The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकेकाळी भारतात वेगवेगळी वेळ दाखवणारे चार घड्याळ वापरले जायचे !

by द पोस्टमन टीम
1 February 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात कालगणनेची पद्धत फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. परंतु जेव्हा ब्रिटिश भारतात आले त्यांनी भारतातील कालगणनेसाठी एका स्टँडर्ड मानांकनाचा वापर करण्यास सुरुवात केली. यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि १ सप्टेंबर १९४७पासून इंडियन स्टँडर्ड टाईमचा स्वीकार करण्यात आला. हे एक भारतीय काल मानांकन होते. गेल्या सात दशकांपासून आपल्या देशातील घड्याळ याच तत्वावर काम करत आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर संपूर्ण देशासाठी एक टाईम झोन सेट करण्यात आला, ज्याला IST म्हटले जाते. जगाच्या कॉर्डिनेटेड वेळेनुसार याला +5.30 अर्थात साडेपाच तास पुढचा वेळ मानण्यात आले आहे. ज्यावेळी टाईमझोन निश्चित करण्यात आला त्यावेळी एक समस्या आली. भारताच्या पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशपासून गुजरातमधील कच्छच्या रणापर्यंत एकच कालगणना पद्धत कशी अकारायची यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. यावर अनेक वाद निर्माण झाले होते.

स्वातंत्र्यानंतर भारताला दोन टाईमझोनमध्ये विभागण्यात आले एक होता बॉम्बे टाईमझोन. इंग्रजांनी १८८४ साली हा टाईमझोन निश्चित केला होता. आंतरराष्ट्रीय टाईम झोन मानांकन परिषदेत ब्रिटिशांनी या टाईमझोनची निश्चिती केली होती. ग्रीनवीच मिनटाईम(जीएमटी)च्या ४ तास ५१ मिनिटे पुढचा टाईमझोन बॉम्बे टाईम होता.

१९०६ मध्ये आयएसटीचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेसमोर ठेवण्यात आला. १९०६ मध्ये फिरोजशहा मेहता यांनी बॉम्बे टाईमच्या बाजूने जोरदार आवाज उठवला होता त्यामुळे बॉम्बे टाईम त्यावेळी सुरू ठेवण्यात आला.

१८८४ च्या बैठकीत बॉम्बेबरोबरच कलकत्ता टाईम देखील निश्चित करण्यात आला होता. जीएमटीपासून साडेपाच तास आणि एकवीस सेकंद दूर असलेला टाईमझोन म्हणून तो परिचित होता. १९०६ मध्ये आयएसटी आणायचा प्रयत्न फसल्यामुळे कलकत्ता टाइम्सचा वापर सुरू राहिला. असं म्हणतात की इंग्रज भौगोलिक आणि खगोलीय दस्तऐवजी कारणासाठी कलकत्ता टाइम्सचा वापर करतात. बॉम्बे आणि कलकत्ता टाईम्सच्या अगोदर मद्रास टाईम्सच्या आधारावर कालगणना केली जायची.



भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जॉन गोल्डींघम यांनी १८०२ मध्ये पहिली पहिली टाईम झोन व्यवस्था निर्माण केली होती. जीएमटीच्या ५ तास २१ मिनिटे पुढे असलेल्या या टाईमझोनला रेल्वेने देखील स्वीकारले होते म्हणून याला रेल्वे टाईम देखील म्हटले जाते. बॉम्बे आणि कलकत्ता टाईम असताना देखील रेल्वेने हा टाईमझोन वापरायला सुरुवात केली होती. १८८४ मध्ये या टाईमझोनची वैधता संपुष्टात आली.

१९४७ मध्ये जेव्हा आयएसटीचा स्वीकार करण्यात आला, त्यावेळी भारताने मद्रास येथील आपल्या नक्षत्रालयाला अलाहाबाद (प्रयागराज) येथे हलवले. भारताने यावेळी एकीकरण अनुभवले. देशभरात पसरलेल्या सीमारेषामध्ये एकच वेळ समजणे अवघड होते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

भारतात दोन किंवा त्याहून अधिक टाईमझोन असण्याचा चर्चा असायच्या, पण चीनप्रमाणे पसरलेल्या सीमारेखा असूनदेखील एकच टाईमझोन निश्चित करण्यावर भारताने जोर दिला होता.

८० च्या दशकात जेव्हा दोन टाईमझोनला पुन्हा लागू करण्याचा चर्चा पुन्हा सुरू झाल्या त्यावेळी ब्रिटीशकालीन व्यवस्था पुन्हा नको म्हणून त्याला नाकारण्यात आले. २००४ मध्ये पुन्हा हा मुद्दा कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आला. जुहनु बुरगा आणि तरुण गोगई यांच्यासारख्या नेत्यांनी आसामसाठी वेगळ्या टाईमझोनची मागणी केली होती.

विज्ञानाच्या दृष्टीने गुजरातच्या कच्छ व ईशान्येकडील आसाममध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळांमध्ये दोन तासांचे अंतर आहे. भारतात डेलाईट सेव्हिंग टाईम अर्थात डीएसटीसारखी व्यवस्था अजूनही लागू करण्यात आलेली नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘मालगुडी डेज’ने आर के नारायणांना जगभरात प्रसिद्ध केले..

Next Post

एकाच झाडापासून तयार होतात तरी भारतात ‘भांग’ विक्रीला सूट आणि ‘गां*जा’ विक्रीला बंदी का आहे ?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

एकाच झाडापासून तयार होतात तरी भारतात 'भांग' विक्रीला सूट आणि 'गां*जा' विक्रीला बंदी का आहे ?

सीबीआयचे अधिकारीसुद्धा ज्याला घाबरतात, तो 'CVC रिपोर्ट' नेमका काय असतो ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.