आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
काश्मीरचा विचार केला की डोळ्यांसमोर उभी राहते तिथली नयनरम्य निसर्ग संपन्नता आणि त्याचबरोबर उभी राहते इतिहासाच्या पानांत दडलेली एक भयानक, माणुसकीला काळीमा फासणारी घटना. आज तीन दशके उलटून गेल्यानंतरही, काश्मीरी पंडितांचा झालेला न*रसं*हार कोणताच भारतीय विसरू शकलेला नाही.
संपूर्ण जगाला या हिं*सक घटनेतून, समोर आलेल्या मनुष्य जातीच्या क्रू*रतेने हादरवून सोडले. वृध्द, बालक, तरुण कोणालाही त्या नराधमांनी सोडले नाही. हाताला येईल त्याचा खू*न करायचाच, हे ठरवूनच ह*ल्ला घडवून आणला होता. काश्मीरच्या त्या अलगाववादाच्या आगीत कित्येक घरे होरपळून गेली, कित्येक मुलं अनाथ झाली, स्त्रियांवर, मुलींवर सामूहिक बला*त्कार घडले, क*त्तली घडल्या.
घाटीच्या गल्ल्या, रस्ते पंडितांच्या रक्तानी, किंकाळ्यांनी भरून गेल्या. लहानपणापासूनचे शेजारी असलेले, भाऊ-बंधू म्हणून सोबत वाढलेलेच जेव्हा आपल्या रक्तासाठी हपापतात तेव्हा काय होतं हे काश्मीरी पंडितांपेक्षा दुसरं कोणीही समजू शकणार नाही.
पंडितांच्या बाबतीत या अलगाववादी आणि कट्टरपंथी घटना १९८७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात घडायला सुरुवात झाली. या निवडणुकीत फारूक अब्दुल्ला यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती.
नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? का बालमित्रांनीच आपल्या सवंगड्यांच्या रक्ताचे पाट वाहिले? या लोकांच्या मनात इतका राग कोणी व का भरवून दिला? याबद्दल थोडे जाणून घेऊया.
१९ सप्टेंबर १९८९ रोजी पंडित आणि राजनैतिक कार्यकर्ते, टीका लाल टपलू यांची, त्यांच्याच राहत्या घरासमोर काहींनी गोळ्या झाडून ह*त्या केली. कोणाला साधी कल्पनाही नसलेल्या त्या न*रसं*हाराची हीच पहिली पायरी होती. या नंतर घाटीतील परिस्थिती झपाट्याने चिघळत होती. दिवसेंदिवस घाटीतील पंडितांचे जीवन खडतर होत चालले होते.
एक दिवस, जानेवारी महिन्यात घाटीतील मशिदीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमू लागली. मोठमोठाले जत्थे मशिदीमध्ये जमू लागले. मशिदींमध्ये जमलेल्या त्या लोकांना “पंडित हे भारत सरकारचे एजंट आहेत” हे सांगून भडकवण्यात आले. भारताविरूद्ध व निरपराध पंडितांविरूद्ध, घाटीतील मुसलमान रस्त्यांवर उतरले आणि भरपूर नारेबाजी झाली. पण परिस्थिती हाताबाहेर जायला फार वेळ लागला नाही. नाऱ्यांवरून शस्त्रांपर्यंत गोष्टी कधी पुढे गेल्या कोणालाच कळले नाही.
“पंडितांनी धर्मांतर करून आम्हाला साथ द्यावी किंवा घाटी सोडून निघून जावे” अशा शब्दांत त्यांना धमकावण्यात आले.
आता आपण इथे राहू शकणार नाही हे लक्षात आल्याने पंडित तिथून पलायन करू लागले. पण घाटी सोडून जाणाऱ्या पंडितांनासुद्धा शांतपणे जाऊ न देता, रक्ताच्या भुकेल्या, दिशाभुल करून दिलेल्या धर्मांध, भरकटलेल्या मुस्लिम जमावाने त्यांच्या क*त्तली करणे सुरू केले.
जवळपास आठ लाख पंडित आपल्या हक्काच्या घरून पलायन करून, त्यांना सुरक्षित वाटणाऱ्या जम्मू व पंजाब येथे आपल्याच देशात शरणार्थी बनले. काहींनी दिल्लीची निवड केली. आपल्या जीवनभराची मेहनतीने कमावलेली पुंजी, इस्टेट, उभारलेले व्यवसाय सगळ्यांवर पाणी सोडून पंडितांना घाटी सोडण्यास भाग पाडण्यात आले.
कित्येक पंडितांची निर्घृणपणे ह*त्या करण्यात आली, हाताला लागलेल्या कित्येक मुली व स्त्रियांवर सामूहिक बला*त्कार करण्यात आले त्या आकड्याची कुठेही नोंद नाही. पण हे अ*त्याचार घडवून आणणाऱ्या कोणावरही कुठलीच कार्यवाही झाली नाही, साधी केससुद्धा झाली नाही. या ह*त्याकांडात न्यायाधीश नीलकंठ गंजू, टेलिकॉम इंजीनियर बालकृष्ण गंजू, दूरदर्शन निर्देशक लसा कॉल, सामाजिक नेता टीकालाल टपलू यांसारख्या प्रतिष्ठित लोकांची ह*त्या केली गेली. जिथे ही मोठी माणसंच सुरक्षित राहिली नाही तिथे सामान्य लोकांच्या जीवाचा तर प्रश्नच उरत नाही.
परिस्थिती चिघळलेली पाहता तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी भारतीय सेना बोलावून घेतली. सेनेच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे पंडितांना होणारा त्रास थोडा का होईना कमी झाला. नाही तर जे घडले त्याहून विदारक आणि भयानक कृत्य घडले असते. जितके पंडित या अ*त्याचारातून बचावले तितकेही बचावले नसते. स्त्रियांसाठी व मुलींसाठी परिस्थिती अजूनच जीवघेणी ठरली असती.
त्या मन विषण्ण करणाऱ्या घटनेनंतरसुद्धा काश्मीरी पंडितांचे जीवन सुरळीत झाले असे नाही. ज्या ठिकाणी पंडितांनी आसरा घेतला होता तिथे त्यांना भेदभावाला सामोरे जावे लागले.
काश्मीरमधील अनंतनाग येथील सरला भट या तरुणीने करिअर म्हणून नर्सिंग निवडले होते. श्रीनगरमधील प्रतिष्ठित शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील तिच्या दिनचर्येत तिचे समर्पण दिसून येत होते. तिच्या सौम्य स्पर्शाने तिच्या रुग्णांना बरं वाटत असे. ती फक्त करायची म्हणून नोकरी करत नव्हती, तर खऱ्या अर्थाने सेवा देत होती.
१४ एप्रिल १९९० रोजी जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या कट्टरपंथी जिहा*दींनी तिला तिच्या वसतिगृहाच्या खोलीतून बाहेर काढले. चार दिवस, या २५ वर्षीय तरुणीवर अपहरणकर्त्यांनी सामूहिक बला*त्कार केला. १९ एप्रिल रोजी सरला भटचा विद्रूप मृतदेह श्रीनगरच्या मध्यभागी आढळला. त्यावर गोळ्यांच्या जखमा, क्रू*र छळाच्या खुणा आणि तिला “पोलिसांना माहिती देणारी” असे लेबल असलेली एक हस्तलिखित चिठ्ठी होती. रुग्णालयात अति*रेक्यांवर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिल्याच्या निराधार आरोपांवरून तिला देशद्रोही ठरवण्यात आले.
तिचे वडील शंभूनाथ भट यांनी अनंतनागमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना द*हश*तवाद्यांनी धमकी दिली आणि स्थानिकांना दूर राहण्याचे आदेश दिले. “आम्ही विधी पूर्ण करत असताना, दोन तरुणांनी आम्हाला थांबवून परत जाण्यास सांगितले,” असे कुटुंबाचे शेजारी इंदू बुशन झुत्शी त्यांच्या आठवणींमध्ये सांगतात.
अशीच अजून एक घटना.
काश्मीरच्या बंदीपोरामधील एक हिंदू-पंडित मुलगी – गिरीजा टिकू, या काश्मीरमधील एका शाळेत लॅब असिस्टंट म्हणून काम करत होत्या. जेव्हा काश्मीरमधील हिंदूंवर हा भ्याड ह*ल्ला सुरु झाला, तेव्हा अनेक काश्मिरी हिंदू जम्मू आणि देशाच्या इतर भागांमध्ये वास्तव्यास गेले. त्यांच्यापैकी गिरीजा टिकू आणि त्यांचं कुटुंब देखील होतं. एके दिवशी गिरीजा यांना काश्मीरमधून फोन आला की इथली परिस्थिती आता निवळली आहे, त्यांनी ज्या शाळेत काम केले होते तिथून पगार घेण्यासाठी आणि आपलं काही सामान घेण्यासाठी यावं.
माहितीवर विश्वास ठेवून त्या शाळेत गेल्या, पण परतीच्या प्रवासात त्यांना माहित नव्हते की त्यांचा पाठलाग केला जात आहे. त्यांचे अपहरण झाले आणि त्यांना अज्ञात ठिकाणी आणलं गेलं. अपहरणानंतर काही दिवसांनी, त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला भयानक अवस्थेत आढळला. शवविच्छेदनात असे दिसून आले की त्यांच्यावर क्रू*रपणे छळ व सामूहिक बला*त्कार झाला होता. त्या जिवंत असतानाच सुतारकामात वापरल्या जाणाऱ्या मेकॅनिकल करवतीने त्यांच्या शरीराचे मध्यभागातून दोन तुकडे करण्यात आले होते.
समाजातून होत असलेल्या टीकेने त्यांचे जीवन जगणे असह्य झाले होते. शाळा, दवाखाने, बँक, सार्वजनिक ठिकाणे सगळीकडेच त्यांना भेदभावाला, मुळ रहिवाशांच्या द्वेषाला सामोरे जावे लागत होते.
विस्थापित झालेल्या पंडितांची ज्या शिबिरांमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती, तिथेही काही खास सुविधा उपलब्ध नव्हती. स्वच्छता, सुरक्षितता यांच्या दृष्टीने ती शिबिरे कमकुवत होती. ५०,००० हून अधिक पंडित तर त्या शिबिरांमध्ये असलेल्या साप व विंचवांच्या दंशाने मरण पावले.
आज त्या घटनेला ३० हून अधिक वर्षे होऊन गेली तरीही प्रत्येक काश्मीरी पंडितांच्या मनात अजूनही त्या जखमा ओल्याच आहेत. परिस्थिती पूर्वापार कधीच होऊ शकणार नाही याची त्यांनी पूर्ण कल्पना आहे. पण जीवन तर सुरूच राहते त्यामुळे त्या कटू आठवणी मागे सोडून पुन्हा जीवनाची गाडी समोर नेण्याचे प्रयत्न करत राहणे मनुष्याचे कर्तव्य आहे या धोरणाला अनुसरून पंडित आपले जीवन व्यतीत करत असून हळूहळू उन्नतीकडे वळत आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.








