The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करून त्याने जगभरातील अंध लोकांचं आयुष्य बदलून टाकलं !

by द पोस्टमन टीम
5 April 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


वीरतेचे खरे लक्षण काय असते? आपण कमजोर आहोत ही भावना बाळगणे वीरतेचे लक्षण नाही. आपण कमजोर असलो तरी आपण अशक्य ही शक्य करून दाखवू शकतो, अशी आत्मविश्वासाची भावना असणे, हे वीरतेचे खरे लक्षण आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांपुढे खचून न जाता, त्या अडथळ्यांमधून यशाचा पथावर मार्गक्रमण करणाऱ्या व्यक्तीसमोर सारे विश्व नतमस्तक होते.

लुई ब्रेल नावाचा एक असाच अफाट अवलिया माणूस होऊन गेला, ज्याने आपल्या अंधत्वाला कधीच आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडसर बनू दिले नाही. कमी वयातच त्याने स्वतः ही सृष्टी पाहण्याची क्षमता गमावली होती तरी त्याने त्याच्यासारख्या असंख्य अंध लोकांना एक नवीन दृष्टी प्रदान केली होती.

लुई ब्रेलचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी झाला. फ्रान्सच्या एका छोट्याशा खेड्यात त्याचे बालपण गेले. त्याचे वडील सायमन रेले ब्रेल हे काठी बनवण्याचे काम करत. ब्रेलला चार भावंडे होती, ते सर्वात लहान होते. ३ वर्षांचे असताना लुई ब्रेलच्या डोळ्याला एका अपघातात इजा झाली. या इजेमुळे त्याच्या एका डोळ्यात इन्फेक्शन होऊन तो डोळा निकामी झाला. पुढे त्याच्या दुसऱ्या डोळ्यावर देखील याचा परिणाम होऊन तो देखील निकामी झाला आणि त्याला बालपणीच अंधत्व आले.

लुई लहानपणापासून जिज्ञासू आणि चाणाक्ष असल्याने त्याच्या वडिलांनी त्याला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. ‘सायमन इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड युथ’ या संस्थेत दाखल करण्यात आले. याठिकाणी लुईने गणित आणि भौतिकशास्त्राचे शिक्षण घेतले.



शिक्षण घेत असताना लुईची चार्ल्स बॅबियर या फ्रेंच सैनिकाशी गाठ पडली. चार्ल्सने ब्रेलला सैनिकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मुन टाईप’ या लिपीची माहिती दिली. ही सांकेतिक भाषा विशिष्ट कोडच्या रचनेतून तयार करण्यात आली होती.

तिला १२ विशिष्ट ध्वनीच्या आधारावर साचेबद्ध करण्यात आले होते. ही लिपी इतकी प्रभावी होती की अंधारात देखील संदेश वहन करता येणे शक्य होते. लुईला ही सांकेतिक लिपी फारच आवडली. त्याने याच्याच धर्तीवर वयाच्या १६व्या वर्षी अंध लोकांसाठी एका विशिष्ट लिपीची रचना केली. ही लिपी भविष्यात कोट्यवधी अंधजनांसाठी वरदान ठरली.

लुईने बॅबियरच्या लिपीमधील जटिलता दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला एक सहज आणि सोपे स्वरूप दिले. बॅबियरच्या लिपीमध्ये १२ बिंदूंच्या ६ पंक्ती होत्या आणि यामध्ये विरामचिन्हे, संख्या आणि गणितीय आकड्यांचा समावेश नव्हता. लुईने फक्त ६ बिंदूंच्या आधारावर आपली नवीन लिपी तयार केली. या लिपीमध्ये ६४ अक्षरं आणि चिन्ह वापरण्यात आले. या लिपीमध्ये सांकेतिक नोटेशन्स आणि विरामचिन्हे वापरण्यात आली.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

लुई ब्रेल याने या लिपीचा शोध लावला म्हणून या लिपीला ‘ब्रेल लिपी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. १८२९ मध्ये ब्रेल लिपीचा शोध लावला होता व त्याच वर्षी ती प्रकाशित करण्यात आली.

आज या ब्रेल लिपीमुळे अनेक अंध लोक लिहू, वाचू शकत आहेत. आज अनेक अंध व्यक्तींना या लिपिमुळे स्वतःचा पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे. अनेक अंध लोक आत्मविश्वासाच्या बळावर जगाला खांदा लावून मार्गक्रमण करत आहेत. आज या लिपीमुळे सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात देखील अंध व्यक्ती मोठे यश मिळवता येणे शक्य झाले आहे.

आजच्या तंत्रज्ञान युगात देखील मोठ्या प्रमाणात ब्रेल लिपीचा वापर करण्यात येतो. या लिपीच्या आधारावर अनेक गॅजेट्स तयार करण्यात आले आहेत.

टचस्क्रीन वॉच, सेलफोन, इत्यादी असंख्य उपकरणात या ब्रेल लिपीचा वापर करण्यात आला आहे. दृष्टिबाधित लोकांना मुख्य धारेत आणण्यासाठी हल्ली मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करण्यात येत आहे.

लुई ब्रेलचे संशोधन फक्त विशिष्ट देशातील लोकांपुरता मर्यादित राहिले नाही. विश्वातील सर्वच अंध व्यक्तीचे कल्याण ब्रेल लिपीमुळे झाले. ४ जानेवारी २००९ रोजी भारत सरकारने लुई ब्रेलच्या सन्मानार्थ नवीन टपाल तिकिटाचे अनावरण केले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांवर ब्रेल लिपीत मजकूर प्रिंट केला असून अंध व्यक्तींना नोटेची पारख होण्यास यामुळे मदत होते.

ब्रेल लिपीचा शोध ही मानवी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि परिवर्तकारी घटना आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एकाचवेळी हा माणूस अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनचा गुप्तहेर म्हणून काम करत होता

Next Post

एवढे आधुनिकीकरण झाले तरीही अजून कच्च्या तेलाचे सर्व व्यवहार ‘बॅरेल’मधेच होतात

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

एवढे आधुनिकीकरण झाले तरीही अजून कच्च्या तेलाचे सर्व व्यवहार 'बॅरेल'मधेच होतात

मार्व्हलचा थॉर या लढवय्या जमातीचा देव आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.