The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ही आहेत दुसऱ्या महायु*द्धातील फारशी प्रसिद्ध नसलेली स्पेशल ऑपरेशन्स..!

by Heramb
23 January 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसरे महायु*द्ध हे जगातील सर्व अत्याधुनिक यंत्रणांच्या आणि उपकरणांच्या साहाय्याने लढलं गेलं असून त्यात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा मोठा वाटा आहे. यु*द्धाचा निकाल आधुनिकता, शस्त्रबलाचे प्रमाण किंवा सैन्यसंख्या अशा गोष्टींवर अवलंबून कमी प्रमाणात अवलंबून असतो. यु*द्धभूमीवर अनेक लहान लहान गोष्टींचा प्रभावदेखील प्रकर्षाने जाणवतो. दुसऱ्या महायु*द्धातही अशा अनेक लहान लहान घटनांचे मोठे परिणाम यु*द्धभूमीच्या दोन्ही बाजूंच्या राष्ट्रांना भोगावे लागले आहेत.

एक गोष्ट यु*द्धावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकते ते म्हणजे ‘हेरगिरी’. शत्रूबद्दल मिळवलेल्या गुप्त माहितीचा वापर करून त्यांचा वीक पॉईंट ओळखता येतो आणि बरोबर त्याच ठिकाणी जबरदस्त आघात झाल्यावर जिंकण्याची शक्यता वाढते. आजचे युग हे माहितीचे युग आहे. प्रत्येक ठिकाणी कोणत्या न कोणत्या स्वरूपात माहिती साठवून ठेवलेली असते. दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात मात्र माहितीचे स्रोत एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हते, त्यामुळे शत्रूबद्दल सर्व महत्वाची माहिती मिळवण्याचा आणि त्यानुसार पुढच्या योजना आखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हेरगिरी!

मित्र राष्ट्र आणि अक्ष राष्ट्र अशा दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी हेरगिरीचे अनेक प्रयत्न केले. मित्रराष्ट्रांमध्ये आपापसातही हेरगिरी होत असत. हेरगिरीच्या प्रकरणामध्ये डबल एजण्ट्सच्या घटना, एलेसा बाझना किंवा सिसेरोची गोष्ट, ब्रिटिशांची भारतीय गुप्तहेर अशा अनेक हेरगिरीच्या प्रकरणांनी दुसऱ्या महायु*द्धाची दिशा वेळोवेळी बदलली असती किंबहुना यातील काही घटनांनी दुसऱ्या महायुद्धाची दिशा बदललीही.

सहा वर्षांच्या काळात झालेल्या युद्धात संख्य हेरगिरीच्या आणि सैनिकी मोहिमा केवळ आश्चर्यकारक आहेत. यामधील एक महत्वपूर्ण मोहीम म्हणजे ऑपेरेशन मिन्समीट! ऑपेरेशन मिन्समीटसारख्याच हेरगिरीच्या आणखी चार घटनांनी दुसऱ्या महायु*द्धाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या महायु*द्धातील अशा चार स्पेशल ऑपरेशन्सबद्दल हा विशेष लेख..



ऑपेरेशन इचे

१९४३ साली, जर्मन सैन्याने आणि सरकारने बेनिटो मुसोलिनीच्या बचावासाठी ऑपरेशन इचे सुरु केले. इचे म्हणजे ‘ओक’चे झाड. इटलीवर मित्र राष्ट्रांच्या आक्र*मण केले आणि फॅसिस्ट हुकूमशहा बेनिटो मुसोलिनीची सत्ता उलथवून टाकली. मित्र राष्ट्रांनी बेनिटो मुसोलिनीला त्यानंतर अपेनिन्समधील स्की रिसॉर्ट येथे ठेवले होते.

हि*टल*रने कमांडो ऑपरेशन्समधील तज्ज्ञ ओट्टो स्कोर्झेनीला अपेनिन्समधील स्की रिसॉर्टमध्ये मित्र राष्ट्रांच्या ताब्यात असलेल्या मुसोलिनीला कोणत्याही परिस्थितीत सोडवण्याचा आदेश दिला. त्यानुसार स्कोर्झेनीने १२ सप्टेंबर १९४३ रोजी हवाई ह*ल्ला करून बेनिटो मुसोलिनीला मुक्त करण्यात यश मिळवले. यानंतर तो म्हणाला, “या कामात अयशस्वी झालो तर माझा मित्र मला सोडणार नाही हे मला माहित आहे!”

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ऑपेरेशन गनरसाईड

ऑपरेशन गनरसाइड ना*झीव्याप्त नॉर्वेमध्ये सुरु झाले. फेब्रुवारी १९४३ मध्ये, नॉर्वेजियन सैनिकांचा ब्रिटनमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक गट नॉर्वेमधील ‘वेमोर्क’ येथील ‘नॉर्स्क हायड्रो प्लांट’जवळ पॅराशूटच्या सहाय्याने उतरला. ‘नॉर्स्क हायड्रो प्लांट’मध्ये ‘हेवी वॉटर’ तयार होत होते. हेवी वॉटर अणु*बॉ*म्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख रसायनांपैकी एक आहे. या प्लान्टवर १९४० पासूनच ना*झी सैन्याचे नियंत्रण होते. हि*टल*र आपल्या आधी अ*णुबॉ*म्ब तयार करेल अशी भीती मित्र राष्ट्रांच्या सैन्याला आणि नेतृत्वाला होती.

मित्र राष्ट्रांच्या कमांडो टीमने प्लांटच्या आत प्रवेश केला आणि हेवी वॉटरच्या टाक्यांजवळ विस्फो*टके प्लांट केली. प्लांट उ*ध्वस्त झाला खरा, पण या ऑपेरेशनमुळे ना*झी सैन्याचे म्हणावे तसे नुकसान झाले नाही. या ऑपरेशनमुळे ना*झी सैन्याला अ*णुबॉ*म्बच्या बाबतीत फक्त काही महिने उशीर झाला. त्यानंतर काही महिन्यांनी नॉर्वेजियन सैनिकांनी जर्मनीकडे हेवी वॉटर घेऊन जाणारे एक जहाज उ*ध्वस्त केले. हि*टल*रला अ*णुबॉ*म्ब न मिळण्यात नॉर्वेजियन लोकांचे मोठे प्रयत्न होते. 

ऑपेरेशन ग्रिफ

ऑपेरेशन ग्रिफमध्येसुद्धा ना*झी सैन्यातील एक प्रतिभावान आणि तज्ज्ञ सैन्याधिकारी ओट्टो स्कोर्झेनीचा समावेश आहे. यु*द्धाच्या शेवटाकडे असताना हि*टल*र यु*द्ध जिंकण्याचे शेवटचे काही प्रयत्न करीत होता. हि*टल*रने ओट्टो स्कोर्झेनीला एका गुप्त मिशनवर पाठवले. मित्र राष्ट्रांच्या विजयी आत्मविश्वासामध्ये आणि संदेशवहन उपकरणांमध्ये व्यत्यय आणण्याचे ‘हर्क्युलियन टास्क’ स्कोर्झेनीला पार पाडायचे होते. 

स्कोर्झेनीने उत्तम इंग्रजी बोलणाऱ्या जर्मन सैनिकांची एक तुकडी तयार केली. या सैनिकांनी अमेरिकन सैनिकांचा युनिफॉर्म घातला होता आणि ते बनावट दस्तऐवजांसह मित्र राष्ट्रांच्या भूमीत घुसखोरी करण्यास सुसज्ज होते. वेष पालटलेल्या या जर्मन सैनिकांनी मित्र राष्ट्रांचे अनेक शस्त्रास्त्रांचे डेपो नष्ट केले.

इतकंच नाही तर त्यांनी मित्र राष्ट्रांच्या सर्व काही टेलिफोन लाईन्स नष्ट केल्या आणि मार्गदर्शक फलकांमध्ये बदल घडवून आणले. ऑपेरेशन ग्रिफचा यु*द्धावर तसा काहीच परिणाम झाला नाही. पण काही काळासाठी का होईना यामुळे अमेरिकन सैनिकांमध्ये गोंधळाची आणि द*हश*तीची स्थिती निर्माण झाली होती. अमेरिकन गणवेशातील या तथाकथित घुसखोर जर्मन सैनिकांना मृत्युदंड देण्यात आला.

ऑपेरेशन फोर्टीट्यूड साऊथ:

ऑपेरेशन फोर्टीट्यूड साऊथद्वारे मित्र राष्ट्रांनी जर्मन सैन्याला ‘कात्रजचा घाट’ दाखवला. नॉर्मंडीवर आक्र*मण करण्यापूर्वी मित्र राष्ट्रांचे हे संयुक्त आणि महत्त्वपूर्ण ऑपेरेशन होते. ब्रिटीशांच्या नेतृत्वाखालील, ऑपरेशन फोर्टीट्यूड साउथद्वारे जर्मन नेतृत्वाची चांगलीच दिशाभूल झाली. मित्र राष्ट्रांचे आक्र*मण नॉर्मंडीमध्ये नाही तर पास डी कॅलेस येथे होईल असा अंदाज ना*झी सैन्याने लावला.

या ऑपरेशनमध्ये एक बनावट सैन्य तयार करायचे होते. मित्र राष्ट्र इंग्लिश चॅनेलद्वारे आक्र*मणासाठी त्यांचे सैन्य तयार करत असल्याची खोटी माहिती जर्मन वैमानिकांना पुरवण्यासाठी या बनावट सैन्याची निर्मिती होत होती. फुगवता येतील असे बनावट रणगाडे, लाकडी लढाऊ विमाने आणि बनावट शस्त्रसाठा इत्यादी सामग्रीचा वापर या ऑपेरेशनमध्ये केला गेला.

६ जून १९४४ नंतर, मित्र राष्ट्रांनी केलेल्या नॉर्मंडीवरील आक्र*मणानंतरही, ‘नॉर्मंडीवरील आक्र*मण आपले लक्ष विचलित करण्यासाठी केलेला एक साधा ह*ल्ला आहे’ असे जर्मन सैन्याला वाटत राहावे, यासाठी ‘पास डी कॅलेस’ परिसरात ऑपेरेशन फोर्टीट्यूड साऊथ सुरुच राहिले.

या सर्व ऑपरेशन्सशिवाय, यु*द्धाची दिशा बदलली असती.

आधीही सांगितल्याप्रमाणे एखाद्या लहान-सहान गोष्टीनेही यु*द्धाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच यु*द्धभूमीवरील प्रत्येक माणूस, शस्त्र तसेच हेरांकडून मिळालेली गुप्त माहितीदेखील यु*द्धाचा निकाल बदलू शकते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एका हॉलिवूड चित्रपटातल्या पात्रावरून एक धर्म अस्तित्वात आलाय त्याचं नाव ड्युडेइझम

Next Post

विमान अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्या सहकाऱ्यांचं मांस खाऊन ते १६ लोक जिवंत राहिले होते

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

विमान अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्या सहकाऱ्यांचं मांस खाऊन ते १६ लोक जिवंत राहिले होते

प्राचीन हिंदू साहित्यातील विज्ञानावर प्रकाश टाकणारा पहिला प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणजे कार्ल सेगन

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.