The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जर्मनीच्याही खूप आधी इंग्लंडमधून ज्यूंना देशाबाहेर हाकलून दिलं होतं

by द पोस्टमन टीम
1 February 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


ज्यू लोकांचा इतिहास हा पहिल्यापासून कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. सुमारे ५००० वर्षांपूर्वी या धर्माची स्थापना झाली असे मानण्यात येते. इस्त्राईल हा या लोकांचा एकमेव देश. या देशावर अनेक वेळा ह*ल्ले झाले आहेत.

ज्यू लोकांवर फक्त हि*टल*रने ह*ल्ले केले अशातला भाग नाही. अगदी इतिहासपूर्व काळापासून अनेक लोकांनी इस्त्राईलचा पाडाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाबिलोनचा राजा नबुचेंदरने इस्त्राईलवर ह*ल्ला करून त्यांचे बांधलेले मंदिर हे पहिल्यांदा तोडून टाकलेले होते.

त्यानंतर काही दशकांनी ज्यू आपल्या देशात परत आले आणि त्यांनी आपल्या इतिहासप्रसिद्ध डेव्हिड राजाचे दुसरे मंदिर बांधले. त्यानंतर ग्रीसमधून सिकंदरने या प्रदेशावर ह*ल्ला चढवला होता. या सिकंदरने ज्यू लोकांना जिंकून घेतले पण त्यानंतर राज्य चालवायला ज्यू लोकांचीच नेमणूक केली.

सिकंदर मेल्यानंतर ज्यू लोकांनी राजद्रोह करून आपली सत्ता परत घेतली. त्यानंतर रोमन सम्राट टायटस इस्त्राईलवर चाल करून आला आणि त्याने हे ज्यू लोकांची शान असलेले मंदिर जमीनदोस्त केले. याच्याविरुद्ध ज्यू लोकांनी बंड करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला यानंतर संतापलेल्या रोमन लोकांनी या ज्यू लोकांना त्यांच्या देशातून हाकलून द्यायला आणि मारायला सुरुवात केली.



स्वत:चा देश सोडून ज्यू जगभरात स्थलांतरित झाले. बरेच ज्यू युरोपमध्ये गेले काही अरबस्तानमध्येसुद्धा गेले.

या रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. येशूला इथेच सुळावर चढवले गेले त्यामुळे जेरुसलेम हे इस्त्राईलमधील शहर हे ख्रिश्चन लोकांचे पवित्र स्थळ बनले. ज्यू लोकांना तेथे येण्यास मज्जाव केला गेला. हेच शहर परत मुस्लीम लोकांसाठी पण पवित्र बनले. मुहम्मद पैगंबर स्वर्गात जाऊन आले ते जेरुसलेममधून त्यामुळे याच शहरात एक मशीद पण बांधण्यात आली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

चर्च आणि मशीद बांधून ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ बांधण्याची त्यांना इथे परवानगी नव्हती. बाकी जेरुसलेममध्ये ज्यू लोकांना राहण्याची परवानगी इस्लामाच्या उदयानंतर तब्बल ५०० वर्षानी मिळाली. पण युरोपमधून धर्माच्या रक्षणासाठी आलेल्या क्रुसेडर्सनी जेरुसलेमचा पाडाव करून ज्यू आणि इस्लाम धर्मी लोकांचे शिर*काण केले.

१९ व्या शतकाच्या सुरुवातील जगभरात विखुरलेल्या ज्यूंनी एक चळवळ सुरु केली हीच ती झायोनिस्ट चळवळ. स्वतंत्र ज्यू देश ही या लोकांची मागणी होती.

१८८२ पासून मोठ्या संख्येने ज्यू लोक जेरुसलेमकडे परत येवू लागले. जेव्हा इंग्रजांनी तुर्क सम्राटाबरोबरची लढाई जिंकली जो जेरुसलेममध्ये राज्य करत होता तिथे त्यांनी मुसलमान लोकांनी केलेल्या मदतीच्या बदल्यात त्यांना पॅलेस्टाईन नावाने इस्त्राईलचा मोठा भाग तोडून दिला आणि काही भाग ज्यूना देण्याचे मान्य केले पण या सगळ्या कागदी गप्पाच राहिल्या.

हि*टल*रने दुसऱ्या महायु*द्धात ज्यू लोकांचे जे शिर*काण केले तेव्हापासून खरंतर हे लोक प्रकाशझोतात आले. पण फक्त जर्मनीच नाही तर त्या अगोदरसुद्धा फ्रांस आणि इंग्लंडने आपल्या देशातून ज्यू लोकांना हाकलून लावलेले होते.

इंग्लंडमध्ये जे ज्यू अरबांनी हुसकावून लावले म्हणून साधारणपणे ९ व्या १० व्या शतकात राहायला आले. तिथे अगोदर त्यांना चांगला आश्रय मिळाला होता असे म्हणता येईल कारण तेथील राजाने त्यांच्या सुरक्षिततेची तशी काळजी घेतलेली होती. पण तिथून पुढे १२ व्या शतकात इंग्लंडचा राजा पहिला एडवर्ड याने ज्यू लोकांना देशातून हाकलून देण्यासाठी  Edict of Expulsion नावाची डिक्री काढली.

edward I

यापाठीमागे त्यांची काय भूमिका होती हे समजावून घेतले तर १० व्या शतकात इंग्लंडमध्ये राहण्यासाठी आलेल्या ज्यूंनी २०० वर्षात त्या देशात चांगले बस्तान बसवले. ज्यूंचा प्रमुख धंदा होता सावकारीचा. लोकांना पैसे उसने देणे आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून व्याज घेणे या दोन्ही गोष्टी ज्यू धर्मात वर्ज्य नव्हत्या त्यामुळे ज्यू लोकांनी पैसे व्याजाने देवून व्याज बट्ट्याच्या धंद्यात नाव कमावले पण व्याज खाणारी जात म्हणून हे लोक संपूर्ण इंग्लंड मध्ये बदनाम झाले.

ज्यू लोकांचे स्वतंत्र प्रार्थनास्थळ असते हे लोक चर्चमध्ये जात नाहीत त्यामुळे ज्यू लोक ख्रिस्ताचा द्वेष करतात असा नवीन प्रपोगंडा या भागात पसरला ज्यामुळे लोकांचा या जमातीवरचा रोष अजून जास्त वाढला.

त्यावेळी ज्यू लोकांच्या विरुद्ध असलेला अँटीसेमेटीझमचा अजेंडा संपूर्ण जगभरात पसरला होता. न्यूयॉर्क शहरात १२ व्या शतकाच्या अखेरीस याच रोषातून १०० ज्यू लोकांची ह*त्या करण्यात आली होती.

ज्यू लोक लहान मुले शोधून मारतात अशी अफवा देखील त्या काळी पसरवली गेलेली होती त्यामुळे लोकांचा ज्युंकडे बघण्याचा दृष्टीकोन वाईट होता. युरोपमध्ये त्या काळात  ज्यू लोकानी स्वत:च्या कपड्यांवर आपण ज्यू असल्याचा एक आयडेंटीटी बॅज घेवून फिरावे असा नियम बनवण्यात आलेला होता. जेणेकरून कुठेही गेल्यावर ज्यू कोण आहे ते ओळखू येईल.

१२८७ मध्ये एडवर्डने काढलेल्या हुकुमनाम्यामुळे ज्यू लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले. त्यांच्या जमिनी आणि इतर संपत्ती जप्त करण्यात आली. ज्यू लोकांकडे जी कर्जाची देणी बाकी होती ती राजाच्या खजिन्याकडे वळवण्यात आली.

खरे तर एडवर्डवर प्रचंड कर्ज झालेले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने त्याच्या प्रजेवर जबरी कर लादण्याचे ठरवले होते पण हा कर भरताना प्रजेमध्ये असंतोष माजू नये म्हणून त्याने त्या बदल्यात देशात राहणाऱ्या सर्व ज्यू लोकांना मी हाकलून काढीन अशा स्वरूपाचा अध्यादेश काढला.

लंडनमध्ये त्यावेळी जवळपास ३००० ज्यू लोक होते. सर्वांना रातोरात घराच्या बाहेर काढून थेम्स नदीच्या काठावर नेले गेले आणि तिथून जहाजात बसवून शहराबाहेर सोडण्यात आले. अशा स्वरूपाच्या दंतकथा आज सांगितल्या जातात. भरतीच्या लाटेत काही ज्यू वाहून गेले आणि बरेच लोक खाडी पोहून किनाऱ्याला लागले.

यानंतर पुन्हा इंग्लंडमध्ये ज्यू लोकांना यायला १५ वे शतक उजाडले. तोपर्यंत २०० वर्ष इंग्लंडमध्ये ज्यू लोकांना प्रवेश वर्जित होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Israel
ShareTweet
Previous Post

भारताच्या संस्कृतीशी एकरूप झालेला आक्र*मक राजवंश

Next Post

या माणसाच्या प्रयत्नांमुळे उडीसा राज्य भारतात विलीन झाले

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या माणसाच्या प्रयत्नांमुळे उडीसा राज्य भारतात विलीन झाले

एक दुर्लक्षित भारतीय महिला संशोधक ज्यांना नोबेलने थोडक्यात हुलकावणी दिली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.