टंटपंथी) घरी काम करत असे. जॉन स्वत: क्वॅकर असल्यानं एका मित्राच्या शिफारसीवरून त्यानं साराला मेरीची काळजी घेण्यासाठी घरी आणलं. १८३८मध्ये जेव्हा ती जॉन टावेलच्या घरी कामासाठा आली तेव्हा ती वयाच्या तिशीमध्ये होती. मेरीची काळजी घेता-घेता सारा आणि जॉनचं सूत जुळलं. कालांतरानं त्यांच्यात शारिरीक संबंधही प्रस्थापित झाले.

मेरीच्या मृत्यूनंतर जॉननं साराला स्वत:ची प्रेयसी म्हणून ‘साल्ट हिल’ येथे एका घरात ठेवलं. आपलं नाव सारा हार्ट असून आपला पती अल्फ्रेड हा परदेशात नोकरी करत असल्याचं तिनं शेजाऱ्यापाजाऱ्यांना सांगितलं. जॉनचं तिच्या घरी येणं-जाणं सुरूचं होतं. जॉन आपल्या पतीचा मालक (मि. टाल्बोट) असून तो त्याचा पगार देण्यासाठी घरी येत असल्याचंही सारानं इतरांना सांगितलं. साराला आशा होती आज ना उद्या जॉन आपल्याशी लग्न करेल. मात्र, जॉननं १८४१ मध्येच एका विधवा स्त्रीसोबत गुपचुप लग्न केलं होतं आणि तिचंही नाव सारा होतं. ही गोष्ट प्रेयसी साराला समजली. त्यानंतर तिचे आणि जॉनचे वारंवार खटके उडू लागले.

१ जानेवारी १८४५ या दिवशी सारा हार्टची शेजारीण मेरी ऍन ऍश्ली हिला साराच्या घरातून भांडणाचा आवाज आला. तिनं बाहेर येऊन पाहिलं असता मि. टाल्बोट म्हणजेच जॉन साराच्या घरातून घाईत बाहेर पडताना दिसला.

मेरी ऍश्लीला संशय आल्यानं ती तत्काळ साराच्या घरात घुसली. तेव्हा सारा किचनमध्ये जमिनीवर लोळत असल्याचं तिला दिसलं. साराच्या तोंडाला फेस आला होता. मेरीनं आणखी शेजाऱ्यांच्या मदतीनं डॉक्टरला बोलवलं मात्र, तोपर्यंत साराचा मृत्यू झाला. 

सारा हार्टला पोटॅशियम सायनाइड देऊन तिचा खू*न करण्यात आला होता. पोटॅशियम सायनाइड पोटात गेल्यानंतर त्याची आणि पोटातील रसायनांची प्रक्रिया होऊन हायड्रोजन सायनाइड तयार झालं. त्यामुळं तिचं शरीर तिच्या रक्तातील ऑक्सिजन वापरण्यास असमर्थ ठरलं आणि तिचा मृत्यू झाला. सायनाइडनं खू*न झालेली सारा हार्ट ही इतिहासातील पहिली व्यक्ती आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलीस अधिकारी ई. टी. चॅम्पन्स घटनास्थळी पोहचला. साराचा खू*न झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर त्यानं मि. टाल्बोटला (जॉन) पकडण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठलं मात्र, तोपर्यंत तो पसार झाला होता. चॅम्पन्सच्या सुदैवानं साल्ट हिल रेल्वे स्टेशनमधून टेलिग्राफ पाठवण्याची सोय होती. पोलिसांनी स्टेशन मास्तर मि. होवेल यांच्या मदतीनं जॉनचं वर्णन करणारा टेलिग्राफ पेडिंग्टन येथे पाठवला. तिथं ब्रिटश ट्रान्सपोर्ट पोलीस सार्जंट विल्यम्सला हा संदेश मिळाला.

जॉन पेडिंग्टनला उतरल्यानंतर विल्यम्सनं त्याचा पाठलाग केला. पण, विल्यम्स ट्रान्सपोर्ट पोलीस असल्यानं तो जॉनला अटक करू शकत नव्हता. त्यामुळं त्यानं स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी जॉन टावेल याला सारा हार्टच्या खु*नाच्या गुन्ह्यात अटक केली.

न्यायालयाच्या सुनावणीमध्ये जॉन टावेलला दोषी ठरवण्यात आलं. २८ मार्च १८४५ रोजी ऍल्सबरी मार्केटच्या चौकात त्याला जाहिर फाशी देण्यात आली. सारा हार्टचा खू*न संपूर्ण ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय झाला. कारण सायनाइड वापरून हा खू*न झाला होता आणि टेलिग्रामचा वापर करून पहिल्यांदाच एखादा आरोपी पकडण्यात आला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या भावंडांच्या आयुष्यातील खऱ्या घटनेवरून स्पीलबर्गने ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ बनवलाय

Next Post

नेपच्युनचा शोध निरीक्षणाने नाही तर गणितामुळे लागलाय..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

नेपच्युनचा शोध निरीक्षणाने नाही तर गणितामुळे लागलाय..!

या भामट्याने एक नाही तर दोन वेळा आयफेल टॉवर विकला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.