The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या श्रीरामपूरचा झहीर खान अख्ख्या देशाचा फेव्हरेट बॉलर बनला होता

by द पोस्टमन टीम
7 October 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


क्रिकेट म्हटले की काही खेळाडूंची हमखास आठवण ही होतेच. भारतीय गोलंदाजांची जेव्हा केव्हा चर्चा केली जाईल तेव्हा झहीर खान हे नाव त्या यादीत हमखास सामील असेल. झहीर खानने क्रिकेट विश्वातून खूप लवकर निवृत्ती घेतली असली तरी त्याने या कमी कालावधीतही क्रिकेट रसिकांच्या मनावर आपला ठसा उमटवला आहे.

झहीर खानने खूप मेहनतीने आपले क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. महाराष्ट्रातील मध्यमावर्गीय मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या झहीरचा हा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरेल हे मात्र नक्की.

झहीरला क्रिकेटर तर व्हायचे होते पण क्रिकेटचे महागडे कोचिंग त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यात त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने इंजिनियर बनावे. पण, झहीरने तर क्रीकेटर बनण्याचा पक्का निर्धार केला होता.

यात त्याची परिस्थिती आड येत होती पण, त्यावरही त्याने मात केली. वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याने आपल्यासाठी क्रिकेटचे क्षेत्र निवडले असले तरी त्यात अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली.

झहीर खानचा जन्म ७ ऑक्टोबर १९७८ रोजी झाला. त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्याचे वडील फोटोग्राफर होते. तुटपुंज्या कमाईत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवणे झेपत नसल्याने त्याच्या वडिलांनी झहीरला त्याच्या काकीच्या घरी पाठवले. झहीरची काकी सैफी हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिचीही आर्थिक परिस्थिती काही फार चांगली होती अशातला भाग नाही. पण, तरीही झहीरचे पालनपोषण तिने जमेल तसे केले.



झहीर राहायला जरी त्याच्या काकीकडे असला तरी त्याच्या वडिलांचे त्याच्याकडे लक्ष होते. त्यांनीही झहीरला कशाची कमतरता भासणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. झहीरचे प्राथमिक शिक्षण श्रीरामपूरमधील ‘न्यू मराठी प्राथमिक विद्यालय’ येथे झाले.

झहीरच्या वडिलांना वाटायचे की आपला मुलगा इंजिनियर व्हावा पण, झहीरच्या डोक्यात मात्र चोवीस तास क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेटच होते. क्रिकेटशिवाय त्याला दुसरे काहीही सुचायचे नाही. क्रिकेटचे त्याला इतके वेड होते की, कधीकधी त्याला नाष्टा करण्याचीही आठवण राहत नसे. क्रिकेटचे त्याचे हे वेड दिवसेंदिवस आणखी वाढतच गेले.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

अशातच १९९६च्या दरम्यान कोच सुधीर नाईक यांची नजर झहीरवर पडली. सुधीर नाईक यांनी झहीरला क्रिकेटचे शास्त्रीय प्रशिक्षण देण्याचे ठरवले.

इकडे त्याचे वडील झहीरला इंजिनियरिंगसाठी मुंबईच्या बाहेर कुठेतरी पाठवण्याचा विचार करत होते. परंतु सुधीर नाईक यांनी झहीरच्या वडिलांना समजावून सांगितले. झहीरने जर हा काळ क्रिकेट सोडून इतरत्र घालवला तर त्याचे क्रिकेटमधील करिअर होणार नाही. हा त्याच्या आयुष्यातील महत्वाचा काळ आहे, याकाळात त्याने कसून सराव केला पाहिजे.

सुधीर नाईक यांच्या सांगण्यामुळे झहीरच्या वडिलांनी आपले विचार बदलले आणि त्यांनी झहीरला क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली. पण, पुढे जाऊन याचा त्यांना निश्चितच अभिमान वाटला असेल. इंजिनियरिंग करून फार फार तर झहीरने आपल्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवले असते. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असती. पण, क्रिकेटर बनून तर त्याने स्वतःचे, घरच्यांचे आणि देशाचेही नाव उंचावले.

क्रिकेटच्या प्रशिक्षणाचा आणि इतर खर्चही सुरळीतपणे व्हावा म्हणून त्यांनी झहीरला एका खासगी कंपनीत नोकरीसही लावले. इथे झहीर महिना ५००० रुपये पगारावर नोकरी करत होता आणि उरलेल्या वेळात क्रिकेटचा सराव करत होता.

नोकरीमुळे झहीरच्या खर्चाचा भार तरी त्याच्या वडिलांच्या डोक्यावरून उतरला. त्यामुळे त्याच्या क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी त्याच्या वडिलांना फारशी चिंता करावी लागली नाही. शेवटी झहीरच्या कष्टांचे एक दिवस चीज झालेच.

२००० साली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने झहीरला भारतीय क्रिकेट संघात स्थान दिले. फक्त स्थानच नाही तर पहिल्या अकरा खेळाडूत त्याचा समावेश करून त्याला मैदानावर आपला खेळ सिद्ध करून दाखवण्याची संधीही दिली.

सौरवच्या या विश्वासाला झहीरनेही तडा जाऊ दिला नाही. त्याने पहिल्याच सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. ३ ऑक्टोबर २००० रोजी केनिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात झहीरने ३ विकेट घेतले. पुढे पुढे तर झहीरने अविश्वसनीय कामगिरी केली.

याच मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने एडम गिलख्रिस्ट आणि स्टीव्ह वॉ या जागतिक फलंदाजांची विकेट घेतली. झहीरच्या या नवख्या खेळाडूने कसलेल्या फलंदाजांना तंबूत पाठवणे म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नव्हे. इथेच झहीरने क्रिकेट रसिकांचेही मन जिंकले. झहीरच्या करिअरची सुरुवातच अशी एकदम जोशात झाली होती.

१० नोव्हेंबर २००० रोजी झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात झहीरची निवड केली गेली.

झहीरच्या खेळातील चमक वाढतच होती. २००३च्या विश्व कप स्पर्धेतही त्याने स्थान मिळवले. विश्व कपची ही मालिका तर झहीरसाठी खूपच खास होती. या स्पर्धेत भारतीय संघ फायनलपर्यंत पोहोचला होता. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, हा तो काळ. त्या काळात झहीरने आपले योगदान देऊन भारतीय संघाला एक मजबूत संघ बनवले. या स्पर्धेत झहीरने १८ विकेट घेतल्या. झहीरच्या कारकिर्दीचा आलेख उंचावतच होता.

प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत कधी ना कधी उतार-चढाव हा येतोच. तसाही तो झहीरच्या वाट्यालाही आला. त्याच्या खेळातील लय हरवत होती. खेळताना झालेल्या दुखापतींमुळे तो आरोग्याच्या समस्येनेही त्रस्त झाला होता. यामुळेच कदाचित त्याच्या खेळावरही परिणाम दिसत होता. पदार्पणातच दमदार सुरुवात करणारा झहीर कारकीर्दीच्या मध्यावर मात्र काहीसा झाकोळून गेला होता.

त्याचा खेळ इतका कमकुवत झाला होता की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून झहीरच्या निवृत्तीच्या चर्चांना त्याकाळी उत आला होता. बीसीसीआयने देखील त्याची ग्रेड ‘ए’वरून ‘सी’ केली होती.

पण याकाळातही झहीरने मैदानावरील सराव आणि क्रिकेटवरील प्रेम कमी केले नाही. त्याच्या परीने तो स्वतःमधे बदल करण्यासाठी झटत होताच.

२००६ साली त्याला पुन्हा एकदा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यासाठी निवडले गेले. त्याच्या या पुनरागमनात पुन्हा एकदा चमक जाणवली. त्याने पुन्हा एकदा स्विंग बॉलिंगची कमाल दाखवायला सुरुवात केली होती. त्याचा हा दमदार खेळ पाहून त्याला २००७ आणि २०११च्या विश्वकप स्पर्धेसाठी निवडण्यात आले. २०११ मध्ये भारतीय संघाने विश्वकप जिंकला होता. या विजयात झहीरचीही भागीदारी होतीच.

पुन्हा एकदा शारीरिक दुखापतीमुळे तो पुन्हा एकदा संघातून बाहेर निघाला. यानंतर दोन अडीच वर्षे त्याला संघात पुन्हा स्थान मिळाले नाही. क्रिकेटमधील त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.

आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये त्याने एकूण ९२ सामने खळले असून त्याच्या नावावर १२३१ धावा तर ३११ जमा विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय एकदिवसीयमधे त्याने २०० सामने खेळले आहेत. यात ७९२ धावा आणि २८२ विकेट्स त्याने कमावल्या आहेत. एकदिवसीयमधे ५/४२ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

२०१४ साली त्याने न्यूझीलंड विरुद्धचा कसोटी सामना खेळला जो त्याचा शेवटचा कसोटी सामना होता. एकदिवसीय सामना तर त्याच्याही आधी २०१२ साली श्रीलंकेविरोधात खेळला होता. यानंतर पुन्हा एकदा त्याला संघातून बाहेर पडावे लागले. यानंतर मात्र तो पुन्हा खेळताना दिसला नाही. २०१५ साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. यांनतर तो आयपीएल मधून खेळताना दिसला. २०१७ साली दिल्ली डेअरडेविल्ससंघाचे नेतृत्वही केले.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर २०१७ साली सागरिका घाटगे या बॉलीवूड अभिनेत्रीसोबत तो विवाहबद्ध झाला. सागरिका आणि झहीरच्या या अंतरधर्मीय विवाहाची खूप चर्चा झाली. पण दोघांचाही संसार सुखाने सुरु आहे.

झहीरचे क्रिकेटप्रेम मात्र वाखाणण्याजोगे आहे, यात काहीच वाद नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुस्तकाची सुरुवात कशी झाली माहितीये का..?

Next Post

हरभजन सिंह – भारतीय संघाचा टर्बिनेटर

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

हरभजन सिंह - भारतीय संघाचा टर्बिनेटर

चिडक्या आणि रडक्या ऑस्ट्रेलियन संघात ग्लेन मॅकग्रा कायमच वेगळा वाटायचा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.