The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागतिक राजकारणात टिकायचं असेल तर सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीला पर्याय नाही!

by द पोस्टमन टीम
11 March 2025
in विश्लेषण, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंधातील गुंतागुंत वाढत चालली असताना प्रत्येक देशांचे एका, एकमेकांशी असलेले संबंध महत्वपूर्ण ठरू लागले आहेत. या काही दशकांपूर्वीपासून आंतरराष्ट्रीय संबंधांना ‘सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी’ हा आयाम जोडला गेला आहे. आंतरराष्ट्रीय संबंध विकसित करण्याची जबाबदारी ही केवळ शासकीय सेवेतील मुत्सद्दी, राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता त्यामध्ये इतर क्षेत्रातील तज्ज्ञ, विचारवंत, कलाकारांना सहभागी करून घेण्याची प्रक्रिया अनेक देशांच्या प्रशासनाकडून राबवली जाते.

दुसऱ्या महायु*द्धानंतर जग जेव्हा रशिया आणि अमेरिका या महासत्ता आणि त्यांचे समर्थक, विरोधक देश यामध्ये विभागले गेले त्या, विशेषतः शीतयु*द्धाच्या काळात ‘सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी’ विकसित करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. आता मात्र, भारतासह बहुतेक सर्व प्रभावशाली देश आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सॉफ्ट पॉवर’ विकसित करण्यावर आवर्जून भर देत आहेत.

इतर देशातील राजनैतिक संबंधांमध्ये केवळ सरकारच्या पातळीवर समन्वय न ठेवता, त्या त्या देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिकांमध्येही आपल्या देशाची संस्कृती, मूल्य, परंपरा आंतरराष्ट्रीय धोरण या विषयी प्रथम उत्सुकता आणि नंतर आत्मीयता निर्माण करणे आणि त्या माध्यमातून खरं तर त्यांच्यावर आपल्या देशाचा प्रभाव निर्माण करणे हा ‘सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी’चा मुख्य उद्देश आहे. कारण, इतर देशातील सामान्य नागरिकांमध्ये आपल्या देशाची जी प्रतिमा निर्माण होते, त्यावर त्या देशाच्या आपल्याबद्दलच्या धोरणनिश्चितीवर मोठा प्रभाव पडतो.

केवळ विदेशीच नव्हे तर आपल्या देशातील नागरिकांशीही याबाबत संवाद असण्याची आवश्यकता आहे. विशेषतः भारतासारख्या चैतन्यशील लोकशाही देशांमध्ये लोकांना केवळ परराष्ट्र धोरण आणि त्याचे तपशील जाणून घेण्याचाच नव्हे, तर धोरणनिश्चितीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे आणि ती त्यांची जबाबदारीही आहे. परराष्ट्र धोरण ही बाब केवळ मुत्सद्दींवर सोडली जाऊ नये, हे तत्व अंगिकारण्यात आलं आहे.

‘सॉफ्ट पॉवर’ ही संकल्पना सन १९८० पासून रुजली असली तरी प्राचीन आणि समृद्ध पंरपरा असलेल्या भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ सहस्रावधी वर्षांपासून प्रकट होत आली आहे. भारतीय परंपरा आणि संस्कृती हे ‘सॉफ्ट पॉवर’चा अखंड स्रोत आहे. भारतीय ज्ञान परंपरा (नॉलेज सिस्टीम्स) केवळ अत्यंत वैज्ञानिक नाहीत तर सौंदर्यशास्त्र आणि भाषाशास्त्र, आयुर्वेद भारताने जगाला प्रदान केले आहेत. ही यादी पाककृतींपासून स्थापत्यशास्त्रापर्यंत किती तरी वाढवता येईल.



प्राचीन भारतातील नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांमध्ये जगभरातील लाखो विद्यार्थ्यांनी मौलिक शिक्षण घेतले आहे. बौद्धधर्म आणि षड्दर्शनासारख्या वैविध्यपूर्ण तत्त्व विचारांची ओळख भारताने जगाला करून दिली. ही सगळी भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ची प्रतीकं आहेत. मुघल आणि इंग्रजांच्या आ*क्रमणामुळे भारताची विपरीत प्रतिमा जगासमोर आली असली तरीही बदलत्या काळात ही ‘सॉफ्ट पॉवर’ पुन्हा मजबूत करण्याचे प्रयत्न आवर्जून केले जात आहेत.

दोन वर्षांपूर्वी कोविड-19 च्या महासाथीने जणू संपूर्ण जगच ठप्प करून टाकलं. जगभराच्या विळखा घातलेल्या या विषाणूच्या भीतीचे सावट अजूनही पूर्णतः निवळलेलेले नाही. या संकटाचा सामना करण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लस विकसित करणं, त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं आणि जगभरात त्याचे वितरण करणं हे महत्त्वाचं आणि अनिवार्य शस्त्र मानलं गेलं. त्यानंतर वेगवेगळ्या देशात अनेक प्रकारच्या कोरोना प्रतिबंधक लसी विकसित करण्यात आल्या.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

लस उत्पादनात जगभरात आघाडीवर असलेल्या भारताने या लसींचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची जबाबदारी स्वीकारली. आपल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, या शेजारी राष्ट्रांसह जगभरात वितरित करण्यासाठी कोट्यवधी लसी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या संकटाच्या काळात लस उपलब्ध करून देण्याचे काम हे मानवतेच्या रक्षणाचे होते तितकेच ते ‘सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी’च्या दृष्टीनेही प्रभावी ठरले आहे. या कार्यामुळे शेजारी राष्ट्रांमध्ये भारताच्या प्रभावात लक्षणीय भर पडली आहे, तसेच जागतिक पातळीवर एक मोठी जबाबदारी पेलू शकणारा देश म्हणून भारताची विश्वासार्हता वाढली आहे.

योग ही भारतीय संस्कृतीने संपूर्ण मानव जातीला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योगाचा संबंध कोणत्याही धर्माशी नाही. कोणत्याही विशिष्ट देवतेशी नाही. योग हे कर्मकांड नाही. उपासनाविषयी नाही, तो केवळ शारीरिक व्यायाम नाही, मन आणि शरीर संतुलित राखून शारीरिक आणि मानसिक आरोग्याची देणगी प्रदान करणारी ती जीवनपद्धती आहे.

योगाने पाश्चात्त्य देश आणि अमेरिकेत यापूर्वीच लोकप्रियता मिळवून दिली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने २१ जून वर्षातला सर्वात मोठा दिवस संयुक्त राष्ट्रांच्या मान्यतेने ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या संबंधीच्या भारताच्या ठरावाला तब्बल १७७ देशांनी पाठींबा दिला आहे. या दिवशी जगभरातील १००हून अधिक देशांमध्ये योगविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने भारतीय परंपरेची ही देणगी जशी जगभरात पोहोचली, त्याचप्रमाणे भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’मध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.

भारत ही कला-संस्कृतीवर आधारित ‘सॉफ्ट पॉवर’ आहे. याचे एक ठळक उदाहरण म्हणजे बॉलिवूड! एकेकाळची महासत्ता असलेल्या रशियापासून सतत संघर्षग्रस्त असलेल्या अफगाणिस्तानमध्ये भारतीय सिनेमा दशकांपासून लोकप्रिय आहे. मनोरंजनाची साधने वाढत असतानाही जगभरात भारतीय सिनेमाची लोकप्रियताही वाढत आहे.

याशिवाय भारतीय शास्त्रीय संगीत आणि भरतनाट्यमसारखे नृत्यप्रकारही जगभर लोकप्रिय आहेत. अशा प्रथा, परंपरा आणि कला प्रकारांची ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून क्षमता ओळखण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी, सर्जनशील ‘संस्कृतिदूतांना’ जगभरात भारतीय संस्कृती घेऊन जाण्यासाठी अधिकाधिक संधी देणे आणि त्या माध्यमातून एक मजबूत सांस्कृतिक अर्थव्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. यामुळे जगभरातील कलाकार, विचारवंत, सांस्कृतिक तज्ज्ञ, यांच्यात सुजनशील सांस्कृतिक सहकार्य आणि देवाण-घेवाण होऊ शकेल.

‘सॉफ्ट पॉवर’ विकसित करण्यासाठी भारताकडे संसाधनांची कमतरता मुळीच नाही. मात्र, त्या ‘सॉफ्ट पॉवर’चा प्रभावी वापर करून आपले महत्त्व वाढविण्यासाठी, राष्ट्रीय हितसंबंध राखण्यासाठी संस्थात्मक यंत्रणेचा भारताकडे अभाव आहे हे मान्यच केले पाहिजे.

याशिवाय जातपात, पंथभेद, भ्रष्टाचार, दारिद्र्य, महिलांवरील अ*त्याचार, शहरी भागातील प्रदूषण, आणि स्त्री-पुरुष असमानता यासारख्या प्रमुख दोषांमुळे भारताच्या जगासमोरील प्रतिमेला डाग लागले आहेत. भारताला आपली राष्ट्रीय प्रतिमा पुनरुज्जीवित करायची असेल तर आपण आपल्या क्षमता ओळखून मर्यादांवर मात केली पाहिजे.

प्राचीन परंपरेने दिलेले शहाणपण आणि अध्यात्म याच्या जोरावर भारत जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यास आणि अनेक क्षेत्रांत नेतृत्व करण्यास समर्थ आहे, हे इतर राष्ट्रांमध्ये ठसवले पाहिजे. उगवती जागतिक ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून आपले स्थान आणखी उंचावण्याची अफाट संधी आपल्याकडे आहे. त्यामुळे देशाच्या विकासाची वाट अधिक रुंद करू शकते. मात्र, त्यासाठी उत्तम कामगिरी करण्याबरोबरच ती उत्तम पद्धतीने सादर करण्याची, ‘मार्केटींग’ची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

यूकेमधील हे ‘पॉयझन गार्डन’ अशा वनस्पतींचे घर आहे ज्या कोणाचाही काटा काढू शकतात

Next Post

Explainer: आपल्या हक्काच्या नोकऱ्या रोबॉट्स पळवतायत का..?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

Explainer: आपल्या हक्काच्या नोकऱ्या रोबॉट्स पळवतायत का..?

सगळ्यांचा लाडका फर्निचर ब्रँड आयकिया एकेकाळी रोमानियातील सिक्रेट पोलिसांना फंडिंग करत होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.