The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नादिया मुराद : ही महिला आयसिस विरोधात खंबीरपणे उभी राहिलीये

by द पोस्टमन टीम
5 May 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


उत्तर इराकमध्ये आपले बालपण व्यतित करणाऱ्या २५ वर्षीय युवतीची ही करुण कहाणी, जिने आपले सर्वस्व गमावले. तिला आयसिसच्या जिहा*द्यांनी पकडून नेले. तिथे ९० दिवस तिच्यावर सतत अ*त्याचार करण्यात आले. आपल्या आयुष्यात सर्वस्व गमावून बसलेल्या मुलीने पुढे जाऊन आपल्यासारखंच नरकयातनांनी भरलेलं जीवन भोगणाऱ्या लोकांसाठी अभियान राबवलं.

नादिया मुराद असे या युवतीचे नाव असून तिला नोबेल पारितोषिक मिळालं आहे. कांगोच्या जंगलात काम करणाऱ्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. डेनिस यांच्यासमवेत विभागून तिला नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते. यु*द्धकाळात शस्त्रास्त्रांच्या वापरावर बंदी घालावी अशी मागणी नादिया मुराद यांनी केली आहे.

बंदिवासात असताना आयसिसच्या हैवानांच्या यौन हिं*साचाराच्या शिकार ठरलेल्या नादिया याझिदी या अत्यंत अल्पसंख्याक समुदायाची आहे.

याझिदीला जगातील सर्वांत प्राचीन धर्म मानले जाते.

उत्तर इराकच्या सीरिया सीमेजवळच्या शिंजा इलाख्यातील कोचू या गावी नादियाचा जन्म झाला. तिला सहा भाऊ होते. नादियाने आपल्या गावात बलात्काराविरोधात जागृती निर्माण करायचे काम सुरू केले. इथे तिला अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाली. तिला शिवीगाळ केली गेली, तिच्यावर शारिरीक अ*त्याचार करण्यात आले. इतकी भीषण परिस्थिती असून देखील आंतरराष्ट्रीय समुदायाने त्या लोकांना कुठलीच मदत केली नव्हती.



आयसिसच्या लोकांनी २०१४ साली नादियाला कैद केले. तब्बल ३ महिने सतत अ*त्याचार सहन केल्यावर कसाबसा आपला जीव वाचवत नादिया मोसुल शहरातील मुस्लिम कुटुंबीयांकडे मदतीसाठी भीक मागत होती. एका कुटुंबाने तिला मदत केली व सुरक्षितपणे कुर्दीस्तान या स्वायत्त भागात आणून सोडले. तिथे ती निर्वासितांच्या शिबिरात राहू लागली. काही काळाने जर्मन सैन्यदलाच्या मदतीने नादियाला जर्मनीत पाठवण्यात आले.

जर्मनीत आल्यावर नादियाने आयसिसविरोधात एक मोठा कार्यक्रम हाती घेतला. आयसिसच्या जाचाला बळी पडलेल्या हजारो बायका व मुलांच्या मानव अधिकारांसाठी नादियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागितली.

याच काळात त्यांनी इस्लामिक स्टेटच्या (आयसिस) छळ छावणीत आलेल्या वाईट अनुभवावर नादियाने ‘द लास्ट गर्ल : माय स्टोरी ऑफ कॅप्टिविटी एंड माय फाइट अगेंस्ट द इस्लामिक स्टेट’ हे पुस्तक लिहिले ज्यात तिने तिचा झालेला छळ जगासमोर आणला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

नोबेल पुरस्कार मिळाला त्यावेळी नादियाने आंतरराष्ट्रीय समुदाय तिच्यासारख्या हजारो मुलींना जिहाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही, अशी तक्रार केली होती. ती म्हणाली की त्यांच्या आयुष्याचे मूल्य हे तेल आणि खनिजांच्या किंमतीपेक्षा कमी आहे म्हणून आंतरराष्ट्रीय समुदाय आणि इतर बलशाली राष्ट्रे त्यांच्या मदतीसाठी काही करत नाहीत.

आज नादिया आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्वासित व आयसिसच्या छावणीत आपलं आयुष्य जगणाऱ्या महिलांसाठी व मुलांसाठी एक अभियान चालवत आहे. तिची जगाकडून एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे तिच्या वाट्याला आलेले भोग पुन्हा कोणाच्या वाट्याला नको यायला!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

गिटार हे ग्रीकांनी आपल्याला दिलेलं अजून एक अनमोल गिफ्ट आहे

Next Post

डेथ व्हिसल म्हणून फेमस झालेली ॲझटेक व्हिसल काय आहे हे संशोधकांना अजून कोडंच आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

डेथ व्हिसल म्हणून फेमस झालेली ॲझटेक व्हिसल काय आहे हे संशोधकांना अजून कोडंच आहे

ही महिला जगातली पहिली साहित्यिक मानली जाते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.