The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेला न कळू देता अमेरिकेने कॅनडाच्या विमानतळावरून ब्रिटनला शस्त्र पुरवले होते !

by द पोस्टमन टीम
6 February 2025
in इतिहास, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात जर्मनीच्या आक्र*मक ना*झीवादाविरोधात मित्रराष्ट्रे एक झाली होती. ब्रिटनला तर सगळ्या गोष्टींसाठी आपली दोस्त राष्ट्रे आणि जगभरात त्याच्या विखुरलेल्या वसाहती यावरच अवलंबून राहावे लागत होते. कच्चा माल असो की पक्का माल ब्रिटनला आयात करण्याशिवाय पर्याय नव्हता.

हिट*लर*ची ताकद दिवसेंदिवस वाढत होती. निम्म्याहून अधिक युरोप ना*झीवादाच्या प्रभावाखाली होता. या यु*द्धात जर्मनीसोबत इटली आणि जपान ही राष्ट्रे होती. पण, नंतर त्यांच्या विरोधात चीन, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका यांच्यासोबत इतर देशही सामील झाले. या यु*द्धाचा वणवा संपूर्ण जगभर पसरला होता. एकही देश या यु*द्धाच्या झळांपासून अलिप्त राहिला नसेल. सुरुवातीला अमेरिकेनेही अलिप्ततेचे धोरण स्वीकारले असले तरी, नंतर त्यालाही या यु*द्धात उडी घ्यावीच लागली.

अमेरिकेने अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले असले तरी, त्यांनी यु*द्धात सहभागी राष्ट्रांना शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्य पुरवण्याचे मान्य केले होते. १९३० सालच्या तटस्थता करारात त्यांनी यु*द्धापासून दूर राहण्याचे मान्य केले. फक्त त्यांना प्रत्यक्ष यु*द्धभूमीवर आपले सैनिक पाठवायचे नव्हते.

फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी यु*द्धात सहभागी होणार नाही याच आश्वासनावर १९४०ची अध्यक्षीय निवडणूक जिंकली होती. त्यांनी जनतेला आश्वासन दिले होते की आपल्या सैनिकांना कोणत्याही यु*द्धात उतरवणार नाही. जनतेने त्यांना याच कारणासाठी निवडून दिले होते. अमेरिकेने आपली तटस्थता जाहीर केली होती.

जर्मनीने ब्रिटनवर हवाई ह*ल्ले केले होते. आधीच बेटावर स्थित असलेला हा देश या ह*ल्ल्यात पुरता कोलमडून गेला. यु*द्ध शिगेला पोहोचले असताना ब्रिटनला शस्त्रास्त्रांची मदत लागणार होती. ब्रिटन आपल्या वसाहतीकडून कच्चा माल मागवत होते. अमेरिकेचा ब्रिटनला पाठींबा होताच. फक्त अँटी-कम्युनिस्ट आणि अँटी-ना*झी वातावरणामुळे सगळी समीकरणे बदलली होती.



रूझवेल्ट यांचा ब्रिटनला पाठींबा होताच. म्हणून त्यांनी ब्रिटनला शस्त्रास्त्रं खरेदीसाठी कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचे कर्ज दिले. ब्रिटनने याच रकमेतून अमेरिकेकडूनच आवश्यक ती शस्त्रास्त्रे खरेदी केली. अमेरिकेने आपली जुनी शस्त्रास्त्रे देखील तारण स्वरुपात ब्रिटनला दिली. पण, जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर ह*ल्ला केल्यानंतर मात्र अमेरिकेला यु*द्धात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा लागला.

तटस्थतेच्या कारणामुळे अमेरिका ब्रिटनला थेट शस्त्रास्त्रांचा पुरवठा करू शकत नव्हते. ब्रिटनला तर शस्त्रास्त्रांची नितांत गरज होती. ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांना फोन लावला आणि शस्त्रे पुरवण्यासाठी विनंती केली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

रूझवेल्ट यांनी अमेरिकेच्या तटस्थ धोरणाचे निमित्त करून ब्रिटनला थेट शस्त्रास्त्रे पाठवण्याचे शक्य नसल्याचे सांगितले. त्याऐवजी ब्रिटननेच ही शस्त्रास्त्रे न्यावीत अशी त्यांनी अट घातली. पण हवाई शस्त्रास्त्रे नेण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री ब्रिटनकडेही नव्हती आणि अमेरिकेहून थेट ब्रिटनला ही सामग्री पाठवणे शक्य नव्हते. म्हणून ब्रिटनने अमेरिकेला कॅनडाच्या सीमेवर ही शस्त्रास्त्रे पाठवण्याचे सुचवले.

कॅनडातून ही हवाई शस्त्रे थेट ब्रिटनला नेणे शक्य होते. अमेरिकेतून कॅनडातही ही शस्त्रास्त्रे हवाई मार्गे नेता येणार नाहीत असे अमेरिकेचे म्हणणे होते. कॅनडाच्या सीमेवर हे हवाई शस्त्रे उतरवल्यानंतर अमेरिका हा हवाई शस्त्रातील इंधन काढून घेईल आणि कॅनडाची सीमा पार केल्यानंतर ब्रिटन यात पुन्हा इंधन भरून कॅनडातून थेट ब्रिटनला ही शस्त्रे नेऊ शकते, असा पर्याय काढण्यात आला.

म्हणून अमेरिका-कॅनडाच्या सीमेवर एका शेतात त्यासाठी तात्पुरता हवाई तळ बांधण्यात आला. मग अमेरिकेने ठरल्याप्रमाणे कॅनडाच्या सीमेवर ही हवाई शस्त्रे उतरवली आणि तिथे त्यांच्यातील इंधन काढून घेतले. ही हवाई शस्त्रे कॅनडाच्या सीमेत नेण्यासाठी ब्रिटनने घोडे आणि ट्रक लावले. घोड्यांनी आणि ट्रकने खेचून ही शस्त्रे कॅनडाच्या सीमेच्या आत नेली. तिथे पोहोचल्यानंतर या सगळ्या शस्त्रांमध्ये पुन्हा इंधन भरले गेले आणि तिथून हवाई उड्डाण करून ही शस्त्रे कॅनडाच्या विमानतळावर नेली गेली. मग ती ब्रिटनला पोहोचवण्यात आली.

डार्क हाउस चित्रपटात विन्स्टन चर्चिल रूझवेल्ट यांना फोन करून मदत मागितल्याचे दाखवण्यात आला आहे. दुसऱ्या महायु*द्धावर आधारित अ यांक इन द आरएएफ या चित्रपटाचा नायक जो अमेरिकेच्या हवाई दलातील एक वैमानिक असतो, कॅनडाच्या सीमेवर ठरल्याप्रमाणे हवाई जहाज न उतरवता थेट ब्रिटनलाच घेऊन जातो असे दाखवण्यात आले आहे.

पर्ल हार्बर वरील ह*ल्ल्यानंतर मात्र अमेरिकेला तटस्थ राहण्याची गरज नव्हती. नंतर अमेरिकेने या यु*द्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला अन् ब्रिटनला थेट शस्त्रास्त्रे पुरवली. त्यामुळे परत कधी अमेरिका-कॅनडा सीमेवरील शेतातील विमानतळाचा वापर करण्याची गरज पडली नाही.

पण, यु*द्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असते असे म्हटले जाते. याही पुढे जाऊन यु*द्धात अशा अनेक आडवाटा शोधाव्या लागतात. शत्रूला मात देण्यासाठी साम दाम दंड भेद अशा सगळ्या मार्गांचा वापर करावा लागतो. ब्रिटननेही अशाच आडवाटा शोधात अमेरिकेची मदत मिळवली आणि अमेरिकेनेही केली.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गांधी ह*त्येवरील या वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकांनी पुस्तकासाठी तब्बल ३ लाख डॉलर खर्च केले होते !

Next Post

हा शास्त्रज्ञ हात धुवायला विसरला म्हणून आपल्याला साखरेला पर्याय मिळाला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

हा शास्त्रज्ञ हात धुवायला विसरला म्हणून आपल्याला साखरेला पर्याय मिळाला

विद्यापीठासाठी वर्गणी देत नाही म्हणून मालवीय यांनी निजामाची भरचौकात इज्जत काढली होती !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.