The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुनील जोशीच्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली होती

by द पोस्टमन टीम
5 June 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतीय क्रिकेट संघात उत्तम खेळाडू आहेत, फलंदाज असो की गोलंदाज, यष्टीरक्षक असो की ऑल राउंडर, भारतीय संघात उत्तमोत्तम खेळाडू आहेत. कपिल देवसारख्या ऑल राउंडर क्रिकेटपटूने परदेशी मातीवर आपल्या कौशल्याच्या बळावर वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर परदेशी संघांनी भारतीय संघाला कमी लेखणे बंद केले होते.

आज आपण एका अशा स्पिनर गोलंदाजाबद्दल बोलणार आहोत, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या बळावर आफ्रिकन संघाला स्पिन ऑफ केले होते. त्या खेळाडूचे नाव होते सुनील जोशी.

१९९९ सालच्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या सामन्यात सुनील जोशीने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने ६ रन देऊन ५ विकेट घेतल्या होत्या.

खरंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ या सामन्यात बेफिकीर होता, पण सुनील जोशीने त्यांची झोप उडवली होती.

सुनील जोशीने १९९५ सालच्या रणजी ट्रॉफीमध्ये उत्तम प्रदर्शन केले होते. तरीही १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला स्थान मिळवता आले नव्हते. पण त्याला वर्ल्ड कपनंतरच्या इंग्लंड मालिकेसाठी निवडण्यात आले. दुर्दैवाने सामना सुरु होण्याच्या अगोदरच तो जखमी झाल्याने त्याला परतावे लागले.



यानंतरही तो अधूनमधून टीम इंडियासाठी खेळत राहिला. पण त्याला कधीच टीममध्ये निश्चित स्थान निर्माण करता आलं नाही. १९९९ साली सुनील जोशी आधीपेक्षा आक्र*मक गोलंदाजी करू लागला. एलजी कपसाठी त्याची निवड करण्यात आली.

अजय जडेजाच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया या तीन संघांशी सामना खेळणार होते.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

२६ सप्टेंबर १९९९चा दिवस होता. ज्यावेळी जिमखाना ग्राउंड, नैरोबी येथे दोन संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळणार होते. दक्षिण आफ्रिकेचा संघ चांगल्या फॉर्मात होता, त्यामुळे हा सामना ते सहज जिंकतील असे सगळ्यांना वाटत होते.

नैरोबीच्या ग्राउंडवर दोन्ही संघामध्ये सामना रंगत होता. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आणि त्यांनी एक मोठी चूक केली.

त्यांनी खेळपट्टी लक्षात न घेता, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ही अशी विकेट होती, जी स्पिनर्ससाठी फार महत्त्वपूर्ण मानली जात होती. हॅन्सी क्रॉनेला वाटले की दक्षिणी आफ्रिकन बॉलर्सचे फुटमार्क्स दुसऱ्या इनिंग्जमध्ये भारतीय फलंदाजांसाठी अडचणीचे ठरतील. पण त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते की त्यांच्यावर सुनील जोशी नावाच्या वादळाचा वज्रप्रहार होणार आहे.

टीम इंडियाचे बॉलर्स व्यंकटेश प्रसाद आणि देबाशिष मोहंती यांना सुरुवातीच्या साऊथ आफ्रिकन फलंदाजांनी सांभाळून घेतले. सुरुवातीच्या ९ ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ नाबाद होता. आफ्रिकेचे फलंदाज फार धिम्या गतीने रन्स काढत होते. यामुळे पहिल्या ९ ओव्हरमध्ये ३२ रन्सची भर पडली.

९ ओव्हर्सनंतर टीम इंडियाच्या कॅप्टनने गोलंदाजीत बदल केले आणि बॉल सुनील जोशीच्या हातात दिला. पहिल्या इनिंगची दहावी ओव्हर घेऊन लेफ्ट आर्म स्पिनर सुनील जोशी अंपायरच्या पाठीमागे येऊन उभी राहिली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा स्कोअर त्यावेळी एकाही विकेटच्या नुकसानाशिवाय ३२ रन होता.

सुनील जोशीचा पहिला चेंडू डॉट बॉल होता. तो बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने लेफ्ट आर्म राउंड द विकेट गोलंदाजी केली. हर्शेल गिब्ज चेंडूला टर्न होताना बघत होता, गिब्सला वाटले थर्ड मॅनला बॉल टोलवून रन काढता येईल. यासाठी त्याने बॅकफूटवर जाण्याच्या निर्णय घेतला.

पण चेंडू उसळला आणि त्याने फलंदाजाच्या बॅटला हलकासा टच करत हवेत उसळी खात राहुल द्रविडच्या हातात जाऊन स्थिरावला. आणि साऊथ आफ्रिकेची पहिली विकेट पडली.

गिब्स आउट झाल्यावर आफ्रिकन संघाने स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि ३९ – १ अशा स्थितीपर्यंत सामना ओढून आणला. पण मार्क बाऊचर रन आउट झाला. त्यामुळे स्कोअर २ बाद ३२ रन असा झाला. सुनील जोशी संपूर्ण तयारीनिशी सामना खेळायला उतरला होता. सोळाव्या ओव्हरमध्ये आफ्रिकन संघाला अजून एक झटका लागला. आता स्कोअर ३९-३असा झाला.

बोएटा डिप्पोनर सुनीलच्या चेंडूवर स्टंप आउट झाला. आता स्वतः कॅप्टन हेन्सी क्रोनये फलंदाजी करायला आला, त्याला त्यावेळी दक्षिण आफ्रिकन संघाचा कणा मानला जायचा. सुनीलने त्याला लेग स्टंप लाईनला चेंडू टाकला. क्रोनयेला सिंगल काढायचा होता, परंतु बाॅलच्या स्पीडमुळे तो खच्ची झाला. बाॅल त्याच्या बॅटच्या कोपऱ्याला लागला आणि चेंडू फिल्डर सदगोपन रमेशच्या हातात गेला. दक्षिण आफ्रिकन संघाचे चार खेळाडू बाद झाले होते. जोशीच्या पदरात ३ विकेट आल्या होत्या.

आफ्रिकन संघ आता दबावाखाली आला. अशातच जॉन्टी ऱ्होड्स बॅटिंग करायला उतरला. त्याच्याकडूनच संघाला आता उरली सुरली अपेक्षा होती. आता सुनील जोशीने गुड लेंथ बॉल टाकला. ऱ्होड्स जोशीच्या चेंडुवर रिव्हर्स स्वीप मारायला गेला आणि कॅच देऊन आउट झाला. पुढे जोशीने शॉन पोलकची विकेट सहज घेतली. अशाप्रकारे सुनील जोशीच्या ५ विकेट्सने भारताला सामन्यात परत आणले.

११७ धावांवर आफ्रिकेचा सगळा संघ गारद झाला आणि मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी टीमला ११८ रन्सची गरज होती. २२,४ ओव्हर्समध्ये १२० रन्स बनवून टीम इंडियाने हा सामना ८ विकेट्स राखून जिंकला होता.

सुनील जोशीला त्याच्या जबरदस्त गोलंदाजीसाठी मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. ११७ हा आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी स्कोअर होता.

सुनील जोशीने त्या सामन्यात १० ओव्हरमध्ये ६ ओव्हर मेडन टाकल्या होत्या. फक्त, ६ रन देऊन त्याने५ विकेट घेतल्या होत्या. २१ जून २०१२ला सुनील जोशीने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली पण, तो आजही या सामन्यातील जबरदस्त बॉलिंगसाठी ओळखला जातो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भटकंती – महाराजांच्या आठवणी जागवणारी उंबर खिंड

Next Post

कित्येक गँगस्टर्सना यमसदनी धाडणाऱ्या प्रदीप शर्मांनाच जेलची हवा खायला लागली होती

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

कित्येक गँगस्टर्सना यमसदनी धाडणाऱ्या प्रदीप शर्मांनाच जेलची हवा खायला लागली होती

ऑस्करला गेलेल्या लगान चित्रपटाला सुरुवातीला निर्माताच मिळत नव्हता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.