The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या फेव्हरेट स्वीप शॉटवर बंदी घालायची मागणी गोलंदाजांनी ICCकडे केली होती

by द पोस्टमन टीम
11 April 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


क्रिकेटच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत या खेळत बरेच बदल झाले. कधी क्रीडा नियामक मंडळांनी हे बदल केले तर कधी खेळाडूंच्या वेगळ्या स्टाईलला क्रिकेट जगतात मान्यता मिळाल्याने हे बदल क्रिकेटचा एक अविभाज्य भाग बनले.

स्वीप शॉट हा असाच एक शॉट आहे, जो पूर्वी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये खेळला जात नव्हता, तरीही आज हा शॉट क्रिकेटमधील एक असामान्य शॉट बनला आहे.

१९२० साली पहिल्यांदा भारतातील एका स्थानिक सामन्यात हा शॉट खेळला गेला होता. भारतीय खेळाडू दिलीप सिंह याने मुंबईच्या संघाकडून पारसी संघाविरुद्ध खेळताना याचा पहिल्यांदा वापर केला.

त्याकाळी या शॉटला क्रिकेटमध्ये अधिकृत मान्यता नव्हती किंवा असा शॉटही खेळला जात नव्हता. क्रिकेट हा खेळ तेव्हा तर भारतीयांसाठी अगदी नवा होता. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या शॉटवरही फारशी चर्चा झाली नाही.

१९६० च्या दशकानंतर मात्र लोकांमधील क्रिकेटचे वेड चांगलेच वाढत होते. क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलत होता. १९६४ साली पाकिस्तानी खेळाडू मुश्ताक अहमदने जेव्हा हा शॉट खेळला तेव्हा मात्र या शॉटची खूप चर्चा झाली. या शॉटमुळे मुश्ताक अहमदही लोकप्रिय झाला. इंग्लडविरुद्धच्या सामन्यात त्याने हा शॉट खेळला होता.



या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानसमोर मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य ठेवले होते. दोन्ही बाजूंनी स्पिनर बॉलिंग करत होते. फलंदाजांना बॉलिंगचा अंदाज येत नव्हता. अशावेळी बॉलरला गुगली देण्यासाठी मुश्ताक अहमदने बॅट उलटी फिरवली. त्याने अशा बाजूला बॉल मारला, ज्या बाजूला कोणी फिल्डिंग करत नव्हते. जिकडे फिल्डर नाही तिकडे बॉल मारल्यास धावा करण्यास जास्त वाव मिळेल या कल्पनेने मी बॅट उलटी फिरवली, असा खुलासाही त्याने दिला होता. तेव्हापासून क्रिकेटमध्ये रिवर्स स्पीप शॉटला मान्यता मिळाली.

गोलंदाजी करणाऱ्यांना चकवा देण्यासाठी हा शॉट एकदम सही असला आणि प्रेक्षकांनाही हा शॉट पाहताना मजा येत असली तरी, हा शॉट मारणे वाटते तितके सोपे नाही. हा शॉट मारण्यासाठी वेळेचे अचूक गणित जुळावे लागते. हा शॉट खेळल्याने गोलंदाजाची लय बिघडून जाते.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

विशेषत: आक्र*मक गोलंदाजावर दडपण आणण्यासाठी हा शॉट खेळला जातो.

हा शॉट खेळणे सर्वांनाच जमते असे नाही. कारण, यासाठी कठोर परिश्रम आणि सरावाची गरज असते. बॅट उलट्या दिशेला फिरवण्यासाठी मनगट मजबूत आणि लवचिक असावे लागते. हा खेळ खेळताना कधीकधी फलंदाज आउट होण्याचीही शक्यता असते. मनगट उलट्या दिशेला फिरवावे लागत असल्याने, कधी कधी दुखापत होण्याची शक्यता असते. म्हणूनच खूप कमी खेळाडू हा शॉट खेळण्याचे धाडस करतात.

मुश्ताक अहमदनंतर जावेद मियांदाद देखील अनेकदा हा शॉट खेळला आहे. आयपीएलमध्येही हा शॉट बऱ्याचदा खेळला गेलेला तुम्ही पाहिला असेल. आयपीएलमध्ये कमी कालावधीत जास्तीत जास्त धावा काढण्याचे आव्हान असते त्यामुळे तिथे हा शॉट जास्त प्रमाणात खेळला जाऊ लागला.

अनेकदा सामन्याचा निकाल फिरवण्यातही या शॉटचे योगदान राहिले आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांची फिरकी घेण्यासाठी किंवा त्याला चकवा देण्यासाठीही हा शॉट खेळला जाऊ लागला. अनेकदा शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठीही हा शॉट खेळला जाऊ लागला. या शॉटमुळे अनेकदा पंचही बुचकळ्यात पडतात.

श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यान २०१२ साली झालेल्या क्रिकेट सामन्यात असाच प्रसंग उद्भवला होता. इंग्लंडचा फलंदाज केविन पीटरसनने सलग हा शॉट मारून श्रीलंकन गोलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले होते. या सामन्यात केविनने शतक ठोकले होते. परंतु अनेकांनी त्याच्या या शॉटबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

गोलंदाजांनी अनेकदा आयसीसीकडे या शॉटवर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे.

सध्या ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज एबी डीविलीयार्स हे दोन खेळाडू उत्तम रिवर्स स्वीप शॉट खेळतात. वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेललाही तुम्ही अनेकदा हा शॉट खेळताना पहिले असेल. भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्माने या शॉटसाठी बरीच मेहनत घेऊन सराव केला आहे. इतर खेळाडूंच्या तुलनेत त्याचे हा शॉट खेळण्यातील कसब वाखाणण्याजोगे आहे.

आपल्या खेळात काही तरी नाविन्य आणण्यासाठी अनेकदा खेळाडू वेगवेगळे प्रयोग करतात आणि त्यातूनच या खेळात काही नवे शॉट आणि बॉलिंग प्रकारांचा समावेश होत आला आहे. रिवर्स स्वीप शॉटच्याबाबतही हेच घडले आहे.

या खेळात आजपर्यंत अनेक नवनव्या तंत्राचा वापर होत आला आहे, ज्यामुळे या खेळातील नाविन्य आणि उत्सुकता टिकून राहिले आहे. कदाचित क्रिकेटने असे नवनवे बदल आत्मसात केल्यामुळेच क्रिकेटची लोकप्रियता इतर खेळापेक्षा थोडीशी वरचढ राहिली असेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

डान्सिंग प्लेग – त्या रात्री एक अख्खं शहर शब्दशः नाचून नाचून मेलं होतं

Next Post

सायमन गो बॅक, छोडो भारत हे नारे या क्रांतिकारकाने दिले होते

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

सायमन गो बॅक, छोडो भारत हे नारे या क्रांतिकारकाने दिले होते

आजच्या तंत्रज्ञानाचा पाया रचणाऱ्या 'निकोला टेस्ला'च्या माहित नसलेल्या गोष्टी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.