The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आयबीएम’ नसतं तर हि*टल*रच्या तावडीतून लाखो ज्यूंचा जीव वाचला असता..!

by द पोस्टमन टीम
17 July 2024
in इतिहास, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगातील सर्वांत मोठं सामूहिक ह*त्याकांड म्हणून दुसऱ्या महायु*द्धात झालेल्या ज्यूंच्या ह*त्येकडं पाहिलं जातं. ना*झी हुकूमशाह हि*टल*रने हे ‘हॉलोकॉस्ट’ घडवून आणलं होतं. यामध्ये तब्बल ६० लाख ज्यूंना मारलं गेलं होतं. हे संपूर्ण ह*त्याकांड अत्यंत थंड डोक्याने, आणि पूर्णपणे नियोजन करुन पार पाडलं गेलं; ज्यामुळे ते अधिक भीषण ठरलं. जर्मनीमधून ज्यू आणि इतर अल्पसंख्यांक लोकांना इतर आर्यवंशीय लोकांमधून वेगळं काढून, ठराविक ठिकाणी एकत्र गोळा करुन, विविध प्रकारे त्यांची ह*त्या करण्यात आली होती.

या हॉलोकॉस्टसाठी सहा टप्प्यांमध्ये तयारी करण्यात आली होती. असं म्हणतात, की टेक्नॉलॉजीची मदत मिळाली नसती, तर हे सहा टप्पे राबवणं ना*झींसाठी कठीण आणि किचकट ठरलं असतं. मात्र एका मोठ्या संस्थेच्या मदतीनं हे काम सोपं झालं. ही कंपनी आजही सुरू आहे, आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी याबाबत ऐकलंही असेल. या संस्थेचं नाव आहे – आयबीएम!

इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्परेशन (आयबीएम) ही जगातील सर्वांत मोठी कम्प्युटर हार्डवेअर, मिडलवेअर आणि सॉफ्टवेअर बनवणारी (आणि विकणारी) संस्था आहे. मेनफ्रेम कम्प्युटर्सपासून अगदी नॅनोटेक्नॉलॉजीपर्यंतचं संशोधन या संस्थेमार्फत केलं जातं. १९११ साली अमेरिकेत सुरू झालेली ही संस्था आज जगातील १७०हून अधिक देशांमध्ये पसरली आहे. याला ‘बिग ब्लू’ या नावानेही ओळखलं जातं.

दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात, जर्मनीतील ‘डेहोमॅग’ नावाची कंपनी आयबीएमसाठी काम करत होती. तब्बल १२ वर्षांपर्यंत डेहोमॅग (पर्यायाने आयबीएम) ही ना*झी जर्मनीसोबत काम करत होती.

२००१ साली प्रकाशित झालेल्या ‘आयबीएम अँड हॉलोकॉस्ट’ या पुस्तकामध्ये एडविन ब्लॅक यांनी याबाबत खुलासा केला होता. आतापर्यंत ४० देशांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. ब्लॅक यांनी सात देशांमधून मिळवलेल्या तब्बल २० हजार कागदपत्रांच्या आधारे आयबीएमने हि*टल*रची मदत केल्याचा आरोप आपल्या पुस्तकामध्ये केला आहे. विशेष म्हणजे, २०१५ साली या पुस्तकाची नवी आवृत्ती समोर आली होती. या आवृत्तीमध्ये त्यांनी आणखी काही ‘पुरावे’ जोडले होते. हॉलोकॉस्टच्या सहा टप्प्यांना राबवण्यासाठी आयबीएमने कशा प्रकारे मदत केली, याबाबत सविस्तर माहिती या नव्या आवृत्तीमध्ये दिल्याचं ब्लॅक यांनी स्पष्ट केलं होतं.



आयबीएमचा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस वॉटसन सीनियर याने हि*टल*रच्या उदयापासूनच ना*झी जर्मनी (थर्ड रेईच) सोबत चांगले संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती. हि*टल*रप्रमाणेच महत्त्वाकांक्षी असलेला वॉटसन आपल्या प्रगतीसाठी आणि फायद्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार होता. हि*टल*रशी हातमिळवणी आपल्याला फायद्याची ठरू शकते म्हणूनच त्यानं हे पाऊल उचललं होतं. ना*झी सरकारकडून आयबीएमला देण्यात येणाऱ्या प्रत्येक कंत्राटामध्ये वॉटसनला ठराविक हिस्सा मिळत होता. तसेच, १९३७ साली हिटलरच्या हस्ते बर्लिनमध्ये त्याचा सन्मानही करण्यात आला होता.

आयबीएमने नेमकं असं काय केलं होतं, की एवढ्या मोठ्या प्रमाणात न*रसं*हार करणं हि*टल*रला शक्य झालं? या संहाराबाबत आयबीएमला कितपत कल्पना होती? आयबीएम नसतं, तर हॉलोकॉस्टवर काय परिणाम झाला असता?

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

हे हॉलोकॉस्ट ‘आयडेंटिफिकेशन’, ‘एक्सक्लुजन’, ‘कॉन्फिस्केशन’, ‘घेट्टोइझेशन’, ‘डिपोर्टेशन’ आणि ‘एक्सटर्मिनेशन’ अशा सहा टप्यांमध्ये पार पडलं. यापूर्वीच्या पुराव्यांमध्ये आयबीएमचा केवळ वर-वरचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. मात्र, २०१५च्या पुराव्यांमध्ये आणखी भीषण माहिती समोर आली.

पहिला टप्पा होता ‘आयडेंटिफिकेशन’. ज्यूंचा संहार करण्यासाठी आधी जर्मनी, युरोप आणि देशभरात किती आणि कोणते ज्यू आहेत हे माहिती असणं गरजेचं होतं. यासाठी अर्थातच नोंदवह्या पुरेशा ठरणार नव्हत्या. एवढा मोठा डेटा गोळा करणं आणि साठवून ठेवण्यासाठी कम्प्युटरची गरज होती. मात्र, तशा प्रकारचं तंत्रज्ञान त्या काळी सहजपणे उपलब्ध नव्हतं.

मात्र, आजच्या आपल्या ‘आधार कार्ड’प्रमाणे अमेरिकेच्या जनगणना विभागाकडे ‘पंच कार्ड’ प्रणाली उपलब्ध होती. आयबीएमने हे तंत्रज्ञान चोरलं, आणि ना*झी जर्मनीला दिलं. यातूनच ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी’चा उदय झाला. या पंच कार्डमुळे एखाद्या परिसरात किती घरांमध्ये ज्यू राहतात, त्या घरांमध्ये किती सदस्य आहेत, त्यांचं वय काय, ते काय करतात अशी सगळी माहिती एका झटक्यात उपलब्ध होत होती.

या कार्डमध्ये माहिती भरण्यासाठीही आयबीएमनेच पुढाकार घेतला होता. आयबीएमने नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी जनगणना केल्याप्रमाणे घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची माहिती (विशेषतः त्यांचा वर्ण आणि धर्म) घेतली.

यानंतर या सर्वांना अक्षरशः रस्त्यावर आणण्यासाठीची सर्व माहिती हि*टल*रकडे जमा झाली होती. आयबीएमने तयार केलेल्या विविध सॉफ्टवेअर्सच्या मदतीने ज्यू लोकांच्या नोकरीबाबत, आर्थिक परिस्थितीबाबत वेगवेगळे डेटाबेस तयार करण्यात आले. या डेटाबेसच्या मदतीने कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांपैकी केवळ ज्यू लोकांना लक्ष्य करणं सोपं गेलं. यासोबतच, ‘एक्सक्लुजन’ म्हणजेच ज्यू वगळता इतर लोकांना या कारवाईपासून दूर ठेवणं; आणि ‘कॉन्फिस्केशन’ म्हणजेच ज्यू लोकांची संपत्ती आणि मालमत्ता जप्त करणं हे सगळंही या डेटाबेसमुळं जलदगतीनं आणि एकाच वेळी मोठ्या प्रमाणात करता आलं.

पुढचा टप्पा होता ‘घेट्टोइझेशन’. ‘घेट्टो’ म्हणजे ज्यू वसाहती. कोणत्या परिसरात किती ज्यू राहत आहेत, या माहितीवरुन त्यांना वसाहतीत नेण्यासाठीची योजना आखणं ना*झींना सोपं झालं. यानंतरचा टप्पा होता ‘डिपोर्टेशन’. ज्यू लोकांना घेट्टोंमधून गॅस चेंबरपर्यंत, वा ज्या ठिकाणी त्यांना मारण्यात येणार आहे त्या ठिकाणापर्यंत विशेष रेल्वे गाड्यांनी नेण्यात आलं होतं. यासाठी कोणत्या रेल्वेमध्ये किती जण असणार, ते कोण असणार ही सगळी माहिती पंचकार्डच्या मदतीने घेण्यात येत होती. तसेच, एका ट्रेनने चेंबरपर्यंत लोक पोहोचवल्यानंतर, दुसरी ट्रेन यायच्या आत तिथल्या मृतदेहांची विल्हेवाट लावली जाणं आवश्यक होतं. यासाठी आयबीएमने रेल्वेच्या वेळापत्रकासाठीही विशिष्ट सॉफ्टवेअर तयार केलं होतं.

ओरॅनाईनबर्गमध्ये असणाऱ्या विशेष ‘टी-बिल्डिंग’मध्ये हा सर्व डेटा ठेवण्यात आला होता. या डेटाला ठेवण्यासाठी आणि सर्व सॉफ्टवेअर्ससाठी आयबीएमने खास वेगळ्या प्रकारचे कम्प्युटर आणि मशीन्स बनवून घेतल्या होत्या. ना*झींना आपली ही योजना पार पाडण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे हे लक्षात घेऊन या मशीन्स बनवण्यात आल्या होत्या. एकंदरीत आपण काय करत आहोत, आणि त्याचा काय परिणाम होणार आहे हे माहिती असूनही आयबीएम हे सर्व करत होतं, असा आरोप ब्लॅक यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, हे पुस्तक प्रकाशित झाल्याच्या २० वर्षांनंतरही आयबीएमने यातील एकही गोष्ट अमान्य केली नाही, किंवा बदलण्यास सांगितले नाही. त्यामुळेच हे सगळं खरं असल्याचं स्पष्ट होतं, असं ब्लॅक म्हणतात.

ब्लॅक म्हणतात, की आयबीएमच्या हॉलरिथ मशीन्स या पंच कार्डशिवाय वापरणं अशक्य होतं. त्याकाळी एक पंच कार्ड हे एकाच वेळी वापरता येत होतं. त्यामुळे आयबीएम सातत्यानं पंच कार्डचा पुरवठा करत राहिलं. जर आयबीएमने पंच कार्डचा पुरवठा केला नसता, तर या सर्व मशीन्स गोळ्या नसलेल्या बंदुकांप्रमाणे निरुपयोगी ठरल्या असत्या.

आयबीएमने मदत केली नसती, तर हॉलोकॉस्ट टळला असता असं नाही. न*रसं*हार करणं हि*टल*रचं ध्येय होतंच. त्याने ते कसंही केलंच असतं. मात्र, आयबीएमच्या मदतीमुळे हे वेगात आणि मोठ्या प्रमाणात झालं. असं असलं, तरी आयबीएम कधीही ‘ना*झीवादी’ वा अन्य कुठल्याही विचारसरणीला पाठिंबा देणारी नव्हती. हा सगळा केवळ व्यापाराचा भाग होता. लाखो लोकांचा जीव जाण्यासाठी केवळ वॉटसनची पैशांची हाव कारणीभूत होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सबंध युरोपला धडकी भरवणारा ‘अत्तिला हूण’ आजवरच्या सर्वात क्रू*र शासकांपैकी एक होता

Next Post

सायकलच्या उत्क्रांतीचा इतिहास मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासा इतकाच इंटरेस्टिंग आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

सायकलच्या उत्क्रांतीचा इतिहास मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासा इतकाच इंटरेस्टिंग आहे

चित्रपट, वेबसिरीज डाउनलोड करायला टोरंट वापरणे गुन्हा आहे का..? जाणून घ्या..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.