The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक्सप्लेनेर : आज नौदलाकडे हस्तांतरित झालेलं ‘INS विशाखापट्टणम’ एवढं विशेष का आहे..?

by Heramb
21 November 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आज २१ नोव्हेंबर २०२१ रोजी आयएनएस विशाखापट्टणमचं रक्षा मंत्र्यांच्या उपस्थितीत नौदलाला अधिकृतरीत्या हस्तांतर होणार आहे. त्याबद्दल आजचा हा विशेष लेख..

  • नौदल आधुनिकीकरणाची गरज:

बिजनेस आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील बहुतेक सिद्धांत हे रणभूमीवरून आलेले असतात. मॅनेजमेंट क्षेत्रातील एक महत्वाचा आणि प्रसिद्ध सिद्धांत म्हणजे ‘स्वॉट (एसडब्लूओटी) अनॅलिसिस’ म्हणजेच स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स यांचं अनॅलिसिस. शत्रूचे किंवा प्रतिस्पर्ध्याचे आणि आपल्या ताकद, दुर्बलता, संधी आणि धोका कशात आहे यांचं विश्लेषणात्मक निरीक्षण करणे म्हणजेच स्वॉट अनॅलिसिस करणे. इंग्रजीतील ‘डेड मॅन मेक्स नो मिस्टेक्स’ या म्हणीनुसार माणूस म्हटलं की त्याच्या हातून चुका घडणार, मग तो कितीही हुशार असुद्या. पण त्या चुका पुन्हा पुन्हा केल्यावर माणसाच्या प्रगतीला आळा बसतो.

‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’नेसुद्धा अस्तित्वात येण्यापूर्वी एक चूक केली, किंबहुना ती फार मोठी चूक होती. माओ झेदॉंगच्या नेतृत्वाखाली पीआरसी विकासाचा प्राधान्यक्रम ठरवत होता. पण हा प्राधान्यक्रम ठरवताना तत्कालीन चीन सरकारकडून एक मोठी चूक झाली.

चीनने ठरवलेल्या प्राधान्यक्रमानुसार, १. तंत्रज्ञान शिक्षण, २. कृषिविकास, ३. औद्योगिकीकरण आणि उत्पादन-क्षमतेत वाढ, ४. सैन्य या चार क्षेत्रांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येणार होते. सैन्याचा प्राधान्यक्रम चौथा होता. तर सैन्य क्षेत्रात १. पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात चीनचे भूदल, २. पीपल्स लिबरेशन एअर फोर्स अर्थात चीनचे हवाई दल आणि ३. पीपल्स लिबरेशन नेव्ही अर्थात चीनचे आरमार असा प्राधान्यक्रम देण्यात आला होता.



हीच ती चीनची सर्वांत मोठी चूक. जर चीनने हा प्राधान्यक्रम उलटून पहिले प्राधान्य पीपल्स लिबरेशन नेव्ही अर्थात चीनच्या आरमाराला दिले असते आणि त्यानंतर चीनचे हवाई दल किंवा भूदलाचा विचार केला असता तर कदाचित आज चीनकडे अमेरिकेइतक्याच विमानवाहू युद्धनौका, युद्धनौका आणि पाणबुड्या असत्या.

  • ‘क्वाड’ची वाढती ताकद:

भारतीय नौदल, ऑस्ट्रेलियन नौदल, न्यूझीलंड नौदल, जपानी नौदल, ब्रिटन नौदल, अमेरिकी नौदल या इंडो-पॅसिफिक भागातील सहा मोठ्या नौदलांचा सामना चीन पुढच्या सुमारे २० ते २५ वर्षे प्रभावीपणे करू शकत नाही. तसेच चीनला ‘साऊथ चायना सी’, ‘इस्ट चायना सी’, ‘स्ट्रेट ऑफ मलाका’ आणि ‘इंडो-पॅसिफिक महासागरांचा भाग’ यांना सुरक्षा देऊन आपला व्यापार आणि इंधनाची वाहतूक सुलभ करणे शक्य झाले असते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पण तसे न होता ‘साऊथ चायना सी’, ‘इस्ट चायना सी’, ‘स्ट्रेट ऑफ मलाका’ आणि ‘इंडो-पॅसिफिक महासागरांचा भाग’ यांच्यावर प्रभुत्व राहतं ते प्रामुख्याने भारतीय, जपानी, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन इंडो-पॅसिफिक कमांडच्या नौदलांचं. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांनी एकत्र येऊन क्वाड (क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग) करारावर सहमती दर्शवली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते चीनबरोबर शत्रुत्व असलेल्या लहान दक्षिण आशियाई देशांच्या नौदलांनासुद्धा क्वाडमध्ये जागा द्यायला हवी, जेणेकरून भारताच्या नेतृत्वाखालील ‘क्वाड’ हे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अजिंक्य होईल.

क्वाडमुळे चीनला समुद्रमार्गाने इंधन आणि इतर व्यवसायिक मालाची वाहतूक सहजासहजी करता येत नाही. म्हणूनच चीनने ‘वन बेल्ट वन रोड’ आणि ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ हे प्रकल्प हाती घेतले आहेत. पण या प्रकल्पांना भारताने विरोध दर्शवला आहे. तसेच हे प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी अनेक वर्षांचा कालावधी लागेल. 

म्हणूनच भारतासाठी बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार बेटे आणि हिंद महासागर हे सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे बनले आहेत. भारतीय नौदलाकडे सागरी सीमांचं रक्षण करण्यासाठी सर्वसंपन्न आणि आधुनिक यंत्रसामुग्री, जहाजे आणि शस्त्रास्त्र आहेत. भारतीय नौदलाच्या या प्रभावी भात्यामध्ये आज आणखी एका विनाशकारी आणि प्रभावी शस्त्राचा समावेश होत आहे, त्या शस्त्राचं नाव भारतीय नौदल पोत (आयएनएस) विशाखापट्टणम.

  • इंडियन नेव्ही शिप विशाखापट्टणम:

आयएनएस विशाखापट्टणम ही विशाखापट्टणम-श्रेणीच्या ‘स्टेल्थ गाईडेड-मिसाईल डिस्ट्रॉयर’ क्लासची प्रमुख युद्धनौका आहे. ‘स्टेल्थ गाईडेड-मिसाईल डिस्ट्रॉयर’ यातील ‘स्टेल्थ’ म्हणजे शत्रूच्या रडारवर सहजासहजी न दिसणारी युद्धनौका आणि ‘गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर’ म्हणजे, एकदा लॉक केलेल्या टार्गेटवर मिसाईल फायर केली तर ते टार्गेट निश्चितपणे नष्ट होणार असे तंत्रज्ञान असलेले ‘डिस्ट्रॉयर’ जहाज.

१२ ऑक्टोबर २०१३ रोजी आयएनएस विशाखापट्टणमची पायाभरणी करण्यात आली. २० एप्रिल २०१५ रोजी मुंबईच्या माझगाव डॉक्स लिमिटेड येथे विशाखापट्टणम लॉन्च करण्यात आली.  २०२० च्या नौदल दिनी विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयरच्या प्रमुख जहाजाची चाचणी सुरू झाली आहे, अशी घोषणा नौदल प्रमुखांनी केली. विशाखापट्टणम श्रेणीतील लढाऊ जहाजांचे हे पहिले आणि आघाडीचे जहाज, २८ ऑक्टोबर २०२१ रोजी नौदलाला प्राप्त झाले. आज २१ नोव्हेंबर २०२१ रोजी अधिकृतरीत्या ते नौदलात सामील होणार आहे.

विशाखापट्टणम श्रेणीच्या एकूण चार अत्याधुनिक युद्धनौकांचं बांधकाम सध्या मुंबईतील माझगाव डॉक्स येथे सुरु आहे. यामध्ये विशाखापट्टणम, मुरमगाव, इंफाळ आणि पोरबंदर यांचा समावेश होतो. भारतीय नौदलाच्या प्रथेनुसार, प्रत्येक युद्धनौकेची पूजा आणि हस्तांतर स्त्रीच्या हस्ते होतं तसेच नौकेला ‘स्त्री’ म्हणूनच संबोधलं जातं. 

याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही आजवरची भारताची सर्वांत आधुनिक युद्धनौका आहे. पी-१५अ कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरमध्ये मॉडिफिकेशन्स करून आयएनएस विशाखापट्टणमचं डिझाईन तयार करण्यात आलं. या जहाजाच्या ‘ऑटोमेशन’ आधारित आधुनिकीकरणावर भर दिल्यामुळे ‘आयएनएस कोलकाता’ या युद्धनौकेपेक्षा आयएनएस विशाखापट्टणमवर अतिशय कमी कर्मचाऱ्यांची गरज लागते.

  • आयएनएस विशाखापट्टणम डिस्ट्रॉयरचे शस्त्रास्त्र आणि तंत्रज्ञान:

जहाजाचे स्टीरींग आणि स्टेबलायझर सिस्टम ‘एल अँड टी इंडिया लिमिटेड’ तर हायड्रोलिक्स ‘पॉलिहायड्रॉन सिस्टीम इंडिया लिमिटेड’ने तयार केले आहेत. या युद्धनौकेवर अत्याधुनिक ‘एम एफ स्टार’ हे इस्रायली रडार आहे, हे रडार ४०० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचं सहजपणे वेध घेऊ शकतं. तसेच आयएनएस विशाखापट्टणम भारत आणि इस्रायलचा संयुक्त सुरक्षा प्रकल्प असलेली ‘बराक-८ मिसाईल सिस्टीम’ने सुसज्ज आहे. ‘बराक-८’ ची प्रभावी रेंज १०० किलोमीटर असून, ते आकाशातील शत्रूची विमाने आणि मिसाईल्ससुद्धा नष्ट करू शकते. या नौकेवर अशा एकूण ३२ मिसाईल्स आहेत.

बराक-८ च्या बरोबरीने अत्याधुनिक ‘ब्राम्होस मिसाईल सिस्टीम’सुद्धा या जहाजाची शोभा वाढवते. या मिसाईल्स प्रामुख्याने समुद्रातून जमिनीवर मारा करण्यासाठी किंवा शत्रूच्या युद्धनौका उध्वस्त करण्यासाठी वापरल्या जातात. याच्या रेंजमध्ये ४५० किलोमीटरची वृद्धी करण्यात आली असून ही मिसाईल ‘आवाजाच्या वेगापेक्षा तीन पट अधिक वेगाने’ मारा करू शकते. या नौकेवर अशा एकूण १६ मिसाईल्स आहेत. याशिवाय विशाखापट्टणम ‘रॉल-०८’ रडार सिस्टीम, हंस सोनार सिस्टीम, अजिंठा सिस्टीम, इत्यादींनी सुसज्ज आहे.

आयएनएस विशाखापट्टणमवरून एकावेळी दोन हेलिकॉप्टर्स ऑपरेट होऊ शकतात. तसेच या युद्धनौकेवर ‘ऑटोमेशनवर’ भर देण्यात आला असल्याने कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही नौका ऑपरेट होऊ शकते. याशिवाय आयएनएस विशाखापट्टणमवर अत्याधुनिक ‘कोंबॅटिंग मॅनेजमेंट सिस्टीम’ आणि विविध ‘इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टिम्स’सुद्धा आहेत.

भारताच्या सागरी सुरक्षेत आयएनएस विशाखापट्टणम नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या माणसाने स्थापन केलेली संघटना आज अडीचशे वर्षांनंतरही लोकांची झोप उडवतेय

Next Post

रॉबिन विलियम्सने अलादिनमधल्या जीनीच्या आवाजासाठी मानधन नाकारलं होतं..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

रॉबिन विलियम्सने अलादिनमधल्या जीनीच्या आवाजासाठी मानधन नाकारलं होतं..!

'शारजाह ड्रेसिंग रूम कांड' जेव्हा कपिल देवनं दाऊदला बाहेरचा रस्ता दाखवला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.