The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सगळ्यांचा लाडका फर्निचर ब्रँड आयकिया एकेकाळी रोमानियातील सिक्रेट पोलिसांना फंडिंग करत होता

by द पोस्टमन टीम
11 March 2024
in विश्लेषण, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


नवीन घर बांधलं किंवा खरेदी केलं की, त्यात विविध होम ॲक्सेसरीज आणि फर्निचर घेण्याची लगबग सुरू होते. सध्याच्या काळात बहुतेक लोक एकाच ठिकाणी सर्व गोष्टी मिळतील अशा पर्यायांना प्राधान्य देतात. त्यामुळं अनेक होम ॲक्सेसरीज आणि फर्निचर ब्रँड लोकप्रिय झाले आहेत. यामध्ये आयकिया (IKEA) या ग्लोबल ब्रँडचा देखील समावेश होतो. भारतातील अनेक प्रमुख शहरांमध्ये आयकियाची भव्यदिव्य शोरूम्स आहेत.

१९४३ साली स्वीडनमध्ये स्थापन झालेली आयकिया तुमच्या घरातील प्रत्येक खोलीसाठी परवडणारी, चांगल्या प्रकारे डिझाइन केलेली उत्पादनं पुरवण्याचं काम करते. आम्ही ग्राहकांच्या कम्फर्टसाठी सतत कटीबद्ध आहोत, असं कंपनीचं म्हणणं आहे. त्यासाठी कंपनी सतत प्रयत्नशील असते, याची प्रचिती तुम्हाला आयकियाच्या एखाद्या शोरूममध्ये गेल्यानंतर येते. त्याठिकाणी पाऊल ठेवल्याबरोबर तुम्हाला समाधानकारक वाईब्स येऊ लागतात.

सध्या ग्राहकांच्या कम्फर्टसाठी प्रयत्न करणारी आयकिया एकेकाळी रोमानियातील क्रू*र कम्युनिस्ट काळात सिक्रेट पोलिसांना फंडिंग करत होती असं तुम्हाला सांगितलं तर? कदाचित अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही.

फर्निचरसारख्या गृहोपयोगी वस्तू तयार करणारी कंपनी एखाद्या राजकीय घडामोडीमध्ये सहभागी घेऊ शकत नाही, असा आपला साधारण समज असू शकतो. मात्र, ही गोष्ट एकदम खरी आहे.



आयकिया या स्वीडिश फर्निचर समूहानं १९८० च्या दशकात स्थानिक फर्निचर उत्पादकाशी केलेल्या व्यवहाराचा भाग म्हणून रोमानियन सिक्रेट पोलिसांना कोट्यावधी रुपयांचा फंड दिला होता.

आयकिया आणि रोमानियन सिक्रेट पोलिसांचा संबंध जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं पलटावी लागतील. पूर्व युरोपमधील साम्यवादाचं शेवटचं दशक अनेक पूर्व युरोपीय देशांसाठी ‘सुवर्णयुग’ मानलं जातं. परंतु, त्यापैकी सर्वात जास्त भरभराट रोमानियानं पाहिली.

कम्युनिस्ट युगात (१९४७-१९८९) रोमानियानं बर्‍याच देशांना मागे टाकलं होतं. याहूनही प्रभावी गोष्ट म्हणजे १९८० च्या दशकात रोमानिया कर्जमुक्त होण्यात यशस्वी झाला. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय बँकेचा एकही पैसा कर्ज म्हणून नव्हता. उलट रोमानियानं जागतिक महासत्तांना नाराज करणाऱ्या इतर देशांना कर्ज देण्याचं धाडस दाखवलं होतं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

जरी रोमानिया कम्युनिस्ट काळात छान दिसत असला तरी, राजकीय मंचाच्या मागे प्रचंड गोंधळ होता. तो निपटण्यासाठी गुप्त पोलिसांची एक संस्था तयार केली गेली होती. तिला ‘सिक्युरिटेट’ म्हटलं जाई. सिक्रेट पोलीस हे असे पुरुष होते जे काळजीपूर्वक निवडले गेले होते. राजकीय विरोधकांना ठार मारणं किंवा त्यांचा छळ करणं यासारखी क्रू*र कामं त्यांना दिली जात होती.

एकूणच, कम्युनिस्ट सरकारच्या विरोधात बंड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही ठार मारून कम्युनिस्ट सरकारची स्थिरता आणि नागरी लोकसंख्येमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी ही संघटना बनलेली होती. अजूनही या संस्थेला युरोपमधील सर्वात क्रूर आणि लबाड गुप्त संघटनांपैकी एक मानलं जातं. याच संघटनेला आयकियानं पैसा पुरवल्याचं निदर्शनास आलं आहे.

काही वर्षांपूर्वी बुखारेस्टमधील ‘नॅशनल कॉलेज फॉर स्टडींग द सिक्युरिटेट आर्काइव्ह्ज’मधील (CNSAS) काही क्लासिफाईड फाईल्स समोर आल्या होत्या. त्या फाईल्समधील डेटानुसार, आयकिया फर्निचर फर्मनं रोमानियामध्ये बनवलेल्या उत्पादनांसाठी जास्त शुल्क आकारण्यास सहमती दर्शविली होती. आकारलेल्या जास्त शुल्कातील काही पेमेंट सिक्युरिटेट नियंत्रित असलेल्या सिक्रेट पोलीस एजन्सीला दिलं जात असे. यावरून असं लक्षात येतं की, रोमानियन कम्युनिस्ट व्यवस्थेमध्ये आयकियाचा सहभाग होता.

या खुलाशामुळे शीतयु*द्धादरम्यान आयकियाच्या ऑपरेशन्सबद्दल नवीन प्रश्न निर्माण झाले. यापूर्वी त्यांनी पूर्व जर्मन राजकीय कैद्यांचा आपली उत्पादनं तयार करण्यासाठी वापर केल्याचंही म्हटलं जात होतं. १९८०च्या दशकात अनेक पूर्वेकडील देशांशी व्यवसाय करण्यासाठी वाढत्या मोकळेपणाचा फायदा घेणार्‍या पाश्चात्य कंपन्यांपैकी आयकिया ही एक मोठी कंपनी होती.

रोमानियासारख्या देशानं देऊ केलेल्या विलक्षण लाकूड संसाधनं आणि स्वस्त मजुरांकडे कंपनी आकर्षित झाली. याच व्यवहाराचा भाग म्हणून त्यांनी सिक्रेट पोलिसांना फंडिंग केल्याचं म्हटलं जात आहे.

समोर आलेल्या कागदपत्रांतील माहितीनुसार, १९८१ साली आयकियानं रोमानियन सरकारी लाकूड कंपनी, टेक्नोफॉरेस्टएक्सपोर्ट (Tehnoforestexport) या कंपनीसोबत करार केला होता. ज्याची किंमत त्या दशकाच्या मध्यापर्यंत सुमारे १० मिलीयन पाउंड इतकी होती. रोमानियनं सिक्युरिटेटनं या सौद्यांमधून पैसे उकळण्यासाठी ICE Dunarea नावाच्या विशेष परदेशी व्यापार कंपनीचा वापर केला होता.

मे १९८६मध्ये सिक्रेट पोलीस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं लिहिलेली नोट क्लासिफाईड फाईल्समध्ये सापडली आहे. मार्च १९८३ मध्ये त्यांना काही स्पेशल करन्सी ऑपरेशन्स कार्यान्वित करण्याचं काम देण्यात आले होतं. ज्यात आयकियासोबत केलेल्या व्यवहारातून १.८५ टक्के कमिशन गोळा करण्याचंही काम समाविष्ट होतं. यावरून गुप्त पोलीस आयकियाकडून फंड मिळवण्यासोबतच कमिशन देखील घेत होते, हे विश्लेषकांनी गृहीत धरलं आहे.

याशिवाय, आयकियानं सिक्रेट सेवेच्या ट्रान्झिटरी अकाउंटमध्ये १ लाख ६३ हजार २०१ स्वीडिश क्राउन्स (म्हणजे जवळपास १.७ करोड युएस डॉलर्स, ज्याची सध्याची किंमत ५.८ करोड यूएस डॉलर्स आहे) रक्कम हस्तांतरित केली होती, अशी माहिती एका बँक स्टेटमेंटमधून निदर्शनास आली आहे.

या निवेदनावर ‘एफ्टीमी गेलू’ नावाच्या एका व्यक्तीने स्वाक्षरी केली होती. ‘एफ्टीमी गेलू’ हे नाव त्या व्यक्तीची खरी ओळख लपवण्यासाठी वापरण्यात आलं होतं. तिचं खरं नाव कॉन्स्टँटिन अँगेलाचे असल्याचं सिद्ध झालं आहे. ही व्यक्ती सिक्रेट पोलिसांची अवर्गीकृत एजंट असल्याचं म्हटलं जातं.

क्लासिफाईड फाईल्समधील माहिती आयकियाच्या विरोधात ठोस पुरावे देत असली तरी आयकियानं रोमानियनं सिक्युरिटेटला पैसे दिल्याचं नाकारलं आहे. याबाबत आयकियानं अंतर्गत चौकशी सुरू केली. त्या वेळी कमिशनसह काम करणं ही अतिशय सामान्य बाब होती.

टेक्नोफॉरेस्ट एक्सपोर्ट हा आमचा फक्त एक व्यावसायिक भागीदार होता. आम्ही त्याच्यासोबत उत्पादनाच्या किंमती आणि दोन कमिशन स्ट्रक्चरवर काम केलं. या व्यतिरिक्त रोमानियामधील राजकीय गोष्टींशी आमचा काहीही संबंध नव्हता, अशी माहिती आयकियाचे ग्लोबल पर्चेसिंग मॅनेजर, हेन्रिक एल्म यांनी दिली होती.

आयकिया खरोखर रोमानियन सिक्रेट पोलिसांना फंडिंग देत होती की नाही, ही गोष्ट अजूनही वादाचा मुद्दा आहे. पण, आता जेव्हा केव्हा तुम्ही आयकियाच्या शोरूममध्ये जाल, तेव्हा हा लेख मात्र, तुम्हाला नक्की आठवेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

Explainer: आपल्या हक्काच्या नोकऱ्या रोबॉट्स पळवतायत का..?

Next Post

गौतम बुद्धांच्या डोक्यावर दिसणारे कुरळे केस हे केस नसून गोगलगायी आहेत

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

गौतम बुद्धांच्या डोक्यावर दिसणारे कुरळे केस हे केस नसून गोगलगायी आहेत

किंग जॉन खरोखरच इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात वाईट सम्राट होता का?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.