The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एवढ्या प्रसिद्ध पत्रकाराला सौदीने असं काही गायब केलं की त्याचं नखसुद्धा सापडलं नाही

by द पोस्टमन टीम
8 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘जमालला का मारण्यात आलं हे मला माहित आहे, अप्रत्यक्षपणे मी देखील याला जबाबदार आहे’

कॅनडास्थित सौदी कार्यकर्ता आणि व्हिडिओ ब्लॉगर उमर अब्दुलाझीझ यांची ही प्रतिक्रिया आहे. सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या ह*त्येवर दिग्दर्शक ब्रायन फॉगेलनं ‘दि डिसिडेन्ट’ नावाचा एक माहितीपट तयार केला आहे. उमर आणि जमाल चांगले मित्र होते. जमाल खशोगीच्या कामाचा मागोवा घेण्यासाठी सौदी सरकारने एनएसओ ग्रुप टेक्नोलॉजीज लिमिटेडच्या ‘पेगासस’ स्पायवेअरची मदत घेतल्याचं या माहितीपटात सांगण्यात आलं आहे.

खशोगी यांच्या ह*त्येनंतर ‘द सिटीझन लॅब’ नावाच्या संस्थेनं उमरच्या फोनची तपासणी केली आणि त्यात ‘पेगासस’ स्पायवेअर असल्याचं उघड केलं. याच स्पायवेअरच्या मदतीनं सौदीमध्ये असलेल्या सर्व्हर्सपर्यंत जमाल खशोगी आणि उमर यांच्या कामांची माहिती मिळत होती, असं उमर यांनी माहितीपटामध्ये सांगितलं आहे.

२०१८ मध्ये झालेली पत्रकार जमाल खशोगी यांची ह*त्या आणि पेगासेस यांचा संबंध होता. त्यावेळी हे प्रकरण जगभर मोठ्या प्रमाणात गाजलं होतं.



जमाल खशोगी कोण होते? त्यांची ह*त्या का आणि कुणी केली होती, यामागे अतिशय रंजक घटनाक्रम आहे.

जमाल अहमद खशोगी हे सौदी अरेबियाचे पत्रकार, लेखक आणि ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक होते. काही दिवस ते ‘अल-अरब न्यूज चॅनेल’चे सरव्यवस्थापक आणि मुख्य संपादक होते. सौदी अरबी वृत्तपत्र ‘अल वतन’चे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

२ ऑक्टोबर २०१८ रोजी इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य दूतावासात त्यांची ह*त्या झाली होती. सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा या ह*त्येमध्ये समावेश असल्याची दाट शक्यता जागतिक स्तरावर चर्चिली गेली.

१३ ऑक्टोबर १९५८ रोजी सौदीतील मदीनामध्ये जमाल यांचा जन्म झाला. सौदीमध्ये आपलं सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले होते. १९८३ मध्ये अमेरिकेतील ‘इंडियाना’ विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारिता सुरू केली होती. अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियन सैन्य आणि मुजाहिद्दीन यांच्यातील संघर्षाची माहिती समोर आल्यानंतर ते प्रथम चर्चेत आले होते. अमेरिका आणि युरोपियन देशांच्या रडावर असलेला अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनच्या अनेक मुलाखती घेणारा पत्रकार म्हणूनही जमाल यांची ओळख होती.

सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमानच्या धोरणांबाबत ते स्पष्ट समीक्षा लिहित आणि टीका करत. या कारणांमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि त्यांना अमेरिकेत रहावे लागले. ते नियमितपणे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रसिद्ध वर्तमानपत्रात स्तंभलेखन करत होते. त्यातून ते सौदी सरकारच्या धोरणांवर टीका करायचे. प्रिन्स सलमाननं अनेक अधिकारी आणि माजी मंत्र्यांना कशा प्रकारे तुरूंगात टाकले यामागील कथा त्यांनी जगासमोर आणली होती. मानवाधिकार कार्यकर्त्यांची अटक आणि लेबनॉन पंतप्रधानांच्या अपहरणप्रकरणासाठी देखील जमाल यांनी प्रिन्सला जबाबदार ठरवलं होतं. ही सर्व कारणं त्यांची ह*त्या करण्यासाठी पुरेशी होती.

जमाल यांच्या ह*त्येचा घटनाक्रम पाहिला असता, अतिशय बारकाईनं नियोजन करून हे काम केल्याचं लक्षात येतं. २ ऑक्टोबर २०१८ रोजी, जमाल खाशोगी इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य दूतावासात गेले होते. आपला पहिला घटस्फोट झाला असून तुर्कीची प्रेयसी हॅटिस सेंगीझशी लग्न करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी, या हेतूने ते सौदी दूतावासात गेले होते. त्यापूर्वी २८ सप्टेंबरला पहिल्यांदा दूतावासाला भेट दिली होती. मात्र, त्यांना २ ऑक्टोबरला पुन्हा येण्यास सांगितलं गेलं होतं.

त्या दिवशी मिस हॅटिस आणि जमाल दोघेही सौदी वाणिज्य दूतावासात गेले होते. मिस हॅटिस गेटबाहेरचं गाडीमध्ये थांबल्या आणि जमाल आतमध्ये गेले. आतमध्ये जमाल यांच्या ओळखीचे काही लोक असल्यानं कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही, अशी आशा असल्यामुळं त्यांनी आपले दोन्ही फोन गाडीमध्ये ठेवले.

जर आपण परत आलो नाही तर तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांच्या सल्लागाराला बोलव, असं देखील त्यांनी मीस हॅटिस यांना सांगितलं होतं. जणू काहीतरी अघटीत होऊ शकतं, याची त्यांना कल्पना होती. मिस हॅटिस यांनी १० तास जमाल यांची वाट पाहिली मात्र, ते परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी जगप्रसिद्ध सौदी पत्रकार जमाल खाशोगी इस्तंबूलमधील सौदी वाणिज्य दूतावासातून बेपत्ता झाल्याची बातमी वेगात पसरली.

जमाल बेपत्ता झाल्यानंतर जवळपास दोन आठवडे सौदी अरेबिया या प्रकरणाविषयी काहीही माहिती नसल्याचं सांगत राहिला. प्रिन्सनं देखील जमाल आपलं काम करून दूतावासातून निघून गेल्याचं ब्लूमबर्ग न्यूजला सांगितलं. त्यानंतर जमाल खाशोगी यांचा एका झटापटीत मृत्यू झाल्याचं २० ऑक्टोबर २०१८ रोजी सौदीनं जाहीर केलं. दरम्यान, ही घटना तुर्कीच्या भूमीवर घडली असल्यानं, मिस हॅटिस यांच्या तक्रारीवरून स्थानिक तपास यंत्रणांनी देखील या प्रकरणाचा तपास केला. त्यांच्या मते, जमाल यांची ह*त्याच करण्यात आली होती.

तुर्की अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमाल यांच्या खु*नाच्या आदल्या दिवशी तीन वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांसह १५ सौदी एजंट्सची एक टीम इस्तंबूल येथे आली होती. त्यांनी जमाल खाशोगीच्या आगमनापूर्वी दूतावासातील सुरक्षा कॅमेरे बंद करून टाकले होते. दूतावासात प्रवेश करताच जमाल यांचा गळा दाबून खू*न करण्यात आला आणि त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून तो नष्ट करण्यात आला.

इस्तंबूलचे मुख्य वकील इरफान फिदान यांनी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी ही माहिती दिली होती. इतकचं काय तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील, जमाल यांची ह*त्या झाल्याचं जाहीर केलं होतं. दूतावासामध्ये एखाद्या व्यक्तीची ह*त्या होते, याचा अर्थ ह*त्येचे आदेश नक्कीच सौदी सरकारकडून आले होते, असा आरोप जगभरात झाला.

या प्रकरणात संयुक्त राष्ट्रांनी देथील लक्ष घातलं होतं. युएनच्या विशेष तपास अधिकारी ऍग्नेस कॅलमार्ड यांनी जून २०१९ मध्ये याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यांच्या मते, जमाल खाशोगीची ह*त्या घडवून आणली आहे आणि त्यासाठी सौदी अरेबिया जबाबदार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यासाठी पुरेसे पुरावे देखील आहेत. सौदी अरेबिया आणि तुर्की यांनी जमाल यांच्या ह*त्येचा तपास केला मात्र, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या प्रकरणाला साजेसा नव्हता, असेही कॅलमार्ड म्हणाल्या होत्या.

त्यांनी सौदी अरेबियातील ११ संशयितांना चौकशीसाठी बोलावले होते. जमाल यांच्या ह*त्येच्या अगोदर जे १५ एजंट दूतावासात आले होते, त्यापैकी एकाकडे बोन कटर असल्याचं तपासात समोर आले होते. यानंतर बेलग्रेडच्या जंगलात जमाल यांचा मृतदेह शोधण्यासाठी तपास मोहिम राबण्यात आल्याची माहिती देखील माध्यमांच्या हाती आली होती. सौदीचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री आदिल अल जुबेर यांनी कॅलमार्ड यांचा अहवाल नाकारला होता.

या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते. एका नावाजलेल्या पत्रकाराच्या ह*त्येमागे सौदी अरेबियाचा हात असल्याचं समोर आल्यानंतर जर्मनी, फिनलंड आणि डेन्मार्क या देशांनी सौदीसोबतचे शस्त्र करार रद्द केले होते. जमाल खशोगी एक अतिशय धाडसी आणि निर्भिड पत्रकार होते. सत्य दाबण्यासाठी सत्ताधारी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात हे जमाल यांच्या ह*त्येनंतर पुन्हा अधोरेखित झालं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जिवंत गाडले जाऊनही हे लोक आपली स्टोरी सांगण्यासाठी पुन्हा परत आले होते..!

Next Post

गावातील रस्ता दुरुस्त करायला लव्हलीनाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावं लागलं

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

गावातील रस्ता दुरुस्त करायला लव्हलीनाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावं लागलं

पानिपतच्या एका शेतकऱ्याच्या पोराने भारताचा ऑलिम्पिकमधला सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवलाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.