The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Explainer – बिटकॉइन मायनिंग पर्यावरणाला हानिकारक का ठरत आहे..?

by द पोस्टमन टीम
14 February 2025
in गुंतवणूक, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


विनिमयाचे सर्वसामान्य साधन म्हणजे चलन. कायद्याचा पाठिंबा व लोकांचा विश्वास या आधारे समाजात चलन वापरले जाते. सर्वग्राह्यता हा कोणत्याही चलनाचा प्रमुख गुण. माणसाची जशी प्रगती व्हायला लागली तशा त्याचा गरजा वाढायला लागल्या. सगळ्या वस्तू काही माणूस एकट्याने निर्माण करू शकत नव्हता त्यामुळे गरजांच्या पूर्ततेसाठी माणूस दुसऱ्यावर अवलंबून राहू लागला. या करता वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात आली. पण कालांतराने वस्तू विनिमय पद्धती ही अडचणीची होऊ लागली. म्हणून चलन वापरायला सुरुवात झाली.

सुरुवातीला जनावरांचा उपयोग चलन म्हणून झाला, नंतर धान्याचा उपयोग, मग समुद्रातील शंख, शिंपले चलन म्हणून वापरण्यात आले. धातूंचा शोध लागल्यानंतर धातूंचा उपयोग हा चलन म्हणून करण्यात आला. युरोपमध्ये चौदाव्या शतकापासून सोने व चांदी हे दोन्ही धातू चलन म्हणून वापरण्यास सुरुवात झाली.

१८६१ साली अमेरिकेने कागदी चलनाचा वापर सुरू केला. सुरुवातीच्या काळात कागदी चलनाला आधार म्हणून कागदी चलनाच्या समतुल्य सुवर्णसाठा मध्यवर्ती बँकेत ठेवला जाई. हे कागदी चलन सुवर्णात परिवर्तनीय होते. म्हणजे कुणालाही कागदी चलनाचा बदल्यात मध्यवर्ती बँकेकडून सोनं मिळत असे. पण १९२९ च्या जागतिक मंदीनंतर ही पद्धत बंद झाली. आज बहुतांश देशात नियंत्रित चलनव्यवस्था आहे. कोणत्याही देशाचं सरकार राष्ट्राच्या अर्थकारणाला पूरक असंच चलनविषयक धोरण आखत असतं.

बिटकॉइन (Bitcoin) ही एक डिजिटल करन्सी आहे. फक्त बिटकॉइन (Bitcoin) हे ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology) वर आधारित असल्यामुळे या चलनाला भौतिक स्वरूप नाही. चलनाला भौतिक स्वरूप नाही याचा अर्थ तुम्ही त्याला स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. बिटकॉइन (Bitcoin) हे एक पूर्णपणे आभासी चलन आहे. 

बिटकॉइन (Bitcoin) च्या व्यवहारात सरकारला किंवा बँकेला हस्तक्षेप करता येत नाही. या बिटकॉइन (Bitcoin) चा शोध सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) याने २००८ साली लावला. २००९ साली त्याने बिटकॉइनचा पहिला व्यवहार केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्यक्तीचं नाव फक्त लोकांना माहिती आहे त्याला कुणीही पाहिलं नाही. आता जशी नोटांची छपाई एखाद्या शासकीय छापखान्यात होते तसे हे बिटकॉइन (Bitcoin) नक्की तयार तरी कुठे होतात? तर हे बिटकॉइन (Bitcoin) बनवण्याच्या प्रक्रियेला बिटकॉइन मायनिंग (Bitcoin Mining) असं म्हणतात. बिटकॉइन मायनिंग ही प्रक्रिया बिटकॉइन सॉफ्टवेअरचा उपयोग करून केली जाते.  जो व्यक्ती बिटकॉइन मायनिंग (Bitcoin Mining) करतो त्याला मायनर (Miner) असं म्हणतात.



आता एखादा माणूस म्हणेल की अरे वाह म्हणजे आपण आपल्याला पाहिजे तितके पाहिजे तेवढे बिटकॉइन (Bitcoin) तयार करू शकतो. तर तुम्ही चुकता आहात, कारण बिटकॉइन सॉफ्टवेअरची नवीन बिटकॉइन तयार करण्याची मर्यादा ही फक्त 21 मिलियन एवढीच आहे. आता हल्ली बिटकॉइन मायनिंग (Bitcoin Mining) हा स्पर्धात्मक व्यवसाय झाला आहे. त्यामुळे जशी जशी मायनरची संख्या वाढत जाईल तसं तसं या क्षेत्रात बिटकॉइनच्या माध्यमातून मिळणारा फायदा हा कमी होत जाईल.

आपण बिटकॉइन (Bitcoin) म्हणजे काय हे समजून घेतलं. आता बिटकॉइन मायनिंग (Bitcoin Mining) ही प्रक्रिया काय आहे व कशी केली जाते ते आता समजून घेऊ.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

बिटकॉइन मायनिंग (Bitcoin Mining) प्रक्रियेसाठी मायनर हे उच्च दर्जाचे संगणकांचा वापर करतात. क्रिप्टोग्राफीच्या(Cryptography) आधारावर बिटकॉइन मायनिंग (Bitcoin Mining) केलं जातं. या प्रक्रियेत ब्लॉकचेन एक पब्लिक लेजर (Public Ledger) शेअर करतो. आता पब्लिक लेजर (Public Ledger) म्हणजे नक्की काय? तर बिटकॉइनचा वापर करून जे कोणते व्यवहार केले गेले आहेत त्या सर्व व्यवहारांची नोंद ज्या ठिकाणी केली जाते त्याला पब्लिक लेजर (Public Ledger) असं म्हणतात. या पब्लिक लेजरमध्ये सर्व बिटकॉइन नेटवर्क असतात.

आता येऊया मूळ प्रश्नाकडे मायनर हे बिटकॉइन तयार कसे करतो? 

तर मायनरला बिटकॉइन बनवण्यासाठी क्लिष्ट अशी गणितीय व क्रिप्टोग्राफीक समीकरणे सोडवावी लागतात. ही क्लिष्ट गणितीय व क्रिप्टोग्राफीक समीकरणे सोडवण्यासाठी उच्च दर्जाचे संगणक व संगणकीय बुद्धिमत्ता लागते. एकदा का मायनरने हे क्लिष्ट गणितीय व क्रिप्टोग्राफीक समीकरणे सोडवली की मायनर त्याला ब्लॉकच्या स्वरूपात रेकॉर्ड करतात. ही क्लिष्ट गणितीय व क्रिप्टोग्राफीक समीकरणे अचूक सोडवली आहेत की नाही हे इतर कॉम्प्युटरद्वारा तपासणी केली जाते.

जर मायनर हे ब्लॉक्स पूर्वी अस्तिवात असलेल्या ब्लॉकचेनमध्ये जमा करू शकले तर त्यांना रिवॉर्ड (Reward) दिला जातो. आता मायनरला रिवॉर्ड मिळतो म्हणजे नक्की त्याला काय मिळतं? तर, रिवॉर्ड मिळतो म्हणजे त्या मायनरला काही बिटकॉइन बक्षीस म्हणून दिले जाते, उदाहरणार्थ जर तुम्ही मायनर असाल आणि तुम्ही एखादं क्लिष्ट गणितीय व क्रिप्टोग्राफीक समीकरण सोडवलं तर तुम्हाला बक्षीस म्हणून 6 बिटकॉइन तुमच्या खात्यात जमा होतील. आताच्या काळात बिटकॉइन मायनिंग (Bitcoin Mining) ही प्रक्रिया फार खर्चिक आणि स्पर्धात्मक झाली आहे.

आता हे बिटकॉइन खरेदी करायचे असतील तर ते कसे करायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जेव्हा बिटकॉइन नुकताच २००९ साली बाजारात आला होता तेव्हा त्याची किंमत फक्त 10 अमेरिकन सेन्ट्स एवढी होती. आज तुम्हाला भारतीय रुपयाच्या बदल्यात बिटकॉइन घेतला तर तुम्हाला त्याकरता 27 लाख रुपये मोजावे लागतील. ही रक्कम फार मोठी आहे व सामान्य माणसाला एक बिटकॉइन खरेदी करणे सोपे नाही. त्यासाठी बिटकॉइनचे छोटे भाग केले गेले व बिटकॉइनच्या या छोट्या भागाला सातोशी असे एकक देण्यात आले आहे. एक अख्खा बिटकॉइन न घेता त्याचा छोटा भाग सातोशी खरेदी करणे तुम्हाला परवडेल. बिटकॉइन खरेदीसाठी तुम्ही बिटकॉइनची विक्री करणाऱ्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की हे विकत घेतलेले बिटकॉइन ठेवायचे कुठे? तर हे बिटकॉइन तुम्ही वेगवेगळ्या बिटकॉइन वॉलेटमध्ये (Bitcoin Wallet) ठेऊ शकता.

हल्लीच्या काळात माणसासमोर जगासमोर असलेल्या असंख्य प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा आणि दुसरा प्रदूषणाचा प्रश्न. जर आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला जर निरोगी व चांगले आयुष्य जगायचे असेल तर कार्बन फुटप्रिंट कमी करणे गरजेचे आहे. आता कार्बन फुटप्रिंट म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ. कार्बन फुटप्रिंट म्हणजे एखादी व्यक्ती, घटना, संस्था, किंवा वस्तू यामुळे उत्सर्जित होणाऱ्या हरितवायू कार्बन डायओक्साइडचं समतुल्य प्रमाण. जागतिक तापमानवाढ आणि कार्बन डायओक्साइड उत्सर्जनाचा थेट संबंध आहे.

आता तुम्ही म्हणाल की कार्बन फुटप्रिंट आणि बिटकॉइनचा काय संबंध? तर या दोन्ही गोष्टींचा काय संबंध आहे हे समजून घेऊ. बिटकॉइन तयार करण्यासाठी बिटकॉइन मायनिंग ही प्रक्रिया केली जाते. बिटकॉइन मायनिंगसाठी लागतात उच्च दर्जाचे संगणक, त्या संगणकांचे सेटअप करण्यासाठी भरपूर पैसे व जागा लागते. आता हे उच्च दर्जाचे कॉम्प्युटर सतत चालू ठेवायचे झाले तर ते तापतील त्यामुळे त्या कॉम्प्युटर्सना थंड करण्यासाठी एक कूलिंग सिस्टीम बसवली असते जी चालू ठेवण्यासाठी पण भरपूर पैसे लागतात.

यावरूनच लक्षात येईल की बिटकॉइन मायनिंग काय एका माणसाचं काम नाही. आज बिटकॉइन मायनिंग करण्यासाठी मोठं मोठ्या कंपनीज भले मोठे डेटा सेन्टर्स उभे करतात. हे डेटा सेन्टर्स चालवण्यासाठी त्यांना भरपूर विजेची गरज असते आणि हे डेटा सेन्टर्स अशा देशात उभे केले जातात जिथे या कंपन्यांना वीज स्वस्तात दिली जाते. यामुळे या कंपन्यांना आर्थिक फायदा तर होतो पण या बिटकॉइन मायनिंगमुळे दोन नवीन समस्या निर्माण होतात. एक म्हणजे या बिटकॉइन मायनिंगमुळे विजेचा वापर वाढल्याने प्रदूषण वाढत जातं व त्यामुळे त्या भागाचा कार्बन फुटप्रिंट वाढतो आणि दुसरं म्हणजे बिटकॉइन मायनिंग करताना उच्च दर्जाच्या कॉम्पुटर्सना भरपूर प्रमाणात चिप्सची गरज असते व यामुळे खराब झालेल्या चिप्सची संख्या वाढते व इ-वेस्टची समस्या निर्माण होते.

यावर तोडगा काय आहे?

बिटकॉइन मायनिंगचा संबंध हा उर्जेशी आहे या ऊर्जेचा संबंध प्रदूषणाशी आहे. त्यामुळे जगात ज्या भागात जास्त प्रमाणात बिटकॉइन मायनिंग होतं तिथे विजेचे दर प्रचंड प्रमाणात वाढवले पाहिजेत, नवीन बिटकॉइन मायनिंग जिथे सुरू झाले आहे तिथे तात्पुरती स्थगिती लावली पाहिजे आणि वारंवार जर सूचना देऊनही त्याचं पालन झालं नाही तर कंपन्यांच्या डेटा सेन्टर्सवर जप्ती आणून तिथली सर्व सामग्री बंद केली पाहिजे. जगाला आणि प्रत्येक देशाला भौतिकदृष्टीने प्रगती करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवले पाहिजेत पण हे उपक्रम राबवताना पर्यावरणाची हेळसांड होणार नाही ही काळजी देखील घेतली पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

Explainer: सेमीकंडक्टर चिप्स काय असतात? त्यांनी जागतिक राजकारणात धुमाकूळ का घातलाय?

Next Post

सेबीने NSEच्या माजी CEO चित्रा रामकृष्ण यांना का दंड ठोठावला; तो रहस्यमय ‘योगी’ कोण आहे?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

सेबीने NSEच्या माजी CEO चित्रा रामकृष्ण यांना का दंड ठोठावला; तो रहस्यमय 'योगी' कोण आहे?

Explainer: युक्रेन 'नाटो'मध्ये सहभागी होऊ नये यासाठी रशिया एवढे प्रयत्न का करीत आहे?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.