The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंपर कमाई करून देणारा पेट्रोल पंप कसा सुरु करायचा? काय आहे प्रोसेस?

by द पोस्टमन टीम
30 April 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दुसर्‍या महायु*द्धानंतर दळणवळणात कमालीची वृद्धी आणि सुधारणा झाली, परिणामी जगभरात पेट्रोलचं महत्त्व वाढलं. हा व्यवसाय सतत नफ़ा देणारा असल्याने पेट्रोलपंप व्यवसायात उतरणार्‍यांची किंवा उतरू इच्छिणार्‍यांची संख्या लक्षणीय झाली.

तुमचं स्वप्नही जर एखादा पेट्रोलपंप चालू करण्याचं असेल तर हा लेख तुमच्यासाठी मार्गदर्शक आहे-

आजच्या काळात पेट्रोलपंप हा आघाडीच्या व्यवसायांपैकी एक आहे. जगात काहीही घडलं तरी रस्त्यावरची वाहतूक थांबत नाही हे गेल्या वर्षभराच्या कोरोनाकाळातील लॉकडाऊनने आपल्याला दाखवून दिलेलंच आहे. सगळं जग बंद पडलेलं असताना वाहतूक मात्र चालूच होती. वाहतूक आली की पेट्रोल आलंच. त्यामुळेच अनेकांचं लक्ष आता या व्यवसायाकडे जाऊ लागलं आहे.

पूर्वी पेट्रोलपंप चालू करण्यासाठी ज्या परवानग्या लागत त्या मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट होती. आता मात्र ही प्रक्रिया तुलनेनं सुलभ झाल्यानं पेट्रोलपंप काढणं अगदीच सोपं बनलं आहे.

पेट्रोलपंप काढण्यासाठी सगळ्यात आवश्यक काय?

तर, तेल विपणन कंपन्यांकडून परवाना मिळविणं! सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कोणत्याही तेल विपणन कंपनीकडून (OMC) हा परवाना मिळवता येतो. यात, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प लिमिटेड (HPCL), रिलायंस पेट्रोलियम लिमि., एस्सार ऑईल लिमि., इन्द्रप्रस्थ गॅस लिमि., ऑईल ॲन्ड नॅचरल गॅस कॉर्पोर्शन लिमि. या आणि यांसारख्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे.



मात्र पेट्रोलपंप कसा चालू करायचा? त्याची काय प्रक्रिया असते, याविषयी अनेकांना माहिती नसल्यानं कोणी यात फ़ारसं पडताना दिसत नाही. भारतात पेट्रोलपंप चालू करताना काय काय करावं लागतं याविषयी-

पेट्रोलपंप डिलरशिपची ऑनलाईन प्रक्रिया पार पाडल्यानंतर तुमच्याकडे खाली नमूद केलेल्या गोष्टी, कागदपत्रं असणं आवश्यक आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पेट्रोलपंप चालू करण्यासाठीच्या योग्यता शर्ती-

वय – आवेदक हा कमीतकमी २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ५५ वर्षांचा असावा.

नागरिकत्व – आवेदक हा भारतीय नागरिक असावा. एनआरआय असल्यास त्याचं १८२ दिवसांहून जास्त वास्तव्य भारतात असायला हवं.

जन्माचा दाखला – दहावी गुणपत्रिका आवश्यक

शिक्षण – सर्वसाधारण गटासाठी १२ वी उत्तीर्ण तर SC/ST/OBC श्रेणीसाठी कमीत कमी दहावी उत्तीर्ण. शहरी क्षेत्रात पेट्रोलपंप चालू करायचा तर आवेदक पदवीधर असणं अत्यावश्यक आहे. CC2 श्रेणीअंतर्गत स्वातंत्र्यसैनिकांसाठी किमान शैक्षणिक योग्यता अट लागू होत नाही.

किमान गुंतवणूक रक्कम – ग्रामीण भागातील पेट्रोलपंपासाठी १५ लाख रुपयांपासून सुरवात होते.

कमाल गुंतवणूक रक्कम – शहरी भागात डिलरशिपसाठी किमान दोन कोटी रूपये आणि त्याहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीची गरज असते.

  1.  ग्रामीण भागातील पेट्रोलपंपासाठी आवेदकाला कमीतकमी पंधरा लाख रूपये ते वीस लाख रूपये इतक्या गुंतवणुकीची गरज असते. शहरी भागात हीच रक्कम वीस ते पंचवीस लाख रुपयांची (जर स्वत:च्या मालकीची जमीन असेल तर) गरज असते.

रोख आणि सोनं याव्यतिरिक्त फ़ंडींगचे इतर पर्याय असे – बॅन्क डिपॉझिट, बॉण्ड आणि शेअर्स, फ़िक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फ़ंड, राष्ट्रीय बचत पत्र, डाक योजना बचत खातं. (म्युच्युअल फ़ंड, बॉन्ड आणि शेअर्ससाठी केवळ ६० टक्के मूल्यावर विचार केला जातो)

अधिसूचनेनुसार अर्जदाराजवळ त्याच्या मालकीची अथवा दीर्घकाळासाठी भाडेतत्वावरची जमीन असणं आवश्यक आहे. रिटेल आऊट्लेट दोन प्रकारची असतात.

रिटेल आऊटलेट

राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर, शहरी आणि अर्ध शहरी क्षेत्रात.

ग्रामीण रिटेल आऊट्लेट

ग्रामीण क्षेत्रात जमीन मात्र राष्ट्रीय महामार्गांवर नाही. साधारणपणे ८०० ते १२०० वर्ग मीटर इतकी जागा पेट्रोलपंपासाठी पुरेशी होते.

परवाना शुल्क:

१. ‘B’/’DC’ रिटेल आउटलेटसाठी: हायस्पीड डिझेल – रुपये १६/किलो लिटर आणि मोटर स्पिरिट – रुपये १८/किलो लिटर

२. ‘A’/’CC’ रिटेल आउटलेटसाठी: हायस्पीड डिझेल – रूपये ४१/किलो लिटर आणि मोटर स्पिरिट – रुपये ४८/किलो लिटर

रेग्युलर रिटेल आऊट लेटसाठी अर्जदाराला एक हजार रुपयांचं आवेदन शुल्क भरावं लागतं. तसेच ग्रामीण रिटेल आऊट लेटसाठी १०० रुपये, SC/ST/OBC वर्गासाठी ५० टक्क्यांची सवलत दिली जाते.

पेट्रोलपंप जर शेतजमिनीवर असेल तर त्याचं गैरकृषी भूमीत (NA) रुपांतर करणं गरजेचं आहे.

कागदपत्रं आणि परवानग्या-

पेट्रोलपंप चालू करण्यासाठी इच्छुकांना काही कागदपत्रं आणि परवानग्यांची पूर्तता करणं आवश्यक असतं.

  • स्थान कागदपत्रं (व्हेरीफ़ाईड)
  • लायसन्स प्राधिकरणाचं ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
  • नगर निगम विभाग (MCD) आणि अग्नी सुरक्षा कार्यालयाची अनुमती
  • प्रमाणन आणि संबंधित अधिकार्‍यांचं ना हरकत प्रमाणपत्र (NOC)
  • पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO), राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (SPCB) आणि स्थानिक महानगरपालिकेकडून आवश्यक रवाने

जर तुम्हालासुद्धा स्वतःचा पेट्रोल पंप काढायचा असेल तर या लेखाने तुम्हाला नक्कीच मदत केली असेल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जिद्दीची गोष्ट – एका मजुराची मुलगी आता हावर्ड विद्यापीठात शिकणार आहे

Next Post

माणूस जगण्यासाठी काय काय करू शकतो याचं हा माणूस उदाहरण आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

माणूस जगण्यासाठी काय काय करू शकतो याचं हा माणूस उदाहरण आहे

द डिसायपल - एका मराठी दिग्दर्शकाच्या या चित्रपटाचं जगभर कौतुक का होतंय..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.