The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या मुस्लिम यो*द्ध्याने ख्रिश्चनांकडून जेरुसलेम ताब्यात घेतले होते, पण…

by द पोस्टमन टीम
9 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मध्ययुगात प्रत्येक आशिया खंडातील बहुतांश देशांनी इस्लामी राजवटींचा क्रू*रतेचे दर्शन घेतले. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी काही इस्लामी शासकांनी आपल्या शौर्य आणि औदार्य या दोन्ही तत्त्वांचा वापर केला, या शासकांपैकी एक होता, मुस्लिम शासक सलाहुद्दीन अय्युबी.

११३७ साली इराकच्या टिकरीत शहरातील एका कुर्दिश सुन्नी परिवारात सलाहुद्दीन अय्युबीचा जन्म झाला. सुल्तान अल नासिर सलाहुद्दीन अय्युबी यूसुफ इब्न अय्युब हे त्याचे पूर्ण नाव होते. लहानपणापासून त्याला धर्मशास्त्र आणि धार्मिक ग्रंथ वाचण्याची आवड होती. त्याने कुराणच्या बरोबरीने खगोल विज्ञान, गणित आणि कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक तरुण सैनिक म्हणून तो आपल्या राज्याच्या सैन्यात सामील झाला.

सलाहुद्दीनने त्याचे काका असद-अल-दिन शिखोह यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते. त्याकाळी ते जेगीद साम्राज्याच्या सैन्य तुकडीचे सेनापती होते. आपल्या काकाकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर सलाहुद्दीनला लहानमोठ्या लढायांमध्ये शौर्य दाखवण्याची संधी मिळत होती. त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले. त्याच्या उत्तम कामगिरीच्या बळावर त्याला पुढे सैन्याच्या मोठ्या मोहिमांच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.

सलाहुद्दीनचे शौर्य आणि यु*द्धाची रणनीती बघता, ११६९ साली त्याला सैन्याचा सेनापती बनवण्यात आले. पुढे सलाहुद्दीनचे काका शिकाखोहचे निधन झाल्यानंतर सलाहुद्दीनला काहिरा येथे फातिमिद राजवंशाच्या खलिफाने आपला वजीर म्हणून नियुक्त केले.

त्याने वजीर बनल्यानंतर फातिमिदच्या साम्राज्याला कमजोर केले, त्याने फातिमिदच्या पायदळाला नष्ट करून आपल्या स्थितीला सुधारले. ११७१ साली सलाहुद्दीनने फातीमिदच्या साम्राज्याचा शेवट केला आणि स्वत:ला बगदादचा खलिफा घोषित केले.



११७४ साली सीरियाच्या उत्तर मेसोपोटेमियाचे नेते नूर अल दीन याच्या मृत्यूनंतर सलाहुद्दीनने स्वतःचे एकछत्री अंमल प्रस्थापित केले. या काळात सिरियावर जेनगिदसचे राज्य होते. पण राजाच्या अकाली मृत्यूमुळे जेनगिदस एका अल्पवयीन शासकाच्या ताब्यात गेली. या अल्पवयीन शासकाचा सलाहुद्दीनने सहजपणे बिमोड केला. या बळावर त्याने संपूर्ण सिरियावर आपले राज्य प्रस्थापित केले. सिरियावर विजय संपादन केल्यानंतर सलाहुद्दीनने इजिप्तच्या संपत्तीचा वापर सुरु केला. त्याने या बळावर उत्तरेकडील ख्रिस्ती शासकांचा राज्यांचा पाडाव करण्यास सुरुवात केली.

यु*द्धात जिंकलेल्या संपत्तीचा उपयोग सलाहुद्दीनने अनेक शाळा, रुग्णालय आणि विविध संस्थांची निर्मिती केली. या बरोबरच त्याने सामाजिक न्यायाची देखील व्यवस्था केली होती. ११७४ सालापासून ११८७ पर्यंत लढण्यात आलेल्या अनेक यु*द्धांमध्ये सलाहुद्दीनने विजयश्री मिळवली. आलेप्पो, दमास्कस आणि मोसुल येथे त्याने साम्राज्यविस्तार केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आपल्या साम्राज्यात त्याने आपल्या नातेवाईकांनाच अनेक मोठंमोठी पदे बहाल केली आणि अय्युबी साम्राज्याची स्थापना केली. सलाहुद्दीन अय्युबीचे हे साम्राज्य जास्त काळ टिकले नाही, काही काळाने ख्रिस्ती शासकांची क्रुसेडर सेना सलाहुद्दीनच्या साम्राज्याचा सर्वनाश करण्यासाठी त्याच्या सीमेवर येऊन पोहचली.

क्रुसेडर सैन्य ही जगातून मुस्लिमांचा नायनाट करायला निघालेल्या ख्रिस्ती राज्यकर्त्यांची फौज होती.

११८७ मध्ये इस्लामिक आणि क्रुसेडर सैन्यात हातिनचे यु*द्ध झाले. या युद्धात सलाहुद्दीनने आपल्या रणनीतीच्या बळावर क्रुसेडर सैन्याला धूळ चारली. हातिनच्या यु*द्धात विजय संपादन केल्यानंतर सलाहुद्दीनसाठी क्रुसेडरच्या जेरुसलेम शहराचे दरवाजे उघडले. यावेळी सलाहुद्दीनने जेरुसलेमच नाहीतर आसपासच्या अनेक शहरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

प्रतिकूल परिस्थिती असली तरी क्रुसेडरचे सैन्य मागे हटले नाही आणि सलाहुद्दीनविरोधात यु*द्ध करत राहिले. तिसऱ्या क्रुसेड यु*द्धाचे नेतृत्व स्वतः इंग्लंडचा राजा रिचर्ड करत होता. यु*द्धात पराभव झाल्यानंतर सलाहुद्दीन याने राजा रिचर्ड याच्याशी सामंजस्य करार केला. जेरुसलेम मुस्लिमांच्या ताब्यात राहील या अटीवर सलाहुद्दीनने करार केला.

जेरुसलेम शहरावर जसे सलाहुद्दीनचे राज्य आले, तसे तेथे राहणाऱ्या ख्रिस्ती लोकांच्या मनात भीती वाढू लागली. त्यांना वाटत होते की सलाहुद्दीन त्यांचा सर्वनाश करेल. पण सलाहुद्दीन याउलट त्याच्या प्रती उदार व्यवहार ठेवला. त्याने एक खरा मुसलमान काय असतो, याचा आदर्श प्रस्तुत करत ख्रिश्चनांना मोकळेपणाने जगण्याचा हक्क दिला. एवढंच काय पण, ११९२ साली राजा रिचर्ड जेव्हा आजारी पडला होता. त्यावेळी सलाहुद्दीन याने स्वतः एक चिकित्सक राजाकडे पाठवला होता.

सलाहुद्दीनच्या मैत्रीपूर्ण व्यवहाराने इस्लाम आणि ख्रिस्ती जगताचे संबंध सुधारण्यास मदत झाली. ११९३ साली ५७ व्या वर्षी सलाहुद्दीनचे निधन झाले. मुस्लिम साम्राज्याच्या विस्तारासाठी त्याने केलेले कार्य हे निश्चितच महत्त्वपूर्ण होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इंग्लंडचा प्रिन्स शून्यावर बाद झाला आणि क्रिकेटमध्ये ‘डक’ आला..!

Next Post

आपण सर्रास खात असलेल्या या ‘टॅबलेट’मुळे गिधाडांची प्रजाती नामशेष होतेय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आपण सर्रास खात असलेल्या या 'टॅबलेट'मुळे गिधाडांची प्रजाती नामशेष होतेय

सोमालियाच्या गल्लीबोळात कॅप्टन जॅक स्पॅरो सापडतात..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.