The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने पहिल्या महायुद्धाच्या १७ वर्ष आधीच त्याची भविष्यवाणी केली होती!

by द पोस्टमन टीम
15 March 2022
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


विज्ञान, तंत्रज्ञान कितीही विकसित झालं असलं तरीही पूर, अवर्षण, भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांचा अंदाज घेणं मानवाला अद्याप शक्य झालेलं नाही. इतकंच काय, युद्धासारख्या मानवनिर्मित संकटांचं पूर्वानुमान बांधणंही अजून पूर्णतः जमलेलं नाही.

रशियाची दीर्घकाळ सुरू असलेली मुजोरी प्रत्यक्ष युद्धखोरीपर्यंत जाणार नाही; असंच अनेक तज्ज्ञांचं मत होतं. मात्र, युरोपीय देशांचं अर्थकारण, परस्पर संबंध यांचं विश्लेषण करून पहिलं महायुद्ध होणार असं भाकीत एका अवलियाने वर्तवलं होतं. ते ही महायुद्धापूर्वी तब्बल १७ वर्ष! युद्धाच्या दुष्परिणामांबाबत जनमत तयार करून आंतरराष्ट्रीय संघर्षाचं निवारण करण्यासाठी संस्था उभ्या करण्यातही त्याने पुढाकार घेतला. त्या अवलियाची ही जीवन कहाणी…

या अवलियाचं नाव होतं जॅन ब्लोच! जगभरच्या; विशेषतः युरोपीय देशांच्या अर्थशास्त्रीय परिस्थितीचे विश्लेषण करून पहिल्या महायुद्धाची शक्यता युद्धापूर्वी तब्बल १७ वर्ष आधी व्यक्त करणारे जॅन ब्लोच यांचा उल्लेख एक द्रष्टे अर्थशास्त्रज्ञ म्हणून करावा लागेल. मात्र, त्यांच्या आयुष्याला अनेक कंगोरे होते. ते एक यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि शांततावादी विचारवंत होते. 

त्यांच्या आयुष्याच्या उत्तराधार्त त्यांनी एक व्यापक लिखाण प्रकाशित केले त्या मध्येच त्यांनी पहिल्या महायुद्धाची शक्यता वर्तवली. या युद्धाच्या विनाशकारी स्वरूपाबाबतही त्यांनी चेतावणी दिली आणि देशादेशांमधील विवादांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाची आवश्यकता प्रतिपादन केली आणि पहिल्या हेग शांतता परिषदेत भाग घेतला. ब्लॉच यांनी ल्यूसर्नमध्ये युद्ध संग्रहालयाची स्थापनाही केली.

जॅन गोटलिब ब्लोच (१८३६ ते १९०२) यांचा जन्म एका गरीब ज्यू कुटुंबात झाला. या घरातल्या अनेक मुलांपैकी एक. चौदाव्या वर्षी ते नोकरी शोधण्यासाठी वॉर्सा येथे गेले. सुरुवातीला ऑफिस बॉय आणि नंतर बँकेत क्लार्क म्हणून काम करत असताना त्यांनी आपले उच्च शिक्षणही स्वकमाईने पूर्ण केलं. सन १८५१ मध्ये त्यांनी कॅल्व्हिन धर्मात प्रवेश केला आणि त्यानंतर कॅथलिक धर्म स्वीकारला. सन १८५६ मध्ये पदवी घेतल्यानंतर ते सेंट पीटर्सबर्गला रवाना झाले आणि रशियाची पहिली पीटर्सबर्ग ते वॉर्सा ही पश्चिम रेल्वे तयार करण्यासाठी महत्वपूर्ण काम केले.



हाती काही भांडवल जमा होताच ब्लोच यांनी हुशारीने रशियाच्या नव्या आर्थिक धोरणांचा फायदा उठवला. काही वर्षांनंतर एक लक्षाधीश आणि उभरता उद्योजक बनून वॉर्सा येथे परतले. आल्यावर त्यांनी एक बँक उघडली, एक चांगल्या पैकी घर विकत घेतले आणि एमिलिया क्रोननबर्ग या पोलंडमधल्या सर्वात श्रीमंत फायनान्सरची भाची लिओपोल्ड क्रोननबर्ग (1812-1878) यांची भाची हिच्याशी लग्न केले.

ब्लोचने आपली रेल्वे गुंतवणूक चालू ठेवली आणि रशियाच्या युरोपीय भागात रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्टॉक एंटरप्राइझची स्थापना केली. त्यांनी उद्योग आणि विम्यामध्ये गुंतवणूक केली. बँकिंग आणि क्रेडिट कंपन्यांच्या उभारणीमध्ये पुढाकार घेतला आणि सन १८७३ ते १८८५ पर्यंत वॉर्सा स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून काम केलं.

उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीबरोबरच ब्लोचने संशोधन आणि सामाजिक उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली. त्यांनि लिहून प्रकाशित केलेली पहिली प्रकाशने रशियामधल्या रेल्वे विकासाच्या आर्थिक आणि सामाजिक पैलूंशी संबंधित आहेत. त्यांची पुस्तकं त्या काळातील तज्ज्ञ मंडळींकडून चांगलीच नावाजली आणि सामान्य वाचकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ब्लोच यांना रशियन अर्थमंत्रालयाच्या वैज्ञानिक समितीमध्ये खास तज्ज्ञ म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्या नंतर त्यांना नियमित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. अर्थात, रेल्वेमार्गांचे विकसन काही त्यांचा एकमेव अभ्यासाचा एकमेव विषय नव्हता. सन १८८० च्या दशकात त्यांनी रशियाच्या आर्थिक, उद्योग आणि पोलिश साम्राज्यातील शेतीवरील सर्वसमावेशक कामांची प्रसिद्धी केली. हा उपक्रम सांख्यिकीय माहिती आणि ऐतिहासिक सामग्रीवर आधारित होता.

ज्यूंच्या अधिकारांवर मर्यादा आल्याने रशियन अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांची माहिती देणारी याचिकाही त्यांनी तयार केली.

रशिया-तुर्की युद्धादरम्यान सन १८७७-७८ मध्ये त्यांनी केलेली निरीक्षणं, रेल्वेच्या बांधकामादरम्यान युद्ध मंत्रालयाशी आलेला संपर्क आणि वॉर्साला तटबंदी घालण्याच्या विशेष समितीमध्ये सहभाग अशा अनेक कारणांमुळे ब्लॉचची युद्धात रुची निर्माण झाली.

सन १८८० मध्ये त्यांनी युद्धाच्या आर्थिक, तांत्रिक, राजकीय आणि सामाजिक पैलूंवर संशोधन सुरू केलं. युद्धाला कारणीभूत असलेल्या यंत्रणा, सशस्त्र संघर्षांमधील लढाईची साधने आणि परिणामांचे मूल्यांकन कसं करावं याचा अभ्यास त्यांना करायचा होता. त्या हेतूने त्यांनी उपलब्ध असलेले संपूर्ण लष्करी साहित्य वाचले आणि अनेक युरोपियन सैन्यातील कर्मचारी अधिकारी, लष्करी अभ्यासक तसेच अनुभवी लोकांशी चर्चा केली. स्वखर्चाने लष्करी प्रशिक्षणाच्या आधारे विविध प्रकारच्या बंदुकांवर प्रयोग केले आणि युद्धाच्या खर्चासंबंधी सांख्यिकीय माहिती संकलित केली.

त्यानंतर सन १८९३ आणि ९४ मध्ये त्यांनी ‘द फ्यूचर ऑफ वॉर इन इट्स टेक्निकल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल रिलेशन्स’ नावाची लेखमालिका प्रकाशित केली. काही काळानंतर त्यांनी तीच पुस्तक स्वरूपात नंतर रशियन, फ्रेंच, जर्मन आणि डच भाषेत विस्तारित आवृत्ती प्रकाशित केली. या अभ्यासपूर्ण पुस्तकांच्या पहिल्या खंडामध्ये ब्लोच यांनी विविध प्रकारची शस्त्र, तसेच घोडदळ, तोफखाना आणि पायदळ यांची कार्य, तटबंदीचे प्रकार तपशीलवार मांडले.

दुसऱ्या खंडामध्ये त्यांनी जमिनीवरील युद्धाची चर्चा केली आहे तर तिसऱ्या खंडामध्ये समुद्रातल्या युद्धाची चर्चा केली आहे. चौथ्या खंडात युद्धाच्या आर्थिक बाजूवर लक्ष केंद्रित केलं आहे. भविष्यातल्या संघर्षाची राजकीय परिस्थिती आणि त्याचा नागरिकांवर आणि सैनिकांवर होणारा परिणाम आणि शांततावादाच्या इतिहासाचे वर्णन पाचव्या खंडात केले आहे. 

स्वतंत्रपणे प्रकाशित झालेल्या इतर स्फुट लेखांमध्ये त्यांनी शस्त्रास्त्रांवर नियंत्रण ठेवण्याची आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थापन करण्याची मागणी केली आहे. आधुनिक युद्धामुळे देशांना आर्थिक किंवा राजकीय फायदा होणार नाही. युद्ध हे संघर्ष निवारणाचं कालबाह्य, निरुपयोगी माध्यम आहे हे तात्विक विवेचनाद्वारे सिद्ध करण्याचा हा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.

ब्लोच यांनी आपल्या समकालीनांना, मुख्यतः युरोपियन राजकारणी आणि जनतेला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की, प्रचलित शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्ध्याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी दीर्घलाकीन आणि न परवडणाऱ्या युद्धाची आवश्यकता असेल. प्रदीर्घ युद्धामुळे देशांची आर्थिक तरलता कमी होईल. सैनिक आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि उपासमार होईल. सामाजिक उद्रेक घडण्याचा धोका वाढेल.

त्यांनी मान्य केले की तोफखाना आणि बॉम्ब हे युद्ध निर्णायक ठरण्यासाठी प्रभावी मार्ग आहेत. मात्र, हा मार्ग विनाशकारी आहे, हे त्यांनी अधोरेखित केलं. युद्धामुळे रस्ते आणि वाहतुकीच्या इतर साधनांचा आणि एकूणच शहरं, ऐतिहासिक ठिकाणं यांचा नाश होण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. त्यांनी मानवजातीचा नाश आणि युरोपियन सभ्यतेचा अंत होण्याची भविष्यवाणी केली. त्यांनी अमेरिका युरोपियन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरच्या बाजारपेठांवर कब्जा करेल. ज्यामुळे अमेरिका आणि युरोपमधील आर्थिक दरी वाढू शकेल, हे देखील महायुद्धापूर्वीच म्हणून ठेवलं आहे.

लष्करी आणि लष्कराचे समर्थक असलेल्या मंडळींनी ब्लॉचच्या कामाचं मर्यादित स्वरूपात स्वागत केलं. मात्र, बुद्धिजीवी मंडळी आणि विचारवंत यांनी ब्लॉचच्या कामात मोठ्या प्रमाणावर रस दाखवला. ब्लॉचचे विचार, लिखाण आणि पुढाकारातून सन १८९९ च्या उन्हाळ्यात हेगमध्ये शांतता परिषद बोलावण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

या परिषदेत ब्लॉच एक निरीक्षक आणि सक्रिय शांततावादी विचारवंत म्हणून उपस्थित होते. बॅरोनेस बर्था फॉन सटनर आणि फ्रेडरिक यांच्यासह त्यांनी लवाद न्यायालय तयार करण्यासाठी आणि निःशस्त्रीकरणावर करार करण्यासाठी प्रभावी वातावरणनिर्मिती केली. ब्लॉच यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातली शेवटची वर्षे शांततावादाच्या प्रसारासह ल्युसर्नमध्ये युद्ध आणि शांती संग्रहालयाची स्थापना करण्यासाठी समर्पित केली.

जॉन ब्लॉच आणि त्यांच्या कामाचे स्मरण पश्चिम युरोपीय बौद्धिक वर्तुळात टिकवून ठेवण्यात आले आहे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ब्लॉच यांच्या शांततावादी विचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. युद्ध हाच स्वातंत्र्य टिकवण्याचा किंवा परत मिळवण्याचा एकमेव मार्ग असल्याची ठाम समजूत त्या काळात मूळ धरून होती. 

ब्लॉच यांना त्यांचे ज्यू मूळ आणि झारवादी अधिकार्‍यांबद्दल त्यांना असलेली निष्ठा यामुळेही त्यांना अप्रियतेला सामोरे जावे लागले. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पोलिश इतिहासकारांनी राष्ट्रीय आणि वर्ग संघर्षाचे दस्तावेजीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामध्ये जॉन ब्लॉच यांना आणि त्यांच्या कामाला फारसे स्थान मिळले नाही. मात्र, परदेशी इतिहासकारांना, विशेषतः लष्करी इतिहासकारांना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल अधिक रस होता.

सन १९७० च्या दशकात आर्थिक आणि सामाजिक इतिहासाच्या क्षेत्रातील संशोधकांनी एक उद्योजक म्हणून ब्लॉचमध्ये रस घेतला. तथापि, त्यांना शांततावादी विचारवंत म्हणून त्यांच्या भूमिकेपेक्षा आर्थिक उलाढालींमध्येच (रेल्वे विकास) अधिक रस होता. अर्थातच या द्रष्ट्या विचारवंताला आणि त्यांच्या विचारांना ते हयात असेपर्यंत तरी म्हणावी तेवढी किंमत मिळाली नाही. मात्र, तर्काच्या आधारे महायुद्धासारख्या विनाशकारी घटनेचे पूर्वानुमान काढणाऱ्या ब्लोच यांच्या द्रष्टेपणाचे महत्व जगाला खूप उशिराने लक्षात आले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

रोनाल्डो हे फुटबॉलप्रेमींच्या लाडक्या खेळाडूचं आडनाव नाहीये!

Next Post

ना*झी सैन्याचे गुप्त संदेश उलगडून हिने दोस्त राष्ट्रांच्या विजयाचा पाया घातला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

ना*झी सैन्याचे गुप्त संदेश उलगडून हिने दोस्त राष्ट्रांच्या विजयाचा पाया घातला होता

डॉ. सलीम अली होते म्हणून सायलेंट व्हॅली टिकली, नाही तर...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.