The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलांना लहान वयातच कोडिंग शिकवणं खरंच आवश्यक आहे का..?

by द पोस्टमन टीम
3 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आजचं जग हे सगळं दिखाव्याचं जग आहे आणि या दिखाव्याच्या जगाचं एकच तत्व आहे “जो दिखता है वो बिकता है”. या दिखाव्याच्या जगात स्पर्धा पण खूप असते. आता कोणत्याही कंपनीचं उत्पादन, मग भले ती वस्तू असो किंवा सेवा असो, त्याचा जास्तीत जास्त खप व्हावा या करता कंपनी त्यांच्या उत्पादनाचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करते.

वर्षभरापूर्वी व्हाईट हॅट ज्युनियर (White Hat Junior) या ऑनलाइन कोडींग प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीवर भरपूर मिम्स आणि जोक्स तयार केले गेले. तर आज आपण कसं व्हाईट हॅट ज्युनियर (White Hat Junior) या कंपनीने ब्रँडिंग आणि मार्केटिंग करून लोकांच्या मानसिकतेवर परिणाम केला हे समजून घेऊ.

एक दशकापूर्वी सगळ्या कोचिंग कलासेसच्या जाहिरातींमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग हेच कसे चांगल्या करिअरचे पर्याय आहेत हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेला. मेडिकल आणि इंजिनिअरिंगची जागा कालांतराने UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांनी घेतली आणि आता ती जागा कोडिंग आणि प्रोग्रामिंग लँग्वेजेसने घेतली आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कोडिंग म्हणजे नक्की काय ते कसं केलं जातं?



तर, कोडिंग म्हणजे संगणकाला हवे तसे वागवण्यासाठी वापरली जाणारी संगणकीय भाषा. कोडची प्रत्येक ओळ संगणकासाठी निर्देशांचा एक संच आहे. कोडचा वापर करून प्रोग्रॅम तयार केले जातात आणि याच प्रक्रियेला कोडिंग (Coding) असं म्हणतात.

जेव्हा एखादा माणूस सॉफ्टवेअर ओपन करतो तेव्हा त्या माणसाला सॉफ्टवेअरचा इंटरफेस दिसतो, पण coding ही सॉफ्टवेअरच्या मागे केलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया फक्त सॉफ्टवेअर बनवणारी व्यक्ती किंवा कंपनी पाहू शकते. वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस म्हणजे संगणकाशी संवाद साधण्याचं एक साधन. या भाषांमध्ये आपण संगणकाला वेगवेगळे निर्देश देऊ शकतो. यालाच coding म्हणतात. Coding संगणकाच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये केली जाते. Computer languages ची उदाहरण द्यायची झाली तर C, Java, HTML इत्यादी.

आता व्हाईट हॅट ज्युनियर कंपनीबद्दल माहिती घेऊ. व्हाईट हॅट ज्युनियर कंपनीची स्थापना २०१८ साली झाली. व्हाईट हॅट ज्युनियर तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मदतीने ऑनलाईन क्लासेसद्वारा सहा ते चौदा वयोगटातील मुलांना Coding चे प्रशिक्षण देते. ही कंपनी ६ ते १४ वयोगटातील मुलांना गेम, ॲनिमेशन, ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी प्रोत्साहित करते. त्यांच्या अभ्यासक्रमात Data Structure, Machine Learning, App Development इत्यादी गोष्टींबद्दल प्रशिक्षण देते. White Hat Junior प्रशिक्षण संस्था Beginner, Intermediate, Advanced, आणि Professional या चार कोर्सेस अंतर्गत Coding चे प्रशिक्षण देते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

कोरोनाच्या काळात भारत सरकारने त्यांचे नवीन शिक्षण धोरण जाहीर केले. या नवीन शिक्षण धोरणाचा उद्देश हा शिक्षण व्यवस्था अधिक लवचीक बनवणे हा आहे. नवीन शिक्षण धोरणात शिक्षण व्यवस्था बहूवैविध्य, बहूभाषिक, करण्याकडे भर देण्यात येणार आहे. या नवीन धोरणा अंतर्गत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असं असणार आहे.

या धोरणा अंतर्गत एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. नवीन शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेत शिक्षण घेता येणार आहे. ज्यांना संशोधन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना चार वर्षांचा अभ्यासक्रम असेल तर ज्यांना नोकरी व्यवसाय करायचा आहे त्यांना तीन वर्षांचा अभ्यासक्रम असेल.

आता तुम्ही विचाराल की Coding आणि नवीन शिक्षण धोरण यांचा एकमेकांशी काय संबंध? Robotics आणि Artificial intelligenceच्या या आधुनिक जगात Coding Language ही नवीन बोलली जाणारी भाषा असेल. नवीन शिक्षण धोरणामध्ये घोषित केलेल्या प्रमुख सुधारणांपैकी एक म्हणजे इयत्ता सहावी पासून विद्यार्थ्यांसाठी Codingचे वर्ग सुरू करणे देखील समाविष्ट आहे.

लहान वयातच कोडिंगचा परिचय करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि तंत्रज्ञानाचा संपर्क वाढेल. कोडिंगमुळे विद्यार्थ्यांना स्वतःचे ध्येय निश्चित करण्याची आणि करीअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. कोडिंगमार्फत विद्यार्थ्यांची प्रगत तंत्रज्ञानाशी ओळख होईल आणि येणाऱ्या भविष्यासाठी त्यांना तयार करता येता येईल. कोडिंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न करण्याची, निरीक्षण करण्याची, त्याचं विश्लेषण करण्याची क्षमता तयार होण्यास मदत होईल.

नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे इयत्ता सहावी पासून विद्यार्थ्यांना कोडिंगचं प्रशिक्षण देण्यात यावं असं सूचित केले आहे आणि White Hat Junior कंपनीने तीन ते चौदा वयोगटातील मुलांना कोडिंगचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे.

आता या दोन मुद्द्यांवरुन काही प्रश्न उपस्थित होतात, तीन ते चौदा वयोगटातील मुलांना कोडिंगचं प्रशिक्षण देणं योग्य आहे की अयोग्य? नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे इयत्ता सहावी पासून विद्यार्थ्यांना कोडिंगचं प्रशिक्षण हे बंधनकारक असणार आहे की नसणार आहे?

मुळात भारत सरकारने विद्यार्थ्यांना कोडिंगचं प्रशिक्षण देण्याआधी ग्रामीण भागातील सर्व शाळांमध्ये लॅपटॉप/कॉम्प्युटर, इंटरनेट कनेक्शन, कोडिंग इन्स्ट्रक्टर या मूलभूत गोष्टी आधी त्या शाळांमध्ये आहेत का नाही हे तपासले पाहिजे. व्हाईट हॅट ज्युनियर कंपनी तीन ते चौदा वयोगटातील मुलांना कोडिंगचं प्रशिक्षण देते आहे पण त्या प्रशिक्षणाचे शुल्क हे भारतातील सर्व पालकांना परवडणारे नाहीत.

आता आपण तीन ते चौदा या वयोगटातील विद्यार्थ्यांनी कोडिंग शिकवण्याचे फायदे तोटे काय आहेत ते जाणून घेऊ.

कोडिंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याचे कौशल्य तयार होते. कोडिंगमुळे विद्यार्थ्यांची अनुक्रमिक आणि विश्लेषणात्मक विचारसरणी वाढण्यास मदत होते, विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य सुधारण्यास मदत होते, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली संगणक कौशल्ये आत्मसात होतात.

पण, तंत्रज्ञान ही अशी गोष्ट आहे जी झपाट्याने बदलते त्यामुळे आज घेतलेलं कोडिंगचं प्रशिक्षण हे उद्या कालबाह्य होणार आहे. लहानपणी मुलांनी मूलभूत मानवी कौशल्ये शिकणे आणि स्वतःच्या आनंदावर लक्ष केंद्रित करणे जास्त गरजेचे आहे. सध्या कोडिंग सॉफ्टवेअर्समुळे सर्व तांत्रिक काम सोपे झाले आहे आणि त्यामुळे कोडर्सची गरज भासत नाही. लहान वयात मुलांनी संगणकासमोर जास्त वेळ घालवणे हे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही.

लहान मुलांचे व्यक्तिमत्त्व हे एखाद्या मातीच्या गोळ्यासारखे असते. आपण पालक जसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देऊ तसा आकार त्या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला प्राप्त होतो. भविष्याची चिंता ही जगातील प्रत्येक माणसाला असते पण पालक म्हणून आपण भविष्याची चिंता या नावाखाली त्या लहान मुलांचे बालपण त्यांचे लहानपण त्यांच्यापासून हिरावून घेणे हे बरोबर नव्हे. हे तर सत्य आहे की या जगात सगळीकडे स्पर्धा चालू आहे, पण या स्पर्धेत आपण आपल्या मुलांना श्रेष्ठ बनवायचं की उत्तम बनवायचा प्रयत्न करायचा हा सर्वस्वी निर्णय त्या मुलांच्या पालकांचा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी कलम ३७० रद्द केल्यामुळे भारताचा निषेध केला होता

Next Post

१९७२ साली आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराची ब्रिटनने २०१० साली माफी मागितली आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

१९७२ साली आंदोलकांवर केलेल्या गोळीबाराची ब्रिटनने २०१० साली माफी मागितली आहे

भारताला दोन टाइम झोन्सची (प्रमाणवेळांची) का गरज आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.