The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा अमेरिकन सैनिक ना*झींविरोधात अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांकडून लढला होता

by द पोस्टमन टीम
5 July 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एका अमेरिकन सैनिकानं तीन वेळा जर्मन बंदिवासातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर गेस्टापोंच्या चौकशीतूनही वाचला. पुढे त्यानं मार्शल झुकोव्हचीही भेट घेतली. कहर म्हणजे त्यानं एकच महायु*द्ध दोन देशांकडून लढलं आहे. त्याच्या कुटुंबानं तो परत येण्याची आशा सोडून दिली होती. मात्र, अनेक संकटांवर मात करून तो परत आला.

यु*द्धावर आधारित कुठल्यातरी फिक्शनचं कथानक असल्यासारखी ही गोष्ट वाटते ना? पण हे कथानक नसून एका सैनिकानं जगलेलं खरंखुरं आयुष्य आहे. इतकं तुफानी आयुष्य जगलेला हा सैनिक होता तरी कोण?

जोसेफ बेयर्ल हा एक अमेरिकन पॅराट्रुपर होता. १९२३ मध्ये त्याचा जन्म झाला. १९४२ साली त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्याला नास्त्रे डॅम विद्यापीठात बेसबॉल शिष्यवृत्ती मिळाली होती मात्र, ती नाकारून तो सैन्याच्या पॅराशूट इन्फंट्रीमध्ये भरती झाला. बेयर्लनं ५०६व्या पॅराशूट इन्फंट्री रेजिमेंटमधील १०१व्या डिव्हिजनमध्ये सेवा दिली. या डिव्हिजनला ‘स्क्रिमींग ईगल’ देखील म्हटलं जात असे.

जोसेफ बेयर्ल रेडिओ कम्युनिकेशन्स आणि डिमोलिशनमध्ये तज्ज्ञ होता. त्याचं पॅराशुट लँडिंगचं कौशल्य सर्वोत्कृष्ट होतं म्हणून त्याच्या साथीदारांनी त्याला ‘जंपिग जो’ असं टोपण नावही दिलं होतं.

६ जून १९४४ रोजी, नॉर्मंडीमध्ये दुसरी आघाडी उघडल्यानंतर, बेयर्लला २४ हजार इतर सैनिकांसह फ्रेंच किनारपट्टीवर तैनात करण्यात आलं. त्यावेळी तो २१ वर्षांचा होता. शत्रूच्या विमानविरोधी तोफखान्याचा सामना करता करता तो जर्मनीच्या ताब्यातील एका गावात पोहचला. तेथील एका चर्चच्या छतावर त्यानं लँडिंग केलं. त्यानं आपल्या डिव्हिजनशी पुन्हा संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आलं नाही.



तिसऱ्या दिवशी, दाट झाडाझुडूपांतून मार्ग काढत असताना जर्मन सैनिकांनी त्याला कैद केलं. इतर कैद्यांप्रमाणे, बेयर्लला हळूहळू पूर्वेकडच्या भागात नेण्यात आलं. कारण मित्र राष्ट्रांना जर्मन लोकांकडून फ्रान्सचा आणखी काही प्रदेश परत मिळाला होता.

कैदेत असताना त्यानं तब्बल तीनदा पळ काढला होता. सर्वात अगोदर नॉर्मंडी येथे त्यानं पहिला प्रयत्न केला होता. जेव्हा यु*द्धकैद्यांच्या काफिल्यावर अमेरिकन सैन्यानं गोळी*बार केला. तेव्हा त्या गोंधळात पळून जाण्यात तो यशस्वी झाला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्याला पुन्हा पकडण्यात आलं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१९४४ मध्ये पुन्हा त्यानं पोलंडमधील एका शिबिरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यु*द्धाचा असा सारीपाट खेळण्यात तो चतुर होता. कॅम्पमध्ये तो सिगारेटसाठी खेळायचा. त्यात त्यानं ४० पॅक जिंकले. मात्र, तो स्वत: सिगारेट ओढत नसे. आपल्याकडं जमा झालेल्या सिगारेट त्याने आपल्या फायद्यासाठी वापरल्या. सिगारेटचं आमिष दाखवून बेअर्लनं एका जर्मन सैनिकाला आपल्याकडं वळवण्यात यश मिळवलं आणि कॅम्पचं कुंपण तोडून पलायन केलं. पण, पळून जाण्याच्या या गोंधळात त्यानं आणि त्याच्यासोबत असलेल्या काही यु*द्धकैद्यांनी चुकीची रेल्वे पकडली. आगीतून फुपाट्यात पडल्यासारखी त्याची अवस्था झाली. कारण ती रेल्वे बर्लिनला जाणारी होती. तिथे गेल्यानंतर तो सरळ गेस्टापोच्या ताब्यात पोहचला.

त्यांनी बेयर्लचा अतोनात छळ केला. दररोजच्या मारहाणीमुळं तो मरणासन्न अवस्थेत पोहचला होता. इतकं होऊनही या पठ्ठ्यानं आपलं तोंड उघडलं नाही. जानेवारी १९४५ मध्ये, बेयर्ल पुन्हा एकदा पळून गेला. यावेळी त्यानं कचरागाडीचा वापर केला. पॅराशुटमध्ये वापरलं जाणाऱ्या होकायंत्राच्या मदतीनं तो मार्ग काढत राहिला आणि सोव्हिएत तोफखान्यात येऊन पोहचला.

त्यानं देवाचा धावा करत आपले हात वरती करून शरणागती पत्करली. कारण, पळून आला आहे म्हटल्यानंतर त्याला कुठल्याही क्षणी गोळी घातली गेली असती. सोव्हिएतच्या लाल सैन्याच्या बटालियनची कंमांडर, अलेक्झांड्रानं दुभाषाच्या मदतीनं बेयर्लशी संवाद साधला तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. का नाही बसणार? जीवघेणा छळ झालेल्या माणसानं स्वत:च्या जीवाची सुटका मागितली असती. मात्र, बेयर्लनं जिद्दीनं लाल सैन्यात सामील होण्याची इच्छा व्यक्ती केली. ‘रेड आर्मी’मध्ये भरती होऊन त्याला पुन्हा जर्मन लोकांशी लढायचं होतं!

दुर्दैवानं, त्याला जास्त काळ सोव्हिएतच्या लाल सैन्यासोबत काम करता आलं नाही. एका महिन्याच्या काळात त्यांची बटालियन एका प्रिझन कॅम्पला  मुक्त करण्यात यशस्वी झाली. याच ठिकाणी बेयर्ला कैदेत होता. त्यानंतर एक दिवस झालेल्या हवाई ह*ल्ल्यात तो जखमी झाला. लाल सैन्यातील त्याच्या साथीदारांनी पुढे बर्लिनकडं कूच केलं आणि त्याला रुग्णालयात रहावं लागलं.

रुग्णालयात दाखल असताना, त्याला चक्क मार्शल जॉर्जी झुकोव्ह (मॉस्कोमधील रेड स्क्वेअरच्या प्रवेशद्वारावर यांचा पुतळा आहे) यांनी भेट दिली. झुकोव्हनं बेयर्लला शक्य ती सर्व मदत केली. बरा झाल्यानंतर तो सुरक्षितपणे मॉस्कोतील अमेरिकन दूतावास गाठेल याची त्यांनी तजवीज केली.

रुग्णालयातून बेअर्ल मॉस्कोतील अमेरिकन दुतावासात पोहचला. मात्र, अद्याप अडचणींनी त्याची पाठ सोडलेली नव्हती. बेअर्ल यु*द्धात मारला गेला असल्याची नोंद अमेरिकेकडं होती. त्यामुळं दुतावासात आलेला व्यक्ती जर्मन हेर असल्याचा संशय अमेरिकेला होता. त्यांनी त्याला अटक करून तुरुंगात टाकलं.

तिथे चौकशीच्या अनेक फेऱ्या पार केल्यानंतर त्याला पुन्हा अमेरिकेला पाठवण्यात आलं. मायदेशी परत आल्यानंतर दोन देशांसाठी लढलेल्या या दिग्गजानं अतिशय सामान्य आयुष्य व्यतित केलं. त्यानं एका कंपनीत नोकरी स्विकारून लग्न केलं. आपल्या मुलांना आणि नातवंडांना अनेक रंजक यु*द्धकथा सांगितल्या.

१९९४ मध्ये, डी-डेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त, अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन आणि रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्तसिन या दोघांनी व्हाईट हाऊसमध्ये बेयर्लचा सन्मान केला. पुढील दहा वर्षांसाठी, बेयर्लला त्याच्या आश्चर्यकारक प्रवासासाठी आणि शीतयु*द्धानंतर दोन्ही देशांच्या सहकार्याचं प्रतीक म्हणून अमेरिका व रशिया या दोन्ही देशांमध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली. २००४ मध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

जर्मन लोकांच्या ताब्यात गेल्यानंतर आणि अतोनात छळानंतर कुणीही जगण्याची आस सोडून दिली असती किंवा शत्रूला माहिती तरी पुरवली असती. मात्र, जोसेफ बेअर्लनं शेवटपर्यंत सर्व संकटांचा सामना केला. आजही अमेरिकन आणि रशियन सैन्यामध्ये त्यांच्या धाडसाच्या गोष्टी सांगितल्या जातात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सोव्हियेत रशियाच्या एकाच रणगाड्याने ना*झींच्या २१ रणगाड्यांचा भुगा केला होता

Next Post

एका तळघरातून सुरू झालेली कंपनी जगातील सर्वात मोठी कुरिअर कंपनी बनली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एका तळघरातून सुरू झालेली कंपनी जगातील सर्वात मोठी कुरिअर कंपनी बनली

त्रावणकोर संस्थानाच्या आर्थिक विकासाला चालना देणारी महाराणी सेतू लक्ष्मी बाई

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.