The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक्सप्लेनर: भारत-कॅनडा तणावाचं कारण नेमकं काय..?

by Heramb
21 September 2023
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


मागच्या काही दिवसांत कॅनडामध्ये खलि*स्तान टायगर फोर्सचा लीडर हरदीप सिंग निज्जर मार*ला गेला तर आज त्याचाच साथीदार सुक्खा दुन्नेकेची ह*त्या झाली. दोन दिवसांपूर्वी कॅनडा सरकारने याच प्रकरणात भारत सरकारचा हात आहे असे दाखवून देत भारताचे डिप्लोमॅट पवन कुमार राय यांना परत पाठवले, त्याला जशास तसे उत्तर देत भारतानेही कॅनडाचा डिप्लोमॅट परत पाठवून दिला. नेमकं काय आहे हे खलि*स्तान प्रकरण आणि ते कॅनडामध्ये कसं रुजलं जाणून घेऊया या लेखातून..

१६ डिसेंबर १९७१ चा तो दिवस ऐतिहासिक ठरला. एखाद्या देशाच्या सैन्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर फक्त १३ दिवसांत शरणागती पत्करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ. तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात याह्या खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारने उर्दू भाषेची सक्ती केली होती. पूर्व पाकिस्तानात पाकिस्तान सैन्याने नरसं*हार घडवून आणला होता, ज्यामध्ये सुमारे ३० लाख निरपराध लोकांचा मृ*त्यू झाला आणि २ ते ४ लाख बंगाली स्त्रियांवर बला*त्कार झाले. यामध्ये प्रामुख्याने हिंदूंना टार्गेट करण्यात आले होते. या सगळ्या विरोधात जी क्रांती झाली तिचा शेवट बांग्लादेशच्या स्थापनेने आणि ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीने झाला.

इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर सही करताना पाकिस्तानचा ईस्टर्न कमांडर ए. ए. के. नियाझी.

आपण भारताला आर्थिक आणि लष्करी बाबतीत तोडीस तोड उत्तर देऊ शकत नाही हे ७१ च्या यु*द्धात सपशेल हरलेल्या पाकिस्तानी नेतृत्वाच्या लक्षात आले होते. म्हणूनच तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टोने ‘थाऊसंड इयर वॉ*र’ हे डॉक्टरीन आणले. पुढे पाकिस्तानचा राष्ट्रपती आणि आर्मी ऑफिसर असलेल्या ‘झिया-उल-हकने’ या डॉक्टरीनची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु केली. दरम्यानच्या काळात पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर ‘अफगाण जि*हाद’ सुरु होता. पाकिस्तानी सैन्याचे सैनिक आणि काही व्हॉल्युन्टीर्स सोव्हिएट रशियाच्या विरोधात लढा देण्यासाठी अफ़गाणिस्तानात गेले. सुमारे एक दशक हे यु*द्ध सुरु होतं. हे यु*द्ध संपल्यावर लगेचच म्हणजे ८० च्या दशकात कश्मीर आणि पंजाबमध्ये दह*शतवादाचा स्फोटच झाला.

दह*शतवाद हे कमी पैशांमध्ये जास्त परिणाम देणारं यु*द्धतंत्र आहे हे पाकिस्तान्यांच्या लक्षात आलं होतं. यासाठी आवश्यक मानवी संसाधन गरिबी आणि धर्मांध इस्ला*ममुळे पाकिस्तान आणि भारतातही सहज उपलब्ध होत असे. तथाकथित मुजा*हिद्यांना धर्माची झापडं लावली की ते कुठेही फुटण्यास तयार होत, मग या तथाकथित शहिदाच्या कुटुंबाच्या तोंडावर थोडेफार पैसे फेकून मारले तरी ते शांत बसतात. हेच तंत्र वापरून त्यांनी जमात-ए-ईस्लामीसारख्या धर्मांध संस्थांच्या मदतीने कश्मीरमध्ये दह*शतवाद पसरवला.

पंजाबमध्ये राजकीय पक्षांनी आपले स्वार्थी ध्येयं साध्य करण्यासाठी जर्नेल सिंग भिंड्रनवालेसारख्या कट्टर*तावादी लोकांना सपोर्ट देऊन वर आणले. त्यांचे सत्ता मिळवण्याचे ध्येय साध्य झाल्यानंतर मात्र हा मोहरा पाकिस्तानच्या हाती लागला आणि त्याचा वापर पंजाबमध्ये शीख पंथाच्या नावाखाली दहश*तवाद पसरवण्यासाठी होऊ लागला. याच दहश*तवादाने स्वतंत्र खलि*स्तानची मागणी करत भारत सरकार आणि सैन्याविरोधात दंड थोपटले. पंजाबमध्ये ड्र*ग्सच्या व्यापाराला उधाण आले. एकेकाळी गुरूंची भूमी समजला जाणारा पंजाब उध्वस्त होऊ लागला होता, या मागे होता पाकिस्तान!


जर्नेल सिंग भिंड्रनवाले

१ जून १९८४ रोजी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ सुरु करून ख*लिस्तानचे नामोनिशाण संपव*ण्यात आले, पण या कारवाईमध्ये पवित्र हरमंदिर साहिब अर्थात अमृतसरच्या सुवर्णमंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राजकारण आणि सत्तेच्या घाणेरड्या खेळात लोकांच्या श्रद्धेवर वार झाले होते. पुढे बदल्याच्या भावनेने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ऑपेरेशनचे नेतृत्व केलेले जनरल वैद्य यांची ह*त्या करण्यात आली, त्यानंतर अनेक वर्षे खलि*स्तान मुद्दा क्वचितच दिसत होता.

२०१८ सालापासून मात्र ख*लिस्तानने डोके वर काढले आहे. जुन्या खलि*स्तानच्या नकाशात पाकिस्तानातील लाहोर शहरही दाखवले जात असत, पण नव्या खलिस्तानच्या नकाशात मात्र फक्त भारतीय पंजाबचाच समावेश होतो. असे का असावे याचे कारण स्पष्ट आहे. पंजाबमध्ये फार पूर्वीपासूनच बाहेरच्या देशांत, विशेषतः कॅनडामध्ये जाऊन शिक्षण घेणे, तिथे सेटल्ड होण्याची ‘क्रेझ’ आहे. याला सुमारे शतकभराची परंपरा असून ब्रिटिश सैन्यातील रिटायर्ड शीख ऑफिसर्स आणि सैनिक उत्तर अमेरिका किंवा कॅनडामध्ये स्थायिक होत असत. व्हॅन्कुव्हर शहरात १८८६ साली पहिला गुरुद्वारा बनला होता. त्यांनतर हे प्रमाण वाढतच गेलं आणि पंजाबी समाजात कॅनडा किंवा इतर पाश्चिमात्त्य देशांत जाण्याचे प्रमाण वाढले आणि तो ट्रेंड बनत गेला. 

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अलीकडच्या काळात राजकीय आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या कॅनडाचा व्हिसा “माझे राजकीय हक्क भारतात सुरक्षित नाहीत” एवढ्या एका कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या पत्राने सहज मिळू लागला. मग काय, मतांच्या राजकारणासाठी असे अनेक पत्रं देण्यात आली. संदर्भ उपलब्ध आहे. अशा प्रकारे खलि*स्तानचे प्रकरण पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने पुन्हा सुरु झाले. तेव्हापासून आतापर्यंत सिद्धू मुसेवालाची ह*त्या, २०२१ च्या जानेवारीत शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली दिल्लीत झालेल्या दंग*ली, अमृतपाल सिंग प्रकरण अशा अनेक घटना घडू लागल्या.

ख*लिस्तानचा तथाकथित नेता गुरु पतवन सिंग पन्नू कॅनडामधून जवळ जवळ रोजच आपल्या भाषणातून भारताचा अपमान करत स्वतंत्र खलि*स्तानची मागणी करतो. या सगळ्या प्रकरणांत ड्र*ग्स आणि हत्या*रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असूनही कॅनडाचे सरकार त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारत नाही, याचे एकमेव कारण म्हणजे मतांचे राजकारण! ‘खलि*स्तानी म्हणजेच शीख’ या कॅनडामधील सरकारच्या गोड गैरसमजाने आज दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

गुरु पतवन सिंग पन्नू

कॅनडामध्ये शीख लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, ती मते मिळवण्यासाठी कॅनडा सरकार खलि*स्तानला पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. पण खरा शीख कधीच स्वतंत्र खलि*स्तानची मागणी करणार नाही. या चांडाळ चौकडीतील आपापसांतील वादांमुळे आणि त्यांच्या कर्माने ह*त्या होतात. हरदीप सिंग निज्जर आणि सुक्खा दुन्नेके दोघांची ह*त्या एकतर अंतर्गत कलहामुळे किंवा आयएसआयने ‘गरज सरो वैद्य मरो’ या भूमिकेतून केली असावी असेच येणाऱ्या बातम्यांमधून दिसते. त्याचं खापर विनाकारण भारतावर फोडलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी कॅनडामध्ये या लोकांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या ह*त्येचा देखावा करून दहश*तवादाचे उघडपणे समर्थन केले तेव्हा कॅनडा सरकारला काहीही समस्या नव्हती, पण हरदीप सिंग निज्जरची ह*त्या कोणी केली हे सिद्ध झाले नसले तरीही फक्त संशयाच्या जोरावर कॅनडाने भारताचे डिप्लोमॅट परत पाठवले होते. प्रत्युत्तराखातर भारतानेही तेच केले, शिवाय कॅनडियन लोकांचे व्हिसासुद्धा भारताने रद्द केले आहेत.

दह*शतवाद नावाचा साप पाळला तर तो शेवटी आपल्यालाच दंश करतो हा धडा कॅनडाने पाकिस्तानच्या उदाहरणावरून घेणे आवश्यक आहे. शेवटी देशाच्या विरोधात काम करणारे दहश*तवादी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरीही भारताची दह*शतवादाविरोधातील झिरो-टॉलरन्स पॉलिसी त्यांना लागू पडतेच..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आजही अनेक वैज्ञानिक त्यांचे वायरलेस इलेक्ट्रीसिटीचे स्वप्न सत्यात उतरवायच्या प्रयत्नांत आहेत..!

Next Post

सात दशके पोलिओशी लढा देत, कोणतीही हालचाल न करता तो आज वकील झाला आहे..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

सात दशके पोलिओशी लढा देत, कोणतीही हालचाल न करता तो आज वकील झाला आहे..!

पे पालच्या माजी कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या कंपन्या आज कोट्यवधींची उलाढाल करताहेत..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.