The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय वैमानिकांच्या सावधानतेमुळे भारत-पाक अणुयु*द्ध होता होता राहिलंय

by द पोस्टमन टीम
28 June 2025
in विश्लेषण, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारत-पाकिस्तान दोन्ही देश स्वतंत्र झाल्यापासून सातत्याने पाकिस्तानचे कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. अगदी स्वातंत्र्य मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी काश्मीरवर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमध्ये घुसखोरी केली. काश्मीरमधून पाक सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने काश्मीरला सहाय्य केले तेव्हापासून भारत-पाक संबंधात कायमची कटुता निर्माण झाली.

भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रातील वैमनस्य जगजाहीर असल्याने या दोन देशांतील संबंधाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले असते. दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज झाल्यापासून तर ही चिंता अधिकच भयावह बनली आहे. या दोन देशांत जर अणुयु*द्धाचा भडका उडाला तर याचे परिणाम सबंध जगाला भोगावे लागू शकतात. म्हणूनच दोन्ही देशा दरम्यानच्या समस्या शक्य तितक्या सामोपचाराने कशा सोडवता येतील यावरच सगळ्यांचा भर असतो. तुम्हाला माहिती नसेल पण, भारतीय वैमानिकांच्या सावधानतेमुळे भारत-पाक अणुयु*द्ध होता होता राहिले आहे. त्याक्षणी जर या वैमानिकांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर कदाचित भारत आणि पाकिस्तानसह संपूर्ण जगाला पुन्हा एकदा अणुयु*द्धाच्या भीषण झळा सोसाव्या लागल्या असत्या.

१९९८ साली दोन्ही देशांनी शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार दोन्ही देशाच्या सीमेवरील काही प्रदेश हा लष्कर विरहित ठेवण्यात येईल असे ठरले. दोन्ही देशादरम्यानचा सलोखा वाढण्यासाठी लाहोर ते दिल्ली अशी बस सेवाही सुरू करण्यात आली.

भारत सामोपचाराने पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न करत असताना तिकडे पाकिस्तान मात्र भारताविरुद्ध कट रचण्यात मश्गुल होता.

इकडे शांतता करारावरील स्वाक्षरीची शाई सुकलीही नसेल तोपर्यंत तिकडे १९९८च्याच डिसेंबरपासून पाकिस्तानने या लष्कर विरहित प्रदेशात घुसखोरी सुरू केली होती. कारगिलसारख्या समुद्र सपाटीपासून १६ ते १८ हजार फुट उंचावरील घुसखोरी लक्षात यायला भारतीय सैन्याला खूपच उशीर झाला. या प्रदेशात पाकिस्तानने चढाई केल्याचे भारतीय लष्कराच्या लक्षात येईपर्यंत १९९९ सालचा पावसाळा उजाडला. त्यानंतर मात्र दोन्ही देशात घमासान यु*द्ध सुरू झाले.



१९९८ मध्येच पाकिस्तानने अणू चाचणी केली होती आणि यात पाकिस्तानला यशही मिळाले होते. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ याने कारगिल यु*द्धावेळी भारताविरोधात अ*ण्वस्त्र वापरण्याची तयारीही केली होती, असे म्हटले जाते. कारगिलचे हे यु*द्ध सर्वाधिक उंचावर लढले गेले होते. भारताविरोधात यु*द्ध लढण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने १९९८ पासूनच तयारी सुरू केली होती. कारगिलवर कब्जा मिळवण्यासाठी पाकिस्तानने आपले ५ हजार सैनिक या परिसरात तैनात केले होते. पाकिस्तानी हवाई दलाला या यु*द्धाची सुरुवातीला कसलीच माहिती देण्यात आली नव्हती. अचानक जेव्हा पाकिस्तानी हवाई दलाकडे पाकिस्तानी सैन्य दलाने मदतीची मागणी केली तेव्हा पाकिस्तानी हवाई दलाने आपल्याच सैनिकांना मदत नाकारली होती.

समुद्रसपाटीपासून १६ हजार ते १८ हजार फुट उंचावरील कारगिलमध्ये विमानांचा वापर करायचा तर विमानांना जवळपास २० हजार फुट उंचावरून उडावे लागणार होते. इतक्या उंचीवर हवा अगदीच विरळ असते. अशा वातावरणात विमान उड्डाण करणे म्हणजे जोखमीचे काम, पण आपल्या हवाई दलाने अजिबात माघार घेतली नाही.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

८ मे पासून कारगिल यु*द्ध सुरु झाले आणि ११ मे पासून भारतीय हवाई दलाने या यु*द्धात सहभाग घेतला.

भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैनिकांनी कंबर कसली होती. जिथे सैन्याचे काही चालणार नाही अशा ठिकाणी हवाई ह*ल्ला करून पाकिस्तानी सैन्याला मात देण्याची योजना आखण्यात आली. यासाठी भारतीय लष्करातील मिग-२७ आणि मिग-२९ विमानांचा वापर करण्यात आला. भारतीय हवाई दलाने जर त्यावेळी ही अवघड कामगिरी पार पाडली नसती तर, भारताला कारगिल यु*द्धात पाकिस्तानला प्रत्युत्तर देणे अवघड होते. भारतीय वैमानिकांनी मिग-२७ ला या युद्धात बहाद्दूर असे नाव दिले. या ऐतिहासिक विजयात मिग-२७ चे नाव देखील स्वर्णाक्षरांत लिहिले जाईल.

हवाई ह*ल्ल्याव्यतिरिक्त या यु*द्धात तोफा आणि रॉकेटच्या सहाय्यानेही मारा करण्यात येत होता. दुसऱ्या महायु*द्धानंतर हे पहिले असे यु*द्ध होते ज्यात एका देशाने दुसऱ्या देशाविरुद्ध मोठ्या प्रमाणात बॉ*म्बचा मारा केला होता.

याच योजनेचा भाग म्हणून पाकिस्तानी तळावर बॉ*म्ब वर्षाव करण्याच्या इराद्याने एक भारतीय विमान गुलतेरी परिसरात पोहोचले. भारतीय वैमानिकांना तिथे पाकिस्तानच्या लष्कराच्या छावण्या दिसत होत्या. भारतीय वैमानिकाने या परिसरात पाकिस्तानी छावणी असल्याच्या सूचना नियंत्रण कक्षाला दिल्या. नियंत्रण कक्षाने या मिशनमध्ये सहभागी असलेल्या सगळ्या वैमानिकांना त्या प्रदेशात बॉ*म्ब वर्षाव करण्याचे आदेशही दिले.

इतक्यात एका वैमानिकाच्या लक्षात आले की ही छावणी पाकिस्तानच्या हद्दीत असून तिथल्या तंबूत खुद्द पाकिस्तानी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ आणि पाकिस्तानी वजीर-ए-आजम (प्रधानमंत्री) नवाझ शरीफ हे दोघे उपस्थित होते. त्याने लगेच नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय नियंत्रण कक्षाने या मिशनमधील सगळ्या वैमानिकांना माघारी बोलावून घेतले. भारतीय विमाने जर वेळेत परत आली नसती तर कदाचित या बॉ*म्ब वर्षावात पाकिस्तानचा तत्कालीन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ आणि पंतप्रधान नवाज शरीफ दोघेही मारले गेले असते.

पाकिस्तानच्या पंतप्रधानाला आणि लष्कर प्रमुखालाच संपवल्यामुळे पाकिस्तानमधील भारतविरोध आणखी तीव्र झाला असता आणि कदाचित कारगिल यु*द्धाने वेगळेच वळण घेतले असते.

कदाचित यातून अ*ण्वस्त्र यु*द्धाचाही भडका उडाला असता. भारतीय वैमानिकांनी वेळीच माघार घेतल्याने भारत-पाकिस्तान दरम्यानच्या अणुयु*द्धाची शक्यता मावळली.

८ मे १९९९ रोजी सुरु झालेल्या या युद्धाला २७ जुलै १९९९ रोजी अधिकृतरित्या पूर्ण विराम मिळाला. पाकिस्तानी सैन्याला या यु*द्धात खूप नुकसान सोसावे लागल्याचे तत्कालीन पाकिस्तानी वजीर-ए-आजम नवाझ शरीफनेही मान्य केले. या यु*द्धात पाकिस्तानने २७०० पेक्षाही जास्त सैनिक गमावले. अर्थात यातून पाकिस्तानने काही धडा घेतला असे मात्र झाले नाही. पाकिस्तानचा उद्दामपणा त्यानंतरही अनेकदा पाहायला मिळाला. यानंतरही पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे आणि नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले. भूतकाळात घडलेल्या लष्करी कारवाईवरून तर हे संबंध खूपच चिघळल्याचे दिसत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

रॉयल एअर फोर्सच्या या ह*ल्ल्याने हि*टल*रच्या कॉन्फिडन्सला धक्का दिला होता..!

Next Post

आपल्याला एक वर्ल्ड क्लास डायरेक्टर मिळालाय पण आपण एका शास्त्रज्ञाला मुकलोय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आपल्याला एक वर्ल्ड क्लास डायरेक्टर मिळालाय पण आपण एका शास्त्रज्ञाला मुकलोय

एरवी शांत असलेला पारशी समाजाने 'कुत्र्यांसाठी' रस्त्यावर उतरून दं*गली केल्या होत्या..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.