The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वेचं रूप पालटलं पण तिकीट मात्र ९० च्या दशकातील प्रिंटरवरच प्रिंट होतं

by द पोस्टमन टीम
10 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतात १८३२ साली चेन्नईच्या रेड हिल-चिंताद्रपेट या दोन स्थानकांदरम्यान पहिली रेल्वे धावली. आर्थर कॉटन यांनी या रेल्वेची निर्मिती केली होती. ही एक मालगाडी होती, ज्यातून ग्रॅनाईटची वाहतूक करण्यात येत होती. ही मालगाडी सुरू झाल्याच्या तब्बल २१ वर्षांनी १६ एप्रिल १८५३ साली, भारतातील पहिली पॅसेंजर गाडी धावली. ही पॅसेंजर गाडी २४ किलोमीटर अंतर धावली होती. मुंबईच्या बोरबंदर स्टेशनपासून ठाणे स्टेशनपर्यंत धावलेल्या या रेल्वेत ४०० लोकांनी प्रवास केला.

ही गाडी तीन इंजिनांवर धावत होती. साहिब, सिंध आणि सुलतान अशी त्यांची नावंं होती. त्यावेळी प्रवास करणाऱ्या लोकांना वाटलं देखील नसेल की ही रेल्वे लाईन संपूर्ण देश व्यापून टाकेल आणि प्रचंड वेगाने भारताच्या दोन टोकांमधील प्रवास अवघ्या काही दिवसांच्या कालावधीवर आणून सोडेल.

पहिली रेल्वे गाडी यशस्वीपणे चालवल्यानंतर भारतीय रेल्वेच्या रुपात मोठे बदल झाले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीने गेल्या तीन दशकांत भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलला आहे.

१९८८ साली भारतातील पहिली शताब्दी एक्स्प्रेस धावली. ही भारतातील सर्वात वेगवान रेल्वेपैकी एक होती. ही रेल्वे दिल्ली ते झाशी स्थानकादरम्यान धावली, पुढे भोपाळपर्यंत ही ट्रेन धावू लागली. १९९० मध्ये नवी दिल्ली येथे सर्वप्रथम ‘सेल्फ तिकीट प्रिंटिंग मशीन’चा वापर करण्यात आला.

१९९३ मध्ये पहिल्यांदा तीन वेगळ्या प्रकारच्या कोच सिस्टमची आणि स्लीपर कोचची रचना करण्यात आली. या आधी फक्त फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास या दोनच सिस्टम भारतीय रेल्वेत होत्या. आता फर्स्ट क्लास एसी, सेकंड क्लास एसी, थर्ड क्लास एसी, स्लीपर क्लास आणि जनरल डब्बे असे वर्गीकरण करण्यात आले आहे.



१९९६ मध्ये पहिल्यांदा कॉम्प्युटराईज्ड रिझर्व्हेशन सिस्टम सुरू करण्यात आली. नवी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे ही सेवा सुरू करण्यात आली. ३ फेब्रुवारी २००० मध्ये भारतीय रेल्वेची पहिली वेबसाईट आकारास आली. ३ ऑगस्ट २००२ला रेल्वेने ऑनलाईन तिकीट आणि रिझर्व्हेशनची व्यवस्था केली. भारतीय रेल्वे आज १७ झोन्समध्ये विभागण्यात आली आहे. भारतीय रेल्वे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःला अपग्रेड करत आहे.

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वांत मोठी रेल्वे सिस्टम आहे. दिवसागणिक ही रेल्वे सिस्टम अत्याधुनिक रूप धारण करते आहे. तिकीट बुकिंगपासून कोचपर्यंत, ट्रॅकिंग सिस्टमपासून टायमिंगपर्यंत भारतीय रेल्वे नवनवीन प्रकारे स्वतःला अपग्रेड करत आहे. पण अशा देखील काही गोष्टी आहेत, ज्यात रेल्वे स्वतःला बदलू इच्छित नाही. यापैकी एक आहे भारतीय रेल्वेची तिकीट बुकिंग प्रिंटर मशीन.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

रेल्वेमध्ये बुकिंग सुरू करण्यात आली तेव्हापासून डॉट मॅट्रिक प्रिंटरचा वापर करण्यात येतो. आज बाजारात डॉट मॅट्रिक प्रिंटरपेक्षा अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत तरी रेल्वे मात्र डॉट मॅक्स प्रिंटरचा वापर करते.

डॉट मॅट्रिक प्रिंटर एकावेळी एक मेन कॉपी आणि तीन कार्बन कॉपी प्रिंट करते. तिकीट बुकिंगच्या वेळी एकाच कॉपीची (प्रतीची) गरज असते. चार पैकी एक मेन कॉपी असते. जिला हेड ऑफिसला पाठवण्यात येते. तीन कार्बन कॉपीजपैकी एक रेल्वे प्लॅटफॉर्मवर लावण्यात येते, दुसरी रेल्वे तिकीट तपासणी कर्मचाऱ्याकडे असते, एक रेल्वे डब्ब्याला लावलेली असते. अत्यंत कमी खर्चात चार प्रिंट मिळतात आणि छपाईसाठी अगदी साधा कागद लागतो, जो स्वस्त असतो. तिकीट लिस्ट असो की तिकीट प्रत्येकाच्या कागदाची क्वालिटी सारखी असते आणि त्यात छिद्रे पडलेली असतात.

डॉट मॅट्रिक प्रिंटर हे फार स्वस्त असते. यात वापरण्यात येणारी शाई देखील स्वस्त असते. हा याचा अजून एक फायदा आहे. एकदा सर्व्हिसिंग केल्यानंतर हा प्रिंटर दीर्घकाळ टिकतो. याची खडखड ऐकल्यावर हे एक ड्युटी मटेरियल असल्याचे लक्षात येते. हे खराब झाले तरी स्वस्तात दुरुस्त होते. याची मेंटेनन्स कॉस्ट देखील कमी आहे. फक्त छापत रहा, छापत रहा, छापत रहा अशीच प्रक्रिया सुरू आहे. रोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात, त्यामुळे आधुनिक प्रिंटर वापरण्यास सुरुवात केली तर ते लगेचच खराब देखील होतील.

डॉट मॅट्रिक प्रिंटरला पेपर साईजचे काहीच लिमिटेशन नसते. तिकीट खिडकीवर बुकिंग करताना जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की लांब लिस्ट असो की एक सिंगल तिकिट सगळं एकाच प्रिंटरवर प्रिंट करण्यात येते. या प्रिंटरच्या साहाय्याने अनेक कामे करता येत असल्यामुळे रेल्वे विभाग या प्रिंटरला सोडचिठ्ठी देत नाही.

रेल्वे विभागाकडून आज रेल्वे तिकीट बुकिंग व लिस्टिंगसाठी एम एस डॉस सॉफ्टवेअर वापरण्यात येते. डॉट मॅट्रिक प्रिंटरची आणि या सॉफ्टवेअरची कॉम्पिटेबिलिटी उत्तम आहे. या दोघींची कार्यपद्धती एकमेकांना पूरक आहे. फक्त पेपर लावल्यानंतर ही मशिन आपोआप छपाई करते. जे प्रिंटर सर्वच बाबतीत रेल्वेला परवडणारे आहे, त्यामुळे कितीही आऊटडेटेड झालं तरी रेल्वे याचा अजून काही वर्ष वापर करत राहील असे दिसते, जोवर याला एखादा उत्तम पर्याय मिळत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

फक्त पुरुषांसाठी असलेल्या कॉलेजात, एकट्या जाणाऱ्या या भारतीय महिलेने इतिहास घडवला होता

Next Post

ओशोंसाठी विनोद खन्ना यांनी बॉलिवूडच्या स्टारडमचा संन्यास घेतला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

ओशोंसाठी विनोद खन्ना यांनी बॉलिवूडच्या स्टारडमचा संन्यास घेतला होता

भारतातून का चोरी होताय कोट्यवधी रुपयांच्या प्राचीन मुर्त्या ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.