The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्विस बँकेत अकाउंट कसं उघडायचं..?

by द पोस्टमन टीम
20 March 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


स्विस बँकेत अकाउंट उघडायचे का हा प्रश्न विचारल्यावर लोक एकतर बिथरतात अथवा त्यांना त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते. स्विस बँक म्हटली की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचे रॅकेट. स्विस बँक ही चित्रपटात अथवा बातम्यांमध्ये दाखवतात तशी नसून ही जगातील सर्वात जास्त उत्तम बँक व्यवस्थापनाचे प्रतीक आहे.

तुम्हालाही घरी बसल्या बसल्या स्विस बँकेत अकाउंट काढता येतं. फक्त त्यासाठी तुम्हाला काही अटी मान्य कराव्या लागणार आहेत. इथे बँक खाते उघडायला तुमच्या जवळ माहिती आणि अधिकृत कागदपत्रे असणे फार गरजेचे आहे.

स्विस बँक ही काही एक बँक नसून स्वित्झर्लंड या देशातील बँकिंग कायदे ज्या बँकांना लागू आहेत, त्यांना स्विस बँक म्हटले जाते. यू.एस.बी ग्रुप, क्रेडिट ससी ग्रुप, जुलिएस बेयर ग्रुप या बँकांना स्विस बँक म्हणून ओळखले जाते.

स्विस बँकेत खाते उघडण्यासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. भारतीय बँकिंगचे जे कायदे आहेत त्याहून फारच वेगळे कायदे स्विस बँकेत आहेत. स्विस बँकेत आपण स्विस फ्रॅंक, डॉलर, युरो अथवा स्टार्लिंग या वेगवेगळ्या करन्सीमध्ये गुंतवणूक करू शकतो. एकवेळ स्विस बँकेतील खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली की मिनिमम बॅलन्स ठेवणे बंधनकारक ठरते. या बॅलन्सची रक्कम बँक निर्धारित करते.

स्विस बँकेत अकाउंट निवडण्यापूर्वी तुम्ही कशाप्रकारची इन्व्हेस्टमेंट करू इच्छित आहात, हे सुनिश्चित करा. जर तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीची चिंता असेल तर भारतात शाखा असलेल्या कुठल्याही बँकेचे चयन करू नका. जर स्विस बँक भारतात असेल तर ती इतर बँकांप्रमाणे एकाच कायद्याचा कक्षेत येईल.



तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही किती पैसे जमा कराल यावरून तुमच्या अकाऊंटची नोंदणी करण्यात येईल. तुम्ही जेवढी मोठी गुंतवणूक कराल, तितकं मोठं सेव्हिंग्ज अकाउंट तुम्हाला देण्यात येईल. तुम्ही स्विस बँकेत सेफ डिपॉझिट पण उघडू शकतात.

तुम्ही स्विस बँकेत ठेवलेल्या रकमेच्या आधारावर तुम्हाला इंटरेस्ट पण मिळेल आणि तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. जर समजा तुम्ही इतर देशातील चलनाच्या आधारावर स्विस बँकेत अकाउंट उघडले तर तुम्ही जास्त इंटरेस्टची कमाई करू शकतात.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अकाउंट उघडणे अत्यंत सोपे असून ई-मेल अथवा फॅक्सच्या मदतीने सहजपणे अकाउंट उघडता येते. अनेक खाजगी संस्था देखील या बँकेत अकाउंट उघडून देण्यासाठी मदत करत असतात. स्विस मनी लॉंड्रिंग कायद्यानुसार पैशाच्या स्रोताची माहिती बँकेला द्यावी लागते. बँकेत खाते उघडण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो, टॅक्स रिटर्न, व्यवसायाचे पेपर्स, डिपॉझिट प्रूफ, डिपॉझिट स्लिप, चेक आणि बर्थ सर्टिफिकेट इत्यादी गोष्टींची गरज पडते.

सर्व डॉक्युमेंटसवर नोटरीची सील असणे बंधनकारक आहे. या नोटरीला स्विस बँक अपोस्टील म्हटले जाते. प्रत्येक कागद अपोस्टील असणे फार गरजेचे आहे.

नंबर अकाउंट हा एका गुप्त खात्याचा प्रकार आहे. यात खातेधारकाचे नाव नसते पण नंबर अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला स्वतःला बँकेत जावं लागतं. या अकाउंटमध्ये तुम्हाला ७० लाख रुपये भरावे लागतात व महिन्यागणिक ही रक्कम वाढवंत रहावी लागते. या अकाउंटसाठी वर्षाकाठी २० हजार रुपये इतका खर्च येतो. हे बँक खाते पुर्णपणे गुप्त नसते. बऱ्याचदा याचा डेटा लिक होत असतो.

स्विस बँकेतून पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. पण या बँकेत तुम्हाला तुमच्या गरजेनुसार दुप्पट पैसे क्रेडिट कार्डमध्ये खर्च करावे लागतात, तरच तुम्हाला ते वापरता येते. याला क्रेडिट कार्ड सिक्युरिटी डिपॉझिट म्हटले जाते. बऱ्याचदा लोक या सिक्युरिटी डिपॉझिटच्या रकमेचे फंड, बाजारात गुंतवून पैसे कमावतात.

स्विस बँकेतून तुम्हाला हवी तितकी रक्कम तुम्ही काढू शकतात. सरकारचे त्यावर कुठलेच बंधन नाही. इतकंच नाही तुम्ही तुमच्या पासबुकचे रेकॉर्ड देखील मिटवू शकतात.

बँक ट्रान्सफरची प्रोसेस ही इतर बँकेप्रमाणेच अकाउंट ते अकाउंट पद्धतीची आहे. परंतु पैशांची देवाणघेवाण केल्याने तुमचे बँकेत अकाउंट असल्याचे जाहीर होते, यामुळे स्विस बँक बऱ्याचदा बँकेच्या नावाने देवाणघेवाण करतात. परंतु ही पद्धत फक्त स्वित्झर्लंडपुरता मर्यादित आहे.

स्विस बँकेचे चेकबुक बाळगणे हे देखील एक अग्निदिव्य आहे. या चेकबुकमुळे तुमची गुप्त माहिती बाहेर येण्याचा धोका असतो. कुठलाच स्विस बँक खातेधारक चेकबुकचा वापर करत नाही.

स्विस बँकेतील खाते बंद करणे हे देखील एक सोप्पे काम आहे. यासाठी फक्त तुम्हाला एक अर्ज बँकेत करावा लागतो. यानंतर काही दिवसातच बँक तुमचे अकाउंट बंद करते.

हॉंगकॉंग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन अर्थात एचएसबीसी ही एक मोठी बहुराष्ट्रीय बँक आणि फायनान्स सर्व्हिस कंपनी आहे. यांचे मुख्यालय लंडन येथे आहे. ही जगातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. जगभरातील ८५ देशात या बँकेच्या ७२०००हुन अधिक शाखा आहेत. या बँकेचे एकूण ४० लाख ग्राहक आहेत.

या बँकेत खाते उघडण्यासाठी प्रति महिना ७५,००० रुपये रक्कम बँकेत असणे गरजेचे असते. या बँकेत बहुतांश श्रीमंत ग्राहक असतात.

एचएसबीसी ही भारताप्रमाणे स्वित्झर्लंडमध्ये देखील असून या बँकेत खाते उघडण्यासाठी तुम्हाला फक्त फोन कॉल करावा लागतो. बँकेचा प्रतिनिधी घरी येऊन तुमच्याकडून फॉर्म भरवून घेतो आणि घरी येऊन रक्कम घेऊन जातो. हे पैसे जिनेव्हा आणि दुबईचा बँक खात्यात जमा होतात. अशाप्रकारे विदेशात न जाता घरी बसून सहजपणे खाते उघडता येते. या बँकेचे व्यवहार देखील घरबसल्या करता येतात.

व्यवहार करण्यासाठी जिनेव्हा येथील एका बँक प्रतिनिधीचा नंबर ग्राहकाला देण्यात येतो. पैसे जमा करण्यासाठी त्या व्यक्तीला फोन करावा लागतो आणि बँकेचा प्रतिनिधी स्वतःहून पैसे घेऊन जातो. जर रक्कम रुपयात देण्यात आली असेल तर ती समोर खात्यात स्विस डॉलरच्या रुपात जमा होते. जर बँकेतुन पैसे काढायचे असतील तर प्रतिनिधी स्वतः घरी पैसे आणून देतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या एसपीजी गार्ड्सची नेमणूक कशी करण्यात येते ?

Next Post

पाकिस्तानचे चार रणगाडे उ*द्ध्वस्त करत २१व्या वर्षी हौतात्म्य पत्करणारे अरुण खेत्रपाल

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पाकिस्तानचे चार रणगाडे उ*द्ध्वस्त करत २१व्या वर्षी हौतात्म्य पत्करणारे अरुण खेत्रपाल

भटकंती - पुण्याजवळच्या या मंदिरातल्या भिंतींवर रामायण, महाभारत कोरलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.