The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एवढा मोठा माणूस असूनही ‘जॅक मा’चा नेमका काय कार्यक्रम झालाय कळायला मार्ग नाही

by द पोस्टमन टीम
23 April 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


अलीबाबा या जगातील एका मोठ्या ई कॉमर्स वेबसाईटचे संस्थापक आणि प्रमुख जॅक मा, हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचा बातमीने जागतिक मार्केटमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चिनी सरकार व कम्युनिस्ट सरकारची आलोचना केल्यामुळे चीनच्या कम्युनिस्ट सरकारने जॅक मा यांची तुरुंगात रवानगी केली असल्याचे म्हटले जात आहे.

चीनमधील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले जॅक मा हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गणले जातात. परंतु चीनच्या सरकारने त्यांच्या जवळील संपत्तीवर आपला हक्क सांगितल्यामुळे त्यांच्यात आणि चीनच्या सरकारमधे मोठा संघर्ष उभा राहिला होता. त्यावेळी जॅक मा यांनी चिनी सरकारच्या विरोधात भाषणबाजी केली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ या काळात ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते.

आपल्या राजकीय प्रतिस्पर्धींना संपवण्याची एकही संधी चिनी सरकारने सोडली नसून जॅक मा यांच्या गायब होण्याने सर्वदूर चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे.

चिनी सरकार आणि जॅक मा यांचे संबंध बिघडायला सुरुवात होण्यास चिनी सरकारचा अलिबाबाचे ३७ अब्ज डॉलर्सचे आयपीओ नष्ट करण्याचा निर्णय कारणीभूत होता. आयपीओ रद्द केल्यामुळे कंपनीला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले होते. यामुळेच जॅक मा यांनी चिनी सरकारवर उघड टीका केली. जॅक मा यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांना पुन्हा पाहिले नसून त्यांना नजरकैद ठेवण्यात आल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय मीडियात रंगली होती.

२० जानेवारी २०२१ रोजी एका धर्मादाय कार्यक्रमात ग्रामीण भागातील शिक्षकांच्या गटाशी व्हिडिओ लिंकद्वारे बोलताना मा यांचे सार्वजनिक जीवनात पुनरागमन झाले. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये, जॅक मा आणि त्यांची कंपनी अलीबाबा यांना चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालकीचे मीडिया आऊटलेट्स विकण्याचे आदेश दिले होते, यामध्ये हाँगकाँगच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टचा समावेश होता. जनमानसावर सरकारेतर मिडियाचा प्रभाव पडू नये यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती.



त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये, जॅक मा जवळजवळ सहा महिने जपानची राजधानी टोकियोमध्ये सर्वसाधारण जीवन जगत होते. मार्च २०२३ मध्ये त्यांनी अलीबाबा कंपनीच्या मुख्य कार्यालयाजवळील एका शाळेला सदिच्छा भेट दिली. तेथे ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. या शाळेला अलीबाबा कंपनीकडून निधीपुरवठा केला जातो. एकूणच जॅक मा यांनी ऑक्टोबर २०२० पासून सार्वजनिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ केली नाही.

चीनमधील कम्युनिस्ट हुकूमशाही सरकार आपल्याविरोधात एकही शब्द ऐकून घेत नाही. हीच खऱ्या अर्थाने हुकूमशाही आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

जॅक मा यांचा पेपरची विक्री करण्यापासून सुरु झालेला संघर्षाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांनी अलीबाबा ही जगातील आघाडीची ई कॉमर्स वेबसाईट सुरूच केली नाही तर, त्यांनी त्या माध्यमातून असंख्य प्रयोग देखील केले आहेत.

जॅक मा यांचा जन्म चीनच्या हॉंग्झोऊ प्रांतात १० सप्टेंबर १९६४ रोजी झाला. जॅक मा यांच्या घरची परिस्थिती फारच बेताची होती. त्यांचे आईवडील गाणे गाऊन मिळणाऱ्या पैशांवर उदरनिर्वाह करायचे. बालपणापासून जॅक मा यांना इंग्रजी शिकायची इच्छा होती, त्यासाठी ते हॉंगझोऊ इंटरनॅशनल हॉटेल नावाच्या एका हॉटेलमधे नोकरी करायचे. त्याठिकाणी येणाऱ्या विदेशी पर्यटकांकडून त्यांनी इंग्रजीचे धडे गिरवले होते.

जॅक मा आधी आपल्या तोडक्यामोडक्या इंग्रजीत पर्यटकांशी संवाद साधायचे आणि त्यानंतर नवीन शब्द शिकून त्याचा सराव करायचे.  जॅक मा यांनी काही काळातच इंग्रजीत प्राविण्य मिळवले व त्यांनी पर्यटकांना इंग्रजीत गाईड करण्यास सुरुवात केली. त्यांनी तब्बल नऊ वर्षे हे काम केले आणि त्यानंतर स्थानिक इंजिनिअरींग कॉलेजमधे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

टुरिस्ट गाईड म्हणून काम करत असताना त्यांचे अनेक विदेशी पर्यटक चांगले मित्र बनले. जॅक मा यांचे मूळ नाव मा यू असे होते, पण विदेशी पर्यटकांना ते उच्चारायला अवघड जात म्हणून त्यांनी त्यांचे नामकरण जॅक असे केले.

जॅक मा यांनी टुरिस्ट गाईडचे काम सोडून नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली. ३० ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करून देखील त्यांना नोकरी मिळत नव्हती. त्यांच्या शहरात केएफसीचे रेस्टॉरंट उघडले होती त्याठिकाणी त्यांनी नोकरीसाठी अर्ज देखील केला होता. २४ लोकांनी अर्ज केला, त्यापैकी २३ लोकांना नोकरी मिळाली आणि ज्या एका व्यक्तीला नोकरी मिळाली नाही त्या व्यक्तीचे नाव होते जॅक मा!

१९९४ साली जॅक माची इंटरनेटशी ओळख झाली. त्या आधी  इंटरनेटबद्दल त्यांना अधिक माहिती नव्हती. इंटरनेटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले होते. ज्यावेळी जॅक मा यांनी इंटरनेट हाताळायला घेतले त्यावेळी त्यावरील माहितीचा स्रोत बघून त्यांचे डोळे दिपले, परंतु आपला देश चीनबद्दल इंटरनेटवर विशेष काही उपलब्ध नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना वाईट वाटले.

यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांसमवेत चायनीज येलो पेजेस नावाची वेबसाईट सुरु केली. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी चिनी लोकांना इंटरनेटवर पेजेस काढून देण्यास सुरुवात केली. त्यांनी १९९५मधे वेबसाईट बनवली आणि काही काळातच असंख्य चिनी लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधत आम्हाला देखील वेबसाईट आणि पेज बनवून द्या अशी मागणी केली. त्यांच्या पत्नी कुक्कु यांच्या समवेत त्यांनी वेबसाईट डिझाईन कंपनी सुरु केली.

या कंपनीतून जॅक मा यांना फार मोठा फायदा झाला. ३ वर्षात या कंपनीने ३ लाख डॉलर्सची घसघशीत कमाई केली. वेबसाईट बनवणे त्याकाळी फार मोठे जिकरीचे काम होते. जॅक मा यांना वेबसाईट डिझाईन करायला आणि ती लोकांना सुपूर्द करायला मोठा काळ लागत होता. आजच्या प्रमाणे ही प्रक्रिया त्याकाळी इतकी सुलभ नव्हती. मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केल्यावर त्यांना त्यांची वेबसाईट विकसित करण्यात यश आले होते. त्याकाळी इंटरनेटचा वेग देखील प्रचंड कमी असल्याने १८ तास सलग काम करण्याची नामुष्की जॅक मा यांच्यावर ओढवली होती, पण असे असताना देखील ते हरले नाहीत, थकले नाहीत. त्यांनी यातून मोठ्या प्रमाणत नफा कमवला.

१९९८ -१९९९ ला ते चीनच्या एका आयटी कंपनीत कामाला होते, पण त्यांना काम आवडले नाही आणि त्यांनी पुन्हा आपल्या मूळ शहरात परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या गावी परतल्यावर त्यांच्या समोर नवीन अडचणी निर्माण झाल्या. त्यांनी त्या अडचणींवर मात करत आपला व्यवसाय मोठा केला.

अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे एका कॉफी शॉपमध्ये बसलेले असताना त्यांच्या मनात ई कॉमर्स वेबसाईट सुरु करण्याचा विचार आला. त्यावेळी त्या वेबसाईटला काय नाव द्यावे हा प्रश्न त्यांच्या मनात होता. त्यांचे इतर सहकारी नेहमी अलीबाबा हे नाव घ्यायचे.

एकदा त्यांनी त्यांच्या भारतीय सहकाऱ्याकडून अलीबाबाची माहिती मिळवली. त्या माहितीच्या आधारावर त्यांनी आपल्या ई कॉमर्स वेबसाईटचे नामकरण अलीबाबा असे करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या वेबसाईटने काही काळातच अनपेक्षित विलक्षण यश मिळवले.

त्यांच्या वेबसाईटने  काही काळातच २४० पेक्षा जास्त देशात विस्तार केला.  २०१४ साली अलिबाबा ही न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर २५ अब्ज डॉलर्सची कंपनी म्हणून नावारूपास आली. २०१७ मध्ये जॅक मा यांनी ३७.६ अब्ज डॉलर्स इतका नफा कमावला होता. जॅक मा यांच्या कंपनीत आज ५० हजाराहून अधिक लोक कामाला आहेत.

जॅक मा यांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या व्यवसायाला आता ग्रहण लागले आहे. चिनी सरकार व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात गेल्याचे मोठे परिणाम जॅक मा यांना चुकवावे लागत आहेत. चीनच्या हुकूमशाहीने आजवर विरोधात बोलणाऱ्या अनेकांची तोंडे बंद केली आहेत, सध्या चीन जगासमोर एक मोठे आव्हान म्हणून येऊन बसला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मुस्लिमांच्या शिया व सुन्नी पंथियांचा पेहरावच नव्हे तर ‘अजान’सुद्धा वेगळी आहे !

Next Post

या स्टार्ट-अपमुळे लाखांच्या शस्त्रक्रिया काही हजारात होणं शक्य झालंय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या स्टार्ट-अपमुळे लाखांच्या शस्त्रक्रिया काही हजारात होणं शक्य झालंय

याने माफीचा साक्षीदार बनून अमेरिकेतल्या माफियांची सिक्रेट दुनिया उघड केली होती, पण...

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.